Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पावसाळ्यात लहानांसोबत मोठ्यांचीही इम्यूनिटी कमी होते. पावसाळा अनेक आजारांना निमंत्रण देते. वारंवार होणारी सर्दी, खोकला आणि ताप यामुळे अनेकजण हैराण असतात. पण तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास तुम्हाला या समस्यांवर मात करणे सोपे होते. म्हणून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा. पाहुया रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर ठरतात....

आवळा
सकाळी नाश्यात एक आवळा खा. व्हिटॉमिन सी युक्त आवळ्यामुळे तंदुरूस्त राहण्यास मदत होते.

कोरफड ज्युस
यात अॅंटी ऑक्सिडेंट असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढून आजारांशी सामना करण्यास मदत होते. ३० मिली कोरफड ज्यूस १०० मिली पाण्यात मिसळून प्या.

अक्रोड
अक्रोडमुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. त्याचबरोबर इम्युनिटी वाढते. म्हणून पावसाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी अक्रोड अवश्य खा.

अळशी
अळशीत ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अॅंटी ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी शरीर तयार होते. अळशी वाटून त्याची पावडर बनवा व दही किंवा सलाडवर घालून त्याचे सेवन करा.

ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये अॅंटी ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. म्हणून पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ग्रीन टी घ्या.

पावसाळा आणि आजारपण हे जोडीने येतं. ताप, सर्दी, खोकला, इन्फेकशन याबरोबरच पावसाळ्यात येणारा अजून एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. परंतु, अनेक लोकांना याबद्दल माहीती नाही. या आजाराचा पसार कुत्रा, उंदीर यांसारख्या प्राण्यांमुळे होतो. खूप पाऊस पडल्यावर पाणी साचतं. काही वेळा पूर येतो. अशा साचलेल्या पाण्यात प्राण्यांच्या लघवीतील बॅक्टरीया मिसळतात व त्यामुळे इन्फेकशन पसरते. तर जाणून घेऊया लेप्टोस्पायरोसिसचा धोका कोणाला अधिक आहे ?
परंतु, काही ठराविक गोष्टींमुळे इन्फेकशनचा धोका अधिक वाढतो. लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढवणाऱ्या घटकांविषयी माहिती करुन घेऊया. त्याचबरोबर त्या आजाराला आळा घालण्याचे मार्गही जाणून घेऊया....

# सगळ्यांनाच लेप्टोस्पायरोसिसचा धोका आहे. परंतु, जर तुम्ही रहात असलेल्या ठिकाणी आजूबाजूला उंदीरांचा प्रादुर्भाव असेल तर हा धोका अधिक वाढतो. कारण त्यामुळे पाणी, माती, अन्न प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित होऊन इन्फेकशन पसरण्याची शक्यता असते.

# या बॅक्टरीयांचा त्वचेत शिरकाव झाल्यानंतर त्वचा फाटली गेल्यास, स्क्रॅचेस आल्यास धोका अधिक वाढतो. बॅक्टरीयामुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होतो. परंतु, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा आजार पसरण्याची शक्यता तशी कमीच असते.

# पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. पशुवैद्य, प्राण्यांचे केयर टेकर यांना देखील हा धोका असतो. जर तुम्ही आऊटडोअर स्पोर्ट्स म्हणजेच राफ्टिंग, स्विमिन्ग दूषित पाण्यात करत असाल तर तुम्हाला इन्फेकशन होण्याची शक्यता असते.

लेप्टोस्पायरोसिसला आळा कसा घालावा ?
पाणी साठलेल्या जागेतून चालणे टाळा. चिखल, घाण असलेल्या जागी अधिक काळ राहू नका. बरं वाटत नसल्यास किंवा लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे दिसून आल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांनाकडे जाणे योग्य ठरेल. कारण स्वतःहून औषधे केल्यास त्रास वाढून परिस्थिती गंभीर होऊ शकते. घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. फिरायला गेलेल्या ठिकाणी देखील स्वच्छता राखा.

पावसाळा सुरु होताच सर्वच झाडांना नवा बहार येतो. सगळीकडे हिरवाई दिसू लागते. इतर झाडांप्रमाणे मेहंदीच्या पानांनाही पावसाळ्यात बहर येतो. सणवार, लग्नसराई मेंहदी आर्वजून काढली जाते. सौंदर्य खुलवण्यात मेंहदीचे महत्त्वाचे स्थान आहे. पण मेहंदीमुळे फक्त सौंदर्यातच भर पडत नाही तर मेहंदी इतरही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया मेहंदीचे इतर फायदे...

नैसर्गिक कंडीशनर
मेहंदीत दही, आवळा, मेथी पावडर घालून मिक्स करा आणि केसांना लावा. १-२ तास केसांवर राहू द्या. त्यामुळे केस काळेभोर, घनदाट आणि चमकदार होतील.

हिट बस्टर
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी मेहंदीचा वापर केला जातो. हाता-पायांच्या तळव्यांना मेहंदी लावल्याने शरीरातील उष्णता कमी होते.

नैसर्गिक कुलेंट
डोकेदुखी किंवा मायग्रेनसारखे त्रास कमी करण्यासाठी मेहंदी एक उत्तम उपाय आहे. मेहंदी वाटून डोक्याला लावल्याने खूप फायदा होतो.

पेन किलर
गुडघेदुखी किंवा सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी मेहंदी आणि एरेंडलची पाने समान प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण हलकेसे गरम करुन गुडघ्यांवर लावा. नक्कीच फायदा होईल.

भाजल्यास उपयुक्त
शरीरावर कोठेही भाजल्यास मेहंदीची पाने वाटून त्याचा लेप तयार करा. हा लेप भाजलेल्या जागी लावा. जखम लवकर बरी होईल.

वेगवेगळ्या अभ्यासांमधून हे समोर आलंय आणि अनेक तज्ज्ञही मानतात की, गरम पाण्याने आंघोळ केल्याने अनेक नुकसान होतात. याने शरीराची वरील त्वचा कमजोर होऊ लागते. त्यासोबतच काहींना खाज आणि इन्फेक्शनचीही समस्या होऊ शकते.

इतकेच नाहीतर यामुळे टेस्टिकल्सचं तापमान वाढतं आणि त्यामुळे स्पर्म काऊंट कमी होतो. अशातच एका रिसर्चमधून समोर आले आहे की, आठवड्यातून पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्यास हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक रोखण्यास मिळते.

एका संशोधनात आढळलं की, रोज 41 डिग्री सेल्सिअस गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदयासाठी चांगलं असतं. शोधकर्त्यांनुसार, नियमीतपणे गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदय चांगलं राहतं आणि ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. इतकेच नाहीतर नियमीत गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्यांना तणावाचाही कमी सामना करावा लागतो.

काय सांगतो रिसर्च?

युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलच्या संशोधनकर्त्यांनुसार, जे लोक आठवड्यातून चार ते सात वेळ गरम पाण्याने आंघोळ करतात. त्यांच्या तुलनेत एकदा गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्यांना स्ट्रोकचा धोका अधिक असतो.

ग्रीन टी चे अनेक फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला रेड टी म्हणजेच लाल चहाचे फायदे सांगणार आहोत. अलिकडे ग्रीन टी सारखीच पसंती रेड टीला सुद्धा मिळत आहे. ज्यांना ग्रीन टीची टेस्ट पसंत नाही ते रेड टीचा आस्वाद घेतात. चला जाणून घेऊया याचे फायदे आणि चहा करण्याची पध्दत....

रेड टी पिण्याचे फायदे

1) रेड टी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाशी निगडीत समस्यांचा सामनाही करावा लागत नाही.

2) रेड टीमध्ये असलेल्या अॅंटीऑक्सीडेंट तत्व हृदय निरोगी ठेवण्यात मदत करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधीत आजार होण्याची शक्यता कमी असते.

3) असे सांगतात की, रोज रेड टीचं सेवन केल्यास कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशीही सामना करता येतो.

4) या चहामुळे वाढतं वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते.

रेड टी तयार करण्याची पद्धत

रेड टी तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वातआधी तीन कप डाळिंबांच्या बियांची गरज आहे. या बीया तुम्ही एक कप साखरेसोबत बारीक करुन घ्या. हे मिश्रण गाळून घ्या. हे मिश्रण तुम्ही साठवूनही ठेवू शकता. त्यानंतर एक चतुर्थांश कप मिश्रण घ्या, त्यात गरम पाणी मिश्रित करा. तुम्हाला हवं असेल तर त्यात थोडं मधही घालू शकता. तुमचा चहा तयार...

रेड टीचे तोटे

रेड टीचं सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे आहेत. पण याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास याचा धोकाही होऊ शकतो. गर्भवती महिला किंवा बाळांना ब्रेस्टफिड करण्याऱ्या महिलांनी रेड टी घेऊ नये.

Dr. Sanjeev Sambhus
Dr. Sanjeev Sambhus
BAMS, Family Physician Physician, 34 yrs, Pune
Dr. Sanjeev Parmar
Dr. Sanjeev Parmar
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 16 yrs, Pune
Dr. Gauri  Nerurkar
Dr. Gauri Nerurkar
BHMS, Dermatologist, 10 yrs, Pune
Dr. Jyoti Shinde
Dr. Jyoti Shinde
BHMS, Diabetologist Homeopath, 9 yrs, Pune
Dr. Shyamsundar Jagtap
Dr. Shyamsundar Jagtap
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Hellodox
x