Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

सध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत एका जागेवर उभे राहिल्याने पायाला थकवा जाणवू लागतो. या परिस्थितीत घरगुती उपायांनी सुद्धा आराम मिळू शकतो. एखादे वेळी पायाचे दुखणे वाढूनते गुडघ्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे गुडघे दुखू लागतात.
अशा वेळी एक टेबल घेवून ऐक पाय जमिनीवर आणि दुसरा टेबलावर सरळ ठेवावा. पाठीत थोडं वाकून हाताने टेबलावरील पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करावा. ही क्रिया पाच सेकंदांपर्यंत करावी. त्यानंतर पायाची अदला बदल करावी. हात पायाच्या अंगठ्यापर्यंत पोहोचले नाहीत, तरी ते शक्य तेवढे लांबावेत. पायांना नियमितपणे मालिश केल्यानेही पायांचा थकवा दूर होतो. मात्र मालिश करताना चांगल्या प्रकारचे कोल्ड क्रीम किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा. मालिशमुळे रक्तभिसरण उत्तम प्रकारे होवून स्नायूंना आराम मिळतो.

पायांवर अथवा पायांच्या बोटांना सूज आली असेल, तर कोमट पाण्यात थोडे मीठ टाकावे. त्या पाण्यात सुमारे दहा मिनटे पाय ठेवावेत. पायांची सूज आणि थकवा दोन्ही कमी होतात. पायांना थकवा जाणवू नये म्हणून खूप कडक किंवा उंच टाचांच्या चप्पल किंवा सँडल्स वापरणे टाळावे.

आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे.

आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडे साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे.

आहार हेच औषध आहे, स्वस्थ जेवणानेच आरोग्य ठणठणीत होते, यासाठी पोषक आहार घ्यावा. नियमित पोषक आहार घेणे गरजेचे आहे. यामुळे शरीराची चांगली वाढ होऊन तंदुरुस्ती प्रदान होते.
आहारात कडधान्ये, पालेभाज्या, फळे भरपूर घ्या. गव्हाचा आटा वापरा, बटाटे सालीसकट खा, भरपूर द्रव्यपदार्थ घ्या. संपूर्ण व सकस आहार शरीरास आवश्यक असते. नाहीतर शरीरात पोषक द्रव्यांची कमी येते.

आहारात हिरव्या भाज्या, ब्रेड, तांदूळ, दूध, दही, मांस, अंडी, मासळी, फळे या पदार्थांचे सेवन करा. यामुळे शरीरास लागणारे व्हिटॅमिन मिळते. शरीरास व्हिटॅमिन आवश्यक असते. योग्य समतोल आहार घ्यावा.


उन्हात पाणी पिणे आणि सावलीत बसून जास्त वारा घेणे टाळावे, यावेळेस योग्य समतोल साधणे उपयुक्त ठरू शकते. यासोबतच अतिउन्हात फिरणे टाळल्यास उष्माघातासारख्या प्रकारापासून मुक्त राहाल. सकाळी व सायंकाळी कामे आटोपावीत.

ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर उसासारखे दुसरे औषध नाही. काविळीच्या रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा.

एक मूठ भुईमुगाचे दाणे भाजून दहा ग्रॅम गुळाबरोबर चावून खावे. न्याहारीच्या वेळेस असे केल्यास आवश्यक मात्रेत ऊर्जा प्राप्त होते. हिवाळ्यात शरीरास ऊर्जेची आवश्यकता असते. स्निग्ध पदार्थांचे सेवनही चांगले असते.

एकदा वापरलेले गोडेतेल दुसर्‍यांदा वापरताना खाली तळाला बसलेला गाळ काढून मग ते तेल वापरण्यास घ्यावे. असे तळणाचे तेल दुसर्‍यांदा न वापरणेच चांगले. ते तेल दिवे लावणे, यासारख्या कामासाठी वापरता येईल. तेल ताजेच ठीक.

एकमेकांचे कपडे वापरू नये. दुसर्‍यांचा कंगवा, टॉवेल इतर वस्तू उपयोगात आणू नये. त्यामुळे त्वचेच्या तक्रारी वाढतात. प्रत्येकासाठी या वस्तू स्वतंत्रपणेच वापरणे अधिक चांगले, स्वच्छतेकडे यातून लक्ष द्यावे.

रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्‍तस्राव होत

असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.



दाढी करताना प्रथम हा गर गालांना व गळ्याला एक इंचाचा कोरफडीचा तुकडा घेऊन तो चोपडावा. कोरफडीचा उरलेला तुकडा घेऊन

फ्रीजमध्ये ठेवावा व नियमितपणे वापरावा. दाढीपूर्वीचे लोशन दाढीनंतरचे लोशन असे काहीच या प्रकाराने दाढी केल्यास लावावे लागतनाही. दाढी केल्यानंतर चेहरा अगदी उजळ होऊन स्वच्छ होतो.

पानांचा गर किंवा त्यामधून निघणारा पिवळसर रस भाजलेल्या त्वचेवर, हिमदाहावर तसेच त्वचेच्या अन्य तक्रारींवर प्रभावी आहे,

चेहर्‍याच्या सौदर्यप्रसाधनांत, तसेच केस धुण्याच्या शँपूमध्ये कोरफडीच्या गराचा वापर करतात.



कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत.

यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत
मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यासभूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.

कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही

कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.

संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे
वाटते.

दूध पिणे आरोग्य तसेच ब्युटीसाठी देखील फायदेशीर आहे. पण दूध पिण्याअगोदर जर तुम्ही या 5 गोष्टींचे सेवन करत असाल तर हे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. जाणून घ्या कोणत्या 5 वस्तूंनंतर दुधाचे सेवन करू नये...

चाळिशीनंतर महिलांची चयापचय क्रिया मंदवते. त्यामुळे या वयोगटातल्या महिलांनी आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवं. चाळिशीतील महिलांनी आरोग्यदायी आहार घेणं गरजेचं असतं. तसंच चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यासाठी व्यायामही करायला हवा. चाळिशीनंतर आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबतच्या काही टिप्स...


चाळिशीनंतर महिलांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. या वयात त्यांच्या चयापचय क्रियेचा वेगही मंदावतो. पण विविध धान्यांच्या सेवनानं या दोन्हींचा सामना करणं शक्य होतं. खरं तर तिशीनंतरच टप्प्याटप्यानं चयापचय क्रिया मंदवण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे पांढरा ब्रेड किंवा पांढरा भात याऐवजी महिलांनी ब्राउन राईस, व्हिट ब्रेड किंवा ओट्स खायला पाहिजे. यामुळे शरीराला फायबर मिळेल. फायबरमुळे वजन वाढण्याला प्रतिबंध होतो आणि वजन कमी व्हायलाही मदत होते.

आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करायला हवा. सॅलेड, कोशिंबिरी हासुद्धा फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे. पालक, गाजर, काकडी, टॉमेटो, संत्री, स्ट्रॉबेरी अशा पदार्थांचं सेवनही महत्त्वाचं ठरतं.



फायबरबरोबर पोटॅशियम, क जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स या पदार्थातून विपुल प्रमाणात मिळतात. यामुळे त्वचा चांगली राहते व सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव होतो.

आहारातलं मीठाचं प्रमाण कमी करायला हवं. मीठामुळे शरीरात पाणी साचून राहतं आणि उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. त्याबरोबर किडनी, धमन्या, हृदय, मेंदू यांनाही धोका पोहचू शकतो.

चाळिशीनंतर मधुमेहाचा धोका वाढतो. शक्यतो साखर आणि गोड पदार्थ टाळावेत. साखर जास्त प्रमाणात खाल्यानं वयस्कर दिसू लागता.

Dr. Nitesh
Dr. Nitesh
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Suneel Gupta
Dr. Suneel Gupta
MBBS, Family Physician General Physician, 43 yrs, Pune
Dr. Mahesh Gupta
Dr. Mahesh Gupta
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Abhijit Shirude
Dr. Abhijit Shirude
MS - Allopathy, ENT Specialist, 5 yrs, Pune
Hellodox
x