Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुली त्यांच्या फीटनेसची जितकी काळजी घेतात त्यापेक्षा थोडी जास्त किंबहुना थोडी अधिकच त्यांच्या त्वचेची काळजी घेतात. त्वचेवर पिंपल्स, टॅनिंग कमी, निस्तेजपणा कमी करण्यासाठी मुली सतत प्रयत्न करतात. ब्युटी पार्लरप्रमाणेच काही घरगुती उपायांच्या मदतीनेदेखील त्वचेचं सौंदर्य खुलवता येतं. त्वचेवरील समस्या कमी करण्यासाठी मुलतानी माती फायदेशीर ठरते. मग मुलतानी मातीमध्ये नेमके काय मिसळल्यास ते अधिक फायदेशीर ठरतात हे तुम्हांला ठाऊक आहे का?

फेसपॅक ठरतात फायदेशीर

मुलतानी मातीमध्ये बेसन आणि चंदनाची पावडर मिसळणं फायदेशीर ठरतं. हे तिन्ही पदार्थ चमचाभर घेऊन एकत्र करून मिश्रण बनवा. यामध्ये गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. हा फेसपॅक चेहर्‍यावर लावून नैसर्गिक रित्या सुकू द्यावा.

हा फेसपॅक लावण्यापूर्वीदेखील त्वचेवर गुलाबपाणी कापसाच्या बोळ्याने लावा.

फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवावा.

आठवड्यातून हा फेसपॅक दोनदा चेहर्‍यावर लावणं फायदेशीर आहे.

नियमित या फेसपॅकचा वापर केल्याने त्वचा सतेज आणि मुलायम होण्यास मदत होते.

त्वचेवर चामखीळ येणं ही समस्या वर पाहता लहान वाटत असली तरीही कलांतराने ती त्रासदायक ठरू शकते. अशावेळेस चामखीळ काढून टाकण्यासाठी काही लोकांना लेझर ट्रिटमेंट्ससारख्या सर्जरीचा पर्याय निवडावा लागतो. वेळेऐच चामखीळीच्या समस्येकडे लक्ष दिल्यास त्याला समूळ नष्ट करणं घरच्या घरी शक्य आहे. मग पहा चामखीळ हटवण्याचे काही घरगुती उपाय -

1. गुलाबपाणी-
चामखीळीपासून सुटका मिळवायची असेल तर गुलाबपाणी फायदेशीर ठरते. गुलाबपाण्याला काही वेळ प्रखर सूर्यप्रकाशात ठेवा. थोडं गरम झाल्यानंतर त्वचेवर हे पाणी लावा. यामुळे त्वचा मोकळी होण्यास मदत होते. चेहर्‍यावर सतत चामखीळ येत असल्यास गुलाबपाण्याचा हमखास वापर करा.

2. बेकिंग सोडा आणि एरंडेल तेल
बेकिंग सोड्यामध्ये थोडेसे एरंडेल तेल मिसळा. ही पेस्ट चामखीळीवर लावा. या उपायाने चामखीळ हळूहळू नरम होते. नियमित हा उपाय केल्यास चामखीळ दूर होण्यास मदत होते.


3. कलोंजी
कलोंजीच्या दाण्याची पेस्ट करा. रात्री झोपण्यापूर्वी चामखीळीवर ही पेस्ट लावा. सकाळी कोमट पाण्याने हा भाग स्वच्छ करा.

त्वचेचा तजेला परत आणण्यासाठी चारकोल मास्क अतिशय फायदेशीर ठरतो. चारकोल मास्कमुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. त्याचबरोबर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून सूटका होते. तुम्ही घरच्या घरीही चारकोल मास्क बनवू शकता. जाणून घेऊया चारकोल मास्क कसा तयार करावा आणि त्याचे फायदे...

कसा बनवावा पील ऑफ मास्क
पील ऑफ मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी ३ अॅक्टीव्हेटेड चारकोलच्या कॅप्सूल्स घ्या. या कॅप्सुल्समध्ये व्हिटॉमिन ऑईल, बेंटोनाईट माती, ग्लिसरीन आणि मध घालून पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये थोडे पाणी घालून चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनंतर मास्क चेहऱ्यावरून पील करा. आणि चेहरा कोमट पाण्याने धुवा.

पिंपल्स असल्यास
पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी चमचाभर कोरफड जेल, एक चमचा हळद आणि एक चमचा अॅक्टीव्हेटेड चारकोल घालून पेस्ट तयार करा. यात थोडे पाणी घालून पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा.

बंद पोर्ससाठी
बंद पोर्स साफ करण्यासाठी एक चारकोल कॅप्सूलमध्ये गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा.

आहारात पुदिन्याचा वापर करणं फायदेशीर आहे. हे तुम्हांला ठाऊक असेल. नेहमीच्या वाटपापासून ते अगदी मिंट मोहितोसारख्या ड्रिंकमध्ये आपण हमखास पुदीन्याचा वापर करतो. पुदीना थंड प्रवृत्तीचा आणि रेचक असल्याने पचनकार्य सुरळीत करण्यासाठी त्याचा हमखास वापर केला जातो. पण हाच पुदीना त्वचेला खुलवण्यासाठीदेखील केला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का?

आरोग्यदायी पुदीना
पचनक्रिया सुधारण्यासोबतच तोंडातील दुर्गंधीचा त्रास कमी करण्यासाठीदेखील पुदीना फायदेशीर ठरतो. त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील पुदीन्याचा वापर केला जातो.

त्वचेसाठी पुदीना कसा ठरतो फायदेशीर ?
पुदिन्याच्या पानांमध्ये मिन्थॉल आणि अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. उन्हात फिरल्यामुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पुदिना फायदेशीर ठरतो. चेहर्‍यावर अ‍ॅक्ने, ब्रेकआऊट्स, सनबर्न, त्वचा लालसर होणं, रॅशेस येणं अशा समस्यांवर ते परिणामकारक ठरतं. त्वचाविकारांना दूर ठेवण्यासाठीदेखील पुदीन्याची पानं फायदेशीर आहेत.


कसा कराल पुदीन्याच्या पानांचा समावेश?
त्वचेसाठी मुलतानी माती गुणकारी आहे हे तुम्हांला ठाऊकच आहे. प्रामुख्याने तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये त्वचेशी निगडीत अनेक समस्या वाढतात. त्वचेतील तेल दूर करण्यासाठी, क्लिंजिंगसाठी मुलतानी मातीसोबतच पुदीनाही फायदेशीर ठरतो.

मुलतानी माती, ताजी पुदिन्याची पानं, मध आणि दही एकत्र करा. हे मिश्रण सुमारे 20 मिनिटं त्वचेवर लावा. फेसपॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याच्या मदतीने हा पॅक काढून टाका. या पॅकमुळे त्वचा मॉईश्चराईज होण्यास मदत होते.

गुलाबपाणीदेखील त्वचेची पीएच व्हॅल्यू सुधारण्यास मदत करतात. यामधील दाहशामक गुणधर्म त्वचेचे सौंदर्य खुलवते. पुदीन्याच्या पानांसोबत मध आणि गुलाबपाणी मिसळणंदेखील फायदेशीर आहे. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

ऋतूमानामध्ये बदल झाला की सहाजिकच त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. साथीचे आजार जसे पसरतात तसेच त्वचेवरही त्याचा परिणाम दिसून येतो. अनेकांना स्किन पिलिंगचा त्रास होतो. वेळीच लक्ष न दिल्यास हा त्रास भयंकर स्वरूप घेऊ शकतो. स्किन पिलिंगचा त्रास वेदना नसल्याने अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. मात्र घरगुती उपायांनी त्यावर मात करण्यास मदत होते.

स्किन पिलिंगचा त्रास कसा ठेवाल आटोक्यात ?
रोज बाऊलभर कोमट पाण्यात 10 मिनिटं हात बुडवा. तुमच्या इच्छेनुसार यामध्ये मध आणि लिंबाचा रसदेखील मिसळू शकता. या पाण्यामध्ये हात बुडवल्याने हाताची त्व्चा मुलायम होते आणि शुष्क त्वचा होण्याचं प्रमाण कमी होते.

व्हिटॅमिन ई युक्त तेल
स्किन पिलिंगचा त्रास कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ईयुक्त तेलाचा वापर करा. नियमित या तेलाच्या मालिशामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते.


ओट्स
बाऊलभर कोमट पाण्यामध्ये ओट्स मिसळा. ओट्स मऊ झाल्यानंतर 10-15 मिनिटं त्यामध्ये हात बुडवून ठेवावेत. त्यानंतर हात साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. हात कोरडे केल्यानंतर मॉईश्चरायझर लावा.

कोरफड
झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर हातावर लावा. काही वेळ मसाज करून झोपावे. सकाळी कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवावेत. त्यानंतर मॉईश्चराझर लावा. यामुळे स्किन पिलिंगचा त्रास कमी होतो.

स्किन पिलिंगचा त्रास कायम राहिल्यास केवळ नैसर्गिक उपायांवर अवलंबून राहू नका. वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.

Dr. Sujata Bauskar
Dr. Sujata Bauskar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 23 yrs, Pune
Dr. Nitin Dongre
Dr. Nitin Dongre
MBBS, General Physician, 37 yrs, Pune
Dr. Varun kumar  PT
Dr. Varun kumar PT
BPTh, Homecare Physiotherapist Physiotherapist, 10 yrs, Pune
Dr. Amruta Gite
Dr. Amruta Gite
BDS, Dental Surgeon Dentist, Pune
Dr. Neha Dhakad
Dr. Neha Dhakad
BHMS, Homeopath Family Physician, 14 yrs, Bengaluru (Bangalore)
Hellodox
x