Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीरात जाणाऱ्या फॅट्सकडे हल्ली इतक्या बारीक नजरेनं पाहिलं जातं की, साध्या 'रेडी टू इट' पदार्थांच्या पाकिटावर देण्यात आलेल्या माहितीमध्येही त्या पदार्थात असणाऱ्या फॅट्सचा वारंवार विचार केला जातो. फॅट्सचं प्रमाण वाढल्यामुळे स्थुलता वाढते असाच अनेकांचा समज असतो आणि मग याच समजापोटी सुरुवात होते ती म्हणजे कमीत कमी फॅट्सचं सेवन कसं करता येईल याचे उपाय शोधण्याची. परिणामी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल आणि पुढे येणारी आव्हानं.

मुळात फॅट्सचं प्रमाण कमी करण्यापेक्षा अन्नपदार्थांच्या माध्यमातून त्यांच्या सेवनावर नियंत्रण असणं महत्त्वाचं. कारण शरीराला अन्नावाटे मिळणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच उपयोगाची असते. हो... अगदी फॅट्सही.
चला तर मग आहारतज्ज्ञ आणि काही जाणकार मंडळींच्या मते शरीरासाठी आवश्यक असणारे हे चांगले फॅट कोणत्या पदार्थांपासून मिळतात यावर नजर टाकूया....

अंड-
आहाराच्या सवयींमध्ये आणि डाएटमध्ये अंड्यांना फार महत्त्वं दिलं जातं. प्रथिनयुक्त पदार्थ म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. अंड्यामध्ये असणारे फॅट आणि त्यातील इतर तत्व शरीरात असणाऱ्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतं, त्यासोबतच डोळ्याच्या आरोग्यासाठीही त्याचा वापर होतो.

डार्क चॉकलेट-
चॉकलेट हे फक्त त्याच्या चवीसाठीच खाल्लं जातं असं नाही. तर, त्यात अ आणि ब जीवनसत्त्वही असतात. कॅल्शियम, लोह, पोटॅशियमचे घटकही त्यात आढळतात. कमी रक्तदाबावर उपाय म्हणूनही चॉकलेटचं सेवन केलं जातं.

ओटमिल-
इतर पदार्थांच्या तुलनेत ओटमिलच्या माध्यमातून मिळणाऱ्या फॅटचं प्रमाण हे जास्त असतं. सहसा अनेकजण ब्रेकफास्टमध्ये ओटमिल खाण्याला प्राधान्य देतात. ज्यामध्ये उपयुक्त अशा पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. रोजच्या आहाराच्या सवयींमध्ये आणि डाएट प्लॅनमध्ये ओट्सचा वापर केल्यास त्यातून मिळणारी अमिनो अॅसिड, क्षार, लोह, प्रथिनं आणि जीवनसत्वंही शरीरास उपयुक्त ठरतात.

सुकामेवा-
सुकामेवा अनेकांनाच आवडतो. मुळात तो खाण्यासाठी कोणाचाच सहसा नकार पाहायला मिळत नाही. सुकामेवा हा ओमेगा फॅटी अॅसिड, अल्फा लिनोहोलिक अॅसिड यांनी परिपूर्ण असतो.

चीझ-
चीझ... नुसतं नाव जरी घेतलं तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. विविध पदार्थांमध्येही हल्ली चीझचा सर्रास वापर केला जातो. अशा या चीझची डाएटमध्येही महत्त्वाची भूमिका असते. स्नायूंच्या बळकटीसाठी त्यात असणाऱ्या फॅट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

कोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन वेगाने घटत असेल तर ते सामान्य किंवा गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. कोणत्याही प्रयत्नांशिवाय आहे, त्या दिनचर्येत तर वेगाने वजन घटू लागले तर ते आरोग्याच्या असमतोलाविषयी संकेत देत असते. त्याकडे दुर्लक्ष अजिबातच नको. आरोग्याच्या समस्यांमुळे जर व्यायाम, जिम न करता, आहारात कोणतेही बदल न करता दोन-तीन महिन्यांत व्यक्तीचे वजन 5-6 किलोने कमी होऊ शकते. वजनात वेगाने घट होत असेल तर साध्याशा आजारापासून ते गंभीर आजारापर्यंत कोणत्याही आजाराचे संकेत यातून मिळत असतात.


मधुमेह : मधुमेहाची समस्या असेल तर सुरुवातीला वजन अचानक घटू लागते. रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते, तेव्हा वजन घटते. वजन घटते शिवाय थकवा, लघवी करताना घाम येणे, रात्री झोपताना घाम येणे यासारखी लक्षणे मधुमेहाच्या सुरुवातीला दिसू शकतात.

थायरॉईड : थायरॉईडच्या समस्येमुळे अचानक वजन कमी होऊ शकते. सर्वाधिक समस्या ही ओव्हर अ‍ॅक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी म्हणजे हायपर थायरॉईडिझममुळे होते. त्याशिवाय मनोवस्थेत बदल, गिळण्याची समस्या, थकवा, श्वास घेण्यात समस्या आणिघाम येणे हीदेखील लक्षणे दिसतात.

कर्करोग : कर्करोग हा घातक आजार जर वेळेवर याचे निदान झाले नाहीत तर हा आजार घातक आणि जीवघेणा ठरु शकतो. कर्करोगाने पीडितांचे वजन वेगाने कमी होते. वजन कमी होत असताना दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर ही कर्करोगाची लक्षणे आहेत.



क्षयरोग : टीबी किंवा क्षयरोग झाल्यासही वजन झपाट्याने कमी होते. क्षय रोगाचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे सतत दोन आठवडे खोकला येतो. क्षयरोग मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोलिस जीवाणूंमुळे होतो. वजन कमी होण्याबरोबरच छातीत वेदना, रात्री झोपताना घाम येणे, थकवा इत्यादी प्रमुख लक्षणे दिसतात.

तणाव : तणाव हा व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक आजारांचे ते एक कारण आहे. तणावामुळे रात्री झोप लागत नाही, तसेच वेगाने वजन घटते. त्यासाठी मेडिटेशन आणि योग करण्याची गरज आहे.

एचआयव्ही - एड्‌सः एचआयव्ही ही लैंगिक संबंधातून होणारा संसर्ग आहे. त्याची शेवटची पायरी म्हणजे एड्‌स. वेगाने वज कमी होणे हे देखील या आजाराशी निगडित आहेत. त्यामुळे वजन कमी होणे दुर्लक्षित करु नका.

इतर काही आजार : इतरही काही आजारांमध्ये वजन वेगाने घटते. पोटाची समस्या, हार्मोन्समधील बदल, सीओपीडी आणि पार्किन्सन्स या आजारांमध्येही वजन कमी होते.

आपल्या शरीरातील कोणताही अवयव मग तो छोटा असो वा मोठा जोपर्यंत स्वस्थ असतो आणि त्याच्या कार्यात कुठेही बाधा येत नसते तोपर्यंत शरीरात कोणत्याही व्याधी निर्माण होत नसतात. मात्र काही वेळा अगदी बारीकसारीक दुखणीही कमालीची वेदनादायक ठरतात. आपल्या बहुतेक सर्व काममाध्ये हाताची बोटे आपण वापरत असतो. अनेकवेळा या बोटांच्या नखांना इजा होतात आणि त्यात पाणी जाऊन पू होतो आणि मग बोटांना ठणका लागतो. त्यावेळी हे उपाय करून पाहावेत.

नख दुभंगणे, जिव्हाळे लागणे ज्या बोटाला हा विकार असेल त्या बोटाला घट्ट चिकटपट्टी बांधावी. हा विकार अगदी थोडक्या काळासाठी असतो व बरेच वेळा 1-2 दिवसातच बरा होतो.



नखुरडे- बर्‍याचवेळा नखुरडे झाल्याने बोटाला ठणका लागतो. यातही बोटाला चिकटपट्टी घट्ट बांधल्यास नखुरडे लवकर फुटते. दुसरा उपाय म्हणजे शेंदूर व अंड्याचा पांढरा बलक खलून लावल्याने आराम पडतो. शेंदूर हा अँटीसेप्टिक म्हणून काम करतो. हाताच्या बोटांची तसेच पायाच्या बोटांची नखे वेळच्यावेळी कापणे, त्यात अडकलेली घाण वेळच्यावेळी काढणे हे एकंदर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. वय वाढत जाईल तसा नखांचा कडकपणा वाढत जातो. वृद्ध वयात तर नखे कापणेही अवघड जाते. अशावेळी पाण्यात बोरीक पावडर टाकून पाय थोडा वेळ बुडवून ठेवावेत व मग नेलकटरच्या साहाय्याने नखे कापावीत. आंघोळ झाल्यानंतरही नखे गर पाण्यामुळे मऊ पडलेली असतात. त्यावेळी ती काढावीत. तसेच नखे कापताना अगदी त्वचेजवळ कापू नयेत. त्यामुळे जिव्हाळे लागण्याचा संभव कमी होतो.
अगदी लहान बाळाची नखे कापतानाही बाळाची आंघोळ होऊन बाळ झोपले की मगच ती अलगद काढावीत.

जसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले तरी कॉफी हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय असल्याचा शोध ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी लावला आहे.

डकोत विद्यापीठाचे प्रमुख शोधकर्ता जोनाथन गिजेर यांनी या विषयीचे संशोधन केले आहे. त्यांनी केलेल्या संशोधनात कॉफीतील कॅफेनने मेंदूवरील दडपण कमी होत असल्याचे आढळून आले. तसेच रोज केवळ एक कप कॉफी घेतल्याने शरीरातील वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे निर्माण होणार्‍या संभाव्य धक्क्यांनाही आळा बसू शकतो, असा त्यांचा दावा आहे.

* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे आरोग्यासाठी द्राक्ष फायदेशीर आहेत. बेदाणांप्रमाणेच त्याचे पाणीदेखील आरोग्यदायी आहे.

* बेदाणांमध्ये नैसर्गिकरीत्या साखर मुबलक प्रमाणात असल्याने रात्रभर बेदाणे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे साखरेचा अंश कमी होऊन न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढते.

* बेदाण्यांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. त्याचे पाणी टॉक्सिन घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

* बेदाण्यांमधील फायबर घटक पचन संस्थेला चालाना देण्यास मदत करतात. यामुळे पचन सुधारते.

* बेदाण्यांमध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे घशातील इंफेक्शन, तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते.

* बेदाण्यांमध्ये कॅल्शियम आणि मायक्रो न्यूट्रीएंट्‌स असतात. यामुळे हाडांना मजबुती मिळते.

* बेदाण्यांमधील आयर्न घटक अ‍ॅनिमियाच्या रूग्णांना फायदेशीर ठरते. यामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.

* फायबरसह बेदाण्यांमध्ये असलेले अनेक आवश्यक पोषकघटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचे विकार असणार्‍यांसाठी बेदाणे फायदेशीर ठरतात.

* कसा कराल उपाय - कपभर गरम पाण्यामध्ये मूठभर स्वच्छ धुतलेले बेदाणे भिजत ठेवा. सकाळी हे पाणी थोडे गरम करून प्यावे. त्यानंतर बेदाणेदेखील चावून खावेत.

Dr. Mukund Ghodke
Dr. Mukund Ghodke
BAMS, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Nilima  Pawar
Dr. Nilima Pawar
BHMS, General Physician Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Ajita Garud-Shinde
Dr. Ajita Garud-Shinde
MS - Allopathy, Ophthalmologist Eye Specialist, 4 yrs, Pune
Dr. Deepti Shukla
Dr. Deepti Shukla
MD - Allopathy, Dermatologist Trichologist, 12 yrs, Mumbai
Dr. Ajay Rokade
Dr. Ajay Rokade
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 15 yrs, Pune
Hellodox
x