Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
अचानक वजन घटते?
#वजन कमी होणे#आरोग्याचे फायदे

कोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन वेगाने घटत असेल तर ते सामान्य किंवा गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. कोणत्याही प्रयत्नांशिवाय आहे, त्या दिनचर्येत तर वेगाने वजन घटू लागले तर ते आरोग्याच्या असमतोलाविषयी संकेत देत असते. त्याकडे दुर्लक्ष अजिबातच नको. आरोग्याच्या समस्यांमुळे जर व्यायाम, जिम न करता, आहारात कोणतेही बदल न करता दोन-तीन महिन्यांत व्यक्तीचे वजन 5-6 किलोने कमी होऊ शकते. वजनात वेगाने घट होत असेल तर साध्याशा आजारापासून ते गंभीर आजारापर्यंत कोणत्याही आजाराचे संकेत यातून मिळत असतात.

मधुमेह : मधुमेहाची समस्या असेल तर सुरुवातीला वजन अचानक घटू लागते. रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते, तेव्हा वजन घटते. वजन घटते शिवाय थकवा, लघवी करताना घाम येणे, रात्री झोपताना घाम येणे यासारखी लक्षणे मधुमेहाच्या सुरुवातीला दिसू शकतात.

थायरॉईड : थायरॉईडच्या समस्येमुळे अचानक वजन कमी होऊ शकते. सर्वाधिक समस्या ही ओव्हर अ‍ॅक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी म्हणजे हायपर थायरॉईडिझममुळे होते. त्याशिवाय मनोवस्थेत बदल, गिळण्याची समस्या, थकवा, श्वास घेण्यात समस्या आणिघाम येणे हीदेखील लक्षणे दिसतात.

कर्करोग : कर्करोग हा घातक आजार जर वेळेवर याचे निदान झाले नाहीत तर हा आजार घातक आणि जीवघेणा ठरु शकतो. कर्करोगाने पीडितांचे वजन वेगाने कमी होते. वजन कमी होत असताना दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर ही कर्करोगाची लक्षणे आहेत.



क्षयरोग : टीबी किंवा क्षयरोग झाल्यासही वजन झपाट्याने कमी होते. क्षय रोगाचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे सतत दोन आठवडे खोकला येतो. क्षयरोग मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोलिस जीवाणूंमुळे होतो. वजन कमी होण्याबरोबरच छातीत वेदना, रात्री झोपताना घाम येणे, थकवा इत्यादी प्रमुख लक्षणे दिसतात.

तणाव : तणाव हा व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक आजारांचे ते एक कारण आहे. तणावामुळे रात्री झोप लागत नाही, तसेच वेगाने वजन घटते. त्यासाठी मेडिटेशन आणि योग करण्याची गरज आहे.

एचआयव्ही - एड्‌सः एचआयव्ही ही लैंगिक संबंधातून होणारा संसर्ग आहे. त्याची शेवटची पायरी म्हणजे एड्‌स. वेगाने वज कमी होणे हे देखील या आजाराशी निगडित आहेत. त्यामुळे वजन कमी होणे दुर्लक्षित करु नका.

इतर काही आजार : इतरही काही आजारांमध्ये वजन वेगाने घटते. पोटाची समस्या, हार्मोन्समधील बदल, सीओपीडी आणि पार्किन्सन्स या आजारांमध्येही वजन कमी होते.

Dr. Sachin Sutar
Dr. Sachin Sutar
BAMS, Family Physician Physician, 8 yrs, Pune
Dr. Sivasubramanian Pachamuthu
Dr. Sivasubramanian Pachamuthu
MD - Allopathy, Dermatologist, 6 yrs, Dharmapuri
Dr. Sneha Kale
Dr. Sneha Kale
MS/MD - Ayurveda, Ayurveda Gynaecologist, 3 yrs, Pune
Dr. Sujata Bauskar
Dr. Sujata Bauskar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 23 yrs, Pune
Dr. Shrikant Choudhari
Dr. Shrikant Choudhari
MS/MD - Ayurveda, General Surgeon, 6 yrs, Pune