Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

धूम्रपानाचे एकदा जडलेले व्यसन अनेकांच्या बाबतीत सुटता सुटत नाही. काही दिवस ते त्यापासून दूर राहतातही, पण पुन्हा त्याकडे आकर्षित होतात.

अशा लोकांसाठी शास्त्रज्ञांनी आता एक ऑटोमॅटिक अलर्ट सिस्टिम विकसित केली आहे. प्रेरणादायी टेक्स्ट आणि व्हिडिओ संदेश पाठवून ते धूम्रपानापासून सुटका करून घेण्यास मदत करते.


अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही सिस्टिम विकसित केली असून त्यांच्या माहितीनुसार, एका स्मार्टफोन सोबतही ही सिस्टिम जोडण्यात आली आहे.

अंगावर परिधान करण्यायोग्य सेन्सरच्या मदतीने ही सिस्टिम धूम्रपानासंबंधी हालचालींची ओळख झाल्यास लोकांना 20 ते 120 सेकंदांचा व्हिडिओ संदेश पाठवते.

धूम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी निकोटिन गमपासून विविध प्रकारची उत्पादने आज बाजारात उपलब्ध आहेत.

मात्र आजच्या काळात या सवयीपासून सुटका करून घेण्यासाठी शरीरावर परिधान केल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाची लोकप्रियता वाढत आहे. या दिशेने ही नवी अलर्ट सिस्टिम पहिलेच पाऊल असू शकते.

या सिस्टिममध्ये दोन आर्मबँड सेन्सरही असून ते धूम्रपान हालचाली ओळखतात. चाचणीमध्ये ही सिस्टिम 98 टक्के खरी उतरली.

सध्या जिम करणारे, डायटिंग करणारे, तसेच ज्यांनी चहा सोडला ते हर्बल टी ला जास्त महत्त्व देताना दिसत आहेत. पण हर्बल टी वाटते तेवढी सुरक्षित नाही. त्याचा जास्त उपयोग हा घातक ठरू शकतो. दिवसांतून एक- दोनदा ही टी घेतल्याने त्याचा परिणाम होत नाही. मात्र जर दिवसभरात आपण त्याचा जास्त सेवन करत असाल तर ते मात्र तुमच्या आरोग्यासाठी परिणामकारक ठरू शकते.

अनेक आजराला आपण बळी पडू शकतो. उदाहरण द्यायचे झाल्यास उलटी तीव्र डोकेदुखी, निद्रानाश, डायरिया, चिडचिडेपणा, हृदयाचे ठोके जलदगतीने पडणे, हातापायात कंप, चक्कर येणे, कानांमध्ये आवाज येणे, अशी अनेक प्रकारची लक्षण जाणवतात.

त्याचप्रमाणे ग्रीन टी सुद्धा घातक ठरू शकते. ग्रीन टी मुळे अँसिडची मात्रा वाढते. तसेच मळमळ, पोटदुखी असे आजारही उद्भवतात.

दोन कप ग्रीन टी मध्ये ग्रॅम कॅफन असते.
ग्रीन टी मधील रसायने गर्भावस्थेत घातक ठरू शकतात. म्हणूनच या महिलांनी दिवसातून दोन कपापेक्षा अधिक ग्रीन टी घेऊ नये. यामुळे गर्भपाताचा धोका संभवतो.

ताणतणाव येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र तणाव आपल्यावर हावी झाला तर तो एक आजाराचं रूप घेतो.काही जण तणावावर सहजपणे मात करतात. मात्र ताण वाढल्यास अनेकांचं मनोधैर्य खचतं. त्याचा परिणाम कामावर आणि खाजगी आयुष्यावरही होतो.

जर आपण आपल्या दिनचर्येत थोडासा बदल केला तर इच्छाशक्तीद्वारे तुम्ही ताणावर नियंत्रण मिळवू शकता. जाणून घ्या त्यासाठीच काही टीप्स..

ताण (Stress) :
ताणतणावापासून पूर्णपणे मुक्ती मिळविण्यासाठी आपल्या दररोजच्या आयुष्यात व्यायामाला अतिशय महत्त्वाचं स्थान द्या. नियमित व्यायाम केल्यानं ताण कमी होण्यास मदत मिळते. जर सकाळी शक्य नसेल तर किमान संध्याकाळी वॉकला जा.

जर आपण एखाद्या आजारानं किंवा शरीरातील बदलामुळं तणावग्रस्त आहात, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उदा. डोक्यावर केस गळत आहेत, याचं टेंशन तुम्ही घेतलं असेल तर काळजी करण्यापेक्षा त्यावर उपाय करा, हेअर ट्रान्सप्लांट करा, औषधं घ्या आणि प्राणायाम करा. जेवणात प्रोटीन असलेले पदार्थ असू द्या.

जर आपल्यासोबत काहीसं असं घडत असेल, ज्याचा विचार करून आपला ताण वाढतोय. तर आपल्या आयुष्यातील या नकारात्मक घटना दूर सारा आणि त्याचा विचार न करता चांगल्या गोष्टींचा विचार करा.

जर नवरा - बायकोच्या नात्यात ताणतणाव असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत किंवा घरातील मंडळींसोबत चर्चा करा. आपण यासाठी मॅरेज काउंसलरची मदत घेऊ शकता.

आर्थिक परिस्थितीच्या कारणानं तणावग्रस्त असाल तर शांत डोक्यानं आपल्याजवळ किती पैसा आहे आणि कायदेशीर मार्गानं आपण आपला इन्कम कसा वाढवू शकतो, याबाबत विचार करा. उगाच टेंशन घेत बसू नका.

स्त्री आणि पुरुष एकमेकांचे पूरक आहे परंतू निर्सगाने दोघांचे वेगळे स्वरूप आखले आहेत. मन आणि तन यात स्त्री पुरुषापेक्षा वेगळी आहे. स्त्री संवेदनशील असते. अपेक्षाकृत पुरुष कठोर. बाह्य स्वरूपातही त्यांची प्रकृती वेगळी आहे. त्यांच्यात हार्मोंसच्या चढ-उताराचा प्रभाव असतो.

प्राचीन ऋषींनी असे काही साधन निर्मित केले ज्याने मन आणि आरोग्याची रक्षा होऊ शकते. प्रस्त वाढल्याने यांना सुंदर दागिन्याचा रूप मिळाला आणि हे नियमपूर्वक घातले जाऊ लागले. जाणून घ्या काय फायदे आहेत या दागिन्यांचे...सोन्याचे दागिने उष्णता आणि चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजे. हा नियम पाळल्याने शरीरात उष्णता आणि शीतलतेचं संतुलन राहतं.
बांगडी घालण्याचे फायदे
बांगडी मनगटावर घासली जाते ज्याने हाताचं रक्त संचार वाढतं. हे घर्षण ऊर्जा व्युत्पन्न करतं ज्याने लवकर थकवा जाणवत नाही.
बांगडी घातल्याने श्वासासंबंधी आजार, हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत मिळते.
तुटलेली बांगडी घालू नये. याने नकारात्मक ऊर्जा वाढते.

जोडवी घालण्याचे फायदे
विवाहित स्त्रिया पायाच्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ शृंगाराची वस्तू नाही. दोन्ही पायात जोडवी घातल्याने हार्मोनल सिस्टम योग्य रित्या कार्य करतं.
जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी असतो.
जोडवी ऍक्युप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्याने शरीराचे खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहतात.
जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवणा सुरळीत होतो. या प्रकारे जोडवी स्त्रियांची गर्भधारण क्षमता निरोगी ठेवते.
याने मासिक पाळी नियमित होते.
पैंजण घालण्याचे फायदे
पैंजण पायातून निघणार्‍या शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते.
पैंजण स्त्रियांच्या पोट आणि खालील भागातील अंगात फॅट्स कमी करण्यात मदत होते.
वास्तुच्या मते पैंजणातून येणारा स्वराने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
चांदीची पैंजणाचे पायाला घर्षण होत असल्याने पायाचे हाड मजबूत होतात.
पायात पैंजण घातल्याने महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वत:च्या आरोग्याची काळजी न करता कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात दिवस घालवून देते.
पायात सोन्याची पैंजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.

बर्‍याच महिलांना ओवरीमध्ये सिस्‍ट असत ज्यामुळे त्यांना वेदना आणि असहजता जाणवते. तसेच मासिक धर्मात देखील उशीर होतो. ही समस्या अस्थायी नसते बलकी बर्‍याच वेळापर्यंत याचा त्रास जाणवतो. पण आम्ही यासाठी काही घरगुती कारगर उपाय सांगत आहोत जे केल्याने ओवरीतील सिस्‍टपासून तुम्हाला सुटकारा मिळू शकतो. हे उपाय खाली प्रमाणे आहे :


1. कॅस्‍टर ऑयल पॅक - ह्या तेलामुळे रक्ताचा संचार चांगल्या प्रकारे होतो आणि सिस्‍टला गळण्यात मदत करतो. तुम्ही एका कॉटन कपड्याला तेलात भिजवून त्याला सिस्‍ट असणार्‍या जागेवर ठेवा नक्की आराम मिळेल.


2. हीटिंग पॅड - स्त्रिया नेहमी हीटिंग पॅडचे वापर करण्यास स्वत:चा बचाव करतात. पण जर ओवरीत सिस्ट असेल तर हीटिंग पॅड कमालीचा
असर दाखवतो. याने स्नायू रिलॅक्स होतात आणि दुखणे कमी होते.


3. ऍपल साइडर वेनिगर - यात एल्‍काइन असत जे दुखण्यापासून तुमचा बचाव करतो. तसेच यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते जी सिस्‍टला संकुचित करते. तुम्ही याचा वापर जेवणात देखील करू शकता.


4. चुकंदर (बीटरूट) - चुकंदरमध्ये बीटासायनिन असत जे दुखण्यात आराम देतो. तसेच यात एल्‍काइन एजेंटपण असत जे सिस्‍टमध्ये फार प्रभावी असतो.


5. कॅमोमाइल चहा - जर तुम्ही एक कप कॅमोमाइल चहाचे सेवन कराल तर तुमच्या ओवरीत होणार्‍या सिस्‍टच्या वेदनांस आराम मिळतो. हा फार प्राचीन उपचार आहे. याचे कुठलेही साइड इफेक्टपण होत नाही.


6. शरीराला मूव्ह करा - जर तुमच्या ओवरीत सिस्‍ट असेल तर रोज व्यायाम किंवा योगा करा. याने तुमच्या दुखण्यात आराम मिळेल आणि वॉर्मअप केल्याने तुम्हाला दीर्घकाळापर्यंत आराम मिळेल.


7. पर्याप्त मात्रेत पाण्याचे सेवन करावे - ओवरीत सिस्‍ट असेल तर पर्याप्त मात्रेत पाण्याचे सेवन करावे. याने शरीरातील विषाक्‍तता बाहेर निघून जाते आणि आराम मिळतो. दिवसातून कमीत कमी 8 ग्लास पाणी जरूर प्या.


8. हर्ब्‍सची मदत घ्‍या - बर्‍याच महिलांना ही समस्या हारमोन्‍सच्या असंतुलनामुळे होते. अशात हर्ब्‍स फारच सहायक असतात. अलसी, तीळ इत्यादीचे सेवन लाभकारी असतात आणि हे सिस्टचा खात्मा करण्यास मदत करतात. तसेच नवीन सिस्‍टला बनू देत नाही.

Dr. Ganesh Pachkawade
Dr. Ganesh Pachkawade
MS/MD - Ayurveda, Cupping Therapist Dermatologist, 4 yrs, Pune
Dr. Sanjay  Babar
Dr. Sanjay Babar
BAMS, Ayurveda General Surgeon, 15 yrs, Pune
Dr. Pradip Pandhare
Dr. Pradip Pandhare
DNYS, 9 yrs, Pune
Dr. Harshad Danwale
Dr. Harshad Danwale
MD - Homeopathy, Homeopath, 5 yrs, Pune
Dr. Shweta Muley
Dr. Shweta Muley
BHMS, Homeopath, 6 yrs, Pune
Hellodox
x