Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

When it comes to skin and hair care, natural oils can prove to be quite beneficial. If you wish to have a soft, supple and nourished skin, then natural oils can do wonders as they have their own unique set of skin benefitting properties. Rice bran oil is used as a dressing in salads. It is not only great for cooking but is also widely used as a natural skin care product. It is quite rich in various vitamins, minerals and antioxidants. Rice bran is the outer layer of rice grain. According to Bangalore-based nutritionist Dr. Anju Sood, "Rice bran oil has the right amount of poly unsaturated fatty acids in it. Apart from this, it also has flavonoids present which can do wonders for skin and hair health." Here's a list of 5 benefits that rice bran oil has to offer. Read on to know more about them.
1. Nourishes Hair:

Rice bran oil is rich in omega 3 and 6 fatty acids which help nourish the hair. If you happen to have frizzy hair, then bring this oil to your rescue as regular use of this use oil could possibly make your hair thicker and easily manageable. To reap its benefits, massage your hair using this oil before hair wash. It will keep your hair follicles healthy.
2. Protects Skin From UV Rays:

Take 2 drops of rice bran oil and gently massage it over your face until it is fully absorbed. This oil will protect your skin from pollution and also act as a natural sun screen
3. Acts As A Makeup Remover:

The natural antioxidants present in the rice bran oil could also help you get rid of excessive makeup, making your skin look supple and soft. It is an excellent source of vitamin E which has the tendency to penetrate deep into your skin's layers.
4. Prevents Early Hair Greying:

The antioxidants present in the oil not only provide skin nourishment but also help in keeping the skin young. It prevents early signs of hair greying. Use warm rice bran oil and massage your hair twice a week. To make the most of it, add 2-3 drops of this oil to your shampoo as well.

बदलती जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनात स्वत:ला फिट ठेवणं, आपल्या त्वचेची, चेहऱ्याची, आरोग्याची काळजी घेणं कठीण होतं. बाजारात चेहऱ्याची, डोळ्यांची सुंदरता वाढवण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. मेकअपने डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळं काही वेळासाठी झाकली जाऊ शकतात. परंतु काळी वर्तुळे घालवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात.

डोळ्यांखाली का होतात काळी वर्तुळं -
- प्रमाणापेक्षा अधिक तणावात राहणं
- तणावामुळे झोप पूर्ण न होणं
- कंम्प्युटर, मोबाईलवर अधिक वेळ घालवणं
- संतुलित आहार न घेणं
- शरीरात आर्यनची कमतरता
- आनुवंशिकता
- शरीरात हार्मोनचं असंतुलन
- मद्यपान, धुम्रपान सेवन
- कमी पाणी पिणं

डोळ्याखाली काळी वर्तुळं होण्यामागे या शक्यता, काही कारणं असू शकतात.

डार्क सर्कल कोणत्याही कारणाने झाले तरी, काही घरगुती उपाय करुन त्यांचं प्रमाण कमी करुन घालवले जाऊ शकतात. दररोज हे उपाय केल्यानंतर याचा फरक जाणवू शकतो.

कच्चा बटाटा -
कच्च्या बटाट्याचे काप किंवा बटाट्याचा रस दररोज डोळ्यांखाली लावल्याने फायदा होऊ शकतो. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.

कच्चा टोमॅटो -
कच्चा टोमॅटो किंवा टोमॅटोचा रस डोळ्यांखाली लावल्याने फायदा होऊ शकतो. संपूर्ण चेहऱ्यावरही टोमॅटो लावू शकता. यामुळे चेहरा चमकदार आणि काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होऊ शकते.

लिंबू -
लिंबाचा रस कापसाने डोळ्यांखाली लावल्याने, हळू-हळू फरक जाणवू शकतो.

बदाम तेल किंवा नारळाचं तेल -
रोज रात्री नारळाच्या किंवा बदामाच्या तेलाचे काही थेंब डोळ्यांखाली लावून मसाज केल्याने फायदा होऊ शकतो.

पाणी -
दिवसभरात २ ते ३ लीटर पाणी पिण्यानेही फरक पडू शकतो. आहारात ताज्या फळांच्या रसाचा समावेश करु शकता.

धूळ, प्रदूषण, ताण-तणाव आणि इतर शारीरिक कारणं याचा थेट परिणाम चेहऱ्यावर होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले डाग, ब्लॅक स्पॉट घालवण्याच्या नादात अनेक जण अनेक प्रकारच्या क्रिम, फेस वॉश, सनस्क्रिन लावतात. पण या सगळ्यामुळेही चेहऱ्यावर अॅलर्जी, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. निस्तेज त्वचा, दाग-धब्बे घालण्यासाठी काही घरगुती, सोप्या उपायांचाही फायदा होऊ शकतो.

पपई -
त्वचा उत्तम राखण्यासाठी पपई अतिशय गुणकारी आहे. पपईमध्ये पपीन नावाचं तत्व असतं जे त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्याचं काम करतं. पपईचा गर बारीक करुन त्यात एक चमचा मध मिसळून त्याची पेस्ट तयार करा. त्वचा ड्राय असल्यास त्यात मिल्क-क्रीमही मिसळू शकता. ऑयली त्वचा असणारे या पेस्टमध्ये अर्धा चमचा लिंबू रस टाकू शकता. हे मिश्रण दररोज लावल्याने चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

कोरफड -
त्वचा आणि चेहऱ्याची सुंदरता कायम राखण्यासाठी कोरफड रामबाण मानलं जातं. कोरफड Black spots Removal क्रिम म्हणून काम करतं. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ईचं तेल आणि लिंबू रस मिळवून ती पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने डाग जाण्यास मदत होते.



पाणी -
दिवसभरात शरीरासाठी लागणारं पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होते. पाणी त्वचेचं सौदर्य राखण्यास, त्वचा चमकदार, ग्लोइंग करण्यास मदत करतं. परंतु पाणी पिताना शुद्ध पाणीचं प्यावे. त्यात अल्कोहोल, कार्बोनेटेड ड्रिंक्स मिसळू नये. दररोजच्या रुटीनमध्ये पाण्यासह विविध फळांचे रसही सामिल करु शकता.

ताक -
ताक पिणं त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. ताकात लॅक्टिक अॅसिड आढळतं. जे चेहऱ्यावर येणारे डाग-धब्बे हटवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, त्या ठिकाणी कापसाने ताक लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

दही-लिंबू -
त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी लिंबू अतिशय उत्तम स्त्रोत मानला जातो. लिंबूमध्ये सी व्हिटॅमिन आणि लॅक्टिक अॅसिड असतं. लिंबू रसात दही मिसळून ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहरा चमकदार होण्यास मदत होऊ शकते. दही आणि लिंबूच्या पेस्टमध्ये थोडी साखर टाकून ती लावल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन हटवून चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

या घरगुती उपायांच्या वापराने त्वचेचं आरोग्य राखण्यास आणि हानिकारक रासायनिक क्रिमपासून चेहऱ्याचं रक्षण करता येईल.

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लहान मोठे आजार उद्भवतात. लहान मोठ्या स्वरूपाचं दुखणं असेल तर सहाजिकच डॉक्टरांकडे न जाता सुरूवातीला केवळ नैसर्गिक आणि घरगुती उपाय केले जातात.आजारपणाप्रमाणेच चेहर्‍यावरील डाग, अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठीही घरगुती उपाय केले जातात. पण असे काही पदार्थ ज्यांचा वापर चेहऱ्यावर केल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.

मेयॉनीज -
त्वचेतील मॉईश्चरायझर टिकून राहण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या मॉईश्चरायझरचाच वापर करा. कारण मेयॉनीझचा वापर केल्यास त्वचेतील छिद्र क्लॉग होऊ शकतात. परिणामी अ‍ॅक्नेचा त्रास वाढू शकतात.

कच्ची अंडी -
अंड्याचा मास्क बनवून चेहर्‍यावर लावल्यास पोअर्स टाईट होण्यास मदत होते. तसेच अनावश्यक केस काढले जातात. असा सल्ला अनेक ठिकाणी वाचायला, बघायला मिळतो. पण अंड्यातील बॅक्टेरियांचे प्रमाण फूड पॉयझनिंग करण्यास कारणीभूत ठरते. परिणामी त्यामुळे त्रासदेखील होऊ शकतो.

लिंबाचा रस -
लिंबाचा रस टॅनिंग कमी करण्यासाठी, डाग कमी करण्यासाठी वापरा असा सल्ला दिला जातो. परंतू त्यामधील अ‍ॅसिडीक घटक त्वचेचे नुकसान करू शकतात. अनेकदा फेस पॅकमध्येही लिंबाचा रस असल्यास त्वचेमध्ये जळजळ जाणवते.

दालचिनी -
मसाल्याचा वापर करून अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येतं असा सल्ला दिला जातो. पण दालचिनीमुळे त्वचेतील जळजळ वाढते.

रोजच्या कामाचा ताण, नैराश्य, नोकरी, ट्रफिक आणि आपली सतत बदलती जीवनशैली याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यात चेहऱ्याचे सौंदर्य कायम ठेवणं हे एक मोठं आव्हान प्रत्येकासमोर असतं. त्याचप्रमाणे व्यस्त वेळापत्रकामुळे पार्ललमध्ये जाणं देखील होत नाही. त्यासाठी कॉफी एकमात्र उपाय आहे. कॉफीने तुम्ही घरबसल्या फेशिअल करून तुमचा चेहरा आणखी उजळू शकता.

त्वचेला अधिक उजाळा देण्यासाठी कॉफी हा पदार्थ अतिशय महत्वाचे काम करतो. त्वचेस तजेलदार करण्यास तसेच चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी देखील हे अतिशय फायदेशीर ठरते.

तजेलदार स्किनसाठी २ चमचा कॉफी पावडर, १ चमचा साखर आणि अर्धा चमचा नारळाचं तेल हे तिन्ही पदार्थ अगोदर एकत्रीत करून त्याचे मिश्रण बनवा. तयार मिश्रणाला चेहऱ्यावर लावून ५ ते १० मिनिटे ठेवा. या मिश्रणाला हलक्या हातांनी स्क्रब करा आणि स्वच्छ पाण्यात चेहरा धुवा.

Dr. Hitendra Ahirrao
Dr. Hitendra Ahirrao
BAMS, Family Physician General Physician, Pune
Dr. Anjali Bartakke
Dr. Anjali Bartakke
DNB, Pediatrician, 18 yrs, Pune
Dr. Manish Pathak
Dr. Manish Pathak
MDS, Dentist Periodontist, 10 yrs, Pune
Dr. Sanjeev Sambhus
Dr. Sanjeev Sambhus
BAMS, Family Physician Physician, 34 yrs, Pune
Dr. Vishakha  Bhalerao
Dr. Vishakha Bhalerao
BHMS, Homeopath Family Physician, 17 yrs, Pune
Hellodox
x