Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

जास्तच जास्त महिला आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. आपला पती आणि मुलं यांची ते चांगली काळजी घेतात. मात्र या धकाधकीत त्या आपल्याकडेच पाहायला विसरतात.
अनेक महिला म्हणतात की मला स्वत:च्या आरोग्याकडे पाहायला वेळ नाही. मात्र आपल्यासाठी काही साधे आणि सहज असे उपाय आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचं फिटनेस कायम ठेऊ शकतात.

रिसर्चने लक्षात आलं आहे की, झोप कमी झाल्यानेही वजन वाढतं. झोप कमी झाल्याने सारखी चिडचिड होत असते.

तणावाशी संबंधित हार्मोन्स शरीराचं पाणी प्रमाणापेक्षा जास्त वाढवतात. त्यामुळे वजन वाढते आणि तुमची झोप होत नाही, तुम्ही व्यायाम करायलाही कंटाळा करतात आणि वजन वाढत असते.

नॉन व्हेज जेवणात खूप सारे पोषक तत्त्व असतात. मात्र तेवढय़ा प्रमाणात फॅटस्ही त्यात दिसून येतात. या उलट साधी पोळी भाजी खाल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. तुमच्या खाण्यात दाळ, हिरवा भाजीपाला जरूर मोठय़ा प्रमाणात असला पाहिजे.

नारळ पाण्यात फॅटस् आणि कॅलरी अजिबात नसते, त्यात अतिरिक्त वजन वाढत नाही. दही आणि दुसरे डेअरी प्रॉडक्टस खातांना लो फॅट ऑप्शन्स आहेत, त्यांना ट्राय करायला हरकत नाही.

चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाण्याचे आणखी दहा फायदेदेखील आहेत…

* शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते – पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृद्यविकाराचा धोका संभवतो.

* वजन घटवण्यास मदत होते – एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.

* रोगप्रतिकारशक्ती वाढते –आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.

* मधुमेहींसाठी गुणकारी – पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव होतो.

* डोळ्यांचे आरोग्य सुधारते – पपईमध्ये व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्‍यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.

* सांधेदुखीपासून आराम मिळतो – पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.

* पचन सुधारते- आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे हे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्‍यता असते. अशावेळी पपई खाल्ल्याने अरबट-चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते.

*मासिक पाळीचा त्रास कमी होतो- अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे.

* कर्करोगापासून बचाव होतो- पपईमधील ऍन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते.

* ताण-तणाव कमी होतो – दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.

अल्कोहलचे अती सेवन आरोग्यासाठी नुकसानदायक असतं, परंतू याची मसाज आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जाणून घ्या याचे 5 सर्वोत्तम फायदे:

* शारीरिक मेहनतीनंतर स्नायूंमध्ये होणार्‍या वेदना अल्कोहल मालिशने दूर होतात. वेदना होत असलेल्या भागावर मसाज करून तासाभरासाठी तसेच राहू द्या नंतर धुऊन टाका.

*त्वचा किंवा नखांवर होणार्‍या बुरशीवर हे खूप प्रभावी आहे. कापसाचा बोळा यात बुडवून संबंधित भागावर लावा आणि वाळेपर्यंत तसेच राहू द्या. धुण्याची घाई करू नका.

* हलक्या जखमेवर अल्कहोलचा प्रयोग केल्याने जखम लवकर बरी होते. हे संबंधित भागेवर अँटीबायोटिकप्रमाणे काम करेल आणि जखम लवकर बरी करण्यात मदत करेल.

*केवळ त्वचा नव्हे तर केसांमध्येही याची मसाज केल्याने फायदा मिळू शकतो. बियर केसांना नरम आणि चमकदार बनविण्यात मदत करते.

*उष्णतेसाठी अल्कोहल मसाज फायदेशीर आहे. याने मसाज केल्यावर आपल्याला त्वचेत उष्णता जाणवेल.

कोणतेही मोड आलेले कडधान्य शरीराला उपयु्रत ठरते. डॉक्टर सांगतात की, कडधान्ये खा. किंवा मोड आणून त्याची भेळ करुन खा. ही टेस्टी भेळ खाण्यास मजाही येते आणि लहान मुले तर यामुळे निरोगी राहतात. त्यात मेथी हा प्रकार तर हेल्दी आहे. आणि मोड आणलेली मेथी म्हणजे दुधात साखर. इतका उत्तमआणि निरोगी पदार्थ आहे.

मोड आलेली मेथी फायदेशीर असते. मधुमेहाच्या आजार कमी करण्यासाठी ही उपयुक्त ठरते. वजनाची चिंता असणार्‍यांना मोड आलेले पदार्थ विशेष फायद्याचे ठरतात. दिवाळी होऊन गेली की प्रत्येकाला वाढणार्‍या वजनाची, ब्लडप्रेशरची आणि कोलेस्टेरॉलची काळजी वाटू लागते गोड पदार्थ खाण्याचा मोह कुणाचा सुटत नाही परिणाम वजन वाढते. मग ते कमी करण्यासाठी अट्टहास सुरु होतो. यावर उपाय म्हणजे मेथी. मेथीचे लाडू बाळंतिणीसाठी आरोग्यदायी असतात. बाळंतिणीला मेथीचे लाडू देतात. पण मेथीचे लाडू कडू लागतात. म्हणून सगळे खायला काचकूच करतात. मेथीला मोड आणले आणि ती वेगवेगळ्या पदार्थांत वापरली तर कडू लागत नाही आणि फायदाही होतो. मोड आलेल्या मेथीचे पुष्कळ फायदे आहेत.

* वजन कमी करण्यास मदत होते.

* मधुमेह नियंत्रणात राहातो.

* कोलेस्टेरॉल कमी होते.

* पचनास मदत होते.

* छातीतील जळजळ कमी होते.

* काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये उपयु्रत.

* बाळंतिणीचे दूध वाढते. यासाठी मेथीचे लाडू किंवा हळीवाचे लाडू देतात.

* महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मेथी उपयु्रत ठरते.

* यामध्ये भरपूर लोह असल्याने महिलांसाठी फायदेशीर ठरते.

* सौंदर्य प्रसाधन म्हणूनही मेथीचा वापर केला जातो.

* केसांच्या समस्येवर मेथी उपयु्रत ठरते. मेथ्या मिक्सरला लावून दह्यामध्ये रात्री भिजत घालावे. केसांना अर्धा तास मॉलिश करावे. अर्धा तासाने केस धुतल्यास केस तजेलदार आणि चमकदार दिसतात.

कोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन वेगाने घटत असेल तर ते सामान्य किंवा गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. कोणत्याही प्रयत्नांशिवाय आहे, त्या दिनचर्येत तर वेगाने वजन घटू लागले तर ते आरोग्याच्या असमतोलाविषयी संकेत देत असते. त्याकडे दुर्लक्ष अजिबातच नको. आरोग्याच्या समस्यांमुळे जर व्यायाम, जिम न करता, आहारात कोणतेही बदल न करता दोन-तीन महिन्यांत व्यक्तीचे वजन 5-6 किलोने कमी होऊ शकते. वजनात वेगाने घट होत असेल तर साध्याशा आजारापासून ते गंभीर आजारापर्यंत कोणत्याही आजाराचे संकेत यातून मिळत असतात.

मधुमेह : मधुमेहाची समस्या असेल तर सुरुवातीला वजन अचानक घटू लागते. रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते, तेव्हा वजन घटते. वजन घटते शिवाय थकवा, लघवी करताना घाम येणे, रात्री झोपताना घाम येणे यासारखी लक्षणे मधुमेहाच्या सुरुवातीला दिसू शकतात.

थायरॉईड : थायरॉईडच्या समस्येमुळे अचानक वजन कमी होऊ शकते. सर्वाधिक समस्या ही ओव्हर अ‍ॅक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी म्हणजे हायपर थायरॉईडिझममुळे होते. त्याशिवाय मनोवस्थेत बदल, गिळण्याची समस्या, थकवा, श्वास घेण्यात समस्या आणिघाम येणे हीदेखील लक्षणे दिसतात.

कर्करोग : कर्करोग हा घातक आजार जर वेळेवर याचे निदान झाले नाहीत तर हा आजार घातक आणि जीवघेणा ठरु शकतो. कर्करोगाने पीडितांचे वजन वेगाने कमी होते. वजन कमी होत असताना दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर ही कर्करोगाची लक्षणे आहेत.



क्षयरोग : टीबी किंवा क्षयरोग झाल्यासही वजन झपाट्याने कमी होते. क्षय रोगाचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे सतत दोन आठवडे खोकला येतो. क्षयरोग मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोलिस जीवाणूंमुळे होतो. वजन कमी होण्याबरोबरच छातीत वेदना, रात्री झोपताना घाम येणे, थकवा इत्यादी प्रमुख लक्षणे दिसतात.

तणाव : तणाव हा व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक आजारांचे ते एक कारण आहे. तणावामुळे रात्री झोप लागत नाही, तसेच वेगाने वजन घटते. त्यासाठी मेडिटेशन आणि योग करण्याची गरज आहे.

एचआयव्ही - एड्‌सः एचआयव्ही ही लैंगिक संबंधातून होणारा संसर्ग आहे. त्याची शेवटची पायरी म्हणजे एड्‌स. वेगाने वज कमी होणे हे देखील या आजाराशी निगडित आहेत. त्यामुळे वजन कमी होणे दुर्लक्षित करु नका.

इतर काही आजार : इतरही काही आजारांमध्ये वजन वेगाने घटते. पोटाची समस्या, हार्मोन्समधील बदल, सीओपीडी आणि पार्किन्सन्स या आजारांमध्येही वजन कमी होते.

Dr. Kusum Garudkar
Dr. Kusum Garudkar
MS/MD - Ayurveda, Family Physician Ayurveda, 23 yrs, Pune
Dr. Varshali Mali
Dr. Varshali Mali
MBBS, Gynaecologist Obstetrician, 6 yrs, Pune
Dr. Akshay Biyani
Dr. Akshay Biyani
BDS, Dentist Root canal Specialist, 10 yrs, Pune
Dr. Avinash Waghmare
Dr. Avinash Waghmare
BAMS, Family Physician Ayurveda, 4 yrs, Pune
Dr. Pooja Hemnani
Dr. Pooja Hemnani
MPTh, Cardiovascular And Pulmonary Physiotherapist Neuro Physiotherapist, 1 yrs, Pune
Hellodox
x