Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

* पित्त पाडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानांचा रस काढा. हा रस पोटभर प्यावा. उलटी होऊन पित्त पडते. * गरमीवर कडुलिंबाच्या पानांचा रस खडीसाखर टाकून सकाळ-संध्याकाळ घ्यावा. कसलीही गरमी असली तरी 7 दिवसात बरी होते.
* खरजेवर कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरूज बरी होते.
* कडुलिंबाच्या बिया वाटून डोक्याला लावल्यावर उवा मरतात.
* कावीळ रोगावर कडुलिंबाच्या अंतर सालीचा कपभर रस काढून त्यांत मध व थोडे सुंठीचे चूर्ण घालून द्यावे. 7 दिवसात कावीळ जातो.
* मूळव्याध, कृमी व प्रमेह यांवर कडुलिंबाची कोवळी फळे खावी.
* कडुलिंबाच्या लिंबाचा मगज काढून वातीस लावा, तिळाचे तेलाचा दिवा लावून काजळ करावे. या काजळाने नेत्रांस तेज येतो.
* पापण्यांचे केस गळत असल्यास कडुलिंबाची पाने चुरून पापण्यांस चोळावी.

कोणत्याही पदार्थांला चमचमीत बनविण्यासाठी त्यात फोडणी घातली जाते ज्याने सर्व मसाल्यांचा स्वाद त्यात मिसळला पाहिजे. पण आपल्याला हे माहीत आहे का फोडणी देण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या असेच 5 फायदे:
1 फोडणीमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि यामुळे इन्फेक्शन आणि सर्दी-खोकल्यापासून बचावा होतो. याचे मुख्य कारण यात लसणाचा वापर. लसूण आरोग्यासाठी उत्तम असतो.

2 हे आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये होणार्‍या वेदनांपासून मुक्ती देतं. कारण यात अख्खे मसाले, जसे लाल मिरची, काळी मिरे इतर मसाले वापरले जातात जे व्हिटॅमिन्ससह वेदनांपासून मुक्ती देतात. लठ्ठपणावर ही उपयोगी आहे.
3 फोडणीत पडणार्‍या मोहर्‍या, जिरा याने पचन संबंधी समस्या सुटतात. यासह याने स्नायू आणि हाडांमध्ये होणार्‍या वेदनांपासून सुटकारा मिळतो. एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉल कमी करण्यात आणि इम्यून पावर वाढवण्यात ही मदत करतं.

4 कढीपत्ता घातल्याशिवाय फोडणीला स्वाद नाही. स्वादासह पत्ता अनेक व्हिटॅमिन्स प्रदान करतं आणि पचन तंत्र व हृद्याचे आरोग्य सुरळीत ठेवण्यात मदत करतं. मधुमेहापासून बचावासाठी तसेच केस काळे ठेवण्यासाठी हा उपाय लाभदायक आहे.
5 फोडणीत हळद वापरल्याने इन्फेक्शनपासून बचाव होतो आणि अँटीबायोटिक तत्त्व, रोग प्रतिकार क्षमता वाढून आरोग्याची रक्षा होते. याने सर्दीपासून देखील बचाव होतो.

'मिटरेसी' कुळातील सदापर्णी, सुगंधी, उंच अशा वनस्पतींपैकी निलगिरी ही उबदार प्रदेशातील वनस्पती आहे. या वनस्पतीपासून सुगंधी
द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात.
संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन
चोळतात.

भाजल्याने त्वचेला इजा होते, अशा वेळी निलगिरी तेलाचा उपयोग होतो.

श्‍वासनलिकेचा दाह आणि जुनाट दम्यावर हे तेल
उत्तेजक असून कफ पातळ करून पाडणारे आहे.

नाकाच्या तक्रारींमध्ये निलगिरी तेल उपयोगी आहे. निलगिरीची मुळे रेचक आहेत. खोडाच्यासालींमध्ये टॅनिन असते.

निलगिरीचा उपयोग अतिसार, जुनाट अमांश, कापणे, दंतवैद्यकीय औषधे इत्यादीत केला जातो.

श्‍वासनलिकेच्या
वरच्या भागात संसर्गजन्य विकार आणि काही कातडीचे रोग यांवर निलगिरी तेल उपयुक्त सिद्ध होते. पाणथळ जागेत, सांडपाण्याच्या
दलदलीच्या जागेत निलगिरीची झाडे लावतात.

मुंबई : बाराही महीने मिळणाऱ्या फळांपैकी एक फळ म्हणजे केळी. केळी खाण्याचे आरोग्यदाई फायदे आजवर अनेकांनी तुम्हाला सांगितले असतील. पण, तुम्हाला माहिती आहे का, केवळ केळीच नव्हे तर, केळीची सालही तितकीच आरोग्यदाई असते. केळीच्या सालीचे फायदे तुम्ही जर जाणून घ्याल तर, केळी खाण्याऐवजी तुम्ही सालीच खाल. इतकी केळीची साल गुणकारी असते. म्हणूनच जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे.......

वजन घटविण्यासाठी
केळीच्या सालीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे तुम्ही जर रोज एका केळीची साल खाल तर, एक महिन्यात तुमचे वजन २ ते ३ किलोंनी घटलेले पहायला मिळू शकते. ते सुद्धा कोणत्याही व्यायामाशिवाय. सॉल्यूबल आणि इन्सॉल्यूबल असे दोन प्रकारचे फायबर केळीच्या सालीत असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रोलची मात्रा कमी करते.

दृष्टीदोषावर गुणकारी
तुमाला दृष्टीदोषाचा त्रास असेल, त्यामुळे चष्मा वापरण्याची वेळ तुमच्यावर आली असेल तर, केळीची साल खा. केळीच्या सालीत ल्यूटीन असते. जे डोळयाची नजर तीक्ष्ण करण्यास मदत करते.

मन प्रसन्न करण्यासाठी
केळीच्या सालीमध्ये सेरोटोनिन असते जे तुमचे मन प्रसन्न (मूड) करण्यासाठी फायदेशीर ठरते. तैवानच्या विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार सलग तीन दिवस नियमीतपणे २ केळीच्या साली खाल तर तुमच्या शरीरातील सेरोटोनिनच्या हॉर्मोनची मात्रा १५ टक्क्यांनी वाढते.

झोपेवर गुणकारी
जर तुम्हाला योग्य प्रकारे झोप येत नसेल तर, केळीची साल खा. केळीच्या सालीत ट्रिप्टोफेन नावाचे एक केमिकल असते. जे तुमची झोप चांगली आणि आरोग्यदाई करण्यासाठी मदत करते.

आंबेहळद हा प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते.
आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते. ती पोटात देत नाहीत. शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबेहळद वापरतात.

कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास आंबेहळद उगाळून कोमट करून लावावी. याने सूज कमी होते त्याचप्रमाणे वेदना शांत होतात.

शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीच्या लेपाने ती बसते.

अंगावर खरका उठल्यास आंबेहळद, कडूजिरे गोमूत्रात वाटून लावतात. यामुळे हा त्रास कमी होतो. खरका म्हणजे अंगावर उठलेल्या बारीक पुळय़ा लचकणे, मुरगाळणे, सुजणे यावर त्वरित आराम मिळविण्यासाठी आंबेहळदीचा लेप लावतात. यामुळे ओढ बसून वेदना कमी होतात.

चिमूटभर आंबेहळद आणि मलई एकत्र करून चेहर्‍यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.

Dr. Suryakant Bhoite
Dr. Suryakant Bhoite
BAMS, Family Physician, 34 yrs, Pune
Dr. Abhijeet  Shinde
Dr. Abhijeet Shinde
DNB, Cardiologist Diabetologist, 13 yrs, Pune
Dr. Varun kumar  PT
Dr. Varun kumar PT
BPTh, Homecare Physiotherapist Physiotherapist, 10 yrs, Pune
Dr. Mayur Patil
Dr. Mayur Patil
BHMS, Family Physician General Physician, 5 yrs, Pune
Dr. Sairandhri Shinde
Dr. Sairandhri Shinde
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 10 yrs, Pune
Hellodox
x