Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

निद्रानाश ही सध्या अनेकांसाठी एक मोठी समस्या असते. या समस्येवर मात करण्यासाठी काही उपाय करणे नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेण्याचे उपाय अवलंबले जातात. मात्र योग हा झोपेच्या समस्येवरील उत्तम उपाय ठरु शकतो. श्वासोच्छवासाचे काही प्रकार व शरीराच्या काही विशिष्ट मुद्रा करून निद्रानाशाच्या समस्येवर तोडगा निघू शकतो. योगासने व प्राणायाम यांनी निद्रानाशाची कारणे टाळता येतात व निद्रानाशावर उपायही होऊ शकतो, हे शास्त्रीय संशोधनातून सिध्द झाले आहे.

रात्रीची झोप शांत व पुरेशी मिळण्यात प्राणायाम व काही योगासनांचा मोठाच उपयोग होतो. नियंत्रित स्वरुपाचा व विशिष्ट सुरातील श्वासोच्छवासाचा व्यायाम, म्हणजे प्राणायाम हा निद्रानाश, तणाव, नैराश्य, डोकेदुखी व चिंता यांवरील चांगला उपचार आहे. यात अनुलोम-विलोम, चंद्रभेदन, कपालभाती व भ्रामरी ही तंत्रे विशेषतः सर्वत्र वापरली जातात. गोदरेज इंटेरिओच्या स्लीप @ १० या उपक्रमांतर्गत याबाबतचा विशेष अभ्यास करण्यात आला आहे. श्वासोच्छवासाची एकतानता व त्यातील सातत्य यांमुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांकडून मेंदूला व शरीराला आपली गती मंद करण्यासाठी काही संदेश पाठवले जातात. ही गती मंदावल्यामुळे शरीर व मन शांत होते. त्यातूनच झोप येण्याची प्रक्रिया सुधारते.

थकावट, तणाव, नैराश्य व चिंता यांव्यतिरिक्त अस्वस्थता, छातीतील जळजळ व डोकेदुखी ही कारणेदेखील झोपेचे खोबरे करण्यास कारणीभूत असतात. शरीराच्या काही विशिष्ट मुद्रा अथवा आसने योग्य त्या पध्दतीने करण्याने विशिष्ट दुखणी दूर होतात, एवढेच नव्हे, तर संपूर्ण शरीराला आराम मिळतो. मार्जारासन, म्हणजे मांजर व उंट यांच्यासारखी मुद्रा केल्याने अन्नपचनाची क्रिया व रक्ताभिसरण सुधारते. शिशुआसन, म्हणजे लहान मुलासारखी मुद्रा केल्याने पाठीचा मणका व मज्जासंस्था यांना आराम पडून शांत झोप मिळते. अनेकदा खूप श्रम केल्याने आपण भयंकर थकलेलो असतो. थकव्याने शरीर दुखत राहते व झोप येणे अशक्य असते. अशा वेळी बध्दकोनासन, म्हणजे फुलपाखरासारखी मुद्रा केल्याने दुखरे स्नायू सैलावतात, त्यांच्या वेदना कमी होतात व झोप मिळू शकते. त्याचप्रमाणे विपरीतकरणी आसनामुळे मेंदूतील रक्ताभिसरण वाढून डोकेदुखी आणि पायाचे दुखणे बरे होऊ शकते.

योगासने शिकणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे, की आसने करण्यापूर्वी व करून झाल्यानंतर शवासन, म्हणजे शवासारखी मुद्रा करणे हितावह असते. शवासनामुळे लक्ष केंद्रित करणे सोपे जाते व शरीरालाही व्यायामाअगोदरचा व नंतरचा आराम मिळतो. तणाव, अपचन, अयोग्य रक्ताभिसरण, थकावट, डोकेदुखी, नैराश्य, चिंता व अनियमित दिनचर्या यांमुळे उद्भवणाऱ्या झोपेच्या विविध समस्यांवर व निद्रानाशावर योग हा पर्यायी उपचार आहे, हे आता जगभरात मान्य झालेले आहे. योग हा आपल्या दिनचर्येचा भाग असायलाच हवा. याचे योग्य ते शिक्षण घेणे कधीही फायदेशीर ठरते.

सध्या सगळेच आपल्या आरोग्याबाबात जागरुक झाल्याचे चित्र आहे. यामध्ये आहाराला विशेष महत्त्व असल्याने त्याबाबत वेगवेगळे प्रयोग केले जातात. बाजारातही विविध गोष्टींचे आकर्षण दाखवून लोकांना भुलवण्याचे प्रकार केले जातात. कधी लठ्ठपणा कमी होण्यासाठी पाचक रस तर कधी मधुमेह कमी होण्यासाठी भाज्यांचा रस सर्रास घेतला जातो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या कितपत कमी होतात माहित नाही पण कोणत्याही सल्ल्याशिवाय आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे आपल्या जीवावरही बेतू शकते. पुण्यात नुकताच एका महिलेचा दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने मृत्यू झाला आहे. आता यामध्ये नेमके कोणते घटक होते किंवा भोपळा खराब होता का असे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भोपळ्याच्या गुणधर्मांविषयी जाणून घेऊया…

१. सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, मूत्राशयाशी निगडीत अडचणी तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते.

२. भोपळ्यामध्ये असणाऱ्या क्युकरबिटॅसिन एका विशिष्ट घटकामुळे कधीकधी हा रस प्रमाणापेक्षा जास्त कडू होतो.

३. या घटकामुळे काकडी, फळांचे रस, वांगे, खरबूज, लाल भोपळा या गोष्टींना कडवट चव येते.

४. भोपळ्याचा रस दिर्घकाळ बंद बाटलीत असेल आणि चवीला थोडा जरी कडू लागला तरी तो खराब आहे असे समजावे आणि तो अजिबात पिऊ नये. कारण त्यातून गंभीर इजा उद्भवण्याची शक्यता असते.

५. अशाप्रकारचा भोपळ्याचा कडू रस प्यायल्यामुळे पोटदुखी, अतिसार, उलट्या, जुलाब यांसारखे त्रास उद्भवतात. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हा त्रास २ ते ७ दिवसांसाठी होत राहतो. कडवट चव असलेला भोपळ्याचा रस प्यायल्यास पुढच्या ३० मिनिटांत ही लक्षणे दिसायला लागतात.

६. अनेकदा असा रस प्यायल्याने काही गंभीर समस्या उद्भवतात. यात जठरामध्ये रक्तस्त्राव होणे, रक्ताच्या उलट्या होणे आणि यकृताशी निगडित तक्रारी उद्भवणे यांचा समावेश असतो.

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात हवामान थंड असते. तसेच याच दिवसांत अनेक साथीचे रोगही पसरतात. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. पावसाळ्यात थंड आणि जड पदार्थाचे सेवन आणि वातावरणातला बदल यामुळे शरीरात वायू आणि कफाचा प्रकोप होतो आणि पावसाळ्यातले शारीरिक त्रास सुरू होतात. ते टाळायचे असतील तर आहाराला पाचक आणि उष्ण पदार्थांची जोड द्यायला हवी. त्यामुळे काही गोष्टी टाळणं आणि काही पदार्थांचा आहारात आवर्जून सहभाग करून घेतला पाहिजे. त्यामुळे या ऋतूत होणारे अनेक त्रास कमी होतात.

पालेभाज्या कमी खाव्या
पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापर शक्यतो कमी करावा. पालेभाज्या पचवण्यास आपल्या आतडय़ांना अधिक काम करावे लागते व पावसाळ्यात सर्वसाधारणत: पचनशक्ती थोडी कमी झालेली असते त्यामुळे आहारात तूर्त पालेभाज्या टाळाव्यात.

फळभाज्यांचा समावेश करावा
या ऋतूत फळभाज्या व शेंगभाज्या अवश्य खाव्यात. फळभाज्यांमध्ये दुधी, घोसाळी (गिलकी), दोडका, तोंडली, लाल भोपळा, पडवळ, कोहळा या भाज्या खाव्यात. तरा गवार, फरसबी, चवळीच्या शेंगा जरूर वापराव्यात. या भाज्यांच्या आत पाणी जाऊ खराब होण्याची शक्यता कमी असते.

भाकरी
ज्यांना पचनाचे त्रास आहेत त्यांनी शक्यतो भाकरीच खावी. ज्वारी, बाजरी, नाचणी अशी कोणतीही भाकरी चालू शकते.

रताळी
रताळी या दिवसांत चांगली मिळतात व या दिवसांत उपवासांचे निमित्तही असते. रताळ्यातही ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व असते. त्यामुळे तेही खावं.

पचायला हलेक पदार्थ
जेवणात सूप/ डाळीचे कढण/ भाताची पेज/ कोकम सार/ ताकाची कढी असे पातळ व गरम पदार्थ नेहमी समाविष्ट करावेत.

मेथी दाणे
पावसाळ्यात आहारात शक्य तिथे मेथीचा वापर जरूर करावा. मेथीच्या दाण्यांना मोड आणून ठेवावेत आणि ही मोड आलेली मेथी डाळी, उसळींसारख्या पदार्थामध्ये शिजताना १-२ चमचे घालावी. ही मेथी पदार्थात घातल्याने पदार्थ कडू लागत नाही. मेथीमुळे पोटात वायू धरणे कमी होते, तसेच वातामुळे होणारी अंगदुखी टाळण्यासाठीही मदत होते.

जायफळ
या दिवसात गोड पदार्थ तयार करताना त्यात जायफळ जरूर घालावे. जायफळ अन्नपचनासाठी मदत करते. मसालेभात किंवा मसालेदार भाज्यांमध्ये थोडीशी जायफळाची पूड घातली तर हे पदार्थही खूप जड होणार नाहीत.

गवती चहा
पावसाळ्यात नेहमीच्या चहात गवती चहा जरूर घालावा. सर्दी-खोकल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी गवती चहा मदत करतो.

लग्न झालेल्यांमध्ये एकटे असणाऱ्यांपेक्षा हृदयविकार उद्भवण्याचे प्रमाण कमी असते असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनावरुन समोर आले आहे. तसेच लग्न झालेल्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी असते. यासाठी जवळपास २० लाख लोकांचा अभ्यास करण्यात आला. लग्न झालेल्या लोकांपेक्षा ज्यांचा घटस्फोट झाला आहे. विधवा किंवा विधूर आहेत आणि ज्यांनी लग्नच केलेले नाही अशांमध्ये ४२ टक्के जणांना हृदय व रक्तवाहीन्यांशी संबंधित तसेच १६ टक्के लोकांमध्ये कोरोनरी आर्टरीचे विकार असतात. हृदय नावाच्या जरनलमध्ये संशोधकांनी केलेल्या नोंदीनुसार, लग्न न झालेल्यांपैकी ४३ टक्के हे हृदयाशी निगडित आजारांमुळे मृत्यू पावतात तर लोक ५५ टक्के लोक हे स्ट्रोकमुळे मृत्यू पावतात.

इंग्लंडमधील किले विद्यापीठातील वरिष्ठ अभ्यासक डॉ. मामस यांनी लग्न हे हृदयाच्या आरोग्यासाठी कसे उपयुक्त असते याबाबत भाष्य केले आहे. लग्नामुळे आर्थिक स्थैर्य, सामाजिक पाठिंबा मिळतो असे त्यांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ हृदयविकाराचा झटका आलेले किंवा हृदयाशी निगडित अन्य काही त्रास असणारे लोक जोडीदाराच्या दबावामुळे औषधोपचार योग्य पद्धतीने करतात आणि पुरेशी काळजी घेतात. त्याशिवाय हृदयविकाराचा झटका येऊन गेला असल्यास त्यांच्यामध्ये पुर्नवसनाची प्रक्रियाही चांगल्या पद्धतीने होते. तसेच जोडीदार आसपास असल्याने या लोकांमध्ये हृदयविकार वेळेत समजण्यास मदत होते. याबरोबरच घटस्फोट झालेल्या महिला आणि पुरुषांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण हे लग्न झालेल्यांपेक्षा ३५ टक्क्यांनी जास्त असते.

विधवांमध्येही जोडप्याने राहत असलेल्यांपेक्षा स्ट्रोकचे प्रमाण १६ टक्क्यांनी जास्त असते. मात्र त्यांच्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण म्हणावे इतके जास्त नसते. लग्नामुळे आरोग्याचे फायदे महिलांपेक्षा पुरुषांना जास्त होतात असेही या अभ्यासात म्हटले आहे. एकटे असणारे लोक आपल्या आरोग्याची आणि हृदयविकार असल्यास त्याची योग्य पद्धतीने काळजी घेत नाहीत. मात्र लग्न झालेले लोक ही काळजी घेताना दिसतात. लग्न झालेल्यांनी जोडीदारासोबत व्यायाम करणे अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे त्यांचे शारीरिक आरोग्य सुधारण्याबरोबर त्यांचे नातेही सुधारते असे डॉ. मामस यांचे म्हणणे आहे.

आपण प्रथिन स्रोताचा स्वस्त आणि सुलभपणे उपलब्ध असलेला विचार करता तेव्हा अंडी साधारणपणे आपल्या मनात येणारी पहिली गोष्ट आहे. आपण त्यांना उकडलेले, तळलेले, पांगळे ठेवू शकता किंवा त्यांना इतर पदार्थांसह जोडू शकता. ते आपल्या शरीरातील पोषण देणारे जीवनसत्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्त्वांच्या पॉवरहाऊस आहेत.

अंडी सर्वोत्तम सुपर पदार्थ मानली जातात का ते येथे आहेत:

1.अंडीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात:

अंडीमध्ये ल्यूटिन आणि झीएक्झिथिनसारखे अँटीऑक्सिडंट असतात ज्यांचे डोळ्यांना पोषण देण्यास मदत होते. काही ठराविक रोगांपासून जसे की बुरसटलेल्या अवयवांमध्ये आणि डोळ्याच्या मोतीबिंदूचा बचाव होतो.
ते पोषण पॉवरहाऊस आहेतः हृदयामध्ये निरोगी चरबी, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर ट्रेस पोषक असतात. ते फॉस्फरस, लोखंड आणि व्हिटॅमिन ए मध्ये देखील समृध्द असतात. अंड्याचा पोषणद्रव्ये असलेल्या बहुतांश घटकांमधे ते कोलेस्टरॉलच्या घटकांपासून घाबरत नाहीत.

2.ते तृप्ततेला उत्तेजन देतात:

अंडी अनावश्यक प्रमाणात कार्बोहायड्रेटची सामग्री जास्त नसल्याने, ते रक्तातील साखरेची पातळी धोक्यात असलेल्या स्पाइक्सपासून दूर करते. तसेच, अंडी उच्च प्रथिनेयुक्त सामग्री तृप्तिला प्रोत्साहन देतात. निरोगी आहाराचा एक भाग म्हणून नियमितपणे अंडी खाणे वजन कमी करते आणि चरबी कमी होण्यास कारणीभूत असते.

3.आपल्या केसांना व त्वचेसाठी चांगले आहेतः

त्यात व्हिटॅमिन बी 12 आणि सल्फरचा समावेश आहे, त्या दोघांनाही त्वचा आणि केसांपासून होणारा विघटन करणारा त्रास आहे. अंडी ही केरोटीन (नाखून आणि केसांमध्ये प्रथिने एक प्रकारचे प्रथिने समाविष्ट असलेल्या) जैव -ोपयोगी वापराच्या दृष्टीने सर्वोत्तम स्त्रोत म्हणून ओळखल्या जातात. (जैवउपलब्धता म्हणजे आपल्या शरीराद्वारे पोषण किती चांगले होते.)

4.शरीरात चांगले कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते:

नियमित अंडी खप आणि शरीरात चांगले कोलेस्टेरॉलची पातळी (एचडीएल) वाढविण्यासाठी दर्शविले गेले आहे ज्यामुळे स्ट्रोक आणि इतर ह्रदयरोगाची शक्यता कमी होते.

5.त्यात प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात:

अंडी हे प्रथिनांचे सर्वात स्वस्त स्त्रोत आहेत आणि सर्वात सोयीस्कर उपलब्ध आहेत. त्यामध्ये शरीरातील आवश्यक 9 अचूक अमीनो असिड्स असतात. स्नायूंना अंडीपासून प्रोटीन म्हणून घेण्याकरिता अंडी सर्वात पसंतीचे पदार्थ आहेत ज्यामुळे शरीराद्वारे सहजपणे शोषून घेता येते. आपण कोणत्याही विशिष्ट समस्येविषयी चर्चा करू इच्छित असल्यास, आपण आहारतज्ञ-पोषणतज्ञांकडे सल्ला घेऊ शकता.

Dr. Tanaji Bangar
Dr. Tanaji Bangar
BAMS, Family Physician General Physician, 8 yrs, Pune
Dr. Vivek  Sahu
Dr. Vivek Sahu
MD - Homeopathy, 17 yrs, Pune
Dr. Seema
Dr. Seema
BAMS, Pune
Dr. Vijay Hatankar
Dr. Vijay Hatankar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 21 yrs, Pune
Dr. Prachi Nandode
Dr. Prachi Nandode
BHMS, Homeopath, 18 yrs, Pune
Hellodox
x