Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

थंडीच्या दिवसांत बाजारात मटार, टोमॅटो आणि गाजरची आवक वाढते. त्यामुळे त्यांचे भावही तुलनेने उतरतात. ठरवलं तर मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या या स्वस्त भाज्यांनी भोजनाची लज्जत वाढवता येते...

न ह्याहारादृते प्राणिनां

प्राणाधिष्ठानं किञ्चिदप्युपलभामहे।

प्राणी जीवनात आहाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याच्याशिवाय प्राणिमात्रांचे प्राण अजिबात स्थिर राहू शकत नाहीत. किंबहुना मानवाच्या ज्या तीन मूलभूत गरजांचा उल्लेख होतो, त्यातली पहिली अन्न ही आहे. अर्थात, सजीवांचे जीवन पूर्णत्वास नेणारा हा आहार जगाच्या पाठीवर भौगोलिक स्थिती, हवामान, ऋतू किंवा मग उपलब्ध जिन्नसांनुसार बदलत जातो. सध्या हिवाळा सुरू आहे. या दिवसांत आपल्याकडे प्रामुख्याने गाजर, मटार आणि टोमॅटोचे उत्पादन अधिक होते. त्यामुळे या भाज्या बाजारात मुबलक आणि तुलनेने स्वस्त भावात उपलब्ध असतात. साहजिकच त्यांपासून बनणाऱ्या पदार्थांचे प्रमाण हिवाळ्यात आपोआप वाढते.

मटार

अतिशय चविष्ट अशा या दाण्यांपासून मटार पनीर, मटार कोफ्ता, मटार कोबी, बटाटा मटार पनीर अशा पदार्थांसह पुलाव, व्हेज कोल्हापुरी व अन्य बऱ्याच डिशेसमध्ये मटार सहज मिसळून जातो व त्या पदार्थांचा स्वाद वाढवतो. मटार पनीर वगैरे नियमित खाल्ले जाणारे किंवा दिसणारे पदार्थ, पण वेगळं काहीतरी ट्राय करायचं असल्यास मटार कोफ्ता केव्हाही उत्तम. गरमागरम कढीसोबत टपोरे कोफ्ते जिभेचे चोचले अगदी सहजगत्या पुरवतात.

मटार चा फायदा

मटार स्वादिष्ट तर आहेच, पण त्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील अँटीऑक्सिडेंट शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

मटार कोफ्ता

साहित्य : ५०० ग्रॅम मटार दाणे, २ बटाटे, १ मोठा चमचा बेसन, २ हिरव्या मिरच्या, एक इंचाचा आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ.

कृती : मटार धुवून उकडून घ्या. बटाटे उकडून, सोलून स्मॅश करा. मटार वाटून घ्या. दोन्हींमध्ये बेसन, मिरची, आलं आणि मीठ व्यवस्थितपणे मिसळा. उत्तम मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचे लिंबाएवढे गोळे करून गरम तेलात लालसर होईपर्यंत तळून काढा.

या गरमागरम कोफ्त्याची लज्जत टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत घेता येते, परंतु ते कढीसोबत खाण्याची मजा काही औरच असते. कढी तयार झाली, की गॅस बंद करावी व कोफ्ते कढीमध्ये टाकून दोनेक मिनिटे झाकून ठेवावेत आणि मग खावेत.

टोमॅटो

बहुतांश पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही जिन्नसांपैकी एक म्हणजे टोमॅटो. तो कच्चा खाल्ला जातो, कोशिंबिरीत समरस होऊन भोजनाची लज्जत वाढवतो किंवा त्याची चटकदार भाजीही करता येते. टोमॅटो सार किंवा सूप, टोमॅटो-बीट सूप, टोमॅटो राइस, टोमॅटो आमलेट, टोमॅटो मॅगी, टोमॅटो चटणी, टोमॅटो लोणचे असे नानानिध चविष्ट पदार्थ त्यापासून बनविता येतात. मात्र गोडगुलाबी थंडीत यातलं गरमागरम टोमॅटो सूप अनोखा आनंद देऊन जातं.

टॉमॅटोचा फायदा

बहुगुणी टोमॅटो अनेक पदार्थांद्वारे शरीरात जातो आणि शरीराला अनेक फायदे होतात. मुख्यत्वे यामुळे चरबीची वाढ रोखली जाते.

टोमॅटो राइस

साहित्य : १ वाटी तांदूळ, २ टोमॅटो, २ चमचे तूप, १ बारीक चिरलेला कांदा, आले-लसून, मिरची पेस्ट, ओलं खोबरं, जिरं, दालचिनीचे लहान तुकडे, मीठ, साखर आणि कोथिंबीर.

कृती : तांदूळ धुवून किमान अर्धा तास निथळत ठेवावेत. टोमॅटो शिजवून मिक्सरमध्ये पातळ वाटून घ्यावा. त्यानंतर पातेल्यात तूप तापवून त्यात जिरं-दालचिनी आणि नंतर कांदा परतून घ्या. आले-लसून, मिरची पेस्ट टाका. मग तांदूळ परतून चवीनुसार साखर व मीठ टाका. त्यात टोमॅटोचं वाटण आणि हवं असल्यास अजून पाणी घालून मंद आचेवर शिजवा. तयार झालेला रूचकर राइस वाढताना त्यावर ओले खोबरे आणि कोथिंबीरने गार्निश करा.

गाजर

गोड गारव्यात मुबलक प्रमाणात मिळणारी आणखी एक भाजी म्हणजे अल्पमोली, बहुगुणी गाजर. याचा हलवा जगभर प्रसिद्ध आहेच, पण त्याव्यतिरिक्त मुलांना भावणारा गाजर फ्राय, गाजर-मटार पुलाव, गाजर-मटार भाजी, गाजर ज्यूस, गाजर रायता, चटपटीत गाजर लोणचे आणि गाजर मुरंबाही तितकाच लोकप्रिय झालाय. गाजर म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो मस्त मधाळ हलवा. हा गोड पदार्थ जवळपास प्रत्येक घरात आपापल्या परीनं बनवला जातो. पण गाजर मुरंब्याची चवही तितकीच लाजवाब!

गाजर ाचा फायदा

थंडीत त्वचा कोरडी पडण्याचे, खडबडीत होण्याचे प्रमाण वाढते. त्यावर गाजराचा रस चोळल्यास ती सतेज बनते.

गाजर मुरंबा

साहित्य : गाजर १ कि. ग्राम, साखर ६०० ग्रॅम ( ३ कप), केसर ३०-४० धागे, २ लिंबू.

कृती : गाजर सोलून धुवून घ्या. सुकल्यानंतर एक किंवा सव्वा इंचाचे तुकडे करा. (गाजर मध्यभागी जास्त पिवळे असल्यास तो भाग काढून टाकावा) एका टोपात कापलेले गाजर पूर्ण बुडेल एवढे पाणी घेऊन त्याल उकळी आल्यानंतर त्यात गाजर टाका. त्यानंतर आणखी एक उकळी येऊद्या. गॅस बंद करा आणि पाच मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर गाजर पाण्याबाहेर काढा. एका चाळणीत कपडा ठेवून त्यावर ती पूर्ण निथळेपर्यंत एक ते दोन तास सुकवा. मग फोर्कने त्यांवर टोचे मारा. ही गाजर एका स्टीलच्या भांड्यात घेऊन त्यात साखर मिसळा. हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा, जेणेकरून गाजरातील रस बाहेर येईल.

सकाळी हे भांडे पुन्हा गॅसवर ठेवा व पाक घट्ट होईपर्यंत ते शिजूद्या. थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस मिसळा आणि आस्वाद घ्या

हाडांचे आरोग्य कालानुरूप जपायला हवे. त्यासाठी योग्य आहार, व्यायाम यांची गरज असते. मात्र, हाडांच्या आरोग्याकडे लक्ष न दिल्याने या दिवसांमध्ये सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात.

लक्षणे

पायऱ्या चढउतार करताना किंवा उठता-बसताना त्रास होणे
थोडासा अधिक दाब पडल्यानंतर सांध्याच्या भागात सूज येणे

हाडांमधून आवाज येणे

पाण्यात अधिक काम केल्यास त्रास होणे

हाडे दुखणे वा ठसठसत राहणे

पाठ, पायांची हाडे, हातांच्या हाडांमध्ये होणाऱ्या वेदना अधिक वाढणे

कारणे

बदलती जीवनशैली, व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा अभाव यामुळे सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात. सांधेदुखी आनुवंशिकही असू शकते. त्यासाठी काही आरोग्यपूर्ण गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. या गोष्टी पाळल्या, तर हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

उपाय

हिवाळ्यात ऊन कमी असते. त्यामुळे उन्हात बसायला हवे. त्याने हाडांना पोषण मिळते.

थंड पाण्यात काम करणे टाळा. पायात कायम घरात वापरायच्या चपला घाला.

हिवाळ्यात आहारावर लक्ष ठेवावे. शिळे अन्न खाऊ नये. आहारात फळे, पालेभाज्या, डाळी, कडधान्य आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करा.

वजन वाढणाऱ्या पदार्थांना या दिवसात दूर ठेवावे. तसेच आहारात ड आणि क जीवनसत्त्व देणाऱ्या पदार्थांचा वापर करावा. मासांहार पूर्ण वर्ज्य करावा.

हिवाळ्यात भूक जास्त लागते. मधल्या वेळी पौष्टिक लाडू, सूप, उपमा, एखादे फळ किंवा खजूर असा पौष्टिक आहार घ्यावा.

हातापायात मोजे वापरावे.

सायकल चालवणे, पोहणे, चालण्यासारखे व्यायाम करणेसुद्धा गरजेचे आहे. व्यायामामुळे सांध्यांना लवचिकपणा, गतिशीलता आणि स्नायूंना शक्ती मिळते.

गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या वजनावर लक्ष केंद्रीत करावे. अधिक आहार घेतल्याने त्यांचे वजन वाढू लागते व त्याचा ताण गुडघ्यांवर येऊन वेदना वाढतात.

रात्री झोपण्यापूवी दोन्ही पाय गरम पाण्यात ठेवावे व नंतर तिळाच्या तेलाने मालिश करून मोजे घालून झोपावे.

या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करावी. मात्र, अतिगरम पाणी टाळावे.

आपल्या फिटनेसबाबत जागरुक असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खास महिलांसाठी फिटनेससंदर्भात हिताच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
ती म्हणते, 'घर सांभाळा आणि मुले सांभाळा असंच आपल्या मनावर सतत बिंबवलेलं असतं. आपल्या स्वत:ला नीट सांभाळण्याचा सल्ला आपली आई कधी देत नाही. महिलांना फिट राहायचं असतं ते लग्नसमारंभात मिरवायला किंवा कपड्यांची फिटींग नीट व्हायला. स्वत:साठी त्या ते करत नाहीत. जेव्हा तुम्ही मनात कोणताही किंतु न बाळगता स्वत:साठी थोडा वेळ काढून जगायला लागाल तेव्हा आयुष्य वेगळं होईल. स्वत:साठी फिट रहा.'

महिलांना काय टिप्स देणार असं विचारता शिल्पा म्हणते, 'मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेय. माझे आई-वडील दोघंही नोकरी करत होते. त्यामुळे मला माहित आहे की नोकरी करणाऱ्या महिलांची किती धावपळ असते. पण कुटुंबाला तुम्ही जसं प्राधान्य देता त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य द्या. तुम्ही फिट राहाल तरच तुमच्या कुटुंबाचा चांगला सांभाळ करू शकाल.'

शिल्पा शेट्टीच्या महिलांना टीप्स :
> रोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खोल श्वास घ्या

> रोज व्यायामासाठी वेळ काढता आला नाही तरी किमान आठवड्यातून दोन दिवस कोणता ना कोणता व्यायाम करा किंवा चाला.

> जर तुम्ही नोकरदार आहात, तर नेहमीपेक्षा अर्धा तास अगोदर उठून योग करा

> तुमचं आरोग्य कसं असेल हे ७० टक्के तुमचा आहार ठरवतो. सकाळी हाय फायबर असलेलं (तंतुमय पदार्थ) अन्न खा. रात्रीचं हलकं जेवण घ्या. खूप पाणी प्या आणि कोल्डड्रिंक्स पूर्ण बंद करा.

मिठाच्या पाण्याने मलाशयाची स्वच्छता होते. त्यासाठी आपल्याला रोज सकाळी पाण्यामध्ये मीठ घालून प्यायचे आहे. हा उपाय केल्यास आरोग्यासाठी हानीकारक आजार जसे मधुमेह आणि स्थूलपणा यांच्यापासून बचाव करू शकता. फक्त मधुमेहच नव्हे तर अनेक जीवघेण्या आजारांपासून आपण वाचू शकतो. मात्र हे पाणी पिताना ते स्वयंपाकघरात पिऊ नका. काळ्या ठिाचे म्हणजेच सैंधव मिठामध्ये असलेली 80 हून जास्त खनिजे शरीर आणि आरोग्यासाठी लाभदायक असतात. कसे तयार करायचे हे पाणी पाहूया.

एक ग्लास कोमट पाण्यात एक छोटा चमचा काळे मीठ घालून ते चांगले विरघळवून घ्यावे. हे पाणी गुणकारी पेय आहे. याचे सेवन केल्याने आरोग्यवर्धक फायदे होतील. ह्या पाणचे फायदे पाहूया.

त्वचेच्या समस्या- या पाण्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतील. त्वचेवरील मुरुम, पुटकुळ्या, डागांपासून सुटका होईल. कारण मिठाच्या पाण्यात क्रेमिया असते, ज्यामुळे त्वचा रोगांशी लढून त्वचा उजळते.

पचन तंत्र- मीठ-पाण्यामुळे तोंडातील लाळनिर्मिती करणार्‍या ग्रंथी अधिक कार्यरत होतात. त्यामुळे पोटातील पाचक एन्झाईम्स जे नैसर्गिक मीठ, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि प्रथिने पचवण्याचे काम करतात. त्यांना पचवण्यास लाळेची मदत होते. त्याशिवाय पोटातील यकृत, आतडे यांच्यामध्ये अन्न पचनास आवश्यक एन्झाईम्स निर्माण होतात.

नैसर्गिक जीवाणूविरोधी- मीठ-पाण्यात अनेक खनिजे असतातच पण हे मीठ पाणी नैसर्गिक जीवाणूविरोधी घटक म्हणून काम करते. शरीरातील जीवघेण्या आजार पसरवणार्‍या जीवाणूंना मारण्याचे काम ते करते आणि आरोग्य चांगले राहाते.

हाडांची मजबुती- वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आपल्या शरीरातील खनिजे आणि कॅल्शिअम कमी होत जाते आणि हाडे कमजोर होऊ लागतात. त्यामुळे हाडे तुटूही शकतात. अशा परिस्थितीत मीठ पाणी प्यायल्याने हाडातील खनिजांची पूर्तता होऊन हाडे मजबूत होतात. त्यासाठी रोज नियमितपणे ह्या पाण्याचे सेवन करावे.

स्नायूंची मजबूती - काळे मीठ कोमट पाण्यात मिसळून रोज प्यायल्यास शरीरातील पोटॅशिअम कमी होते. त्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि आरोग्य लाभते.
वजन घटते -कोमट पाण्यात काळे मीठ घालून प्यायल्यास शरीरातील अतिर्रित चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे स्थूलपणा दूर होतो. त्याशिवाय शरीरातील कोलेस्ट्रोलची पातळी घटते. त्यामुळे मधुमेहासारखा जीवघेणा आजार होण्याची शक्यता कमी होते.

डीटॉक्सिफिकेशन - शरीरातंर्गत विषद्रव्ये काढण्यासाठी उपयुक्त असते. विषद्रव्ये बाहेर पडल्याने अवयवांना नुकसान होत नाही.

शरीरातील पाण्याचे प्रमाण- शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहाते. आरोग्यावरही त्याचा चांगला परिणाम होतो. तसेच त्वचेची लवचिकता वाढते आणि त्वचा सदोदित मऊ मुलायम राहते.

यकृताच्या समस्या - या पाण्यामुळे यकृताची हानी भरून निघते. यकृताच्या खराब झालेल्या पेशी चांगल्या होतात. त्यामुळे यकृताच्या सिर्‍होसिससारखी समस्या बरी होण्यास मदत होते.

झोप लागण्यास मदत - रक्तातील कार्टिसोल, अ‍ॅड्रिनल वाढण्यास ठिामुळे मदत होते. ही सर्व हार्मोन्स तणावाशी निगडित आहेत. ह्या हार्मोन्सचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाल्यास झोप चांगली लागते. अनिद्रेची समस्या असल्यास काळे मीठ घातलेले पाणी प्यावे.

दालचिनी वजन कमी करण्यात मदत करते. यासाठी आपल्याला केवळ दालचिनीचा चहा तयार करून सेवन करायचे आहे. दालचिनी सेवन केल्याने मेटाबॉलिझमची काम करण्याची क्षमता वाढते ज्याने वजन कमी करायला मदत मिळते. दालचिनीच्या चहाने हार्मोन्समध्ये अचानक इन्सुलिन वाढण्याचा धोका कमी होतो. या चहात कॅलरीज नसते ज्याने लठ्ठपणावर नियंत्रण मिळतं.

अनेक लोकं दालचिनीचा चहा बनवतात परंतू चुकीच्या पद्धतीने. येथे जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत-

सामुग्री- 1 लीटर पाणी, 1 लहान दालचिनीची काडी किंवा 5 लहान चमचे दालचिनी पावडर, 1/2 चमचा मध
कृती- एका भांड्यात पाणी उकळून घ्या. दालचिनी पावडर टाकून मिश्रण मध्यम आचेवर पाच मिनिटासाठी राहू द्या. हा चहा गार होऊ द्या नंतर यात मध मिसळा. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्या.

दिवसातून तीनदा सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या चहाचे एक-एक कप सेवन करा. आपण आपल्या आवडीप्रमाणे हा चहा गार किंवा गरम सेवन करू शकता.

Dr. S K  Toke
Dr. S K Toke
DNB, Pulmonologist General Physician, 11 yrs, Pune
Dr. Jyoti Kumari
Dr. Jyoti Kumari
BDS, Chest Physician Child Abuse Pediatrician, Ranchi
Dr. Deepika Manocha
Dr. Deepika Manocha
DNB, Gynaecologist Obstetrician, 10 yrs, South Delhi
Dr. Tushar D Tarwate
Dr. Tushar D Tarwate
BDS, 11 yrs, Pune
Dr. Vikas Kumar
Dr. Vikas Kumar
Specialist, Gastroenterologist, Pune
Hellodox
x