Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

दही रोज खावे की नाही हा प्रश्न अनेक लोकांना पडत असतो तर येथे आम्ही आपल्या सांगत आहोत की दर रोज दही भात खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरु शकेल:


रात्री दह्याचे सेवन टाळावे. याने कफ होण्याची शक्यता असते. रात्री दह्याचे सेवन करायचे असल्यास यात साखर आणि मिरपूड टाकावी.
दररोज दुपारच्या जेवण्यानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही सुधारतं आणि वजन नियंत्रित राहतं. ताण जाणवतं असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे. हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

का खास आहे दही-भात

याने ताण कमी होतं. तसेच तिखट खाण्याचे शौकिन असल्यास कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही. याचे अल्कलाइन प्रभावामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढेल. अॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.

वजन कमी होईल
स्नेक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल. साध्या दही-भातात, पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल. खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दह्याचे सेवन केलं जाऊ शकतं.

कारण

कारण दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही. दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते. एका शोधाप्रमाणे दररोज 300 ग्रॅम दही खायला पाहिजे. तसेतर हे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात अधिक सेवन केल्या जाणार्‍या आहारात सामील आहे तरी पोट गडबड असल्यास, अपचन किंवा इतर आजारात गरम भातासोबत दह्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारतं. याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. भात आणि दही मिळून शरीर थंड ठेवण्यात मदत करतं.

मांसाहारींसाठी मासे हे अगदी प्रिय असतात. चिकन मटण सोबतच माशांचा आस्वाद घेणं हे केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही उपयुक्त ठरतात. म्हणूनच तुम्ही पहिल्यांदा मासे खाणार असाल तर थोडी काळजी घ्या. ... म्हणून आठवड्यातून किमान दोन दिवस मासे खायलाच हवेत !

मासे खाताना त्यामधील एक महत्त्वाचा अडथळा असतो तो म्हणजे काटे. भरभर खाताना माश्यातील काटे नकळत घासामध्ये येतात. काटा घशामध्ये अडकल्यास तो सतत टोचत राहतो. अशावेळेस काट्याचा त्रास दूर करण्यासाठी काही खास टीप्स नक्की लक्षात ठेवा .

कसा दूर कराल घशात अडकलेला काटा -

भात -

माशाचा काटा घशामध्ये अडकल्यासारखे जाणवल्यास सुका भात एकत्र करून गोळा करा. भाताचा हा गोळा छोटा करा. तो चावता गिळल्याचा प्रयत्न करा. सुक्या भातामुळे अडकलेला काटा दूर होण्यास मदत होते.

केळ -

पिकलेलं केळंदेखील काटा दूर करण्यास मदत करतात. एक केळं शांतपणे आणि हळूहळू चावून खावे. यामुळे घशात अडकलेला काटा दूर होण्यास मदत होते.

अनेकांना रात्रीत झोपेत पायाची नस एकमेकांवर चढण्याचा त्रास जाणवतो. एखादी नस एकमेकांवर चढल्यानंतर पायामध्ये असह्य वेदना जाणवतात. 2-5 मिनिटं हा त्रास जाणवत असला तरीही वेदना मात्र खूपवेळ जाणवतात. पायदुखीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी काही खास टीप्स लक्षात ठेवा.

का चढते एकमेकांवर नस ?

डायरिया, डाईयुरेटिक, मधूमेह, डिहायड्रेशन, अल्होहलचे अतिसेवन, थकवा, पार्किनसन्स असे आजार असणार्‍यांमध्ये नस एकमेकांवर चढते. यासोबतच रक्तदाबाचा त्रास किंवा गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही पायांवरील नस एकमेकांवर चढते.

वेदना कमी करण्यासाठी काय कराल?
पायात गोळा आल्यासारखा जाणवल्यास लगेजच हालचा करा. थोडा वेळ फेरफटका मारा.
उभं राहून हळूहळू हलवा.


उभं राहून किंवा बसून खेचल्या गेलेल्या भागाला मोकळं करा.
बसल्या जागी पाऊल घोट्याच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा. काहीवेळ या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा.
खूप तीव्र वेदना जाणवत असल्यास पायाखाली एखादी मोठी उशी ठेवा.

वरवर रुक्ष दिसणारी कोरफड ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्म असलेली आहे. विशेषतः डायबेटीस म्हणजेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही वनस्पती वरदान ठरते. अनेक संशोधनातून हे समोर देखील आले आहे.

कोरफडीमध्ये क्रोमियम आणि मँगनीझ ही तत्वे देखील आहेत. यामुळे शरीरातील इंश्युलीनची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेह होण्यापासून बचाव होतो. कोरफडीच्या गराचा किंवा रसाचा वापर करण्याऐवजी ताज्या कोरफडीचा उपयोग करणे जास्त फायद्याचे आहे. दररोज दोन लहान चमचे कोरफडीचा ताज्या गराचे सेवन केल्याने शरीरामध्ये असलेले साखरेचे प्रमाण पुष्कळ अंशी कमी होण्यास मदत मिळते.

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना लहानशी जखम देखील भरून येण्यास खूप वेळ लागतो. वरही कोरफड उपयुक्त आहे. कोरफडीचा गर सरळ जखमेवर लावल्याने जखमेमुळे होणारी आग किंवा वेदना कमी होतात, व जखम लवकर भरून येण्यास मदत मिळते. योग्य आणि संतुलित आहाराच्या जोडीने कोरफडीचे नियमित केलेले सेवन मधुमेह नियंत्रित ठेवण्यास सहायक ठरते.

घर आणि जॉब यात व्यस्त महिला स्वत:ची तारांबळ करून घेतात. स्वत:च्या आहाराकडे दुर्लक्ष करतात ज्याने पोषक तत्त्वांची कमी होऊन रोग प्रतिकारक क्षमता कमी होते आणि अनेक प्रकाराच्या आजारांना समोरा जावं लागतं. अनेक स्त्रिया वजन वाढू नये म्हणून कमी आहार घेतात परंतू याने पचन संबंधी समस्या उद्भवतात ज्यात गॅसची समस्या, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी सामील आहे.

असा असावा डाइट प्लान

ब्रेकफास्ट

सकाळचा नाश्ता कधीही टाळू नये कारण दिवसभर काम करण्यासाठी लागणार्‍या ऊर्जेसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. ब्रेकफास्टमध्ये आपण दूध, सांजा, कॉर्नफ्लॅक्स, सँडविच इत्यादी घेऊ शकता. किंवा फ्रूट चाट ही चांगला पर्याय आहे. यात सफरचंद, पपई, डाळिंब सामील करता येऊ शकतं. ड्राय फ्रूट्ससोबत एक ग्लास दूधही योग्य ठरेल.

लंच

दुपारच्या जेवणात वरण, भाजी, चपाती आणि कोशिंबीर सामील करावे. गरमीच्या दिवसात दही किंवा ताक घ्यावे. हिरव्या भाज्या, पनीर, कोशिंबीर सामील करावे. संध्याकाळी लाइट स्नेक्स लंच मध्ये फळं किंवा स्प्राउट्स घेता येतील.

डिनर

झोपण्याच्या दोन तासापूर्वी डिनर घेणे योग्य ठरतं. यात मसालेदार पदार्थ टाळावे. लाइट पदार्थ खावे. झोपण्यापूर्वी दूध घेण्याची सवय असल्यास कमी फॅट्स असलेले दूध घ्यावे. रात्री दूध उकळून त्यात आलं किंवा वेलची घालावी. जेवल्यानंतर किमान 20 मिनिट वॉक करावे.

Dr. Santoshkumar Gaikwad
Dr. Santoshkumar Gaikwad
BDS, Dentist Root canal Specialist, 24 yrs, Pune
Dr. Manish Pathak
Dr. Manish Pathak
MDS, Dentist Periodontist, 10 yrs, Pune
Dr. Rachana Parmar
Dr. Rachana Parmar
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 20 yrs, Pune
Dr. Sheetal Jadhav
Dr. Sheetal Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, Pune
Dr. Vinay Shankar Gupta
Dr. Vinay Shankar Gupta
MS - Allopathy, Dermatologist Family Physician, 40 yrs, Shimla
Hellodox
x