Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

होळी म्हटलं की रंग हे आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र हे रंग बऱ्याचदा तुमच्या त्वचेचं, केसांचं नुकसान करू शकतात. तुम्ही अगदी ऑरगॅनिक रंग वापरत असलात तरी सूर्यप्रकाशात आणि रंगांच्या पाण्यात तुमचा बराच वेळ जाणार आहे. पण, काळजी करू नका. अशा काही टिप्स आहेत, ज्यामुळे होळीची धमाल केल्यानंतरही तुमच्या त्वचेचा तजेला कायम राहील.

एसपीएफ: एसपीएफ किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या लोशनचे संरक्षण तुमच्या त्वचेला द्या. त्यामुळे त्वचा मॉईश्चराइज होईल आणि सूर्याच्या प्रखर किरणांपासून तिचे संरक्षण होईल. रंग, धूळ आणि उष्णतेचा सामना तुमच्या त्वचेला करावा लागणार आहे. त्यामुळे, यापासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. चेहरा, मान, हात आणि रंग लागेल अशा शरीराच्या अन्य सर्व भागांना नीट लोशन लावा.

नारळाचे तेल: नारळाच्या तेलामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि रंग त्वचेत कमी प्रमाणात झिपरतात. शिवाय, त्वचा आणि केसांवर संरक्षक कवच असल्यास रंग धुवून काढणेही सोपे होते. त्वचेला अधिक मॉइश्चराइज करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून लावू शकता.

लिप बाम: ओठांच्या भेगांमध्ये रंग अगदी सहज जातात. चांगल्या दर्जाच्या लिप बामचे ४ ते ५ कोट्स लावून ओठांना नीट घासून घ्या आणि ओठ मऊ व मॉइश्चराइज्ड राहतील, याची काळजी घ्या.

हँड क्रीम: होळीमध्ये सर्वाधिक दुर्लक्ष होतं ते हातांची काळजी घेण्याकडे. नखांमध्ये रंग चटकन अडकून बसतात आणि ते काढणं अगदी अशक्य होऊन जातं. नखांमध्ये रंग अडकू नयेत आणि क्युटिकल्सचे नुकसान होऊ नये यासाठी भरपूर हँड क्रीम लावा. नखं लहानच ठेवा. शिवाय, होळीच्या आधी अॅक्रॅलिक किंवा जेल नेल्सचा वापर टाळा.

शॉवर जेल: शरीरावर लागलेले रंग धुवून काढण्यासाठी कोणत्याही तीव्र साबणाऐवजी नैसर्गिक शॉवर जेलचा वापर करा. अंग घासण्याचा स्पंज किंवा इतर साधनांचा वापर करतानाही जरा जपून.

शॅम्पू: केसांना पूर्णपणे वाचवणे अशक्य आहे. पण, हा त्रास कमी करता येईल. त्यासाठी सौम्य कडिंशनिंग असणारा माइल्ड स्वरुपातील शॅम्पू वापरून केसांमधील मॉइश्चर संरक्षित ठेवा. सारखे केस धुवू नका. त्याऐवजी, केस धुण्यामध्ये काही काळाचे अंतर ठेवा. त्यामुळे, त्वचेतून निर्माण होणारे नैसर्गिक तेल धुवून जाणार नाही आणि केस कोरडे होणार नाहीत.

फेस स्क्रब: मृत त्वचा काढून टाकणे आणि बंद झालेली छिद्रे मोकळी करण्यासाठी होळीनंतर दुसऱ्या दिवशी फेस स्क्रब वापरा. चेहऱ्यावर हळुवारपणे गोलाकार लावा. शरीराच्या इतर भागांवरही स्क्रबचा वापर करता येईल. कोमट पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर त्वचा कोरडी पडू नये यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा.

फेस मास्क: होळीमध्ये अनेक प्रकारची रसायने आणि इतर घटकांचा तुमच्या त्वचेशी संपर्क होतो. त्यामुळे, त्वचेला आराम देण्यासाठी तुम्ही हर्बल फेस पॅक वापरू शकता. त्वचेवर हळुवार मालिश करा आणि मास्क १० ते १५ मिनिटं राहू द्या. मास्कमुळे तुमच्या त्वचेला आराम मिळेल, कमी झालेले माइश्चरायझर पुन्हा निर्माण होईल आणि त्वचेची स्वच्छता होईल. एक-दोन वेळ मास्क लावल्यास त्वचा पुन्हा पुर्ववत होत असल्याचे तुम्हाला जाणवेल.

होळीचा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तुम्हीही होळीसाठी खास तयारी करत असालचं... होळी म्हणजे रंगाची उधळण करणारा सण. मग तुम्ही या दिवसाला आणखी रंगीबेरंगी करण्यासाठी रंग खरेदी केले की नाही? काय सांगता अजून रंग खरेदी केले नाहीत. काही हरकत नाही. बाजारामध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त रंगांपेक्षा तुम्ही काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुमच्या आवडीचे रंग घरीच तयार करू शकता.

होळीसाठी बाजारामध्ये जे रंग उपलब्ध असतात. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्स असतात. असे रंग त्वचेसोबतच आरोग्यासाठीही धोकादायक ठरतात. त्याऐवजी जर गरच्या घरीच रंग तयार करून त्याने होळी खेळलात तर आरोग्य जपण्यास मदत होईल. तुम्ही घरी रंग तयार करण्याचा विचार करत असाल तर घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंच्या मदतीने नैसर्गिक पद्धतीने रंग तयार करू शकता. हे रंग त्वचेला नुकसान पोहचवण्याऐवजी फायदाच पोहोचवतात.


घरीच तयार करा नैसर्गिक रंग :

1. पिवळा रंग

बेसन आणि हळद दोन्ही एकत्र करून घ्या. हे एकत्र केल्यानंतर तुम्हाला सुकलेला पिवळा रंग मिळण्यास मदत होईल. हे दोन्ही पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हळदीमध्ये अन्टीसेफ्टिक गुणधर्म आढळून येतात. तर बेसन चेहरा स्वच्छ करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला गरज असेल तर झेंडूची फुल पाण्यामध्ये उकळून पिवळा रंग तयार करू शकता.

2. गुलाबी रंग

गुलाबी रंग जास्तीत जास्त मुलींना जास्त आवडतो. गुलाबी रंग तयार करण्यासाठी तुम्ही बीटाचा वापर करू शकता. त्यासाठी बीटाची मुळं किंवा बीट पाण्यामध्ये उकळून घ्या, त्यानंतर ते गाळून त्यामध्ये दूध एकत्र करा.

3. नारंगी रंग

नारंगी रंग तयार करण्यासाठी तुम्ही केशर पाण्यामध्ये एकत्र करून रात्रभरासाठी तसचं ठेवा. लगेच नारंगी रंग तयार करायचा असेल तर केशर पाण्यामध्ये टाकून उकळून घ्या. जेव्हा पाणी थंड होइल त्याचा वापर रंग म्हणून करा.

4 ब्राउन कलर

कॉफी पावडरचा वापर करून ब्राउन रंग तयार करून शकता किंवा चहा पावडर पाण्यामध्ये उकळूनही तुम्ही ब्राउन रंग तयार करू शकता. पण लक्षात ठेवा हा रंग जात नाही. तुम्ही हा रंग तयार करण्यासाठी मुलतानी मातीचाही वापर करू शकता.

5. हिरवा रंग

हिरवा रंग तयार करण्यासाठी तुम्ही हलदीमध्ये नीळ एकत्र करू शकता. याव्यतिरिक्त पालक, धने, पुदिना, टॉमेटो किंवा कडुलिंबाची पानं वाटून पाण्यामध्ये एकत्र करा. तुम्ही हे कोरड्या रंगाच्या रूपामध्येही वापरू शकता.

6. निळा रंग

निळीचा वापर करून निळा रंग तयार करता येतो.

7. लाल रंग

कोरडा लाल रंग तयार करण्यासाठी लाल जास्वंदाच्या फूलाचा वापर करू शकता. त्यासाठी जास्वंदाच्य फूलाची पावडर पिठासोबत एकत्र करून तयार करा. त्याऐवजी गाजराला पाण्यामध्ये उकळून लाल रंग तयार करू शकता.

सर्दीमध्ये आपल्याला चेहऱ्याची जास्त काळजी घ्यावी लागते, कारण सर्दीत थंड वाहणारा वारा त्वचेला जास्त नुकसान पोहचवतो. या नैसर्गिक उपचार केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील चमक कायम राहील. तुमच्या त्वचेला सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे उपचार करु शकता.

सर्वात प्रथम चेहरा स्वच्छ करुन घ्या. चेहऱ्याला कपड्याने जोर लावून साफ करण्याची गरज नाही. चेहरा साफ करण्यासाठी क्लींजिंग ऑईलने किंवा फेस ऑईलचा वापर करा. यासाठी ओलिव्ह ऑईल, कॅस्टर ऑईल यांच एकत्र मिश्रण करुन गरम होईपर्यंत हातावर रगडून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर ओला कपडा करुन ओला त्या कपड्यातून पाणी काढून घ्या आणि चेहऱ्यावर ठेवा. थोड्या वेळाने कपडा बाजूला काढा. असे केल्यास त्वचेवरील चमक कायम राहते.

संत्र्याच्या सालदेखील चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते. संत्र्याच्या साल चांगले वाळवून त्याची पावडर तयार करुन घ्या. त्यानंतर ही पावडर साखरेच्या गरम पाण्यात मिसळून घ्या. तयार झालेली पेस्ट चेहऱ्य़ावर लावून ठेवा. १०-१५ मिनिटे झाल्यानंतर चेहरा धुवून घ्या. याने खराब त्वचा निघून जाते. या उपचारांमुळे आपण आपली त्वचा हिवाळ्यातही चांगली आणि टवटवीत राहू शकते.

The skin is a major organ. It protects the human body from coming in contact with germs, infections and microbes; it helps you feel sensations and also adjusts your body temperature. Keeping in mind the range of functions performed by this organ, you should take good care of it. A healthy diet and a few healthy habits can add an extra edge to your skin. Try to know about these seven fruits that successfully better your skin.

1. Pomegranate
Pomegranate juice can work wonders for your skin. It can heal lines and freckles on being used regularly. The fruit contains polyphenols that counter free radicals and increase blood flow. It makes your skin healthy through detoxification. Pomegranates can prevent as well as treat skin damages caused by ultraviolet rays of the sun. The peel of the fruit used along with seed oil encourages cell growth and hinders wrinkles naturally. It averts enzymes which break down collagen and make your skin look younger.

2. Bananas
Whether you like the taste of it or not, care to include this fruit in your beauty regime for its many benefits. It contains amino acids that are known to increase your skin elasticity. The fruit also contains Zinc and Potassium. While Zinc fights against bacterial infection and prevents Acne, Potassium hydrates a dehydrated skin. Do not throw away banana skins; the inside of a banana skin when rubbed on your face can make it glow.

3. Watermelon
This juicy, refreshing fruit refreshes your skin as well. It contains astringent that can naturally tone your skin. It revitalizes dull and boring skin. When you return home after a tiring day, it is best to cleanse your face with a refrigerated slice of this fruit. The red fruit controls signs of aging because of its carotene content. It is also known to prevent blisters on your skin when applied on a regular basis.


4. Papaya
Pigmentation is a serious problem that many of us suffer from. Treating the problem through medication works but daily skin care is also needed. Mashed papaya helps in smoothening rough skin. It makes your skin really supple. Many tend to develop wrinkles at an early age. This hampers confidence as you are constantly worried about the way you look. Applying papaya masks can actually control wrinkles.



5. Kiwi
Kiwi is known to contain omega- 3 fatty acids; these acids defend your skin from germs. They prevent you from horrible skin infections. However, the fruit prevents your skin from sagging. It is rich in Vitamin C which again helps in producing collagen. Kiwi checks the levels of sebum excretion reducing the chances of having a sticky face.

6. Oranges
If you are tired of the blackheads on your skin, you have a home remedy to deal with it. Oranges are brilliant in extracting blackheads. Orange juice is also known to lighten one's skin tone. It reduces blemishes and treats acne. Consuming the fruit or its juice regularly can give you a radiant skin.

7. Apples
You should wholeheartedly believe in the saying "an apple a day keeps the doctor away". Apples are good for your skin as they have a BLT effect. Apples brighten and lighten your skin. They provide protection against tanning. The fruit acts effectively on your skin by doing away with the pathogens and excess oils.

आई झाल्यावर भारतीय महिलांच्या सौंदर्यविषयक संकल्पनेत बदल होत असल्याचं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आलंय. 'मॉम्सप्रेसो'नं हे सौंदर्य सर्वेक्षण केलंय. या सर्वेक्षणात २५ ते ४५ अशा व्यापक वयोगटातील १११५ महिलांना समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यातील जवळपास ६७ टक्के महिलांनी आई झाल्यावर त्यांची सौंदर्यविषयक कल्पना पार बदलून गेल्याचे मान्य केले. याउलट बाह्य रूपापेक्षा आंतरिक स्वास्थ्याला त्या अधिक महत्त्व देत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. आई झाल्यावर भारतीय स्त्रीसाठी सौंदर्याची व्याख्या कशी बदलते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न मॉम्सप्रेसोनं केलाय.

मातृत्वाच्या आनंदासोबतच...

सौंदर्याच्या व्याख्येत बदल होण्यासाठीची महत्त्वाची कारणे म्हणजे स्वतःसाठी पुरेसा वेळ नसणे तसेच सतावणारी चेहऱ्याची आणि शरीराची चिंता... आई झाल्यावर दिवसभरात स्वतःच्या सौंदर्यासाठी घालवण्याच्या वेळेत ५०% पर्यंतची घट होत असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. मातृत्व प्राप्तीनंतर केस गळणे, पोट सुटणे, स्ट्रेच मार्क्स आणि ओघळलेले स्तन या शारीरिक चिंता त्यांना सर्वाधिक सतावत असतात.

बहुतांशी भारतीय मातांना तरुण दिसण्याचे दडपण नसते पण त्वचेचा असमान रंग, सुरकुत्या आणि काळे डाग यांची चिंता त्यांना सतावत असते. अनेक उत्पादने वापरल्यास पुढे जाता ते त्यांच्या सौंदर्यासाठी हानिकारक ठरू शकत असल्याची भीती असल्यामुळे शक्यतो त्या घरगुती इलाज करणे पसंत करतात.

सौंदर्याच्या बदलत्या व्याख्या...

५०% महिलांना असे वाटते की सौंदर्य हे उपजत असते आणि त्यात मागाहून फारसे काहीही करता येत नाही... तर ७०% महिलांना वाटते की, योग्य सौदर्य प्रसाधने वापरुन रूप खूप आकर्षक करता येऊ शकते. दुसरीकडे, या सर्वेक्षणात असंही दिसून आलं की, प्रत्यक्षात ९०% महिला मोठ्या प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरण्याच्या विरोधात आहेत. कारण त्यांना वाटते की, त्यामुळे पुढे जाता त्यांच्या सौंदर्याची हानी होऊ शकते व त्यामुळे ४ पैंकी ३ महिला घरगुती उपचार करणे पसंत करतात.

महिला सौंदर्याबद्दल प्रत्यक्षात काय विचार करतात आणि त्यांच्या रूपाशी निगडीत अडचणी याबाबतची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मॉम्सप्रेसोनं हे सर्वेक्षण केलंय. 'महिला मातृत्वानंतर सौदर्याबाबत किती आश्चर्यकारकरित्या वेगळा विचार करतात... मुले लहान असताना वेळ ही मुख्य अडचण असते पण व्यापकदृष्ट्या महिला सौंदर्याबाबत कसा विचार करू लागतात, हे जाणून घेणं वेगळाच अनुभव होता... त्या आता बाह्य रूपापेक्षा आंतरिक स्वास्थ्याला जास्त महत्त्व देतात' असं मॉम्सप्रेसोच्या मुख्य संपादक पारुल ओहरी यांनी म्हटलंय.

Dr. Vinay Shankar Gupta
Dr. Vinay Shankar Gupta
MS - Allopathy, Dermatologist Family Physician, 40 yrs, Shimla
Dr. Jayashree Mahajan
Dr. Jayashree Mahajan
BDS, 13 yrs, Pune
Dr. Rupesh Khandelwal
Dr. Rupesh Khandelwal
BDS, Dentist, 14 yrs, Pune
Dr. Himashree Wankhede
Dr. Himashree Wankhede
MBBS, Ophthalmologist Cataract surgeon, 5 yrs, Pune
Dr. S K  Toke
Dr. S K Toke
DNB, Pulmonologist General Physician, 11 yrs, Pune
Hellodox
x