Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

हा कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सूंठ म्हणतात. दोन्ही मूलतः एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे. आलं हे कटू, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे, म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा.

आलं हे अग्रिदीपक आहे. भूक लागत नसेल, अजीर्ण झाल्यास, तोंडाला चव नसेल तर आले द्यावे. जेवणापूर्वी अर्धा तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस एक चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून घ्यावे. यामुळे भूक लागते. पडसे, खोकला आल्यास आल्याचा रस पिंपळीपूर्ण व मधासोबत द्यावा. हा प्रयोग दिवसातून तीनवेळा करावा.

आल्याचा रस मधासोबत दिल्याने उचकीसुद्धा कमी होते. संपूर्ण अंगावर सूज येत असेल तर आले गुळासोबत खाल्ल्याने फायदा होतो. आल्यापासून आल्याचा कीस, सुपारी, पाक बनविता येतात. आल्याचा पाक करताना आल्याच्या रसात विलायची, जायफळ, लवंग, पिंपळी, काळी मिरी, हळद, साखर टाकावी. यामुळे आलेपाक गुणकारी बनतो.

आमच्या पैकी सर्वच जण नेमाने फळांचे सेवन करतात, पण यानंतर देखील ते आजारी पडतात. याचे मागचेकारण असे ही होऊ शकत की आम्ही चुकीच्या वेळेस वस्तूंचे सेवन करतो यामुळे फायदा तर मिळतच नाहीपण नुकसानच होत.

सफरचंद :
अॅप्पलचे सेवन सकाळी नाश्ता करताना करणे उत्तम मानले जाते. यात पेक्टिन नावाचा तत्त्व उपस्थित असतो जो बीपी लो करतो आणि कोलेस्ट्रालला कमी करतो. रात्रीच्या वेळेस जेवणात अॅप्पल नाही खायला पाहिजे कारण रात्री पेक्टिनच्या पचनामध्ये अडचण येते आणि यामुळे पोटात अॅसिडिटी वाढते.

केळी :
केळींचे सेवन दुपारी अर्थात लंचमध्ये करायला पाहिजे. केळी आमच्या शरीरात प्रतिरोधक क्षमता वाढवण्यात मदतगार ठरतात. केळींचे सेवन रात्री बिलकुल नाही करायला पाहिजे कारण यामुळे अपचची समस्या वाढते.

बटाटा :
बटाटा आणि त्याने तयार पदार्थांचे सेवन सकाळी नाश्ता करण्यासाठी योग्य मानले गेले आहे. हे देखील कोलेस्टरॉल कमी करतो आणि आमच्या शरीराला योग्य ऊर्जा देतो. यात हायकॅलोरी असल्यामुळे रात्री याचे सेवन करणे टाळावे. जर तुम्ही रात्री बटाटा खात असाल तर याने वजन वाढण्याची समस्या येऊ शकते.

दूध :
दुधाबद्दल तर डॉक्टर देखील सांगतात की याचे सेवन रात्री करणे योग्य असत. रात्री कोमट दुधाचे सेवन केल्याने चांगली झोप येते आणि शरीरात एनर्जी रिस्टोर होते. सकाळी जर जास्त मेहनत किंवा व्यायाम करत असाल तरच दूध घ्या अन्यथा हे पचण्यास जड असत.

खरबूज खाण्यात जितका लज्जतदार लागते तितकाच तो सौंदर्याच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. खाण्यासोबतच तुम्ही खरबूज त्वचेवर लावल्यास तुम्हाला 'इस्टंट ग्लो' मिळेल. त्याचा फेसपॅक लावल्यानंतर तुम्ही काही मिनिटातच उजळल्याचा अनुभव घेऊ शकाल.


खरबूजाचा रस आणि दही

खरबुजात मोठ्या प्रमाणावर पाण्याची मात्रा असते. त्यामुळे त्याला कापल्यानंतर बऱ्यापैकी रस निघतो. त्यातून निघणारा रस एका वाटीत एकत्र करून घ्यावा. जितका रस निघेल तितक्याच मात्रेत त्यात दही मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणाचा लेप चेहरा आणि मानेवर चांगल्या पद्धतीने लावावा. सुमारे १५ मिनिटांपर्यंत हा लेप तसाच राहू द्यावा. त्यानंतर चेहरा धुवावा. हा लेप लावल्यामुळे तुमचा चेहरा उजळल्यासारखा वाटू लागतो. उन्हामुळे आलेले काळे डाग काही प्रमाणात कमी होतात. तुम्ही सातत्याने जलतरण करीत असाल, तर हा फेसपॅक तुम्ही हमखास वापरलाच पाहिजे. त्यामुळे त्वचेवरील काळे डाग, काळवटपणा कमी होईल. खरबुजाप्रमाणे त्याच्या बियादेखील उपयुक्त आहेत. बियांपासून तयार करण्यात आलेला फेसपॅक लावल्याने त्वचेची सखोल स्वच्छता होते. या मिश्रणात असलेल्या दह्यामुळे त्वचा मुलायम होते. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावर त्यामुळे तजेलादेखील येतो. दह्यातील अनेक पदार्थ त्वचेसाठी मॉइश्चरायजरप्रमाणे काम करतात.


मधासह खरबूज

मध हे त्वचेसाठी अमृततूल्य आहे. त्याने फायदे अनेक आहेत. त्यामुळे त्याला बहुगुणी म्हणून ओळखले जाते. खरबुजाच्या रसात मध कालवावे. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. १५ ते २० मिनिटानंतर चेहरा धुवावा. तीव्र उन्हामुळे तुमच्या चेहऱ्यावर जळल्यासारखे डाग पडले असतील, तर ते कालांतराने कमी होण्यासाठी हे फेसपॅक उपयुक्त आहे. घामामुळे येणारे मुरूम, पुटकुळ्या आणि तारूण्यपिटिकांवर हा फेसपॅक उत्तमप्रकारे काम करतो. धूळ-मातीमुळे अनेकदा चेहरा काळवंडतो. त्यामुळे त्वचेवरील सुक्ष्म छीद्र बंद होतात. ते उघडण्यासाठी या फेसपॅकमुळे मदत होते. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर जमा झालेली अस्वच्छता दूर होण्यास मदत होते.


असे होतील फायदे

- चेहरा थंड ठेवण्यास मदत होते.

- सनस्क्रीमसारखे काम करते.

- चेहऱ्यावरील काळे डाग दूर करते.

- त्वचेला आतपर्यंत स्वच्छ करते.

- त्वचा उजळण्यास मदत होते.


मधाचा उतारा

त्वचेवर मध वापरल्याने त्यावरील डाग दूर होतात. त्वचेतील मृतपेशीपासून मुक्तता मिळते. नव्या पेशी तयार होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 'सनबर्न'मुळे जे डाग पडतात, ते कमी होण्यासाठी मध सहाय्यक ठरते. वातावरणात असलेल्या हानीकारक किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदातरी चेहऱ्यावर मधाने मसाज करावा.


खरबूज अन् दूध

चेहऱ्यावरील काळसर डाग दूर करण्यासाठी हे मिश्रण फायदेशीर ठरते. या मिश्रणातील दूध हे चेहऱ्यासाठी डाग दूर करण्याचे सर्वोत्तम साधन ठरते. त्यासाठी खरबुजाच्या रसात थोडे दूध मिसळावे. त्यानंतर कापसाच्या सहाय्याने हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. किंचित मसाज करावा. त्यानंतर चेहरा धुवावा. तीव्र उन्हात फिरल्याने त्वचा लवकर काळी पडते. चेहऱ्यावर डाग पडतात. त्वचा भाजल्यासाखी होते. हे सर्व दूर करण्यासाठी खरबुजाचा रस आणि दुधाचे मिश्रण गुणकारी उपाय आहे.

--

खरबूज, काकडी

काकडीतील महत्त्वाचे घटक चेहरा थंड ठेवण्यासाठी मदत करतात. खरबूज आणि काकडीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील सर्व डाग नष्ट होतात. परंतु ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. हा पॅक वापरत राहिल्याने कालांतराने हे डाग नष्ट होतात. चेहऱ्याला नवीन तजेला देण्यासाठी आणि चेहरा उजळण्यासाठी हा पॅक लाभदायक आहे. उन्हातील तीव्र किरणांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासूनही हा पॅक त्वचेला वाचवितो.

घरून ऑफीसला जाण्याच्या घाईत आपले जेवण व्यवस्थित होत नाही. मग अशावेळी अनेक जण फळं कापून नेतात. परंतु आपण जेव्हा ही फळे खाण्यासाठी काढतो, त्यावेळी ती तपकिरी दिसतात किंवा काळवंडलेली असतात. मग अशी फळे खाण्याची ईच्छाच होत नाही. तुम्ही देखील अशा समस्येला दररोज तोंड देत असाल तर येथे काही उपयुक्त टिप्स आहेत ज्यामुळे यापुढे फळं काळी पडणार नाहीत.


बरेचदा तुम्ही अनुभवलेले असेल की तुम्ही सफरचंद कापता. त्यानंतर ते हवाबंद डब्यात किंवा फ्रीजमध्ये ठेऊन देतात. कालांतराने ते कापलेले सफरचंद बाहेर काढले की त्याचा रंग बदललेला असतो. फळांमध्ये असलेल्या लोहामुळे ही प्रक्रिया होते. असे बहुतांश फळांसोबत होते, की ती कापल्यानंतर काही वेळाने तपकिरी किंवाबरेचदा तुम्ही अनुभवलेले असेल की तुम्ही सफरचंद कापता. त्यानंतर ते हवाबंद डब्यात किंवा फ्रीजमध्ये ठेऊन देतात. कालांतराने ते कापलेले सफरचंद बाहेर काढले की त्याचा रंग बदललेला असतो. फळांमध्ये असलेल्या लोहामुळे ही प्रक्रिया होते. असे बहुतांश फळांसोबत होते, की ती कापल्यानंतर काही वेळाने तपकिरी किंवा काळी पडतात. वास्तविकतेत ज्यावेळी आपण फळं कापतो त्यावेळी त्यातील 'इंटरनल सेल्स'ला नुकसान होते. हे सेल्स जेव्हा हवेच्या संपर्कात येतात त्यावेळी रासायनिक क्रिया होते व त्यांचा रंग बदलतो.


सेल्स जेव्हा हवेच्या संपर्कात येतात त्यावेळी रासायनिक क्रिया होते व त्यांचा रंग बदलतो.

लिंबाचा रस

फळं कापल्यानंतर त्यावर थोडा लिंबाचा रस मिसळावा. त्यामुळे फळे तपकिरी, काळपट होणार नाहीत. लिंबाचा रस पिळल्यानंतर तुम्ही फळांना फ्रीजमध्येही ठेऊ शकता.

रबरबॅण्ड वापरा

कापलेल्या फळांना एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावे. त्यानंतर या पिशवीचे तोंड रबरबॅण्डने अगदी घट्ट बंद करावे. त्यातून किंचितही हवा जाणार नाही याकडे लक्ष द्यावा. त्याने फळं ताजी राहतील.

सिट्रस अॅसिड चूर्ण

फळांना तपकिरी होण्यापासून वाचविण्यासाठी त्यावर सिट्रस अॅसिडची पावडर टाकावी. हा उपाय केल्याने फळांना १० ते १२ तासांपर्यंत ताजे ठेवाता येते. हा उपाय फळांना तपकिरी व काळवंडण्यापासून पूर्णपणे वाचवितो. बाजारात ही पावडर सहजपणे मिळेल. त्याने फळांची चवही बदलणार नाही.

प्लास्टिक रॅपिंग

कापलेल्या फळांना प्लास्टिक रॅपिंग केले जावे. असे केल्याने फळं चार ते पाच तास ताजी राहतात. त्यासाठी बाजारात प्लास्टिक रॅपिंग पॅकेट मिळतात किंवा अॅल्यूमिनियम फॉइलही वापरता येईल. जेणेकरून फळं ताजी राहतील.

मिठाचे पाणी

ताज्या फळांना तपकिरी होण्यापासून वाचविण्यासाठी मिठाच्या पाण्यात तीन ते पाच मिनिट कापलेली फळं भिजवावी. त्यामुळे त्यांच्या रंगात कोणताही बदल होणार नाही.

थंड पाणी

तुम्ही फळं कापली असतील तर त्याला हवा लागू देऊ नये. या फळांना काही वेळेसाठी थंड पाण्यात भिजवावे. लक्षात ठेवा ही फळं पाण्यात पूर्णपणे भीजणे गरजेचे आहे. अन्यथा काही भाग तपकिरी होईल. त्यानंतर ही फळं हवाबंद डब्यात ठेवावी. त्यामुळे ती सुमारे तीन ते चार तास ताजी राहतील.

सगळी फळं कापल्यावर लगेच संपवता येत नाहीत. कापून तुकडे केलेल्या फळांचा हवेशी संपर्क आल्यावर ती लगेच काळी पडतात. त्यामुळे फळे कापल्यावरही ताजी राहावीत यासाठी काही प्रयत्न करता येतील. सफरचंदासारख्या फळांमध्ये लोह असते. फळे कापल्यावर त्यातील अंतर्गत पेशी मरु लागतात, त्यांचा हवेशी संपर्क आला की पोलीफेनॉल नावाचे संप्रेरक निर्माण होते आणि आयर्न ऑक्साइडचा एक थर फळांवर तयार होतो. त्यामुळे कापलेली फळं काळी दिसू लागतात.

1) लिंबाच्या रस या फळांना लावल्यामुळे फळांचे तुकडे काळे होण्याची क्रिया मंदावते. लिंबाच्या रसाचा उपयोग करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात.

2) फळं कापल्यामुळे त्यांचा हवेशी संपर्क येतो आणि ती काळी पडतात, हे रोखण्यासाठी फळं थंड पाण्यात पूर्णपणे बुडवावीत. तू पूर्ण बुडवणे अत्यंत आवश्यक आहे.

3) अर्धा चमचा मीठ पाण्यात विरघळवून त्या मिश्रणामध्ये कापलेली फळे तीन ते पाच मिनिटे बुडवावीत. त्यामुळेही कापलेल्या भागाचा हवेशी संपर्क कमी येतो आणि ती काळी पडत नाहीत.

4) फळ कापल्यावर त्यांच्यावर रबर बँड लावून त्यांना पुन्हा मूळ फळाच्या आकारात बांधून ठेवता येईल त्यामुळेही त्यांचा हवेशी संपर्क कमी येईल.

5) सायट्रिक अॅसिड असलेल्या कोणत्याही सोड्यात फळ बुडवल्यास त्यांचा हवेशी संपर्क कमी होईल. मात्र सोड्यामुळे फळांचा स्वाद कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळांवर साखर घालून ती खाता येतील.

6) फळांचे तुकडे हवाबंद पिशवीत घालून ठेवता येतील, हा एकदम सोपा उपाय आहे.

7) अॅस्कॉर्बिक अॅसिडची पावडरही फळांवर शिंपडता येईल. यामुळे फळं काळी पडणार नाहीत. अॅस्कॉर्बिक अॅसिड म्हणजे क जिवनसत्त्व होय.

Dr. Nilima  Pawar
Dr. Nilima Pawar
BHMS, General Physician Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Brinda Dave
Dr. Brinda Dave
MPTh, Neuro Physiotherapist Physiotherapist, 4 yrs, Pune
Dr. Suhas Sodal
Dr. Suhas Sodal
MBBS, Pediatrician, 8 yrs, Pune
Dr. SS Bansal
Dr. SS Bansal
MBBS, Obstetrics and Gynecologist, 32 yrs, Pune
Dr. Ajay Rokade
Dr. Ajay Rokade
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 15 yrs, Pune
Hellodox
x