Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

कॅफिन शरीरासाठी चांगले असल्याचे सांगितले आहे, जर ते मर्यादित प्रमाणात वापरली जाते. हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्या स्वरूपात तो वापरला जातो तो देखील महत्त्वाचा आहे आणि हिरव्या चहा खूप चांगले असल्याचे म्हटले आहे. पण जेवण संपल्यानंतर लगेचच हिरवा चहा मिळण्याचा काय अर्थ आहे?

एक पेय म्हणून हिरवा चहा, एक आश्चर्यचकित पेय असणे एक प्रतिष्ठा आहे, आणि अगदी योग्यरित्या त्यामुळे, हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हां किंवा जेवणानंतर हिरवा चहा असणे ही व्यक्ती चांगली कल्पना असू शकत नाही. पण हे का घडते? विहीर, तेथे रसायने आहेत, ज्या हर्बल चहामध्ये अस्तित्वात असतात. जेव्हां हिरव्या चहाला जेवणानंतर लांब नाही असे फिन्लेसचे काय होते, ते असे आहे की ते अन्नातील लोहयुक्त पदार्थांच्या शोषून अडथळा आणू शकतात.

जेवणाच्या वेळी हलक्या चहा पिण्याची किंवा जेवणाची वेळ नसल्याबरोबरच, हे शक्य तितके चांगले आहे की आपण ते पिणे टाळावे जेव्हा दुधापासून बनलेले पदार्थ जसे की चीज वापरल्या जात आहेत. याचे कारण असे आहे की दुधात अस्तित्वात असलेले प्रथिने, व्यक्तीच्या चयापचय वर सामान्यतः चहा-पिण्याच्या चयापचयवर सामान्य प्रभाव पडू देत नाही म्हणून चयापचय वाढवणे आणि वजन कमी करण्याच्या आव्हानास थोडी सोपे करणे शक्य नाही. .

तरीही असे असेल तर जेवण किंवा नंतर हिरव्या चहा पिणे ही एक सवय आहे, ज्याला सर्व काही हलवण्यात काहीच अर्थ नाही, मग काय केले जाऊ शकते हे असे आहे की जेवण एखाद्या प्रमाणात बदलले पाहिजेत लोह समृध्द अन्न जास्त प्रमाणात फिनोलच्या प्रभावांना सामोरे जाण्यास हा काही मार्ग आहे. लोहाच्या समृध्द अन्नांव्यतिरिक्त, व्हिटॅमिन सीसह समृद्ध अन्न देखील खाण्याची आवश्यकता आहे.

तथापि, असे म्हटले जात आहे, जे लोखंडीपणाने कमतरते असलेले लोक जेवणानंतर वापरलेल्या हिरव्या चहाच्या स्वच्छतेपासून मुक्त आहेत. त्याऐवजी, जेवण आणि दिवसाच्या सुरुवातीच्या काळात ते काय करू शकतात. काय हे साध्य होईल की हिरव्या चहाचे सर्व फायदे शरीराद्वारे आत्मसात केले जाऊ शकतात आणि अन्नाचे कोणतेही पोषण मूल्य एकतर गमावले जाते याव्यतिरिक्त, जेवण दरम्यान ग्रीन चहा प्यालेला देखील भूक कमी आणि वजन कमी मदत करू शकता. काय चांगले असू शकते? आपण कोणत्याही विशिष्ट समस्येविषयी चर्चा करू इच्छित असल्यास, आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

पायाच्या नसांमध्ये गुठळी झाल्यास ती फुफ्फुसांमध्ये जाऊन अडकते आणि श्वासोच्छ्वास बंद झाला, की पेशंटचा मृत्यू होतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत गाठ आढळल्यास रक्तपुरवठा खंडीत होतो. रक्ताच्या या विकारांचा गुंता सुरुवातीला सुटत नसल्यानं अनेकांचे प्राण गेल्याच्या घटनाही घडल्यात.

अमितचे बाबा सत्तरीतले. घरात पडून त्यांचा खुबा फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी त्यांना खुबा बदलण्याचा सल्ला दिला. ऑपरेशन झाल्यानं ते काही दिवस हॉस्पिटलमध्ये झोपून होते; परंतु सातत्यानं झोपून राहिल्यानं त्यांच्या पायातील मोठ्या नसांमध्ये रक्ताची गुठळी तयार झाली. ती गुठळी थेट फुफ्फुसांमध्ये गेली आणि त्यांना श्वासोच्छ्वासाला त्रास होऊ लागला. व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं; पण उपयोग झाला नाही. त्यांची प्राणज्योत मालविली. रक्ताच्या एका गुठळीमुळे अमितच्या बाबांचा प्राण गेला. त्याचं योग्य निदान आणि उपचार झाले असते, तर कदाचित ते वाचले असते.

'रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे घटक नसले, तर 'डीव्हीटी' नावाचा आजार होतो. प्रोटीन किंवा म्युटेशन नसल्यानं रक्त गोठतं. जास्त पाणी न पिणं, डिहायड्रेशनमुळे रक्त गोठणं, एकाच स्थितीमध्ये पाय न हलवल्यास त्या व्यक्तीमध्ये पायाच्या नसांमध्ये रक्ताची गुठळी होण्याची शक्यता असते. जास्त वेळ उभं राहणं किंवा सातत्यानं बसून काम करण्याच्या स्थितीमुळे रक्तवाहिन्या फुगतात. त्या पेशंटला 'डीव्हीटी' (deep venus thrombosis) हा आजार बळावतो. काही रक्तवाहिन्यांमध्ये पारदर्शक घटक (वेब) असतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळेही 'डीव्हीटी'चा आजार होतो. रक्ताच्या आजारांचं निदान करणं अनेकदा अशक्य होतं. ५० टक्के नागरिकांमध्ये हा आजार का होतो त्याची कारणं कळत नाही. त्यासाठी योग्य ते उपचार घ्यावे लागतात,' अशी माहिती रक्तविकार तज्ज्ञ डॉ. यादव मुंडे यांनी दिली.

उपचार कोणते?

काही वर्षांपूर्वी 'डीव्हीटी'चा आजार झाल्यास रक्तपातळ करण्याची औषधं आयुष्यभर सुरू ठेवावी लागत होती. त्या उपचाराच्या पद्धतीत कालांतरानं बदल झाला आहे. 'कॅथेटर डायरेक्टेड थ्रोम्बोलायसिस' हे उपचार दिले जातात. जिथं गुठळी झाली आहे, त्या ठिकाणी रक्तवाहिनीला छिद्र केलं जातं. तिथून ट्यूब टाकून त्या माध्यमातून गाठ बाहेर काढली जाते. त्या उपचार पद्धतीला 'कॅथेटर डायरेक्टेड थ्रोम्बोलायसिस' म्हणतात. या उपचाराच्याही पुढील उपचार आहेत. त्या उपचार पद्धतीला 'अँजिओजेट' म्हणतात. या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका बाजूनं रक्त बाहेर काढलं जातं आणि दुसऱ्या बाजूनं रक्त आत घेण्यात येतं. त्यामुळे गुठळ्या बाहेर पडणं शक्य होतं. पूर्वी कॅथेटरनं गुठळ्या बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत होता. आता १५ ते २० मिनिटांमध्ये गुठळ्या बाहेर निघतात, याकडे डॉ. मुंडे यांनी लक्ष वेधलं.

रक्तवाहिन्यांच्या आजाराची लक्षणे

रक्तवाहिन्या फुगण्यामुळे अथवा रक्ताच्या गुठळीमुळे आजार बळावतात. पाय दुखणं, पोट दुखणं, पोटातील नसांमध्ये दुखणं, पाय लाल होणं, गरम होणं, सूज येणं अशी लक्षणं दिसतात. पायात रक्ताची गुठळी झाल्यास ती फुफ्फुसांमध्ये जाते आणि त्याला 'पल्मोनरी एम्बोलिझम' म्हणतात. ती गाठ काढण्यासाठीही 'अँजिओजेट' या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पेशंटचा प्राण वाचू शकतो. या गुठळ्या होऊ नये यासाठी पोटातील सर्वाधिक मोठ्या रक्तवाहिनीत फिल्टर टाकला जातो.

रक्ताची गाठ कधी होऊ शकते ?

'पायाच्या स्नायूंना दुखापत झाल्यास, पाय हलवला नाही, तर रक्ताची गुठळी होऊ शकते. त्याशिवाय बाळंतपणामध्ये गर्भाशय मोठं झाल्यास रक्तवाहिन्यावर दाब येऊन प्रवाह कमी होतो. त्यावेळी रक्त गोठण्याची शक्यता असते. मेंदूच्या रक्तवाहिनीत गाठ झाल्यास 'पॅरालिलिस'चा झटका येऊ शकतो. त्यालाच 'ब्रेन अॅटेक' म्हणतात. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीत गाठ असल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पायांच्या नसांमध्ये गुठळी झाल्यास त्याला 'लेग अॅटेक' म्हणतात. या आजारांचे वेळीच योग्य निदान झालं, तर त्याच्यावर वेळेत उपचार करता येतात. त्यावर हृदयाप्रमाणे अँजिओप्लास्टी, बायपासचं ऑपरेशन करता येतं,' अशी माहिती रक्तविकार तज्ज्ञ डॉ. धनेश कामेरकर यांनी दिली.

उपाय काय कराल?

- बैठ्या कामात सातत्यानं ब्रेक घ्या.

- भरपूर पाणी प्या.

- नियमित व्यायाम करा.

- चुकीची जीवनशैली बदला.

बदलती जीवनशैली, पाश्चात्य संस्कृतीच्या परिणामामुळे रक्ताच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. प्रामुख्यानं ५० ते ७० वयातील व्यक्तींमध्ये हा आजार आढळतो. 'ब्रेन अॅटेक', 'लेग अॅटेक' ही संकल्पना आजारामुळे रूजतेय.

नेहमीच मिल्क चॉकलेट जिभेवर ठेवण्याऐवजी डार्क चॉकलेट खाल्लं तर आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असतं. पण मर्यादित प्रमाणातच, कारण हे मजेदार खाद्य म्हणजे रोजचा आहार आणि व्यायाम यांना पर्याय नाही हे विसरुन चालणार नाही.

चॉकलेट हवं का, म्हणताच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच माना होकारार्थी हलतात. चॉकलेट म्हणजे तरुण मुलींची खास पसंती. वाढदिवस असो किंवा प्रेमानं एखाद्या मित्रमैत्रिणीला काही द्यावंसं वाटलं, तर भेटवस्तूत पहिला मान चॉकलेटचा असतो. एकेकाळी फक्त एखाददुसऱ्या स्वादामध्ये मिळणारं हे चटपटीत खाद्य आज हजारो दिलखेचक चवीत आणि आकारात मिळतं, की नाही म्हटलात, तरी तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा मॉलमध्ये जा, पानपट्टीच्या दुकानात आणि चक्क वह्या-पुस्तके विकणाऱ्या स्टेशनरीच्या दुकानातही चॉकलेट आपल्याला खुणावतात. लालसर, तपकिरी, काळसर अशा रंगात आणि टॉफी, कँडी, बार, मिल्क चॉकलेट, ब्लॅक चॉकलेट अशा प्रकारात मिळणाऱ्या या अद्भुत खाद्यप्रकारात साखर, दुधाची पावडर, कोको पावडर, कोको बटर असे विविध घटक असतात.

सतत चॉकलेट खाल्ल्यानं दात किडतात, वजन वाढतं, कोलेस्टेरॉल वाढतं अशी टीका नेहमीच केली जाते. त्यात साखर जास्त असते म्हणून मधुमेहींनी खाऊ नये, भरपूर कॅलरी असतात म्हणून स्थूल व्यक्तींनी आणि चरबीयुक्त घटक असल्यामुळे उच्च रक्तदाबाच्या, हृदयविकारांच्या रुग्णांनी ते निश्चितच टाळावं. मात्र, 'डार्क चॉकलेट' या नावानं वर्णिल्या जाणाऱ्या वर्गाचा माफक प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला फायदा होतो असं आता लक्षात येऊ लागलंय. या डार्क चॉकलेटमध्ये साखरेचं प्रमाण अगदी नगण्य असतं आणि कोकोची मात्रा भरपूर असते. कोको हे वनस्पतीजन्य फळ असतं आणि त्याच्या बियांपासून कोको पावडर बनते. त्यात ११ टक्के फायबर तर असतंच; पण लोह, तांबे. मॅग्नेशियम, मँगेनीज, जस्त, सेलेनियम, फॉस्फरस अशी खनिजे, पोटॅशियमसारखे क्षार मुबलक प्रमाणात असतात. साधारणतः १० ग्रॅमच्या डार्क चॉकलेटमध्ये ६० कॅलरी असतात. साहजिकच ते पौष्टिक समजायला हरकत नाही.

आपल्या शरीरातील दैनंदिन चयापचय क्रियेमध्ये अनेक प्रकारचे दूषित आणि विषारी रासायनिक कण निर्माण होतात. यांना 'फ्री रॅडिकल्स' म्हणतात. आरोग्याला अपायकारक असलेल्या फ्री रॅडिकल्सना आहारातले काही विशेष घटक निर्विष करतात. या पदार्थांना 'अँटी ऑक्सिडंट' म्हणतात. डार्क चॉकलेटमध्ये असे 'अँटी-ऑक्सिडंट्स' मोठ्या प्रमाणात असतात. साहजिकच त्यांचा आरोग्यावर आपल्या शरीरातील क्रियांवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणजे, शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत राहतो, रक्तातील कोलेस्टेरॉलमधील एचडीएल हा उपयुक्त घटक वाढतो आणि एलडीएल हा अपायकारक घटक कमी होतो. याचा परिणाम रक्तदाब नियंत्रित राहण्यात, रक्तवाहिन्यांमध्ये अॅथेरोस्क्लेरॉसिस न होण्यात आणि पर्यायानं हृदयविकार टळण्यात होतो.

डार्क चॉकलेटमधील अँटी-ऑक्सिडंटमुळे होणाऱ्या परिणामात मेंदूतील रक्ताभिसरण सुविहित राहतं. यामुळे मानसिक थकवा दूर होऊन मनाला ताजेतवानं आणि रीलॅक्स वाटतं. परिणामतः आजच्या जीवनपद्धतीत सतत सामोरे येणारे ताणतणाव, नैराश्य ताब्यात ठेवता येतं. विद्यार्थ्यांची शाळेतील आणि अभ्यासातील एकाग्रता सुधारते आणि अधिक गोष्टी स्मरणात राहू लागतात. अँटी ऑक्सिडंट भरपूर असल्यानं त्वचेतील रक्ताभिसरण सुधारतं आणि चेहरा टवटवीत, प्रफुल्लीत दिसू लागतो. यामुळे सतत नावीन्याच्या शोधात असलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत आजकाल चॉकलेट बाथ, चॉकलेट फेशियल पॅक, चॉकलेट वॅक्सिंगही वापरलं जाऊ लागले आहेत. नियमितपणे एखादं डार्क चॉकलेट खाल्लं, तर मन शांत राहतं, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वयाच्या खुणा दूर राहतात. एवढंच नव्हे, तर केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे डार्क चॉकलेट हे अँटी-एजिंग मानलं जाऊ लागलंय. साधं चॉकलेट खाऊन वजन वाढत असलं, तरी डार्क चॉकलेटमुळे वजनही नियंत्रित राहतं.

जर्मनीमधील माइन्झ इथल्या 'इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड डाएट' यांच्यातर्फे झालेल्या एका वैद्यकीय चाचणीत हे सिद्ध करण्यात आलं. त्यांनी एका गटाला अतिशय कमी पिष्टमय पदार्थ असलेला आहार रोज दिला. दुसऱ्या गटाला त्याच आहारासमवेत १.५ औंस (४२.५ ग्रॅम) वजनाचं डार्क चॉकलेट देण्यात आलं. तीन आठवड्यानंतर पहिल्या गटाचं वजन अपेक्षेप्रमाणे कमी झालंच, शिवाय डार्क चॉकलेट खाणाऱ्या दुसऱ्या गटातील व्यक्तींचं वजन पहिल्या गटाच्या तुलनेत चक्क १० ते १५ टक्क्यांनी कमी झालेलं आढळलं, शिवाय त्यांची झोप सुधारली आणि कोलेस्टेरॉलही कमी झालं.


आजच्या रुक्ष जीवनात रंगत वाढवणारे जे काही उपाय आहेत, त्यात चॉकलेटचा नंबर नक्कीच वर लागतो. नेहमीचं तपकिरी चॉकलेट किंवा मिल्क चॉकलेट जिभेवर ठेवण्याऐवजी काळे घट्ट डार्क चॉकलेट खाल्लं, तर मौजेसोबत काही आरोग्यमय फायदेही मिळतात; पण मर्यादित प्रमाणातच, कारण हे मजेदार खाद्य म्हणजे रोजचा आहार आणि व्यायाम यांना पर्याय नाही हे विसरून चालणार नाही.

आपण अनेकदा आपल्याचा शरीराकडे पुरेसे लक्ष देत नाही. शरीरावरील काही खुणांवरून तुम्हांला आरोग्याबाबतच काही कळत नकळत संकेत मिळतात. अशांपैकी एक म्हणजे कानाजवळ असलेले छिद्र.

कानाजवळ छिद्र म्हणजे काय ?
काही लोकांच्या कानाच्या वरच्या बाजूला छिद्र असते. कालांतराने काहींमध्ये हे छिद्र मिटून जाते. वैद्यकीय भाषेमध्ये याला प्रीऑरीकुलर साइनस म्हणतात. सुमारे फक्त 10 % लोकांमध्ये हे छिद्र राहते.

का आढळते हे छिद्र?
अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, हे छिद्र मांस आणि त्वचेमध्ये काही दोष निर्माण झाल्याने तयार होते. प्रामुख्याने हे छिद्र कानाच्या बाजूला आढळते. आईच्या गर्भामध्ये बाळाचा योग्यप्रकारे विकास न झाल्यास हे छिद्र निर्माण होते.

कोणामध्ये अधिक छिद्र आढळते ?
दक्षिण कोरिया युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, अमेरिकेमध्ये 9% लोकांमध्ये कानाजवळ हे छिद्र आढळते. तर आशिया आणि आफ्रिकामध्ये सुमारे 10% लोकांमध्ये कानाजवळ छिद्र आढळते.

कानाजवळील छिद्र धोकादायक आहे का?
अमेरिकन नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, कानाजवळील छिद्रामुळे कोणताही धोका नाही. मात्र हे संक्रमित होत नाही तो पर्यंत सुरक्षित आहे. शस्त्रक्रियेच्या मदतीने कानाजवळील छिद्र मिटवता येते. तुमच्या कानाजवळही छिद्र असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रात्री अर्धवट झोप झाल्यास दिवसभर थकल्यासारखे आणि अस्वस्थ वाटते. सातत्याने अपुरी झोप मिळाल्यास त्याचा परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या आरोग्यावर होतो. मोबाईलच्या व्यसनामुळे झोपेचे चक्र बिघडले. कारण रात्रभर सोशल मिडिया अपडेट्स चेक करत राहण्याची सवय आपल्याला लागली आहे. तसंच काही नसेल तर इंटरेस्ट नसलेल्या वेबसाइट्स आपण चेक करत राहतो.

रात्री कॉफी पिणे, फ्रेंड्स, कलीगसोबत गप्पा करणे यामुळे ही झोप येत नाही. तसंच गप्पा करताना किती कॉफी घेतली जाते याचा अंदाजच नसतो आणि त्यातील कॅफेनचा झोपेवर परिणाम होतो. परंतु, अपुऱ्या झोपेचा परिणाम चेहऱ्यावर आणि कामावर दिसू लागतो. पिंपल्स येणे, कार्यक्षमता कमी होणे या समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते.

चेहऱ्यावरील डाग कमी होऊ लागतील

लवकर झोपण्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. पिंपल्स कमी होऊ लागले. आणि डागही हळूहळू कमी होतील.

ब्लड ग्लुकोज कमी होत नाही
अचानक ब्लड ग्लुकोज कमी होण्याचा त्रास दूर होतो.

भूकेत सुधारणा होईल

भूक लागत नाही हे कारण आता भूतकाळात जमा होईल. हेल्दी पदार्थ खावेसे वाटतील. आधीपेक्षा अधिक चांगले आणि आरोग्यदायी पदार्थ खाण्याची इच्छा प्रबळ होईल.

मायग्रेनचा त्रास कमी होईल

आजकाल कमी खाणे, जास्त किंवा कमी झोप, खूप रडणे किंवा खूप हसणे या कशाही मुळे मायग्रेनचा त्रास जाणवणार नाही. पुरेशी झोप घेतल्याने मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होईल. आणि आता कोणतीही गोळी न घेता राहू शकता.

कार्यक्षमतेत वाढ होईल

८ तास पुरेशी आणि शांत झोप घेतल्यामुळे अधिक उमेदीने, तत्परतेने काम करू शकाल. कार्यक्षमता वाढेल. आता तुम्हाला जाणवेल की, झोपेचा परिणाम कामावर होतो आणि पुरेशा झोपेमुळे कामही उत्तम होते.

Dr. Deepak  Bhalerao
Dr. Deepak Bhalerao
BHMS, Adult Congenital Cardiologist Cardiologist, 17 yrs, Pune
Dr. Rajendra Lahore
Dr. Rajendra Lahore
MS/MD - Ayurveda, Ophthalmologist, 11 yrs, Pune
Dr. Ashwini Bhilare
Dr. Ashwini Bhilare
BDS, Endodontist Root canal Specialist, 9 yrs, Pune
Dr. Smita Shah
Dr. Smita Shah
MD - Allopathy, Obstetrics and Gynecologist, 29 yrs, Pune
Dr. Darshankaur Chahal
Dr. Darshankaur Chahal
BAMS, Ayurveda Family Physician, 23 yrs, Pune
Hellodox
x