Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

वाढतं वय आणि त्यामुळे शरीरात होणारे बदल या साऱ्याच्या हल्लीच्या जीवनशैलीत बराच विचार केला जातो. मुख्य म्हणजे अनेकजण आपल्या वाढत्या वयाचा थेट परिणाम हा सौंदर्यावर, परिणामी त्वचेवर होणार, या चिंतेनेसुद्धा त्रस्त असतात. याच चिंता आणि या तणावापासून दूर राहण्यासाठी मग सुरुवात होते ती म्हणजे विविध उपाय शोधण्याची. महागडी औषधं या अनेकांचाच शेवटचा पर्याय असतोत. पण, तुम्हाला ठाऊक आहे का, रोजच्या वापरात असणारी फळंही त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी तितकीच फायद्याची असतात. चला तर, जाणून घेऊया ही फळं नेमकी आहेत तरी कोणती याविषयी...

सफरचंद-
सफरचंदामध्ये असणारा एन्झामाईन नावाचा घटक त्वचेचा तजेला कायम राखण्यास मदत करतं. त्वचेला एक वेगळी चमकही सफरचंदामुळेच मिळते. ‘अॅन अॅपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे’ असं नेहगमीच म्हटलं जातं. त्वचेच्या बाबतीतही असंच काहीसं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

पपई
त्वचा उजळण्यासाठी पपईचं सेवन करणं कधीही उत्तम. रोजच्या रत पपईचा समावेश केल्यास चेऱ्यावरील सुरकुत्या, डाग इत्यादीपासून तुमची सुटका होऊ शकते.


स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं. या घटकांमुळे त्वचेचं सौंदर्य कायम राहण्यास मदत होते. तसंच त्वचेतील कोलेजन वाढण्यासही स्ट्रॉबेरी उपयुक्त ठरतात.

किवी-
सहसा डेंग्यू या आजारावर उपाय म्हणून खाल्लं जाणारं किवी हे फळ आता अनेकांच्या आवडीचं झालं हे. डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळं म्हणजेच डार्क सर्कल, चेहऱ्यावरील सुरकुत्या यांचं प्रमाण कमी करण्यासाठी कीवीतील अँटीऑक्सिडंटस उपयुक्त ठरतात. या फळात असणारं ई आणि क ही जीवनसत्व वाढतं वय लपवण्यास उपयुक्त ठरतात.

कलिंगड-
शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी कलिंगडाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. मुख्य म्हणजे सौंदर्याची अर्धीअधिक मदार ही त्वचेवर असते आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी पाणीही तितकच गरजेचं असतं. परिणामी चिरतरुण सौंदर्यासाठी कलिंगड़ खाणं खूप फायद्याचं ठरतं.

लवंगाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. याशिवाय लवंग औषधीही आहे.

दातांचे दुखणे, खोकला यासारख्या समस्यांवर लवंगाचा वापर केला जातो.

लवंगामध्ये अँटी-बॅक्‍टेरियल, अँटी-फंगल हे गुण असतात. लवंग तेलाचा वापर हा त्वचाविकारांवरही केला जातो. ते एक चांगले ब्युटी प्रॉडक्‍ट आहे.

त्याच्या नियमित वापराने अनेक त्वचाराविकारांवर फायदा होतो. मुरुमांच्या डागांवर लवंगाचे तेल नियमित लावल्यास डाग निघून जातात.

लवंगाच्या तेलाच्या वापराने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. रोज रात्री झोपताना लवंगाच्या तेलाने मसाज करा.

लवंगाच्या तेलाच्या नियमित वापराने केस लवकर पांढरे होत नाहीत तसेच गळणेही कमी होते.

दरम्यान, नारळाच्या तेलात लवंगाचे तेल मिसळून लावा.

कारण नुसत्या लवंग तेलाचा केसांवरील वापर नुकसानकारक ठरु शकतो

सौंदर्यात भर घालणारा महत्वाचा घटक म्हणजे केस. परंतु, अनेकदा हेच केस सौंदर्याच्या आड येतात. बऱ्याचदा चेहऱ्यावर, हातावर, पायांवर असलेले केस काढण्यासाठी आटापिटा केला जातो. चेहऱ्यावरील नको असलेले केस हटवणं हा तरूण मुली आणि महिलांसमोरील मोठा प्रश्न असतो. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. मग वॅक्सिंग, थ्रेडिंग तसेच अनेकदा लेझर ट्रिटमेंटसारखे उपाय केले जातात. पण या उपायांव्यतिरिक्त काही घरगुती उपायांनी या समस्येवर तोडगा काढता येऊ शकतो. अंड्याच्या मदतीनेही त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. तसेच अंड्यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केसही दूर केले जाऊ शकतात. जाणून घेऊयात काही साधे-सोपे घरगुती उपाय...

1. तुमच्या चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर पावडर घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. जेव्हा चेहऱ्यावर लावलेला हा मास्क सुकून जाईल त्यावेळी हळूहळू तो चेहऱ्यावरून काढा. असे केल्याने चेहऱ्यावरील नको असलेले केस निघून जातील आणि त्वचा मुलायम होईल.

2. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठीही अंड्याचा पांढरा भाग तुमच्या चेहऱ्यावर लावा. जेव्हा हा सुकून जाईल त्यावेळी याला थंड पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने त्वचेमध्ये असलेले एक्स्ट्रा ऑईल दूर होईल. चेहऱ्यावरील सुरकूत्याही दूर होतील.

3. जर ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावा. हा लेप सुकल्यानंतर ठंड पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून दोन वेळा असे केल्यानं ब्लॅकहेड्सची समस्या दूर होईल.

4. अंड्याचा उपयोग स्किन टोनर म्हणूनही करण्यात येतो. त्यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि मुलायम होण्यास मदत होते. यासाठी एक अंडे फेटून घ्या. त्यानंतर ते चेङऱ्यावर आणि मानेवर लावा. जेव्हा हे मिश्रण सुकून जाईल त्यावेळी गरम पाण्याने धुवून घ्या. यामुळे त्वचेवर ग्लो येतो.

टिप - प्रत्येक व्यक्तीलाच या टिप्सचा उपयोग होईल असे नाही. बऱ्याचदा अनेकांना अंड्याची अॅलर्जी असते. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्यानेच वरील उपायांचा अवलंब करावा.

तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये अ‍ॅक्ने, पिंपल्स, ब्रेकआऊट्सचा त्रास हमखास जाणवतो. त्यामुळे तेलकट त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अंड्याचा आहारात समावेश केल्याने शरीराला बळकटी मिळते. त्याप्रमाणे केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठीदेखील अंड फायदेशीर आहे. त्वचेसाठी अंड्यातील पांढरा विशेष फायदेशीर आहे.

कसा कराल फेसपॅक?
अंड आणि लिंबू -
अंड्याचा पांढरा भाग वेगळा काढा. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. दहा मिनिटं हा फेसपॅक चेहर्‍यावर नैसर्गिकरित्या सुकू द्यावा. यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा.

या फेसपॅकमुळे चेहर्‍यावरील तेल कमी होण्यास मदत होते. सोबतच चेहर्‍यावरील ग्लो वाढतो.

हा फेसपॅक नियमित आठवड्यातून 2-3 वेळेस चेहर्‍याला लावल्यास अधिक फायदेशीर ठरते.

अंड आणि लिंबाच्या रसाप्रमाणेच अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये आरारूट पावडर मिसळून फेसपॅक बनवणेदेखील फायदेशीर आहे. हा फेसपॅकदेखील त्वचेचे क्लिन्जिंग करण्यास फायदेशीर ठरते.

अंड आणि आरारूट पावडर
एका अंड्याच्या पांढर्‍या भागात दोन लहान चमचे आरारूट पावडर मिसळा. हे मिश्रण एकत्र करून 10-15 मिनिटं चेहर्‍यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा.

डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही. काही लोक अगदी आमटी-भाजीतील कडीपत्ता शोधून खातात. तर काही तो दिसताच बाजूला काढतात. परंतु, कडीपत्ताचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचबरोबर सौंदर्याच्या समस्या दूर करण्यासही कडीपत्ता फायदेशीर ठरतो. पाहुया त्याचे फायदे...

# कडीपत्ता आयर्न आणि फॉलिक अॅसिडचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे अॅनेमियासारख्या समस्या दूर करण्यासाठी त्याचा फायदा होतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता आणि खजूर खाल्याने देखील खूप फायदा होतो.

# पचनासंबंधित समस्या असल्यास कडीपत्ता वाटून ताकात घालून प्या. यामुळे पोटात होणारी गडबड शांत होते आणि पोटाच्या समस्यांचे निवारण होते.

# मधुमेहींनी आहारात कडीपत्ताच्या समावेश केल्यास ब्लड शुगरची समस्या दूर होण्यास मदत होईल. ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहे.

# केस काळेभोर, मजबूत करण्यासाठी कडीपत्ताचा हा प्रयोग करुन पहा. यासाठी खोबरेल तेलात कडीपत्ता उकळवा. थंड झाल्यावर ते तेल केसांना लावून मालिश करा.

# कफ झाल्यास किंवा कफ सुकल्यास वा फुफ्फुसात जमा झाल्यास यावर कडीपत्ता खूप फायदेशीर ठरतो. यासाठी कडीपत्ता वाटून त्याची पावडर करा आणि मधासोबत त्याचे सेवन करा.

# त्वचासंबंधित समस्यांवर कडीपत्ता फायदेशीर ठरतो. खूप काळापासून पिंपल्स किंवा त्वचेच्या अन्य समस्यांमुळे त्रासले असला तर रोज कडीपत्ता खा किंवा त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा.

Dr. Rohan Shirole
Dr. Rohan Shirole
MS/MD - Ayurveda, Dermatologist Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Mukund Ghodke
Dr. Mukund Ghodke
BAMS, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Gopal Samdani
Dr. Gopal Samdani
MBBS, Pediatrician, 30 yrs, Pune
Dr. Vishnu Nandedkar
Dr. Vishnu Nandedkar
MBBS, Joint Replacement Surgeon Orthopaedics, 9 yrs, Pune
Dr. Abhijit Kamble
Dr. Abhijit Kamble
BAMS, Family Physician General Surgeon, 14 yrs, Pune
Hellodox
x