Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
रोजच्या डाएटमध्ये नक्की करा 'या' पदार्थांचा समावेश
#आहार आणि पोषण#आरोग्याचे फायदे#निरोगी जिवन

अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीरात जाणाऱ्या फॅट्सकडे हल्ली इतक्या बारीक नजरेनं पाहिलं जातं की, साध्या 'रेडी टू इट' पदार्थांच्या पाकिटावर देण्यात आलेल्या माहितीमध्येही त्या पदार्थात असणाऱ्या फॅट्सचा वारंवार विचार केला जातो. फॅट्सचं प्रमाण वाढल्यामुळे स्थुलता वाढते असाच अनेकांचा समज असतो आणि मग याच समजापोटी सुरुवात होते ती म्हणजे कमीत कमी फॅट्सचं सेवन कसं करता येईल याचे उपाय शोधण्याची. परिणामी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल आणि पुढे येणारी आव्हानं.

मुळात फॅट्सचं प्रमाण कमी करण्यापेक्षा अन्नपदार्थांच्या माध्यमातून त्यांच्या सेवनावर नियंत्रण असणं महत्त्वाचं. कारण शरीराला अन्नावाटे मिळणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच उपयोगाची असते. हो... अगदी फॅट्सही.
चला तर मग आहारतज्ज्ञ आणि काही जाणकार मंडळींच्या मते शरीरासाठी आवश्यक असणारे हे चांगले फॅट कोणत्या पदार्थांपासून मिळतात यावर नजर टाकूया....

अंड-
आहाराच्या सवयींमध्ये आणि डाएटमध्ये अंड्यांना फार महत्त्वं दिलं जातं. प्रथिनयुक्त पदार्थ म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. अंड्यामध्ये असणारे फॅट आणि त्यातील इतर तत्व शरीरात असणाऱ्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतं, त्यासोबतच डोळ्याच्या आरोग्यासाठीही त्याचा वापर होतो.

डार्क चॉकलेट-
चॉकलेट हे फक्त त्याच्या चवीसाठीच खाल्लं जातं असं नाही. तर, त्यात अ आणि ब जीवनसत्त्वही असतात. कॅल्शियम, लोह, पोटॅशियमचे घटकही त्यात आढळतात. कमी रक्तदाबावर उपाय म्हणूनही चॉकलेटचं सेवन केलं जातं.

ओटमिल-
इतर पदार्थांच्या तुलनेत ओटमिलच्या माध्यमातून मिळणाऱ्या फॅटचं प्रमाण हे जास्त असतं. सहसा अनेकजण ब्रेकफास्टमध्ये ओटमिल खाण्याला प्राधान्य देतात. ज्यामध्ये उपयुक्त अशा पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. रोजच्या आहाराच्या सवयींमध्ये आणि डाएट प्लॅनमध्ये ओट्सचा वापर केल्यास त्यातून मिळणारी अमिनो अॅसिड, क्षार, लोह, प्रथिनं आणि जीवनसत्वंही शरीरास उपयुक्त ठरतात.

सुकामेवा-
सुकामेवा अनेकांनाच आवडतो. मुळात तो खाण्यासाठी कोणाचाच सहसा नकार पाहायला मिळत नाही. सुकामेवा हा ओमेगा फॅटी अॅसिड, अल्फा लिनोहोलिक अॅसिड यांनी परिपूर्ण असतो.

चीझ-
चीझ... नुसतं नाव जरी घेतलं तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. विविध पदार्थांमध्येही हल्ली चीझचा सर्रास वापर केला जातो. अशा या चीझची डाएटमध्येही महत्त्वाची भूमिका असते. स्नायूंच्या बळकटीसाठी त्यात असणाऱ्या फॅट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

Dr. Neha Sawant
Dr. Neha Sawant
BPTh, Orthopedic Physiotherapist Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Neha  Khandelwal
Dr. Neha Khandelwal
BHMS, Homeopath Family Physician, 5 yrs, Pune
Dr. Sushma Todkar
Dr. Sushma Todkar
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Dr. Pratima Kokate-Ghode
Dr. Pratima Kokate-Ghode
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diet Therapeutic Yoga, 9 yrs, Pune
Dr. Sapna Mahajan
Dr. Sapna Mahajan
BAMS, Ayurveda, 9 yrs, Pune