Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

हा ज्यूस म्हणजे बीटचा ज्यूस होय. बीट तुम्हाला माहितीच असेल, परंतु काहीजण हे आवडत नाही म्हणून खाण्याचे टाळतात. मात्र याचे अनेक फायदे आहेत. आरोग्यासाठी चांगले असणारे हे बीट आता मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाही मदत करत असल्याचे नुकत्याच झालेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

बीटचा ज्यूस पिण्याने मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत असून, वृद्धांचा मेंदू तरुणांप्रमाणे कार्यक्षम राहण्यास मदत होते.

अमेरिकेच्या वेक फॉरेस्ट विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले.

यामध्ये 55 किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या 22 पुरुष आणि महिलांचा समावेश करण्यात आला होता.

सहभागी झालेल्यांना आठवडयातून तीन वेळा असे सहा महिने बीटचा रस पिण्यास दिला. रस पिण्यापूर्वी त्यांना 50 मिनिटे चालण्यास सांगितले होते.


सहभागी झालेल्या निम्म्या लोकांना बीटमधून 560 मिली ग्रॅम नायट्रेट मिळाले, तर इतरांना बीटमधून अतिशय कमी प्रमाणात नायट्रेट उपलब्ध झाले.

ज्या वेळी तुम्ही व्यायाम करता, त्या वेळी तुमच्या मेंदूमधून सोमॅटोमोटर कॉर्टेक्‍स स्नायूतील माहिती प्रक्रिया सुरू करतो. व्यायाम करण्यामुळे सोमॅटोमोटर कॉर्टेस मजबूत होण्यास मदत होते.

व्यायाम करण्यामुळे आपल्या मेंदूतील ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होतो. त्या वेळी बीटचा रस घेतल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्‍सिजनचा पुरवठा होतो.

यामुळे सोमॅटोमोटर कॉर्टेस बळकट करण्यासाठी योग्य वातावरण मिळते. याचा थेट परिणाम मेंदूवर होत असून, तो अधिक कार्यक्षम होण्यासाठी मदत होत असल्याचे अभ्यासात दिसून आल्याचे संशोधकांनी सांगितले.

व्यायाम आणि बीट यामुळे मेंदूवर सकारात्मक परिणाम होत असून, त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होत असल्याचे या अभ्यासात दिसून आले.

वाढत्या वयासोबत वृद्ध मंडळींमध्ये अनेक शारीरिक समस्या डोके वर काढतात. मात्र हिरव्या पालेदार भाज्यांचे सेवन यातून बाहेर पडण्यास मदत करू शकते.

हिरव्या भाज्यामुंळे बुजुर्गांचा अनेक समस्यांतून बचाव होऊ शकतो.

हल्लीच झालेल्या एका अध्ययनात असे आढळून आले की, ब्रोकली, कोबी, फ्लॉवर आणि मोड आलेल कडधान्याच्या सेवनामुळे वृद्ध महिलांच्या गळ्यातील रक्तवाहिन्या कठोर होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो.

त्यांच्या सेवनामुळे साहिजकच हृदयविकारांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या आहाराचे दररोज तीन वा तीनपेक्षा जास्त वेळा सेवन करणे वृद्धांसाठी लाभदायक ठरू शकते.

ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ लॉरेन ब्लॅकेनहॉर्स्ट यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे अध्ययन केले असून अशा प्रकारच्या भाज्यांचा हृदयाच्या कॅरोटिड आर्टरी वॉलवर पडणार्‍या प्रभावाचे अध्ययन करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.

कॅरोटिड वॉलची जाडीमध्ये 0.1 मिलीमीटर घटीचा संबंध पक्षघात व हृदयविकारांच्या जोखीमींमध्ये 10 ते 18 टक्क्यांच्या घटीसोबत आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

संतुलित जीवनशैली आणि अशा प्रकारच्या भाज्यांचे सेवन हृदयरोगापासून बचाव करण्यातही महत्त्वपूर्ण समजले जाते.

डोकेदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास आपण विक्स वेपोरबचा वापर करतो. मात्र विक्स वेपोरबचा केवळ सर्दी, खोकल्यासाठीच वापर होत नाही तर याचे अनेक फायदेही आहेत, जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील.

* आपले कपडे व त्वचेवर विक्स वेपोरब लावल्यास डास दूर होतील.

*विक्स वेपोरबच्या वापराने सायनसमुळे होणारी डोकेदुखी बरी होण्यास मदत होते.

*ऐकायला कदाचित हे विचित्र वाटेल, मात्र विक्स वेपोरब पिंपल्सवर लावल्यास पिंपल्स बरे होतात.

* अनेकदा नाटक, सीरियल्सच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांना खोटे अश्रू काढावे लागतात, तर थोडासा वेपोरब डोळ्यांच्या खाली लावा.

*कीटक, पतंगांनाही दूर राखण्याचे काम विक्स वेपोरब करते.

*खाण्याच्या टेबलावरून माशा दूर करायच्या असल्यास टेबलावर विक्स वेपोरबची डबी उघडून ठेवावी.

* खरचटल्यास विक्स वेपोरबमध्ये थोडेसे मीठ मिसळून खरचटलेल्या जागी लावा. जखम लवकर बरी होईल.

*स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठीही विक्स वेपोरबचा वापर होतो. नियमितपणे स्ट्रेच मार्कवर विक्स वेपोरब लावल्यास दोन आठवड्यांत तुम्हाला परिणाम दिसू लागतील.

*ड्राय स्किनसाठी विक्स वेपोरब एक मॉश्चमरायझर म्हणून काम करते.

फिट राहणे आणि सिक्स पॅक्स एब्स असणे फॅशन झाले आहे. अधिक वेळ जिम करून किंवा वजन उचलून एब्स लवकर बनतील असे विचार करणार्‍यांना हे ही माहीत असावे की योग्य आहार नसल्यास एब्स बनणे शक्य नाही. बॉडी बनवण्यासाठी प्रोटीनची भूमिका महत्त्वाची असते. एका स्वस्थ व्यक्तीला दररोज प्रती किलो वजनाप्रमाणे एक ग्राम प्रोटीनची आवश्यकता असते. ही मात्रा दररोजच्या कार्यशैलीप्रमाणे कमी जास्त असू शकते. यासोबतच शरीरातील मेटाबॉलिझम जलद असावे. हे सर्व संतुलित ठेवण्यासाठी आहारा या 15 वस्तू सामील करण्याची गरज आहे तर जाणून घ्या सिक्स पॅक्स एब्स साठी कसा असावा आहार:


ब्रोकोली
यात कॅलरीज कमी प्रमाणात आढळत असून हे फायबरयुक्त असतं. याने वजन कमी होण्यात मदत मिळते.
दालचीनी
एका रिसर्चप्रमाणे दालचीनी शरीरात इन्सुलिन प्रतिक्रिया वाढवण्यात मदत करते ज्याने पोटावर फॅट्स एकत्र होत नाही.

मश्रुम, रताळे
हे लो कॅलरी फूड असून याने पोटही भरतं आणि स्नायू बनतात.


सफरचंद
यात अँटीऑक्सिडेंट पॉलीफेनोल असतात जे शरीरात चरबी जमा होऊ देत नाही.

ग्रीन टी, मिरची
चयापचय क्रिया सुधारते.

ब्‍लूबेरीज
हे नवीन चरबी पेशी निर्मिती रोखण्यात मदत करतं.

ग्रेपफ्रूट
यात आढळणारे रसायन इन्सुलिन स्तर कमी करण्यात मदत करतात.


ओट्स
ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळत ज्याने पोट भरलेलं जाणवतं.


संत्रं
हे रक्तात हार्मोनचे स्तर कमी ठेवण्यात मदत करतं.
अक्रोड
अक्रोड फायबर, अँटीऑक्सिडेंट्स आणि असंतृप्त फॅटी एसिडमध्ये उच्च असतात ज्याने रक्तदाब संतुलित ठेवण्यात तसेच ताण कमी करण्यात मदत मिळते.

सॉल्‍मन मासोळी
ही मॅग्नीशियमचा एक मोठा स्रोत असून याचे सेवन केल्याने कोर्टिसोलचे स्तर नियंत्रित राहण्यात मदत मिळते.

हिंदू कुटुंबांमध्ये शंख वाजवणे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. शंख वाजवल्याने वातावरणातील हानिकारक तत्त्व नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असे मानले आहे. परंतू हे आरोग्यासाठी उत्तम आहे हे कमी लोकांनाच माहीत असेल.. तर बघू रोज शंख वाजवण्याचे काय फायदे आहेत ते:

स्नायू मजबूत होतात
शंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात.

प्रोस्टेट
शंख वाजवण्याने प्रोस्टेट क्षेत्रावर दबाव पडतो आणि याने प्रोस्टेट स्वास्थ सुधारतं. हे प्रोस्टेट वृद्धी रोखण्यात मदत करतं.

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी
याने फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होता आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते.

थायरॉईड ग्रंथीत सुधार
शंख वाजवल्याने थायरॉईड ग्रंथी आणि वोकल कोड्सचा व्यायाम होतो.

बोलण्यात स्पष्टता
याने आपल्या बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यासंबंधी समस्या दूर होतात. बोबडे बोलणार्‍या मुलांना शंख वाजवायला हवा याने त्यांची वाणी सुधारेल.

सुरकुत्या दूर होतात
शंख वाजवताना चेहर्‍याचे स्नायू खेचले जातात याने फाईन लाइन्स आपोआप दूर होण्यात मदत मिळते.

त्वचा रोग दूर होतात
रात्र भर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. सकाळी या पाण्याने शरीरावर मालीश करावी. याने त्वचेसंबंधी रोग दूर होतात.

ताण दूर होतं
शंख वाजवल्याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि ताण कमी होण्यात मदत मिळते.

नकारात्मकता दूर होते
शंख वाजवताना त्यातून ऊँ ध्वनी बाहेर पडते ज्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता पसरते.

हार्ट अटॅकपासून बचाव
नियमित शंख वाजवणार्‍या हार्ट अटॅकचा धोका नसतो. शंख वाजवल्याने सर्व ब्लॉकेज उघडून जातात.

हे लक्षात ठेवावे:
तज्ज्ञाकडून शंख वाजवणे शिकावे. प्रशिक्षण घेतल्याशिवाय शंख वाजवल्यास नुकसान होऊ शकतं. तसेच शंख वाजवताना नाकातून श्वास टाकावे.

विशेष: उच्च रक्तदाब, हार्निया किंवा मोतीबिंदू या आजाराने पीडित लोकांनी शंख वाजवू नये कारण याने कमजोर अंगांवर दबाव पडतो.

Dr. Kirti Dagor
Dr. Kirti Dagor
BAMS, Ayurveda Panchakarma, 11 yrs, Pune
Dr. Abhijit Shirude
Dr. Abhijit Shirude
MS - Allopathy, ENT Specialist, 5 yrs, Pune
Dr. Aradhana Patkar
Dr. Aradhana Patkar
Specialist, Gynaecologist Infertility Specialist, 4 yrs, Pune
Dr. Shivdas Patil
Dr. Shivdas Patil
BAMS, Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Nandita Bhati
Dr. Nandita Bhati
BDS, Dentist Implantologist, 14 yrs, Pune
Hellodox
x