Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाण्याचे आणखी दहा फायदेदेखील आहेत…

* शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते – पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृद्यविकाराचा धोका संभवतो.

* वजन घटवण्यास मदत होते – एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.

* रोगप्रतिकारशक्ती वाढते –आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.

* मधुमेहींसाठी गुणकारी – पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव होतो.

* डोळ्यांचे आरोग्य सुधारते – पपईमध्ये व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्‍यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.

* सांधेदुखीपासून आराम मिळतो – पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.

* पचन सुधारते- आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे हे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्‍यता असते. अशावेळी पपई खाल्ल्याने अरबट-चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते.

*मासिक पाळीचा त्रास कमी होतो- अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे.

* कर्करोगापासून बचाव होतो- पपईमधील ऍन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते.

* ताण-तणाव कमी होतो – दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.

वजन कमी करा - वजन कमी करण्यासाठी रोज एक कच्चे केळे खायचा सल्ला डॉक्टर देतात. केळ्यामध्ये असलेल्या फायबर्समुळे शरीरातील अनावश्यक फॅट सेल्स काढून टाकायला मदत होते.


बद्धकोष्ठतेच्या समस्येवर उपाय - कच्च्या केळ्यामध्ये असलेल्या फायबर आणि स्टार्चमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

भुकेवर ताबा मिळवण्यासाठी - कच्च्या केळ्यांमधील फायबर, इतर पोषण गुणांमुळे भुकेवर ताबा मिळवता येतो. कच्ची केळी खाल्ल्यामुळे लागणारी भूक नियंत्रणात येते. जंकफूडपासून वाचता येऊ शकते.

डायबिटीसवर नियंत्रण -तुमचा डायबिटीस प्राथमिक स्टेजमध्ये असेल तर कच्ची केळी खायला सुरुवात करा. कच्च्या केळ्यामुळे डायबिटीस नियंत्रणात यायला मदत होते.

पचन प्रक्रिया होते चांगली - कच्ची केळी खाल्ल्यामुळे पचन प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते. कच्च्या केळ्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. यातील कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात.

सकाळच्या ब्रेकफॉस्टमध्ये केळी आणि गरम पाणी घेतल्याने चांगले परिणाम मिळू शकतात. केळीसोबत एक कप गरम पाणी घेतल्याने लठ्ठपणाही कमी होतो. योग्य मात्रेत याचे सेवन केल्याने शरीराला शेप मिळेल.

आपल्याला विश्वास बसत नसेल पण स्टार्च आणि हेल्दी कार्बोहायड्रेटने भरपूर ही डायट आपला लठ्ठपणा कमी करण्यात मदत करेल. या नाश्त्याने पोट भरल्यासारखे वाटेल आणि आपण इतर कॅलरीज घेण्यापासून वाचाल.
याव्यतिरिक्त आपल्या ऊर्जावान आणि शक्तिशाली वाटेल.

आतापर्यंत केलेल्या अनेक सर्व्हेमध्ये मॉर्निंग बनाना सेवन करण्याचे फायदे सांगितलेले आहेत. केळ शरीरातील मेटाबॉलिझम स्तर वाढतो आणि पचनक्रिया सुधारतो. यात आढळणारे फायबर बद्धकोष्ठतेशी संबंधी तक्रार दूरकरण्यात मदत करतं.

या ब्रेकफॉस्टनंतर आपल्याला ताजेतवाने वाटेल. यानंतर आपल्या अतिरिक्त शुगर किंवा कॅलरीज घेण्याची गरजही भासणार नाही.

तुम्ही कधी डाळिंबाच्या सालाच्या चहाबद्दल ऐकले आहे का?
हो, खरं आहे डाळिंबाच्या सालींचे देखील चहा तयार करू शकतो आणि त्याचे फायदे जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल. या चहात उपस्थित बरेच महत्त्वपूर्ण एंटीऑक्सिडेंट्समुळे हे हृदय रोग, बर्‍याच प्रकारचे कँसरपासून बचाव करते आणि त्वचेवर वयाच्या प्रभावाला कमी करतो.

असे तयार करा डाळिंबाच्या सालीचा चहा

डाळिंबाच्या सालीचा चहा तयार करताना सर्वात आधी एका भांड्यात एक कप पाणी गरम करा. आता या पाण्यात एक चमचा डाळिंबाच्या सालीचे पूड घाला. थोड्या वेळ पावडरला पाण्यात तसेच ठेवा. नंतर याला कपात गाळून घ्या. चव वाढवण्यासाठी यात थोडंसं लिंबाचा रस आणि ऑर्गेनिक मध मिसळा.

या चहा चे फायदे

पचनासाठी फायदेशीर

डाळिंबाच्या सालीत उपस्थित बरेच एंटीऑक्सिडेंट्समुळे हा चहा फारच फायदेशीर असतो आणि बर्‍याच आजारांपासून शरीराचा बचाव करतो. जेवण झाल्यानंतर या चहाचे सेवन करणे उत्तम असते.

गळ्यात खरखर
जर तुमच्या गळ्यात खरखर असेल किंवा तुम्हाला टॉन्सिलचा त्रास असेल तर या चहाचे सेवन केले पाहिजे. यामुळे तुम्हाला लगेचच आराम मिळेल.

हृदयाच्या आजारांपासून बचाव
फ्लेवेनॉइड्स, फेनॉलिक्स सारखे एंटीऑक्सिडेंट्समुळे या चहाचे सेवन केल्याने हृदयाचे आजार कमी होण्याची आशंका असते. या चहाचे सेवन केल्याने तुमचे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहत आणि शरीरातील बॅड कोलेस्टरॉलचा स्तर कमी होतो.

वयाचे प्रभाव कमी होण्यास मदत मिळते
चहात उपस्थित या एंटीऑक्सीडेंट्समुळे याचे सेवन केल्याने तुमच्यावर वयाचा प्रभाव कमी होतो आणि तुम्ही तुमच्या वयापेक्षा कमी दिसू लागता.
हे एंटीऑक्सिडेंट्स फ्री रेडिकल्सला न्यूट्रिलाइज करतात, जसे सुरकुत्या व डोळ्याखालील काळेपणा दिसत नाही.

संधिवातात फायदेशीर
हा चहा प्यायल्याने संधी वात आणि हाडांच्या कमजोरीत फायदा मिळतो.

कँसरपासून बचाव

बर्‍याच शोधामध्ये ही बाब समोर आली आहे की डाळिंबाच्या सालांमध्ये बरेच तत्त्व उपस्थित असतात जे शरीरात कँसरच्या आशंकेला कमी करतो. याचा सर्वात जास्त फायदा स्किन कँसरमध्ये बघण्यात आला आहे.

अनेकदा लोकं हेल्दी डायटच्या नावावर कच्च्या भाज्या खातात. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर्ससह इतर पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. आणि भाज्या उकळून किंवा शिजवून सेवन केल्याने त्यातील पौष्टिक तत्त्व नष्ट होतात हे खरं असले तरी प्रत्येक भाजी आपण कच्ची खाऊ शकत नाही. जाणून घ्या कोणत्या अश्या भाज्या आहे ज्या कच्च्या खाऊ नाही.

वांगी
कच्चे वांगी खाण्याचा प्रयत्न करू नये. वांग्यांमध्ये सोलानिन नामक तत्त्व मोठ्या प्रमाणात आढळतं. कच्चे वांगी खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या होऊ शकते. म्हणून वांगी शिजवून खावे.

गाजर
गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आढळत ज्याने बॉडी व्हिटॅमिन ए मध्ये कन्वर्ट करते. गाजर शिजवल्यावर कॅरोटीनचे प्रमाण वाढतं. शरीरात पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता वाढवण्यात तसेच स्किनला पोषण मिळण्यासाठी ये आवश्यक तत्त्व आहे.

बटाटे
बटाट्यांमध्ये आढळणारे स्ट्रार्च पचण्यात समस्या बनू शकतात म्हणून बटाटे उकळून किंवा शिजवून खावे.

टोमॅटो
टोमॅटोमध्ये आढळणारे लाइकोपीनमुळे याचा रंग लाल असतो. यामुळे प्रोस्टेट कँसर आणि हार्टच्या समस्यांपासून सुटकारा मिळतो. टोमॅटो शिजवल्यावर त्यात आढळणारे टच सेल वाल्स ब्रेक डाउन होतात आणि लाइकोपीन रिलीज करतात. यामुळे हे शरीरात शोषले जातात.

ब्रोकली
ब्रोकली आणि कोबीत कठोर घटक आढळतात. या भाज्या चांगल्यारीत्या शिजवून न खाण्याने पचण्यात समस्या येते.

बींस
बींसमध्ये फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, फोलेट्स, फोटो पोषक घटक, व्हिटॅमिन आणि इतर पोषक तत्त्व आढळतात. उकळून खाल्ल्यास हे सर्व पोषक तत्त्व आपल्याला मिळू शकतात. मधुमेहावर उकळलेले बींस उपयोगी ठरतात. 5 मिनिट बींस उकळून त्यावर मीठ आणि काळ्या मिर्‍याची पूड घालून खाऊ शकता.

पालक
पालक अनेकदा सलॅड म्हणून खाण्यात येतं. कच्चा पालक खाणे धोकादायक ठरू शकतं. पालक शिजवल्यावर त्यात आढळणार्‍या आयरन आणि मॅग्नेशियम तत्त्वांमध्ये वाढ होते.

रताळे
रताळ्यांमध्ये आयरन, फोलेट, कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्स इतर आढळतं, याने इम्यून सिस्टम मजबूत होतं. रताळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे कार्बोहाइड्रेट शरीरासाठी आवश्यक असतं. याचे दुप्पट गुण मिळवण्यासाठी रताळे उकळून खावे.

Dr. Virag  Kulkarni
Dr. Virag Kulkarni
BAMS, Ayurveda Panchakarma, 14 yrs, Pune
Dr. Kunal Janrao
Dr. Kunal Janrao
MDS, Dentist Periodontist, 6 yrs, Pune
Dr. Rajendra Lahore
Dr. Rajendra Lahore
MS/MD - Ayurveda, Ophthalmologist, 11 yrs, Pune
Dr. Ashwin Prasad
Dr. Ashwin Prasad
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Cosmetic Surgeon, 2 yrs, Pune
Hellodox
x