Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

अनेकदा वातावरण, हंगाम बदलल्याने काही लोकांच्या हाताची त्वचा निघू लागते. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास ही समस्या गंभीर रुप धारण करु शकते. हाताची त्वचा निघाल्याने काही वेदना होत नाहीत पण काम करताना थोडा त्रास होतो. पण काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. पाहुया कोणते आहेत ते घरगुती उपाय...

गरम पाणी
रोज १० मिनिटे हात गरम पाण्यात बुडवून ठेवा. या गरम पाण्यात तुम्ही मध आणि लिंबू देखील घालू शकता. त्यामुळे हाताची त्वचा नरम होईल आणि त्वचा शुष्क होणे बंद होईल.

व्हिटॉमिन ई युक्त तेल
स्किन पीलिंगपासून सुटका मिळवण्यासाठी व्हिटॉमिन ई युक्त तेल उपयुक्त ठरते. म्हणून रोज या तेलाने हातांना मालिश करा. आराम मिळेल.


ओट्स
एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात ओट्स भिजत घाला. काही वेळानंतर ओट्स नरम पडतील. तेव्हा त्यात १०-१५ मिनिटे हात बुडवून ठेवा. त्यानंतर हात पाण्याने स्वच्छ करा आणि त्यावर मॉश्चराईजर लावा.

कोरफड जेल
रोज झोपण्यापूर्वी हातांना कोरफड जेलने मालिश करा. सकाळी उठल्यावर हात कोमट पाण्याने धुवा आणि मग त्यावर मॉश्चराईजर लावा.

पुदीना म्हटलं की त्याचा पहिल्यांदा त्याचा गंध आठवतो आणि मग त्याची चटपटीत चटणी लक्षात येते. पुदीना आरोग्यदायी असून अनेक ड्रिंक्समध्ये त्याचा वापर केला जातो. पोटाला थंडावा देण्यासाठी पुदीना गुणकारी ठरतो.

पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी, तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी पुदीना उपयुक्त ठरतो. पण पुदीना फक्त आरोग्यदायी आहे असे नाही तर तो सौंदर्यवर्धकही आहे.

त्वचेसाठी लाभदायी असलेला पुदीना नेमका कसा वापरावा, पाहुया...

# पुदीन्यात मिंथॉल आणि अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. पिंपल्स, रॅश, घामोळ्या, सनबर्न यांसारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी पुदीन्याची पाने उपयुक्त ठरतात.

# मुलतानी माती देखील त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्वचेतील ऑईल नियंत्रित करून त्वचा स्वच्छ करण्याचे काम मुलतानी माती करते. मुलतानी मातीत पुदीन्याची पान्यांची पेस्ट, मध, दही घालून त्वचेवर लावा. २० मिनिटांनंतर चेहरा धुवा. त्यानंतर त्वचेवर मॉईश्चरायजर लावा. तेलकट त्वचेचा त्रास कमी होईल.

# त्वचेची पीएच लेव्हल सुरळीत ठेवण्यासाठी, अतिरिक्त ऑईल नियंत्रित करण्यासाठी गुलाबपाणी फायदेशीर ठरते. त्यामुळे पुदीन्याची पाने, मध आणि गुलाबपाणी एकत्र मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. त्वचा मुलायम होईल व हायड्रेट राहिल.

पूर्वी उन्हातून आलेल्यांना गूळ पाणी देण्याची प्रथा होती. चहामध्येही गूळाचा समावेश केलेला असे. आजकाल आपल्या आहारात गूळाचा समावेश अगदीच सीमीत स्वरूपात झाला आहे. मात्र केवळ आरोग्यासाठी नव्हे तर त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील गूळाचा आहारात समावेश करणं हितकारी आहे.

गूळामुळे कसे खुलते सौंदर्य ?

अ‍ॅक्नेवर परिणामकारक :

अ‍ॅक्नेचा त्रास, चेहर्‍यावरील काळे डाग, पिंपल्स यांचा त्रास दूर करण्यासाठी गूळ फायदेशीर आहे. आहाराप्रमाणेच फेसपॅकमध्येही गूळाचा समावेश करता येऊ शकतो. गूळाच्या फेसपॅकसाठी चमचाभर गूळ, चमचाभर टोमॅटोचा रस, अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमुटभर हळद व ग्रीन टी मिसळा. हा फेसपॅक 15 मिनिटं चेहर्‍यावर लावा. त्यानंतर तोंड थंड पाण्याने स्वच्छ धुवावे.

त्वचेवर सुरकुत्या -

जसे वय वाढतं तसे चेहर्‍यावर अकाली सुरकुत्या पडण्याचं प्रमाणही वाढतं. गूळामधील अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक शरीरात फ्री रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात. नियमित गूळ खाल्ल्याने सुरकुत्या कमी होतात.

केसांचं आरोग्य खुलते -

गूळामुळे चेहर्‍यासोबतच केसांचेही आरोग्य खुलते. गूळात मुलतानी माती, दही, पाणी मिसळून पॅक बनवा. हा पॅक केसांवर लावल्यानंतर तासाभराने स्वच्छ धुवाव. यामुळे केस घनदाट आणि मुलायम होतात.

त्वचा खुलते -

गूळामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन घटक मुबलक असतात. हे नॅचरल क्लिंजरप्रमाणे काम करतात. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणं याचा परिणाम चेहर्‍यावर दिसतो. पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्यासोबत गूळाचा खडा खाल्ल्यास किंवा चहामध्येही साखरेऐवजी गूळ वापरावा.

रक्त साफ होते -

रक्त साफ असल्यास त्वचाविकार वाढत नाहीत. गूळामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. अ‍ॅनिमियाचा त्रास कमी करण्यासही त्याची मदत होते. मधुमेही आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गूळाचा आहारत किती प्रमाणात समावेश करावा हे ठरवावे.

चेहरा हा मनाचा आरसा असतो, असे म्हटले जाते. मनातील भाव चेहऱ्यावर उमटतात. त्याचबरोबर सौंदर्याचे प्रमुख अंग म्हणजे चेहरा. म्हणून सौंदर्य खुलवण्यासाठी आपण महागडे प्रॉडक्ट्स वापरतो, ट्रिटमेंट्स घेतो. पण आजकालच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण जीवनशैलीचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यामुळे चेहरा दिवसातून दोनदा धुणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते आणि त्वचाही चांगली राहते. पाहुया दिवसातून दोनदा चेहरा धुण्याचे फायदे...

आर्द्रता टिकून राहण्यास मदत
नियमित त्वचा स्वच्छ केल्याने त्वचा चांगली राहण्यास मदत होते. त्वचा मऊ, चमकदार होते, त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते.

मृत त्वचा निघून जाते
फेसवॉश केल्याने चेहऱ्यावरील धूळ, माती, घाण, तेलकटपणा निघून जातो. त्याचबरोबर मृत पेशीही दूर होतात. त्यामुळे चेहरा उजळ, फ्रेश दिसतो.


तरुण दिसण्यासाठी
योग्य पद्धतीने चेहरा धुतल्याने त्यावरील अनावश्यक घटक दूर होतात. त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते. परिणामी त्वचेतील आर्द्रता टिकून राहते आणि तुम्ही तरुण दिसता.

रक्ताभिसरण सुधारते
चेहरा धुताना आपण फेसवॉश लावून चेहऱ्यावर काही वेळ हात गोलाकार पद्धतीने फिरवतो. त्यामुळे नकळत मसाज केल्यासारखे होते. परिणामी पेशी कार्यरत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचेवर चमक येते.

मीठाशिवाय आपण जेवणचा विचारही करू शकत नाही. मात्र मीठ आहरात चव वाढवण्याचं काम करत नाही तर त्याचा आरोग्यदायी फायद्यांसाठीही अनेकप्रकारे वापर करता येऊ शकतो. सौंदर्य खुलवण्यासाठीही मीठ अत्यंत फायदेशीर आहे.

चेहर्‍यासाठी फायदेशीर मीठ
मीठामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. यामुळे चेहरा तजेलदार होतो. उन्हाळ्यात त्वचेवर मृत पेशी साचून राहण्याचं प्रमाण अधिक असतं. अशावेळेस डेड स्कीनचा थर नैसर्गिकरित्या हटवण्यासाठी मीठ अत्यंत फायदेशीर आहे.

घरगुती स्क्रब -
मीठामध्ये ऑलिव्ह ऑईल, लॅव्हेंडर ऑईल, बदामाचं तेल मिसळा. या स्क्रबरने चेहरा स्वच्छ केल्यास मृत पेशींचा थर निघून जाण्यास मदत होते.


व्हिटॅमिन्सच्या कमीमुळे अनेकदा नखं कमजोर होतात. अशावेळेस चमचाभर मीठामध्ये, चमचाभर लिंबाचा रस, चमचाभर बेकिंग सोडा आणि कपभर कोमट पाणी मिसळा. ही पेस्ट नखांवर लावल्यास ते मजबूत आणि चमकदार होतात.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी एक चमचा मीठ, दोन चमचा बेकिंग पावडर मिसळा. ही पेस्ट टुथब्रशवर घेऊन लावा. यामुळे दात स्वच्छ होतात.

Dr. Sandeep Sandbhor
Dr. Sandeep Sandbhor
MS/MD - Ayurveda, General Medicine Physician, 16 yrs, Pune
Dr. S K  Toke
Dr. S K Toke
DNB, Pulmonologist General Physician, 11 yrs, Pune
Dr. Rajesh  Tayade
Dr. Rajesh Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Reshma P. Ransing
Dr. Reshma P. Ransing
BHMS, Family Physician, Pune
Dr. Akshay Biyani
Dr. Akshay Biyani
BDS, Dentist Root canal Specialist, 10 yrs, Pune
Hellodox
x