Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पुरेशी झोप घेतल्यानंतरही ऑफिसमध्ये सुस्तावल्यासारखे वाटते का? तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव असेलही. आणि जर नसलास तर तुमच्या आसपासच्या लोकांना तरी तुम्ही ऑफिसमध्ये डुलकी घेताना पाहिले असेल. यापैकी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. पुरेशी झोप घेऊनही ऑफिसमध्ये झोप येत असल्यास याचा थेट परिणाम कामावर होतो. तर तुमची ही समस्या दूर करण्यासाठी या काही टिप्स...

दिवसभर पाणी प्या
पुरेसे पाणी न प्यायल्यास आवश्यक तितकी झोप घेऊनही तुम्हाला सुस्तावल्यासारखे वाटते. जर तुम्हाला ऑफिसमध्ये पूर्ण वेळ फ्रेश राहायचे असेल तर दिवसातून कमीत कमी १० ग्लास पाणी प्या.

हेव्ही जेवण टाळा
ऑफिसमध्ये असताना दुपारचे जेवण हलके असणे फायद्याचे ठरेल. त्यामुळे आळस येणार नाही. परिणामी नकळत येणारी झोपही टाळता येईल. दुपारच्या जेवणात ताक, सलाड यांचा समावेश करा.

चॉकलेट
काम करताना थकल्यासारखे वाटत असेल तर जवळ चॉकलेट ठेवा. थकवा, सुस्ती जाणवल्यास चॉकलेट खा. त्यामुळे शरीराला इंस्टेंट एनर्जी मिळेल. त्याचबरोबर ताण दूर होण्यासही मदत होईल.

व्यायाम करा
रोज सकाळी न चुकता व्यायाम करा. त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि अॅक्टीव्ह रहाल.

चहा आणि कॉफी घेणे टाळा
चहा-कॉफी घेतल्याने सुस्ती दूर होते, असा अनेकांचा समज आहे. परंतु, हे काही नाही. चहा घ्यायचा असल्यास ग्रीन टी घेणे फायद्याचे ठरेल. सकाळी तुळस घातलेला चहा अवश्य घ्या.

किशोरवयीन मुलींनी डाएटिंग केल्यास त्या धूम्रपान व मद्यपान या वाईट सवयींच्या आहारी जाण्याची शक्यता जास्त असते व त्यांच्या आरोग्यास ते हानिकारक असते शिवाय त्यामुळे त्यांच्या वर्तनातही अनिष्ट बदल होत असतात असे एका अभ्यासात दिसून आले आहे. कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, ज्या मुली डाएटिंग करतात त्यांच्यात तीन वर्षांनंतर वर्तनात वाईट बदल दिसून आले आहेत.

जेवण टाळण्यामुळे या मुलींच्या वर्तनात बदल होत असल्याचे अमंदा राफोल यांचे म्हणणे आहे. डाएटिंगमुळे शरीराचा समतोल राहात नाही. तीन वर्षांत अनेक मुलींनी केव्हा ना केव्हा तरी डाएटिंग केले होते कारण त्यांच्यावर पौगंडावस्थेत असताना वजन वाढल्याने समाजाकडून शरीर सडपातळ ठेवण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव होता, बहुतेक देशात याच कारणातून त्या डाएटिंग करतात व त्याचा परिणाम म्हणून त्या पुढे न्याहारी टाळू लागतात तसेच धूम्रपान व मद्यपानाच्या आहारी जातात. डाएटिंग करणाऱ्या मुली धूम्रपान व न्याहारी टाळण्याकडे वळण्याची शक्यता १.६ पट, तर मद्यपानाकडे वळण्याची शक्यता दीडपट असते, त्यामुळे आहार कमी करणे हानिकारक असते. कारण त्यामुळे काही चांगले होण्यापेक्षा हानी अधिक असते त्यापेक्षा संपूर्ण आरोग्यावर लक्ष केंद्रित करून वजन कमी करावे. त्यासाठी डाएटिंग करण्याची गरज नाही. ओंटारिओतील माध्यमिक शाळेतील ३३०० मुली या प्रयोगात सहभागी होत्या.

फक्त नाव घेतलं तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चटपटीत, आंबट, गोड,तिखट चवीची पाणीपुरी अनेकांसाठी मूड सेट करायला मदत करते. पण केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही पाणीपुरी खाणं फायदेशीर आहे. बाजारात मिळणारी पाणीपुरी आणि स्वच्छता हा वादाचा मुद्दा असतो. म्हणूनच घरच्या घरी आणि झटपट तयार होणारी पाणीपुरी या फायद्यांसाठी बिनधास्त चाखायला हवी.

तोंड येणं -

अति तिखट किंवा गरम पदार्थ खाल्ल्याने तोंड येण्याचा त्रास जाणवतो. मात्र अशावेळेस पाणीपुरीचा आस्वाद घेतल्यास तोंड येण्याचा येण्याच्या समस्येवर तात्काळ आराम मिळण्यास सुरूवात होते.

पोटाचा त्रास -

चूकीच्या किंवा अति खाल्ल्याने पोट जड वाटणं, पचनाचा त्रास जाणवणं हा त्रास तुम्हांला होत असेल तर पाणीपुरीचा आस्वाद घ्या. पाणीपुरीच्या तिखट पाण्यामध्ये पुदीना, काळं मीठ, जीरं यांचा समावेश केलेला असतो. हे पदार्थ पाचक असल्याने पचनाचा सौम्य स्वरूपातील त्रास दूर होण्यास मदत होते. वाटाण्याऐवजी मूगाचा वापर करणं अधिक आरोग्यदायी आहे. घरच्या घरी बनवलेलं पाणीपुरीचं तिखट पाणी केवळ पिणंदेखील अपचनाचा त्रास दूर करण्यास फायदेशीर आहे.

चिडचिड -

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा मूड स्विंग्समुळे होणारी चिडचिड कमी करण्यासाठी पाणीपुरी हा उत्तम पर्याय आहे. मिश्र चवीची पाणीपुरी तुमचा मूड सुधारायला मदत करते.

किती आणि कधी खावी पाणीपुरी ?
संध्याकाळच्या वेळेस पाणीपुरीचा आस्वाद घेणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. एका वेळेस 5-6 पाणीपुरी खाणं आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षित आहे. जेवणापूर्वी 10-15 मिनिटं पाणीपुरी खाणं आरोग्यदायी आहे. मात्र वर्क आऊट पूर्वी आणि नंतर शक्यतो पाणीपुरी खाणं टाळा.

मुंबई : जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप आणि धनाडाळ खाण्याची सवय असते. यामुळे पचन सुधारायला मदत होते सोबतच तोंडाला येणारी दुर्गंधीदेखील कमी होते. मात्र बडीशेप खाणं जितकं फायदेशीर आहे तितकेच बडीशेपाचे पाणीदेखील आरोग्याला फायदेशीर आहे. बडीशेप भिजत ठेवून त्याचं पाणी पिणं आरोग्याला फायदेशीर आहे. पहा बडीशेपाचं पाणी प्यायल्याने कोणकोणते फायदे होतात ? तुम्हाला माहीत आहे का जेवणानंतर पान, बडीशेप का खातात?

बडीशेपाचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे -
लठठपणा कमी होतो
आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठपणाची समस्या आढळते. त्यावर डाएट, जीम, योगाच्या मदतीचे बडीशेपाचं पाणी पिणेदेखील फायदेशीर ठरू शकते. नियमित सकाळी ग्लासभर बडीशेपाच्या पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने फायदा होतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

गरोदर स्त्रीयांना फायदेशीर
गरोदर स्त्रीयांसाठी बडीशेप फायदेशीर आहे. बडीशेप आणि खडीसाखरेचे मिश्रण नियमित सकाळ संध्याकाळ खाणं उपयुक्त ठरते. या मिश्रणामुळे गर्भाच्या शरीरात वाढणारे रक्तही शुद्ध राहते.

पचनाचा त्रास
बडीशेप पचन सुधारण्यास मदत करते. बडीशेपाचे पाणी प्यायल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता,पोटाचे, पचनाचे विकार दूर ठेवण्यास मदत होते.

मुंबई: आजच्या रोजच्या धावपळीच्या आणि फास्टफूडच्या जीवनात प्रत्येकालाच काहीना काही आरोग्यादायक समस्या भेडसावत असतात. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात तर काही याबाबत सजग दिसतात. बाहेरच्या तेलकट आणि जंकफूडमुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो आहे. खासकरुन अनेकांना वाढत्या वजनाने हैराण करुन सोडले आहे. धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळेलच असं नाही. अशात हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक उपाय आहे.

- मोड आलेल्या मुगामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. तसंच रक्त शुद्ध व्हायला मदत होते. फळं आणि भाज्यांमध्ये मिळतं त्यापेक्षा 100 पट जास्त एंजाईम तुम्हाला मोड आलेले मूग किंवा चणे खाल्यामुळे मिळतं.

- मोड आलेले मूग आणि चणे खाल्ल्यामुळे पचन संस्थाही चांगली होते. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीर चांगलं काम करतं. मोड आलेले मूग आणि चण्यांमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात. चेहऱ्याचे अनेक विकार काही दिवसात यामुळे दूर होतील.

- या कडधान्यांचे एवढे फायदे असले तरी अनेकांना ती नुसती खायला आवडत नाहीत. त्यामुळे त्याला सॅलड बनवूनही तुम्ही खाऊ शकता. पण लक्षात ठेवा मोड आलेल्या या कडधान्यांना शिजवलं किंवा तळलं तर त्यामधली पोषक तत्त्व निघून जातात. त्यामुळे ही कडधान्य उकडून सॅलडसारखीच खा.

- या कडधान्यांना तुम्ही टोमॅटो, कांदा आणि काकडीबरोबरही खाऊ शकता. तसंच त्यामध्ये गरजेनुसार मीठ आणि चाट मसाला टाकून तुम्ही त्याला आणखी चविष्ट बनवू शकता.


Dr. Ajay Rokade
Dr. Ajay Rokade
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 15 yrs, Pune
Dr. Dr Anirudha Vaidya
Dr. Dr Anirudha Vaidya
MPTh, Neuro Physiotherapist Obesity Specialist, 7 yrs, Pune
Dr. Jayashree Suryavanshi
Dr. Jayashree Suryavanshi
BAMS, Garbh Sanskar Diet Therapeutic Yoga, 21 yrs, Pune
Dr. Sayali Shinde
Dr. Sayali Shinde
BAMS, Pune
Dr. Mahesh Yadav
Dr. Mahesh Yadav
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Hellodox
x