Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

बदलत्या काळानुसार सौंदर्याची संकल्पना बदलत चालली आहे. प्रत्येक व्यक्ती प्रेझेंटेबल दिसण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.त्यातच मग अनेक तरुणी,महिला ओघाओघाने सौंदर्यप्रसाधनांचा वापर करताना दिसतात. मात्र या प्रसाधनांचा अतिवापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अनेक वेळा चेह-यावर पुटकुळ्या येणे, त्वचा काळवंडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर नैसर्गिक घटकांची मदत घेणे फायदेशीर ठरते.

आजीबाईच्या बटव्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या वापरामुळे शारीरिक समस्यांपासून सुटका मिळेल. त्यातलाच एक घटक म्हणजे कडूनिंबाचा पाला. कडूलिंबाच्या पाल्यामध्ये अनेक उपयुक्त घटक असून त्याच्या वापरामुळे त्वचेसंदर्भातील आजार, समस्या दूर होण्यास मदत होते. कडूनिंबापासून तेल, साबण,पेस्ट यासारख वस्तूंचे उत्पादन करता येते. कडूनिंबामध्ये अॅटी सेफ्टिक, अॅटी बॅक्टेरिअल हे गुणधर्म आहेत. कडूनिंबाचे हेच गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे त्वचेसंदर्भात कोणतीही समस्या असल्यास कडूनिंबाच्या पानांचा किंवा पेस्टचा वापर करणे फायदेशीर ठरते. कडूनिंबाच्या पानांच्या पेस्टमुळे दूर होणारे असेच काही उपयोग दिक्षा झाब्रा यांनी सांगितले आहेत ते पुढील प्रमाणे –

१. चेह-यावरील डाग दूर होतात –
तरुण वयातील प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी तारुण्यपिटीकेचा सामना करावा लागतो. या तारुण्यपिटीकेमुळे चेह-यावर डाग किंवा खड्डे निर्माण होतात. त्यामुळे चेह-यातील आकर्षकता कमी होते. चेह-यावरील हे डाग दूर करण्यासाठी कडूनिंबाची पाने आणि तुळशीची पाने एकत्र करु त्याचा लेप तयार करावा हा लेप गुलाब पाण्यात मिसळून चेह-यावर लावावा. लेप वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेह-यावरील डाग कमी होण्यास मदत मिळते.

२. त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते –
सतत उन्हामध्ये फिरल्यामुळे अनेकांचा चेह-या टॅन होतो.त्वचा काळवंडली जाते. अशावेळी प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा कडूनिंबाच्या पानांचा वापर कधीही योग्यच ठरेल. काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळविण्यासाठी कडूनिंबाची काही पाने, गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट गुलाबपाण्यात मिसळून हा लेप चेह-यावर लावा. लेप वाळल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धूवा.

३. त्वचेतील ओलावा टिकून राहतो –
काही व्यक्तींची त्वचा कोरडी असते. अशा व्यक्ती त्वचेतला ओलावा टिकून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. याच प्रयत्नामध्ये मॉश्चरायझरचा वापर करण्यात येतो मात्र कालांतराने या प्रसाधनांचा साईड इफेक्ट जाणवू लागतो. हा साईड इफेक्ट टाळण्यासाठी प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा घरी तयार केलेल्या नैसर्गिक मॉश्चरायझरचा वापर करावा. यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकवण्याबरोबरच त्वचेसंदर्भातील अन्य समस्याही दूर होतात. यासाठी कडूनिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये थोडंस मध मिसळून हा लेप १५ मिनीटे चेह-यावर लावावा. त्यानंतर धूवुन चेहरा स्वच्छ करावा. यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो.

४. चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होते –
अनेक वेळा चेह-यावर अतिरिक्त तेल जमा झाल्यामुळे चेह-यावर पुटकुळ्या येतात. यातूनच मग चेह-यावर डाग पडण्याची समस्या निर्माण होत असते. या समस्येपासून वाचण्यासाठी कडूनिंब गुणकारी ठरत असून कडूनिंबाच्या वापरामुळे चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. यासाठी कडूनिंबाची पेस्ट दही आणि लिंबाचा रस यांच्यासह एकत्रित करुन २० मिनीटे चेह-यावर लावा त्यानंतर चेहरा स्वच्छ धूवा. हा लेप आठवड्यातून एकदा लावल्यामुळे चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते.

५. चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात –
वय वाढत गेलं की त्याच्या खुणा चेह-यावर दिसू लागतात. यातूनच चेह-यावरील त्वचा सैल होऊन सुरकुत्या पडू लागतात. या सुरकुत्या कमी करण्यासाठी कडूनिंबाचा वापर होऊ शकतो. यासाठी कडूनिंबाच्या पेस्टमध्ये चंदनाची पावडर एकत्र करुन हा लेप चेह-यावर लावावा. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

नवजात शिशूची त्वचा नाजूक असते. अशा वेळी तुम्हाला बाळाच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याच्या त्वचेसाठी कोणते प्रॉडक्ट योग्य आहे आणि कोणते अयोग्य, याचा निर्णय तुम्हाला खूप विचारपूर्वक घ्यावा लागेल. कारण, प्रत्येक कॉस्मेटिक प्रॉडक्टध्ये केमिकल असतात. यामुळे बाळासाठी योग्य प्रॉडक्ट निवडणे आवश्यक आहे.

* तुम्ही पहिल्यांदाच बाळाला शॅम्पू किंवा साबणाने आंघोळ घालत आहात. त्या साबणाने बाळाला इजा होईल, अशी भीती तुम्हाला वाटत असेल, तर पहिल्यांदा एकाच जागी साबण लावा. बाळाची त्वचा लाल पडली किंवा तेथे खाज येऊ लागल्यास तत्काळ साबणाचा वापर थांबवा.

* सहा महिन्यांपेक्षा लहान बाळांना साबणाच्या वडीने चोळून आंघोळ घालू नका. साबणआपल्या हाताला लावून मग बाळाला आंघोळ घाला. त्यामुळे बाळाच्या त्वचेवर साबणाच्या चोळण्याचे निशाण पडणार नाहीत.
* सुगंधुक्त साबणाचा वापर करा. ज्या साबणाला वास येतो, त्यात जास्त केमिकल असतात. त्यामुळे कमी सुगंधाचा, सुगंधुक्त साबणाचा वापर करावा.

* बाळाच्या त्वचेला खूप जास्त चोळण्याची गरज नसते. कारण, त्यांच्या त्वचेवर धूळ जमा होत नाही. तुम्ही फक्त मालिश करा आणि आंघोळ घाला.

* तीन वर्षांपर्यंतच्या बाळाला बबल्स बाथ देऊ नये. यामुळे त्याच्या मूत्र मार्गात संक्रण होण्याची भीती असते.

लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे हे वचन आपण लहानपणी ऐकलेले असते. घरातील आजी-आजोबा रात्री लवकर जेवत असल्याचेही पाहिले असेल. आजही खेडेगावात रात्री 8 च्या सुमारास जेवतात. पण शहरात परिस्थिती वेगळी आहे. शहरांतील बरेचजण रात्री 10 आणि त्यानंतर जेवतात. नाईटशिफ्टमुळे काहींच्या जेवणाच्यावेळा अनिश्चित असतात. मात्र, आरोग्यशास्रानुसार रात्री उशिरा जेवण करणे हे अयोग्य मानले गेले आहे.

चयापयच क्रियेवर परिणाम- चयापचय क्रिया वेगवान असेल तर शरीरातील चरबी वेगाने जळून आपण सडपातळ राहू शकतो. मंद वेग असलेल्या चयापचय क्रियेच्या व्यक्तींध्ये चरबीचे ज्वलन होण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे काही व्यक्ती जाड होतात. रात्री उशिरा जेवल्यामुळे जास्त कॅलरीज पोटात जाऊन आपली झोप पूर्ण होत नाही. परिणामी आपले वजन वाढते.

स्थूलता वाढते : रात्री उशिरा भूक लागल्यावर बर्‍याचदा हवे ते खाल्ले जाते. त्यावेळी वजन वाढेल याचा विचार केला जात नाही. यामुळे चयापचयाच्या वेगात बदल होतो. दिवसा जेवतो, तेव्हा शरीराची काही ना काही हालचाल होत राहाते. पणरात्री झोपताना चयपचयाचा वेग कमी होतो. त्यामुळे रात्री उशिरा आपण जे काही खाऊ ते अत्यंत कमी वेगाने पचते आणि त्यामुळे वजन वाढते.
पित्तप्रकोप : रात्री उशिरा जेवल्यास पित्तप्रकोप किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते. छातीत जळजळ होते. खूप रात्री जेवल्यास त्याचे पचन योग्यप्रकारे होत नाही आणि अन्न पचण्यासाठी आवश्यक आम्ल पुन्हा अन्ननलिकेत जाते. त्यामुळे अपचन होते. सातत्याने हे होत राहिल्यास गरगरणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्‌भवतात.

उच्च रक्तदाब : रात्री उशिरा जेवल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाच्या आजाराला आमंत्रण मिळते. म्हणूनच रात्रीच्या जेवणाची वेळ सांभाळणे गरजेचे आहे.
रात्री उशिरा जेवल्याने झोपेशी निगडित समस्याही निर्माण होतात. रात्री उशिरा जेवणार्‍या लोकांमध्ये चिडचिडेपणावाढू शकतो.

अनेकांना दातदुखीचा त्रास होतो. कॅव्हिटीमुळे दातदुखीची समस्या निर्माण होते हे खरे असले तरी यामागे इतर काही कारणेही असू शकतात.

* दातांमध्ये टोचल्यासारखे दुखत असेल आणि काही खाल्ल्यावर किंवा चावल्यावर वेदनांमध्ये वाढ होत असेल तर हे जंतूसंसर्गाचे किंवा दात तुटल्याचे लक्षण असू शकते. अशावेळी तातडीने दंततज्ज्ञांना भेटायला हवे. दातांच्या वेदनेचे कारण शोधून काढण्यासाठी क्ष-किरण चाचणी केली जाते.

* दातांच्या आरोग्याशी संबंधित नसणार्‍या काही कारणांमुळेही दातदुखी निर्माण होऊ शकते. सायनससारख्या त्रासामुळे दात दुखू शकतात.

* संवेदनशीलता हे दातांच्या वेदनेचे एक कारण असू शकते. गोड किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर दातांमध्ये झिणझिण्या आल्यासारखे वाटत असेल तर तुमचे दात संवेदनशील झाले आहेत, असे समजावे. दातांवरचे आवरण निघून गेल्यास, विरळ झाल्यास किंवा हिरड्यांच्या समस्येमुळे दात संवेदनशील बनू शकतात. या समस्येवरचा उपाय शोधणे गरजेचे आहे.

* दातदुखी असताना तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. खूप अस्वस्थ वाटत राहते. म्हणूनच कॅव्हिटी किंवा जंतूसंसर्गअसेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

आज जगभरात World No Tobacco Day हा दिवस पाळला जातो. तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी लाखों लोकांचा मृत्यू होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं तंबाखूच्या विळख्यात अडकली आहेत. तंबाखूमुळे हृदय आणि फुफ्फुसाच्या विविध आजारांसोबतच हाडांचीही समस्या होते. अशा जर तुम्हाला तंबाखू सोडायचा असेल तर आणि त्यासाठी उपाय शोधत असाल तर खालीलप्रमाणे काही गोष्टींचा वापर करु शकता.

सकारात्मक रहा

तुम्ही जर दिवसभर तंबाखूचं सेवन करत असाल तर ही सवय मोडणे तुमच्यासाठी मोठं आव्हानच असणार आहे. अशावेळी तुम्ही सकारात्मक विचार करणे आणि मनाची तयारी करणे आवश्यक आहे. आपण हे करु शकतो अशी गाठ मनात बांधून ठेवा. स्वत:वर विश्वास ठेवा. अशात तुमच्या मनात अनेक चुकीचे विचार येणार आणि पुन्हा तुम्ही त्याच मार्गावर जाण्याचा प्रयत्न कराल अशावेळी स्वत:ला रोखण्याची तुमची परीक्षा असेल.

प्लॅन आखून काम करा

तंबाखूची सवय मोडण्यासाठी एक दिवस ठरवा. तंबाखू खाण्याचे नुकसान, त्याने काय होतं याबाबात जे वाचायला मिळेल ते वाचा. मनाची पूर्ण तयारी करा.

स्वत:ला बिझी ठेवा

तंबाखूची सवय मोडायची असेल तर सर्वात चांगला उपाय म्हणजे स्वत:ला कामात व्यस्त करुन घेणे. लोकांसोबत वेळ घालवा, सतत पाणी प्यायला हवे, टीव्ही बघा. हे सगळं करताना काही दिवस तुम्हाला त्रास होईल पण याने तुमचं मन डालव्हर्ट होईल आणि तुमची सवय मोडण्यास मदत होईल.

या गोष्टींपासूनही रहा दूर

त्या गोष्टींपासूनही दूर रहा ज्यामुळे तंबाखूचं सेवन करण्यास प्रोत्साहन मिळतं. कॉफी ब्रेक किंवा ड्राईव्ह करताना याची खास काळजी घ्या. घरातून तंबाखू बाहेर फेकून द्या. जे तंबाखू खाणारे लोक आहे त्यांच्यापासून दूर रहा.

हे ट्राय करा

तंबाखूचं व्यसन मोडण्यासाठी तुम्हाला तुमचं मन दुसऱ्या गोष्टीत लावावं लागेल. तुम्हाल जर तंबाखू खाण्याची तलब आली तर च्यूईंगम, ओवा खावा. याने तुम्हाला आलेली तबल त्या वेळेपुरती मारली जाते.

Dr. ATUL KALE
Dr. ATUL KALE
MS/MD - Ayurveda, Ayurveda Neurotologist, 15 yrs, Pune
Dr. Divya Prakash
Dr. Divya Prakash
MDS, Dentist Implantologist, 6 yrs, Pune
Dr. Deelip Janugade
Dr. Deelip Janugade
BAMS, Family Physician General Physician, 31 yrs, Pune
Dr. Chandrashekhar Jadhav
Dr. Chandrashekhar Jadhav
BAMS, Ayurveda Child Abuse Pediatrician, 15 yrs, Pune
Dr. Amit Gupte
Dr. Amit Gupte
BDS, Dentist, 18 yrs, Pune
Hellodox
x