Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी घरगुती उपाय
#डोळ्याखालील वर्तुळे#घरगुती उपचार#स्किनकेअर

बदलती जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनात स्वत:ला फिट ठेवणं, आपल्या त्वचेची, चेहऱ्याची, आरोग्याची काळजी घेणं कठीण होतं. बाजारात चेहऱ्याची, डोळ्यांची सुंदरता वाढवण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. मेकअपने डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळं काही वेळासाठी झाकली जाऊ शकतात. परंतु काळी वर्तुळे घालवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात.

डोळ्यांखाली का होतात काळी वर्तुळं -
- प्रमाणापेक्षा अधिक तणावात राहणं
- तणावामुळे झोप पूर्ण न होणं
- कंम्प्युटर, मोबाईलवर अधिक वेळ घालवणं
- संतुलित आहार न घेणं
- शरीरात आर्यनची कमतरता
- आनुवंशिकता
- शरीरात हार्मोनचं असंतुलन
- मद्यपान, धुम्रपान सेवन
- कमी पाणी पिणं

डोळ्याखाली काळी वर्तुळं होण्यामागे या शक्यता, काही कारणं असू शकतात.

डार्क सर्कल कोणत्याही कारणाने झाले तरी, काही घरगुती उपाय करुन त्यांचं प्रमाण कमी करुन घालवले जाऊ शकतात. दररोज हे उपाय केल्यानंतर याचा फरक जाणवू शकतो.

कच्चा बटाटा -
कच्च्या बटाट्याचे काप किंवा बटाट्याचा रस दररोज डोळ्यांखाली लावल्याने फायदा होऊ शकतो. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.

कच्चा टोमॅटो -
कच्चा टोमॅटो किंवा टोमॅटोचा रस डोळ्यांखाली लावल्याने फायदा होऊ शकतो. संपूर्ण चेहऱ्यावरही टोमॅटो लावू शकता. यामुळे चेहरा चमकदार आणि काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होऊ शकते.

लिंबू -
लिंबाचा रस कापसाने डोळ्यांखाली लावल्याने, हळू-हळू फरक जाणवू शकतो.

बदाम तेल किंवा नारळाचं तेल -
रोज रात्री नारळाच्या किंवा बदामाच्या तेलाचे काही थेंब डोळ्यांखाली लावून मसाज केल्याने फायदा होऊ शकतो.

पाणी -
दिवसभरात २ ते ३ लीटर पाणी पिण्यानेही फरक पडू शकतो. आहारात ताज्या फळांच्या रसाचा समावेश करु शकता.

Dr. Sanjeev Parmar
Dr. Sanjeev Parmar
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 16 yrs, Pune
Dr. Dr Anirudha Vaidya
Dr. Dr Anirudha Vaidya
MPTh, Neuro Physiotherapist Obesity Specialist, 7 yrs, Pune
Dr. Smita Darshankar
Dr. Smita Darshankar
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Dr. Rajendra Lahore
Dr. Rajendra Lahore
MS/MD - Ayurveda, Ophthalmologist, 11 yrs, Pune
Dr. Sumit Patil
Dr. Sumit Patil
BAMS, Family Physician General Physician, 15 yrs, Pune