Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

चॉकलेट केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठीही तितकेचं फायदेशीर आहे. त्वचा मुलायम करण्याची क्षमता डार्क चॉकलेटमध्ये आहे. त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवणयसाठी डार्क चॉकलेट फायदेशीर आहे. त्यामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक वाढत्या वयासोबत येणार्‍या समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे खाण्यासोबतच चेहरा खुलवण्यासाठी डार्क चॉकलेट कसे मदत करते हे जाणून घेण्यासाठी हा सल्ला नक्की वाचा.

डार्क चॉकलेटचा त्वचेसाठी फायदा कसा ?
चॉकलेटमध्ये दाह शामक गुणधर्म असल्याने चेहर्‍यातील शुष्कपणा कमी करण्यास मदत होते. संवेदनशील त्वचेसाठी चॉकलेट फायदेशीर आहे. यामुळे चेहर्‍याला चमक मिळते. सोबतच त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.

आजकाल अनेक फेशिएल्समध्ये चॉकलेटचा फ्लेवरही मिळतो. त्वचेवर डार्क चॉकलेट लावल्याने अनेक समस्या कमी होतात. चेहर्‍यावरील अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाणही कमी होतं.


1/3 कप कोको पावडरमध्ये 4 चमचे मध, लिंबाचा रस मिसळा. हा फेसपॅक चेहर्‍यावर आवा. 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. या फेसपॅकमुळे चेहरा तुकतुकीत होण्यास मदत होते.

अनेकांना स्वतःच्या त्वचेच्या रंगाचा न्यूनगंड असतो. मग गोरेपणा मिळवाण्यासाठी बाजारातील अनेक क्रीम्सचा भडीमार केला जातो. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केवळ जाहिरातींना भूलून फेअरनेस क्रीमची निवड करणं आरोग्याला धोकादायक ठरू शकते. फेअरनेस क्रीमचेही साईड इफेक्ट्स असू शकतात हे अनेकांना ठाऊकच नसते.

बाजारात सौंदर्यप्रसाधनं लॉन्च करण्यापूर्वी अनेक टेस्टमधून जावं लागतं. अनेकदा क्रीममध्ये पारा मिसळला जातो. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक 4पैकी 3 महिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ब्लिचिंग करण्याचा निर्णय घेतात.

अनेक समस्यावर उपचार
चेहर्‍यावरील डाग, त्वचेच्या रंगामध्ये अनियमितता असणं, त्वचेवर अकाली सुरकुत्या येणं असे दोष लपवण्यासाठी फेअरनेस क्रीमचा वापर केला जातो. समान्यपणे क्रीममध्ये दोन प्रकारचे ब्लिचिंग एजेंट असतात. हाइड्रोक्विनोन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे घटक आढळतात.


त्वचा तज्ञांच्या सल्ल्यानुसार, क्रीममध्ये हाइड्रोक्विनोनचं प्रमाण 4%पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. त्वचेवर खाज येत असल्यास अनेकदा कॉर्टिकोस्टेरॉइड्स किंवा टॉपिकल स्टेरॉइड्स दिली जाते. मात्र त्वचेचा त्रास नसणारेदेखील अनेक रूग्ण त्याचा वापर करतात.

क्रीम त्वचेला त्रासदायक ठरू शकते
ज्या क्रीममध्ये हाइड्रोक्विनोन घटक असतात, अशा क्रीम्स दिवसातून 2 वेळेपेक्षा अधिक लावू नका. अशा क्रीम्स चेहर्‍यावर लावू नयेत. तसेच 8-12 आठवड्यांपेक्षा अधिक दिवस लावू नका.

कॉर्टिकोस्टेरॉइड्स असणारी क्रीम नाजूक भागांवर लावली जाऊ शकते. प्रामुख्याने खाज कमी करण्यासाठी सुचवल्या जाणार्‍या क्रीममध्ये त्याचा वापर केला जातो. मात्र त्यासोबत कोण-कोणते घटक मिसळले आहेत हे पाहणं गरजेचे आहे.

क्रीमचे साईडइफेक्ट्स
नॅशनल हेल्थ सर्विसच्या अहवालानुसार ब्लिचिंग एजंटच्या चूकीच्या वापरामुळे अनेक दुष्परिणाम दिसतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, यामुळे त्वचेवर सूज, त्वचेवर डाग पडणं, जळजळ वाढणं असे दुष्परिणाम आढळतात. अतिवापरामुळे त्वचा पातळ होते, शरीरात नसा थेट दिसतात. यकृत, किडनीवरही त्याचा परिणाम होतो. प्रामुख्याने गरोदरपणाच्या काळात चूकीच्या क्रीम्सचा वापर केल्यास बाळावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

म्हणूनच त्वचा उजळवण्याच्या नादात अति प्रमाणात आणि चूकीच्या क्रीम्सचा वापर करणं आरोग्यावर गंभीर परिणाम करते.

श्रावण माहिना सुरू झाला की सणवारांची रेलचेल सुरू होते. नागपंचमी, रक्षाबंधनाच्या दिवसांमध्ये मुली प्रामुख्याने मेहंदी काढतात. अनेकजणी धावपळीच्या दिवसात स्वतः घरी मेहंदी काढण्यापेक्षा बाजारात किंवा मॉलमध्ये झटपट मेहंदी काढण्याचा निर्णय घेतात. झटपट रंगणारी, गडद होणारी मेहंदी म्हणून तुम्ही बाजारात कलाकारांकडून मेहंदी काढून घेत असाल तर वेळीच सावध रहा. कारण मेहंदीमध्ये ती रंगण्यासाठी काही केमिकल्सचा वापर केला असेल ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

नुकसानकारक मेहंदी
मेहंदी नैसर्गिक स्वरूपात हातावर लावल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो. मात्र जर झटपट रंगण्यासाठी त्यामध्ये केमिकल्स मिसळले असल्यास त्यामधून त्वचेला नुकसान होऊ शकते. त्वचेवर जळजळ, खाज, सूज येणं अशी लक्षण प्रामुख्याने आढळतात.

कॅन्सरचा धोका
मेहंदी खुलण्यासाठी घातक केमिकल्स, रासायनिक पदार्थांचा वापर केल्यास त्यामधून कॅन्सरचा धोका बळावू शकतो. पीपीडी सोबतच अमोनिया,ऑक्सिडेटीन, हायड्रोजनसारखे घातक केमिकल्स मिसळल्यास त्वचेला नुकसान होऊ शकते. मेहंदीमध्ये पीएच अ‍ॅसिड असल्यास ते अधिक त्रासदायक ठरू शकतं.


हर्बल मेहंदी सुरक्षित
सणांमध्ये मेहंदी हातावर काढणार असाल तर हर्बल मेहंदीचा समावेश करा. यामुळे शरीरात थंडावा रहण्यास मदत होते. हर्बल मेहंदी हातांना सुंदर बनवते.

खास काळजी
पुरेशी काळजी घेऊन बाजारातून मेहंदी घेतली तरीही काहींना अ‍ॅलर्जीमुळे त्याचा त्रास होऊ शकतो. हातावर मेहंदीमुळे काही त्रास होत असल्यास तात्काळ हात थंड पाण्याने धुवाव. त्यानंतर खोबरेल तेल लावा. त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा.

काही वर्षांपूर्वींपर्यंत ऑलिव्ह ऑईल आपल्यासाठी एक्झॉटीक पदार्थांपैंकी एक होते. मात्र आता ऑलिव्ह ऑईलचे आरोग्यदायी फायदे जाणून घेतल्यानंतर त्याचा आहारातील समावेश वाढला आहे. आहारात जसा समावेश करणं फयाद्याचे आहे तसेच त्याचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठीही केला जातो.

ऑलिव्ह ऑईलमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. सोबतच त्यामध्ये मिनरल्स, नॅचरल फॅटी अ‍ॅसिड असतात. यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते..अकाली सुरकुत्या पडण्यापासून त्वचेचे रक्षण होते.

मुलायम त्वचेसाठी खास स्क्रब -
त्वचा मुलायम ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑईल आणि मीठाचा वापर स्क्रब म्हणून केला जातो. त्वचेवरील मृत पेशींचा थर हटवण्यासाठी त्याचा फायदा होतो. मीठामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स असतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.


कसं बनवाल स्क्रब ?

-अर्धा कप ऑलिव्ह ऑईल
-1/4 कप मीठ
-लिंबाचा रस

सारे पदार्थ एकत्र करून मिश्रण बनवा. त्वचेवर हलक्या हाताने या मिश्रणाने मसाज करा. 5 मिनिटं स्क्रब चेहर्‍यावर लावून ठेवा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

कोपरे, ढोपर, घोटा येथील काळसरपणा हटवण्यासाठीही हा स्क्रब फायदेशीर आहे. प्युमिक स्टोन पायावर घासल्यानंतर स्क्रबने मसाज करावा. रात्री झोपण्यापूर्वी या स्क्रबचा वापर करा. त्यानंतर मॉईश्चरायझर लावून झोपा. त्वचेमध्ये मुलायमपणा टिकून ठेवण्यासाठी यामुळे मदत होऊ शकते.

मुली प्रामुख्याने त्वचा आणि सौंदर्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतात. त्यामध्येही चेह्र्‍यावरील ओपन पोअर्सचा त्रास कमी करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात. तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये ओपन पोअर्सचा त्रास अधिक जाणवतो. वाढत्या वयानुसार ओपन पोअर्स वाढतात. म्हणूनच सुरूवातीच्या टप्प्यावर ओपन पोअर्स जाणवल्यास या उपायांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

ओपन पोअर्सच्या समस्येवर घरगुती उपाय -

केळं -
केळ्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हांला ठाऊक असतील परंतू त्याचा फायदा सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो. त्वचेवरील मृत पेशींचा थर हटवणयसाठी, चेहर्‍यावर पुन्हा तजेला येण्यासाठी केळं फायदेशीर ठरते. आठवड्यातून दोनदा केळ स्मॅश (कुस्करून) करून चेहर्‍यावर लावल्याने ओपन पोआर्सचा त्रास कमी होतो.

काकडी आणि लिंबू -
ओपन पोअर्सचा त्रास कमी करण्यासाठी काकडीमध्ये लिंबू पिळा. या मिश्रणाचा रस चेहर्‍यावर लावा. यामुळे चेहर्‍यावरील ओपन पोअर्स टाईट होण्यास मदत होते.

दूध आणि ओट्स -
दोन चमचे ओट्स आणि चमचाभर गुलाबपाणी, मध यांचे एकत्र मिश्रण बनवा. ही पेस्ट 10 मिनिटं चेहर्‍यावर लावा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवाव. यामुळे ओपन पोअर्ससोबतच चेहर्‍यावरील डागही कमी होण्यास मदत होते.

Dr. Swapnil Dhamale
Dr. Swapnil Dhamale
BHMS, Family Physician Homeopath, 1 yrs, Pune
Dr. Minal Sapate
Dr. Minal Sapate
BDS, Dentist Cosmetic and Aesthetic Dentist, 15 yrs, Pune
Dr. Kirtiraj Dilip Kate
Dr. Kirtiraj Dilip Kate
BDS, Dentist, 4 yrs, Pune
Dr. Vijaykumar Raut
Dr. Vijaykumar Raut
BAMS, Family Physician Physician, 18 yrs, Pune
Dr. Sheetal Shetty
Dr. Sheetal Shetty
BHMS, Homeopath Psychologist, 5 yrs, Pune
Hellodox
x