Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

काही वर्षांपूर्वींपर्यंत ऑलिव्ह ऑईल आपल्यासाठी एक्झॉटीक पदार्थांपैंकी एक होते. मात्र आता ऑलिव्ह ऑईलचे आरोग्यदायी फायदे जाणून घेतल्यानंतर त्याचा आहारातील समावेश वाढला आहे. आहारात जसा समावेश करणं फयाद्याचे आहे तसेच त्याचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठीही केला जातो.

ऑलिव्ह ऑईलमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. सोबतच त्यामध्ये मिनरल्स, नॅचरल फॅटी अ‍ॅसिड असतात. यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते..अकाली सुरकुत्या पडण्यापासून त्वचेचे रक्षण होते.

मुलायम त्वचेसाठी खास स्क्रब -
त्वचा मुलायम ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑईल आणि मीठाचा वापर स्क्रब म्हणून केला जातो. त्वचेवरील मृत पेशींचा थर हटवण्यासाठी त्याचा फायदा होतो. मीठामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स असतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

कसं बनवाल स्क्रब ?

-अर्धा कप ऑलिव्ह ऑईल
-1/4 कप मीठ
-लिंबाचा रस

सारे पदार्थ एकत्र करून मिश्रण बनवा. त्वचेवर हलक्या हाताने या मिश्रणाने मसाज करा. 5 मिनिटं स्क्रब चेहर्‍यावर लावून ठेवा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

कोपरे, ढोपर, घोटा येथील काळसरपणा हटवण्यासाठीही हा स्क्रब फायदेशीर आहे. प्युमिक स्टोन पायावर घासल्यानंतर स्क्रबने मसाज करावा. रात्री झोपण्यापूर्वी या स्क्रबचा वापर करा. त्यानंतर मॉईश्चरायझर लावून झोपा. त्वचेमध्ये मुलायमपणा टिकून ठेवण्यासाठी यामुळे मदत होऊ शकते.

चेहर्‍यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी अनेकजण थ्रेडिंगचा पर्याय निवडतात. थ्रेडिंगद्वारा आयब्रो (भुवया) आणि अप्पर लिप्सवरील केस हटवले जातात. मात्र ही प्रक्रिया काही प्रमाणात वेदनादायी आहे. संवेदनशील त्वचेच्या लोकांमध्ये थ्रेडिंगमुळे वेदनांसोबत पुरळ, पिंपल्सचा त्रासही बळावण्याची शक्यता असते. थ्रेडिंगनंतर काही दिवसातच पिंपल्स येण्याचा तुम्हांलाही त्रास असेल तर या उपायांनी त्यावर नक्की मात करा.

थ्रेडिंगनंतर या उपायांनी कमी करा पिंपल्सचा त्रास :

1. थ्रेडिंगनंतर येणारे पिंपल्स टाळण्यासाठी कोमट पाणी फायदेशीर आहे. याकरिता थ्रेडिंगपूर्वीच कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. कोमट पाण्यामुळे चेहरा मुलायम होतो, सोबतच थ्रेडिंगदरम्यान वेदना कमी होतात.

2.आयब्रो केल्यानंतर त्वचेवर बर्फ फिरवा. यामुळे जळजळ, इंफेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होईल.


3. थ्रेडिंगनंतर पिंपल्सचा त्रास टाळायचा असल्यास आयब्रोवर टोनर लावावे. टोनर नसल्यास दालचिनीचा काढा लावणंही फायदेशीर ठरते.

4. थ्रेडिंग केल्यानंतर चेहर्‍यावर गुलाबपाणी लावणं फायदेशीर आहे. यामुळे त्वचा खुलवण्यास मदत होते. थ्रेडिंग केल्यानंतर 12 तासांपर्यंत शक्यतो कोणत्याही ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करणं टाळा.

डार्क स्पॉट्सपासून सुटका मिळवणं हे अत्यंत काठीण आहे. आपण करत असलेल्या अनेक लहान सहान गोष्टींमुळे चेहर्‍यावर डार्क स्पॉट वाढतात. तुम्ही नकळत करत असलात तरीही या काही गोष्टी चेहर्‍यावर डार्क स्पॉट वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत.

डार्क स्पॉट्स वाढण्यामागील कारणं -

सूर्यप्रकाश -

सूर्यप्रकाशातील युव्ही किरणांमुळे त्वचेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्वचेमध्ये मेलॅनिन घटकाचे प्रमाण वाढते. परिणामी डार्क स्पॉट्स वाढतात.

लेझर किंवा पिलिंग -

त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही लेझर किंवा पिलिंगचा वापर करता मात्र यामुळे त्वचेमध्ये दाह वाढतो. परिणामी काही जणांच्या त्वचेवर ब्राऊन रंगाचे पॅच निर्माण होतात.


दाह -

हायपरपिगमेंटेशन निर्माण होण्यामागे त्वचेला मोठ्या प्रमाणात होणारा आघात हे एक कारण आहे.

अ‍ॅक्ने -

चेहर्‍यावरील लहान स्वरूपातील ब्रेकआऊट्स पुढे पिंपल्स किंवा अ‍ॅक्नेच्या स्वरूपात बदलतात. अनेकांना चेहर्‍याला सतत हात लावण्याची सवय असते, खाजवणं, पिंपल्स फोडणं हा त्रास होऊ शकतो.

औषधगोळ्या -

काही अ‍ॅन्टिबायोटिक्स आणि औषधगोळ्यांचा त्वचेवर परिणाम होतो. प्रामुख्याने संवेदनशील त्वचा सूर्यप्रकाशात गेल्यानंतर अधिक खराब होण्याची शक्यता असते. त्वचेवर अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता असते.

क्लीन शेव करण्यासाठी किंवा शरीरावरील केस काढण्यासाठी बहुतांशवेळा रेझरचाच उपयोग केला जातो. शरीरातील इतर भागांतील केस काढण्यासाठी हेअर रिमूवल क्रीम किंवा इतर केमिकल प्रोडक्टपेक्षा रेझरचा उपयोग सुरक्षित असतो. पण चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला तर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार जडवू शकतो. यामध्ये काही त्वचेसंबंधी असतील तर काही गंभीरही असू शकतील.

त्वचा इन्फेक्शन

रेजरचा उपयोग ब्लेड बदलून एकापेक्षा अधिकवेळा केला जातो. रेझर ओलं राहिल्यास किंवा ते व्यवस्थित साफ न झाल्यास त्यामध्ये सूक्ष्म किटाणू जमा होतात. पुढच्या वेळेस वापरताना धुवल्यानंतरही ते जात नाहीत. यामुळे फंगल किंवा यीस्ट इंफेक्शन होण्याची शक्यता असते. यातून वाचण्यासाठी रेझरचा वापर करुन झाल्यावर प्रत्येकवेळेस स्वच्छ धुवून सुकवायला हवं. असं न केल्यास तुम्ही वेगवेगळ्या बॅक्टेरिया आणि वायरल इन्फेक्शनच्या विळख्यात येऊ शकता.

फॉलिक्युलाइटिस

दुसऱ्याने वापरलेलं रेजर वापरल्यास फॉलिक्युलाइटिस आजाराचा धोका असतो. फॉलिक्युलाइटिस झाल्यास तुमच्या शरीरावर रॅशेस दिसून त्यातून मऊ पदार्थ बाहेर येतो. रेशेस पूर्णपणे निघून जाईपर्यंत शेव्हींग करु नये. याकडे दुर्लक्ष केल्यास चेहऱ्यावर डाग दिसू लागतात.

एमएसआरए

एमएसआरए हे एक गंभीर स्किन इंफेक्शन असून यामुळे जीवही जाऊ शकतो. एक किंवा एकापेक्षा जास्त लोकांसोबत रेझर शेअर केल्याने हा आजार जडू शकतो. यामध्ये त्वचेला सूझ येते आणि त्वचा लाल होते. एमएसआरएमूळे तुम्हाला तापही येऊ शकतो.

फोड आणि डाग

रेझर शेअर करण्याने आणि वापरानंतर न धुतल्यास किंवा किटाणुनाशकचा वापर न केल्यास त्यात बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो. यामधलं स्‍टाफीलोकोकस इंफेक्‍शन सामान्य असतं. स्किन इन्फेक्शन हे रेझरच्या चुकीच्या वापरामूळे होतं. यामुळे चेहऱ्यावर फोड आणि डाग दिसू लागतात.

हेपेटाइटिस

रेझर वापरल्यानंतर किंवा वापरानंतर गरम पाण्याने धुणे गरजेचे आहे. रेझर, शेव्हींग ब्रश कोणासोबत शेअर करु नका. कोणत्याही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेल्या व्यक्तिसोबत हे शेअर केल्यास तुम्हालाही ते होण्याची शक्यता जास्त असते. हेपेटाइटिसच्या रुग्णांसोबत रेझर किंवा ब्लेड शेअर केल्यास तुम्हालाही हा त्रास उद्भवू शकतो.

स्किनकेअरचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपली त्वचा स्वच्छ आणि ताजे ठेवणे. परंतु त्यापूर्वी, त्याचसाठी योग्य उत्पादन शोधणे आवश्यक आहे. त्वचेचा प्रकार व्यक्तीपासून भिन्न असतो आणि म्हणून आपल्या त्वचेसाठी सर्वात उपयुक्त त्वचेच्या वस्तू शोधणे हे सर्व फरक बनवते.

स्नान करण्याची सवय थेट आपल्या त्वचेच्या गुणवत्तेवर परिणाम करतात, ज्यामध्ये योग्य स्वच्छता घेण्याची आवश्यकता असते; मी ई. शरीराचे साबण आणि शरीर धूळ दरम्यान निवडणे. प्रत्येकाकडे भिन्न प्रकारचे गुणधर्म असतात आणि स्वतःच्या फायद्यांचे आणि तोटे आहेत. चला आपल्या त्वचेसाठी कोणते चांगले आहे हे शोधूया.

* आपण स्नान साबण बार का निवडावे:

- खोल साफ करून घाण काढून टाकणे हे अधिक प्रभावी आहे

- ते त्वचेसाठी उपयुक्त आहे जे जास्त प्रमाणात तेलकट आहे कारण त्यामध्ये अशी सामग्री आहे जी त्वचेतून जास्त तेल काढून टाकण्यास अत्यंत प्रभावी आहे.

* आपण साबण बार न घेता का निवडू नये:

- ते नैसर्गिक तेले आणि ओलावाची त्वचा काढून टाकते, ज्यामुळे ते कोरडे आणि फिकट बनते

- थेट शरीराच्या संपर्कामुळे व्यक्तींच्या दरम्यान शेअरिंगच्या बाबतीत साबणास प्रतिबंध नसतो म्हणून साबण आपल्या त्वचेवरील घाण जमा करतात.

* शरीराचे धूर निवडण्याचे कारण:

- साबणांच्या तुलनेत त्वचेवर त्याचा सौम्य आणि सौम्य प्रभाव असतो

- ते नैसर्गिक तेलांचे संरक्षण करून त्वचा moisturized ठेवते

- परस्पर सामायिकरण बाबतीत बार साबणांपेक्षा ते अधिक स्वच्छतेचे आहे

- कोरड्या त्वचेसाठी हा सर्वात योग्य पर्याय आहे

* शरीरावर धूळ घालण्याचे कारण:

त्यात मोठ्या प्रमाणावर कृत्रिम ऍडिटीव्ह आणि प्रेझर्वेटिव्ह आहेत जे आपल्या त्वचेला जास्त नुकसान पोहोचवू शकतात, काही प्रकरणांमध्ये ऍलर्जिक प्रतिक्रिया वाढवते.

तर मग दोघांचा विजेता कोण आहे?

आपल्या त्वचा प्रकारासाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या निवडीवर आपण नक्कीच आधार केला पाहिजे. शरीराचे साबण तेलकट त्वचेसह अधिक सुसंगत असते तर कोरडी त्वचा शरीराचे धूळ अधिक चांगले असते. शरीराचे धूर, तथापि, आपल्या त्वचेवर अधिक सभ्य आहे.

Dr. Lalit deshmukh
Dr. Lalit deshmukh
BHMS, Family Physician, 14 yrs, Pune
Dr. Neha Dhakad
Dr. Neha Dhakad
BHMS, Homeopath Family Physician, 14 yrs, Bengaluru (Bangalore)
Dr. Manna  Varghese
Dr. Manna Varghese
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune
Dr. Himanshu Verma
Dr. Himanshu Verma
Medical Student, General Physician, 3 yrs, Bhopal
Hellodox
x