Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

अनेक मुली चेहर्‍यावरील अनावश्यक केस ब्राऊन करण्यासाठी, टॅनिंग, डार्क स्पॉट, चेहर्‍यावरील डाग दूर करण्यासाठी ब्लिचिंग करतात. ब्लिचिंगमुळे चेहर्‍यावरील छुपी घाण, प्रदुषणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत होते.

ब्लिचिंगमध्ये केमिकल घटक अधिक असतात. अनेकदा संवेदनशील त्वचेला त्यामुळे नुकसान होऊ शकते. काहींना जळजळ जाणवते. ब्लिचमुळे तुमच्या त्वचेवरही जळजळ होत असल्यास काही खास टीप्स लक्षात ठेवा.

1. ब्लिच करण्यापूर्वी त्याची पॅचटेस्ट नक्की करून घ्या. थेट त्वचेवर लावण्याआधी हातावर त्याची पॅच टेस्ट करा. जर जळजळ जाणवल्यास त्याचा वापर करण्यासाठि योग्य तज्ञांचा सल्ला घ्या.
त्रास टाळण्यासाठी बाजारात अनेक हर्बल, लाईट अमोनियायुक्त ब्लिचचा वापर करा.


2. अनेकदा बाजारात शरीरासाठी आणि चेहर्‍यासाठी वेगवेगळे ब्लिच उपलब्ध असतात. मात्र मुली ते विकत घेताना पुरेशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे दोघांमधील फरक न समजल्याने, चूकीच्या ब्लीचची निवड केल्याने त्रास होऊ शकतो.

3. ब्लिच करण्यापूर्वी चेहर्‍यावर बर्फाचा मसाज करणं फायदेशीर आहे. 2-3 मिनिटं बर्फाचा मसाज केल्याने चेहर्‍याला होणारा त्रास कमी होतो.

4. अमोनिया फ्री ब्लिचमुळे त्वचेला नुकसान होत नाही. त्याचा वापर केल्याने त्वचेवर लालसरपणा वाढणं, खाज येणं, अ‍ॅलर्जीचा धोकाही कमी होतो.

नितळ, तजेलदार त्वचा कोणाला नको असते. पण धूळ, प्रदूषण, तणावग्रस्त जीवनशैली यामुळे चेहऱ्यावरील तेज गायब होऊ लागते. तसंच यामुळे ओपन पोर्सची समस्या उद्भवते. तेलकट त्वचा असणाऱ्यांना हा त्रास अधिक संभवतो. वयानुसार हे पोर्स देखील वाढू लागतात. त्यामुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते. तुम्हालाही या समस्येमुळे त्रस्त असाल तर हे काही घरगुती उपाय करुन पाहा...

केळं

केळं खाण्याचे तर अनेक फायदे तुम्हाला ठाऊक असतील. पण तुम्हाला माहित आहे का? की त्वचेसाठी देखील केळं खूप फायदेशीर आहे. केळ्यामुळे त्वचेतील डॅमेज टिश्यूज दूर होऊन त्वचा ग्लो होण्यास मदत होते. आठवड्यातून दोनदा केळं मॅश करुन लावल्याने त्वचेवरील ओपन पोर्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

काकडी आणि लिंबू

ओपन पोर्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काकडी आणि लिंबाचा वापर तुम्ही करु शकता. यासाठी काकडीच्या रसात लिंबाचा रस मिसळून लावा. असे नियमित केल्यास स्किन पोर्स टाईट होण्यास मदत होईल.


दूध आणि ओट्स

दूध आणि ओट्सचा पॅक बनवण्यासाठी २ चमचे ओट्समध्ये चमचाभर गुलाबपाणी आणि १ चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे ओपन पोर्सची समस्या तर दूर होईलच पण चेहऱ्यावरील डाग दूर होण्यासही मदत होईल.

आपल्या नेहमीच्या धावपळीत त्वचेशी निगडीत अनेक समस्या वाढतात. अ‍ॅक्ने, त्वचा काळवंडणे, ब्रेकआऊट्स अशा अनेक लहान सहान समस्यांवर प्रत्येकवेळीच ब्युटीपार्लरमध्ये ट्रीटमेंट घेणं शक्य नसतं. अशावेळेस काही नैसर्गिक उपायांनी त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते. रक्तचंदन हा आयुर्वेदातील असाच एक उपाय आहे. पावडर किंवा काडीच्या स्वरूपात रक्तचंदन बाजारात उपलब्ध असतं. त्वचेचं आरोग्य खुलवण्यासाठी रक्तचंदन फायदेशीर आहे.

कसा कराल रक्तचंदनाचा समावेश
रक्तचंदन आणि लिंबू
1 टेबलस्पून रक्तचंदनामध्ये लिंबाचे काही थेंब मिसळा. हा पॅक चेहर्‍यावर नीट पसरवून लावा. सुमारे 15-20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.

तेलकट त्वचा असणार्‍यांमधील समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी रक्तचंदन फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवरील पोअर्स टाईट होण्यास मदत होईल. तसेच अतिरिक्त सेबम आटोक्यात ठेवण्यास मदत होते.


रक्तचंदन, हळद, मधाचा पॅक
रक्तचंदन काडीच्या स्वरूपात असल्यास ते गुलाबपाण्यामध्ये उगाळा. यामध्ये चमचाभर मध, हळद मिसळा.

रक्तचंदनाचा हा पॅक चेहर्‍यावर लावा. नैसर्गिकरित्या पॅक पूर्णपणे सुकल्यानंतर कोमट पाण्याने तो स्वच्छ धुवावा.

या रक्तचंदनाच्या पॅकमुळे पिंपल्समुळे चेहर्‍यावर पडणारे डाग, अ‍ॅक्ने कमी होण्यास मदत होते. यामधील थंडावा चेहर्‍याच्या त्वचेतील दाह कमी करण्यास मदत होते.

रक्तचंदन आणि दही
चमचाभर रक्तचंदनाच्या पावडरमध्ये दही आणि हळद मिसळा. हा फेसपॅक चेहर्‍यावर लावा काही मिनिटांनी स्वच्छ धुवावा. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक लावल्याने चेहर्‍यावरील अनेक समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.

पिग़मेंटेशन, त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी, स्कीन टोन सुधारण्यासाठी हा पॅक फायदेशीर आहे.

सौंदर्य खुलवण्यासाठी मध हे अत्यंत फायदेशीर आहे. मध आरोग्याला जितके फायदेशीर आहे तितकेच ते सौंदर्य खुलवण्यासाठीही मदत करते. घरगुती उपायांनी सौंदर्य खुलवण्यास प्रयत्न करत असल्यास मधासोबत हे काही पदार्थ मिसळून चेहर्‍यावर त्याचा उपयोग करावा.

मध आणि हळद -

हळद आणि मध दोन्हींमध्ये अ‍ॅन्टी सेप्टिक गुणधर्म आहेत. यामुळे चेहर्‍यावरील अ‍ॅक्नेचा त्रास कमी होण्यास मदत होते. हळद आणि मधाचा फेसपॅक चेहर्‍यावर लावल्यानंतर 20 मिनिटांनी स्वच्छ धुवावा. आठवड्यातून दोन वेळेस हा फेसपॅक लावल्याने अ‍ॅक्नेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

मध आणि ओटमील -

ओट्स चेहर्‍यावरील डाग कमी करण्यास मदत करतात. अर्धा कप शिजवलेले ओट्स आणि 2 चमचे मध एकत्र करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. अर्धा तासानंतर हा फेसपॅक कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.

मध आणि व्हिनेगर -

मधासोबत अ‍ॅपल सायडर व्हिनेगर एकत्र मिसळणं फायदेशीर आहे. हे दोन्ही अ‍ॅसिडीक प्रकृतीचे आहेत. यामुळे त्वचेतील pH पातळी जपण्यास मदत होते. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण चेहर्‍यावर लावावे. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.

मध आणि लिंबू -

मधामध्ये लिंबाचा रस मिसळणं फायदेशीर आहे. यामधील अ‍ॅन्टि ऑक्सिडंट घटक, व्हिटॅमिन सी घटक अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यास मदत करतात. मध आणि लिंबाच्या रसाचा पॅक चेहर्‍यावर लावल्यानंतर 10मिनिटांनी चे
हरा गरम पाण्याने स्वच्छ धुवावा.

मध आणि नारळाचं तेल -

नारळाच्या तेलामध्ये मध मिसळा. या मिश्रणामुळे एक्झिमा, सोयरासिससारख्या आजारांचा धोका कमी होतो. यामुळे अ‍ॅक्नेचा त्रास कमी होतो. 15 मिनिटांनंतर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवावा.

आजकालच्या तणावग्रस्त होत असलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यासोबतच सौंदर्यही खराब होत आहे. प्रामुख्याने तेलकट आणि संवेदनशील त्वचेच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागते. ऋतूमानानुसार होणार्‍या बदलाप्रमाणे त्यांच्या ब्युटी रूटीनमध्येही बदल करणं आवश्यक आहे. चेहरा खुलवण्यासाठी मध अत्यंत फायदेशीर आहे. मधामुळे चेहरा नैसर्गिकरित्या खुलण्यास मदत होते.

त्वचा मुलायम होते -
चमचाभर लिंबाच्या रसामध्ये मध मिसळा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. 20 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. आठवड्यातून एकदा या पेस्टचा वापर केल्यास हळूहळू त्रास कमी होण्यास मदत होते.

त्वचेला उजाळा -
शुष्क त्वचा पुन्हा तजेलदार करण्यासाठी चमचाभर दूध पावडर, चमचाभर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आणि मध मिसळून त्वचेवर 10 मिनिटं लावावे.
या पेस्टचा वापर त्वचेवरही परिणामकारक आहे. आठवड्याभरात त्वचा तजेलदार होण्यासाठी मदत होते.


तेलकट त्वचेसाठी
दोन चमचे ऑलिव्ह ऑलिव्हमध्ये एक लहान चमचा मध मिसळा. 5 मिनिटं हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवाव. त्यानंतर मॉईश्चरायझर क्रीम लावावे. आठवड्यात नियमित दोन वेळेस हा उपाय केल्याने तेलकट त्वचा खुलण्यास मदत होते.

चमकदार त्वचा -
टोमॅटोच्या रसासोबत अर्धा चमचा मध मिसळा. ही पेट चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचा चमकदारहोण्यास मदत होते.

Dr. Kusum Garudkar
Dr. Kusum Garudkar
MS/MD - Ayurveda, Family Physician Ayurveda, 23 yrs, Pune
Dr. Urmila Kauthale
Dr. Urmila Kauthale
BAMS, Ayurveda, 7 yrs, Pune
Dr. Deelip Janugade
Dr. Deelip Janugade
BAMS, Family Physician General Physician, 31 yrs, Pune
Dr. Suchita Tupdauru
Dr. Suchita Tupdauru
BSMS, Homeopath, 18 yrs, Pune
Dr. Dhananjay Ostawal
Dr. Dhananjay Ostawal
BHMS, General Physician, 34 yrs, Pune
Hellodox
x