Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

म्हातारपणी जे लोक कमजोर स्मृतीची शिकार ठरतात व छोट्यामोठ्या गोष्टी विसरतात, त्यांच्यासाठी एक चमचा साखर लाभदायकठरू शकते, असा खुलासा एका ताज्या अध्ययनातून झाला आहे. त्यामुळे त्यांची स्मृती वाढू शकते.

ज्यावेळी आपल्या पाण्यामध्ये थोडी साखर मिसळून पितो, तेव्हा आपला मेंदू आधीच्या तुलनेत जास्त कठोर मेहनत करू लागतो.

एवढेच नाही तर वृद्ध लोक साखरेचे सेवन केल्यानंतर स्वतःला जास्त खूश समजतात व त्यांची स्मृतीही चांगली होते.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, समजा आपल्या शरीरात मेंदूसाठी जास्त ऊर्जा उपलब्ध झाली तर आपल्याला जास्त मेहनत घेण्यास प्रोत्साहन मिळेल.

त्यामुळे आपला आत्मविश्र्वास अधिक चांगला होईल व आपले मानसिक प्रदर्शनही उत्तम होईल.

युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविकच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यांच्या दाव्यानुसार, या अध्ययनाचे निष्कर्ष जे वृद्ध आपल्या मेंदूचे प्रदर्शन चांगल्या प्रकारे होण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यांच्यासाठी कमी लाभदायक ठरू शकतात.

साखरेचे थोडेसे प्रमाण 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा मूड चांगला करून स्मृती सुधारण्यास मदत करतो.

या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी काही वृद्धांना साखरमिश्रीत पेय पिण्यासाठी दिले व त्यानंतर त्यांना बौद्धिक काम दिले.

हे पेय पिणार्‍या वृद्धांची स्मृती सुधारली व त्यांचा मूडही चांगला झाला. यामुळे त्यांची एकाग्रताही वाढल्याचे दिसून आले.

कानफुटीची वेल पावसाळ्यात उगवते. या वेलीची पाने कडुलिंबाच्या पानासारखी कातरलेली असतात. कानफुटीच्या वेलीला फुले पांढरी येतात. ती तीन तीन अशी एकत्र असतात. याची फळेही औषधी आहेतती तीन धारी आहेत.यात तिन कप्पे असतात यात प्रत्येकी तीनतीन बिया असतात. त्यावर पांढरे ठिपके असतात. कानफुटीची मुळे पांढरी असतात.

कान फूटला असता कानफुटीची पाने ठेचून बांधतात किंवा या पानांचा रस कानातून पू घाण निघत असेल किंवा कान फुटला असेल तर घालतात. कानास अप्रतिम औषध आहे.

शौचाला साफ – कानफुटीच्या पानांचा रस दोन छोटे चमचे पोटात घेतला असता या पर्णरसाच्या सेवनामुळे परसाकडे साफ होते.

आमवातावर – आमवातामुळे शरीरास आलेला जडपणा नाहीसा करण्यासाठी कानफुटीची पाने ठेचून अर्धा लिटर पाण्यात त्याचा एक अष्टमांश उरेल इतका काढा करावा व तो आमवतात सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा रोज घ्यावा. त्याने बरे वाटते. आमवातात तर हा अगदी अप्रतिम औषधोपचार आहे.

मूत्र रोगावर – कानफुटीच्या जुलाबान लघवी तुंबली असेल तर ती साफ होते.

मूतखडा – कानफुटीच्या जुलाबाने मूतखडाही बरा होतो.

संधीवातात – कानफुटीची पाने ठेचून अर्धा लिटर पाण्यात त्याचा एक अष्टमांश उरेल इतका काढा करावा व तो आमवातात सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा रोज घ्यावा. त्याने बरे वाटते.

आर्तवजन्यरोगावर – कानफुटीची पान व वेखंड ही समभाग चूर्ण करून एक छोटा चमचा सकाळ व संध्याकाळ घेतल्यास ताबडतोब गुण येतो व आर्तवजन्य सर्व रोग बरे होतात.

पोटदूखीवर – कानफुटीच्या पानांचा रस दोन छोटे चमचे पोटात घेतला असता या पर्णरसाच्या सेवनामुळे पोटदूखी बरी होते. अशाप्रकारे कानफूटी ही अतिशय उपयुक्‍त वनौषधी आहे.

प्रतिदिन अक्रोडाचे सेवन करावे.

रोज मधाचा उपयोग कुठल्याही प्रकारात केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.

पिंपळाच्या पानाचे पिकलेले 5 फळं रोज खाल्ल्याने देखील स्मरणशक्ती वाढते.


आठवड्यातून एक वेळा भोपळ्याची भाजी खाल्ल्याने स्मरणशक्तीत नक्कीच वाढ होते.

जेवणाअगोदर एक सफरचंद साल न काढता सेवन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.

बीटरूटचा 2 कप रस दिवसातून दोन वेळा घेतल्याने स्मृतीत वाढ होते.

जास्त करून लोक लिंबाचा वापर भोजन स्वादिष्ट करणे किंवा ज्यूस पिण्यासाठी करतात. पण जर आम्ही याचा वापर वेग वेगळ्या पद्धतीने केला तर बरेच हेल्थ प्रॉब्लम्स देखील कंट्रोलमध्ये करू शकता. येथे आम्ही तुम्हाला अर्ध्या लिंबाचे काही उपयोग सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही स्वस्थ राहू शकता.


डैंड्रफ दूर करा
अर्ध्या लिंबाचा रस आणि नारळाचे तेल मिक्स करून केसांना आणि स्कल्पवर मसाज करा. यामुळे डैंड्रफ कंट्रोलमध्ये येईल.


पिंपल्स हटवेल
रोज अर्ध्या लिंबाचा रस आणि मध घालून चेहर्‍यावर लावा. यामुळे पिंपल्स दूर होण्यास मदत मिळेल.


हेअर फॉल कंट्रोल करेल

अर्ध्या लिंबाचा रस आणि कांद्याचा रस एकत्र मिसळून स्कल्पवर मसाज करा. ही क्रिया आठवड्यातून 3 ते 4 वेळा करा. हेअर फॉलची समस्या नक्कीच दूर होईल.

सुरकुत्या मिटवेल
अर्ध्या लिंबाचा रस आणि कडू लिंबाच्या पानांचा रस एकत्र करून चेहर्‍यावर लावा. यामुळे सुरकुत्या झुर्रियों दूर होण्यास मदत मिळेल.


सर्दी पडसं दूर करेल
एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून त्याचे सेवन करावे. यामुळे सर्दी खोकल्याची समस्या दूर होईल.

तुम्ही कपडे बदलताना हे नोटिस केले असेल की तुमच्या ब्रेस्टच्या खाली लाल रंगाचे चकते दिसत आहे, तर त्याला इगनोर करू नका. स्तनाखाली रेषेस येणे सामान्य बाब आहे. ही समस्या बर्‍याच कारणांमुळे येऊ शकते. ज्यात जास्त घाम येणे, वायू प्रवाह योग्य प्रकारे न होणे तथा जास्त टाईट ब्रा घालणे इत्यादी. त्याशिवाय इतर कारक जसे गरम आणि नम वातावरण व लठ्ठपणा या समस्येला जास्त वाढवतात.

मेडिकल टर्ममध्ये या समस्येला Interigoच्या नावाने ओळखण्यात येते. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरात एखाद्या लेडीला ही समस्या झाली असेल तर तिला आराम लवकर मिळावा यासाठी काही घरगुती उपचार देण्यात आले आहे.

1. ब्रा घालून झोपू नये

जर तुम्हाला ब्रेस्टच्या रेशेसपासून सुटकारा हवा असेल तर रात्री ब्रा घालून झोपू नये. तुम्ही रात्री झोपताना एखादा ढिला सुती कुर्ता किंवा टी शर्ट घालून झोपायला पाहिजे.

2. गार पाण्याचा शेक घ्यावा

एक महिना सुती कपड्यात काही बर्फाचे तुकडे घेऊन याला प्रभावित जागेवर 10 मिनिट ठेवावे. काही वेळ थांबून परत ही क्रिया करावी. त्याशिवाय गार पाण्याने अंघोळ करावी. याने त्वचेतील रोम छिद्र बंद होण्यास मदत मिळेल. ज्याने घाम कमी येईल आणि रेषेस ही कमी येतील.

3. तुळशीचे पान
तुळशीच्या पानांमध्ये बरेच औषधीय गुण असतात. काही तुळशीचे पान घेऊन त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टला रेषेस असणार्‍या जागेवर लावा. जेव्हा ही पेस्ट वाळून जाईल त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

4. कॉर्न स्‍टार्च लावा
ब्रेस्टच्या खाली येणार्‍या रेशेसपासून बचाव करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे की ब्रेस्टच्या खाली घाम जमा होऊ देऊ नका. नमीला सोखण्यासाठी आपल्या ब्रेस्टच्या खालच्या भागाला स्वच्छ करून त्यावर कॉर्न स्‍टार्च लावा. असे केल्याने घाम तेथे जमणार नाही आणि तुम्हाला रेशेस येणार नाही.

5. नारळाचे तेल
नारळाचे तेल त्वचेसाठी फारच फायदेशीर असून यात औषधीय गुण देखील असतात. त्याशिवाय यात एंटीबॅक्टीरियल आणि एंटीफंगल गुण असतात जे संक्रमण थांबवण्यास फायदेशीर ठरतात. नारळाच्या तेलाला प्रभावित भागावर दिवसातून दोन ते तीनवेळा लावा. थोड्याच दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल.

6. एलो वीरा
एलो वीरा ब्रेस्टच्या खाली येणार्‍या रेशेसवर खाज आणि जळजळमध्ये आराम करण्यात सहायक सिद्ध होतो. एलो वीराच्या पानांचा ताजा रस काढा व याला प्रभावित भागावर लावा. ह्या रसाला किमान 20 मिनिटांपर्यंत लावून ठेवा. तुम्हाला याला धुवायची गरज नाही. तुम्ही एलोवीरा जेलसोबत हळद मिसळून देखील लावू शकता.

Dr. Hemant Damle
Dr. Hemant Damle
MD - Allopathy, Gynaecologist Obstetrics and Gynecologist, 25 yrs, Pune
Dr. Anjali Bartakke
Dr. Anjali Bartakke
DNB, Pediatrician, 18 yrs, Pune
Dr. Sachin Nandedkar
Dr. Sachin Nandedkar
MS/MD - Ayurveda, Obesity Specialist Ayurveda, 22 yrs, Pune
Dr. Vasudha Pande
Dr. Vasudha Pande
MBBS, Ophthalmologist, 16 yrs, Pune
Dr. Vipul Jaiswal
Dr. Vipul Jaiswal
MS/MD - Ayurveda, Ayurveda General Physician, 11 yrs, Pune
Hellodox
x