Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.
Published  

मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे अफलातून फायदे

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

ऋतूमानामध्ये जरा बदल झाला की लगेजच काही व्हायरल इंफेक्शनचा त्रास होतो. सर्दी, खोकला, घसा दुखणं हा त्रास संभवणं अगदी स्वाभाविक आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू झाल्यावर वातावरणात होणारा बदल अनेक संसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरतो. अशावेळेस अ‍ॅन्टीबायोटिक्सवर अवलंबून राहण्यापेक्षा काही घरगुती उपायांच्या मदतीने मात करता येऊ शकते.

सर्दीमुळे घशात होणारी खवखव कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरतात. मीठाच्या पाण्यामुळे नाक, घसा मोकळा होण्यास मदत होते.

मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे
कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. यामुळे तोंडातील इंफेक्शानचा धोकादेखील कमी होतो.


मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील अ‍ॅसिडचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

घशामध्ये साचलेला कफ, त्यामुळे होणार्‍या वेदना कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरतात. श्वासनलिकेला होणारा त्रास, सूजदेखील कमी करण्यास मदत होते. त्यामुळे खूप प्रमाणात सर्दी झाली असल्यास मीठाच्या पाण्याने गुळण्या करा यामुळे चोंदलेलं नाकही मोकळं होण्यास मदत होते.

तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठीदेखील मीठाच्या पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरू शकतात. मीठाच्या पाण्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे इंफेक्शन कमी होण्यास सहज मदत होते.

Published  

कान साफ करण्यासाठी 'या' तेलाचा करा वापर

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

कानामध्ये मळ निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. कानाचं आरोग्य त्यावर अवलंबून असतं. मात्र कानामध्ये अतिप्रमाणात मळ साचल्यास इंफेक्शन, कानदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे कानात खाज येण्याचाही त्रास अनेकांना जाणवतो. अशावेळेस सतत कानात पिन, टोकदार वस्तू घालणं त्रासदायक ठरू शकतं. म्हणूनच कानातला मळ मऊ करून बाहेर काढणयसाठी काही विशिष्ट तेल मदत करतात.

कोणत्या तेलाचा करा वापर?

कानातील मळ साफ आणि मऊ करण्यासाठी बेबी ऑईल आणि ऑलिव्ह ऑईल मदत करते. 1-2 चमचे बेबी ऑईल थोडं गरम करा. त्यानंतर मान थोडी वाकडी करून कानामध्ये त्याचे थेंब टाका. तेल टाकण्यासाठी बोटांचा किंवा आयड्रॉपरचा वापर करा. रात्री झोपण्यापूर्वी सलग 3-4 दिवस हा उपाय केल्याने मळ मोकळा होण्यास मदत होते.

बेबी ऑईलसोबत अल्कोहलचे काही थेंबही मिसळणं फयादेशीर ठरू शकतं. यामुळे बॅक्टेरियल इंफेक्शन कमी होण्यास मदत होते.

अन्य घरगुती उपाय
आल्याचा आणि लिंबाचा रसदेखील कान साफ करण्यास मदत करतात. कानात आल-लिंबाचा रस टाकल्यानंतर अर्धा तासाने कापसाच्या गोळ्याने कान स्वच्छ करा.

तुळशीचा रस, कांद्याचा रसदेखील फायदेशीर ठरतो. यामुळे कानातील मळ मोकळा होतो. या घरगुती उपायांनी कानदुखीचा किंवा कानातील मळ मोकळा होण्याचा त्रास कमी न झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Published  

त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी गूळ फायदेशीर

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

पूर्वी उन्हातून आलेल्यांना गूळ पाणी देण्याची प्रथा होती. चहामध्येही गूळाचा समावेश केलेला असे. आजकाल आपल्या आहारात गूळाचा समावेश अगदीच सीमीत स्वरूपात झाला आहे. मात्र केवळ आरोग्यासाठी नव्हे तर त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील गूळाचा आहारात समावेश करणं हितकारी आहे.

गूळामुळे कसे खुलते सौंदर्य ?

अ‍ॅक्नेवर परिणामकारक :

अ‍ॅक्नेचा त्रास, चेहर्‍यावरील काळे डाग, पिंपल्स यांचा त्रास दूर करण्यासाठी गूळ फायदेशीर आहे. आहाराप्रमाणेच फेसपॅकमध्येही गूळाचा समावेश करता येऊ शकतो. गूळाच्या फेसपॅकसाठी चमचाभर गूळ, चमचाभर टोमॅटोचा रस, अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमुटभर हळद व ग्रीन टी मिसळा. हा फेसपॅक 15 मिनिटं चेहर्‍यावर लावा. त्यानंतर तोंड थंड पाण्याने स्वच्छ धुवावे.

त्वचेवर सुरकुत्या -

जसे वय वाढतं तसे चेहर्‍यावर अकाली सुरकुत्या पडण्याचं प्रमाणही वाढतं. गूळामधील अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक शरीरात फ्री रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात. नियमित गूळ खाल्ल्याने सुरकुत्या कमी होतात.

केसांचं आरोग्य खुलते -

गूळामुळे चेहर्‍यासोबतच केसांचेही आरोग्य खुलते. गूळात मुलतानी माती, दही, पाणी मिसळून पॅक बनवा. हा पॅक केसांवर लावल्यानंतर तासाभराने स्वच्छ धुवाव. यामुळे केस घनदाट आणि मुलायम होतात.

त्वचा खुलते -

गूळामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन घटक मुबलक असतात. हे नॅचरल क्लिंजरप्रमाणे काम करतात. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणं याचा परिणाम चेहर्‍यावर दिसतो. पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्यासोबत गूळाचा खडा खाल्ल्यास किंवा चहामध्येही साखरेऐवजी गूळ वापरावा.

रक्त साफ होते -

रक्त साफ असल्यास त्वचाविकार वाढत नाहीत. गूळामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. अ‍ॅनिमियाचा त्रास कमी करण्यासही त्याची मदत होते. मधुमेही आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गूळाचा आहारत किती प्रमाणात समावेश करावा हे ठरवावे.

Published  

ताण दूर करण्याचे '५' मजेशीर उपाय!

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

अभ्यास, ऑफिसचे काम, कौटुंबिक समस्या, आरोग्याची समस्या यांसारख्या अनेक कारणांमुळे ताण येतो. तणाव हा जीवनाचा एक भाग झाला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. काहीही असो तणावाला आपण बळी पडतोच. पण या तणावामुळे शारीरिक-मानसिक आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आजारांचा धोका वाढतो. पण काही साध्या सोप्या उपयांनी तुम्ही तणावापासून दूर राहु शकता. पाहुया कोणते आहेत ते उपाय...

# बाहेर फिरायला जा. मोकळ्या हवेत काही काळ चालल्याने नकारात्मकता दूर होईल. मित्रपरिवार किंवा कुटुंबियांसोबत पिकनिकला जावू शकता.

# एक सुगंधी मेणबत्ती लावा. मंद सुवास आणि प्रकाश तुमचा मूड नक्की चांगला करेल.


# फुगे फुगवा. काही रंगीबेरंगी फुगे फुगवा आणि ते तुमच्या आसपास ठेवा. पाहा तुम्हाला किती छान वाटेल.

# गाणे गा. तुमच्या आवडीचे गाणे गा.

# संत्र्याचा ज्युस घ्या. तणाव वाढवणारे कॉर्टिसोल हार्मोन संत्र्याचा ज्युस प्यायल्याने कमी होतात.

Published  

ओले सॉक्स घालून झोपण्याचे '३' आश्चर्यकारक फायदे!

Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

पावसाळ्या उद्भवणाऱ्या अनेक समस्यांपैकी अजून एक समस्या म्हणजे सॉक्स (मोजे) ओले होणे. अशावेळी कधी एकदा ते सॉक्स काढतो, असे होते. पण तुम्हाला माहित आहे का? ओले मोजे घालण्याचे काही आश्चर्यकारक फायदे देखील आहेत. जाणून घेऊया...

ताप किंवा सर्दी असल्यास ओल्या सॉक्सचा हा प्रयोग करुन पाहा. तात्काळ फरक दिसेल.

पोटाची समस्या
पोटाच्या समस्यांनी त्रस्त असाल तर पाण्यात काळ्या जिऱ्यासोबत बडिशेप देखील १० मिनिटे उकळवा. या पाण्यात सॉक्स बुडवून पायात घाला. खराब पोटाची समस्या दूर पळेल.


ताप
घरात कोणाला खूप ताप आल्यास व्हिनेगरच्या पाण्यात सॉक्स ओले करा. त्यातील अतिरिक्त पाणी पिळून ताप आलेल्या व्यक्तीच्या पायात घाला. ताप लवकर उतरेल.

सर्दी
तुम्हाला जर वारंवार सर्दी होत असेल तर कांद्याच्या रसात चमचाभर मध मिसळून त्यात सॉक्स ओले करा आणि पिळून पायात घाला.

Dr. Kshitija Kulkarni
Dr. Kshitija Kulkarni
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda Panchakarma, 4 yrs, Pune
Dr. Smita  Patil
Dr. Smita Patil
BHMS, Homeopath, 15 yrs, Pune
Dr. ATUL KALE
Dr. ATUL KALE
MS/MD - Ayurveda, Ayurveda Neurotologist, 15 yrs, Pune
Dr. Neha  Khandelwal
Dr. Neha Khandelwal
BHMS, Homeopath Family Physician, 5 yrs, Pune
Dr. D. Malekar
Dr. D. Malekar
MBBS, Family Physician, 21 yrs, Pune
Hellodox
x
Open in App