Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो.
गुणधर्म :
काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.
उपयोग :
काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.
फायदे :
काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेहीसांठी

देखील काकडी चांगली अंगातील आग कमी व्हावी, म्हणून काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये. प्रयोग दोन महिने करावा. त्याने शरीरावरील गळवे, पुळ्य कमी होतात.

डायटिंग करणारे तांदुळाचे पदार्थ खाणे टाळतात. पण काय आपल्या माहीत आहे की भात खाण्याचे किती फायदे आहेत? प्रत्येक पदार्थांप्रमाणे तांदूळ खाणेही आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण लिमिटमध्ये. तसेच मधुमेह आणि दमा रोगींसाठी मात्र तांदूळ नुकसान करू शकतं, कारण याची प्रकृती गार असते. तर चला पाहू या भात खाण्याचे फायदे:

एनर्जी मिळते: एक वाटी भात खाल्ल्याने शरीराला कार्बोहायड्रेट मिळतं आणि मेंदू सुरळीत काम करतं. याने शरीराचे मेटाबॉलिझम वाढतं आणि आपल्याला दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यासाठी एनर्जी मिळते.

'बीपी'
वर
नियंत्रण: आपल्या हाय बीपीची तक्रार असेल तर दररोज एक वाटी भात खायला हवा. यात सोडियमची मात्रा नसते म्हणून हृदयासंबंधी रोगांपासून बचाव होतो.
लो कोलेस्टरॉल लेवल: भातात कोलेस्टरॉलची मात्रा नावाला असते. तरीही आपण कोलेस्टरॉल फ्री राईस सेवन करू शकता.



कर्करोगापासून बचाव: ब्राउन राईसचे सेवन कर्करोगापासून बचाव करतं.

त्वचा उजळते: आयुर्वेदाप्रमाणे त्वचा तेजस्वी हवी असल्यास तांदूळ खायला हवा. तसेच तांदुळाच्या पाण्याने ज्याला माढ म्हणतात, त्वचेची सर्व तक्रार दूर होते. यात आढळणारे अँटिऑक्सिडेंट सुरकुत्या कमी करतं.
अल्झायमर आजार दूर होतो: दररोज भात खाल्ल्याने आपल्या मेंदूत न्यूरोट्रांसमीटरचा विकास जलद गतीने होईल, जे अल्झायमर आजाराशी लढण्यात सहायक राहील.

उष्णतेवर नियंत्रण: उष्ण वातावरणात भात खाणे फायद्याचे आहे. पोटात उष्णता असल्यास दररोज भात खाल्ल्याने शरीराला शरीर थंडपणा मिळतो.

हृदय रोगींनी ब्राउन राईस या वाईल्ड राईस सेवन करावे.

आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे. सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल. गवती चहाला पातीचा चहा असे देखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात.

तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते. गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणार्‍या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते. गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो.

ताप आल्यावर प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील करावेत.

काय आहेत हे घरगुती उपाय…

– तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो.

–आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जाईल.

–तापात बेलफळाचं चूर्ण उपयुक्त ठरतं. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून ताप उतरेपर्यंत घ्यावं.

–सफरचंद, दूध, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा.

– कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण ५-१० मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.

–तापकमी करण्यासाठी तुळशीचा रसदेखील फायदेशीर ठरतो. लहान मुलांसाठीदेखील हा उपाय सुरक्षित आणि फायदेशीर आहे. १०-१५ तुळशीच्या पानांना पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटावे. २-३ तासांनी तुळशीचा रस प्यावा. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.

रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्‍तस्राव होत

असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.



दाढी करताना प्रथम हा गर गालांना व गळ्याला एक इंचाचा कोरफडीचा तुकडा घेऊन तो चोपडावा. कोरफडीचा उरलेला तुकडा घेऊन

फ्रीजमध्ये ठेवावा व नियमितपणे वापरावा. दाढीपूर्वीचे लोशन दाढीनंतरचे लोशन असे काहीच या प्रकाराने दाढी केल्यास लावावे लागतनाही. दाढी केल्यानंतर चेहरा अगदी उजळ होऊन स्वच्छ होतो.

पानांचा गर किंवा त्यामधून निघणारा पिवळसर रस भाजलेल्या त्वचेवर, हिमदाहावर तसेच त्वचेच्या अन्य तक्रारींवर प्रभावी आहे,

चेहर्‍याच्या सौदर्यप्रसाधनांत, तसेच केस धुण्याच्या शँपूमध्ये कोरफडीच्या गराचा वापर करतात.

कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत.

यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत
मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यासभूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.

कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही

कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.

संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी
करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे
वाटते.

Dr. Amruta Siddha
Dr. Amruta Siddha
MBBS, ENT Specialist, 9 yrs, Pune
Dr. Sandeep Awate
Dr. Sandeep Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune
Dr. Smita Shah
Dr. Smita Shah
MD - Allopathy, Obstetrics and Gynecologist, 29 yrs, Pune
Dr. Pramod Bhimrao Patil
Dr. Pramod Bhimrao Patil
BAMS, 10 yrs, Pune
Dr. Virag  Kulkarni
Dr. Virag Kulkarni
BAMS, Ayurveda Panchakarma, 14 yrs, Pune
Hellodox
x