Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पपई म्हणजे अनेक आरोग्यदायी फळांपैकी एक... निसर्गतः उष्ण असलेले हे फळ अरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याच्या सेवनाने शरीरासोबतच त्वचा आणि केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी फायदा होतो. पपईमध्ये अनेक आवश्यक पोषक तत्व जसं अ‍ॅन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळून येतात. जे शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी उपयोगी ठरतात. पपईमध्ये लायकोपीनही मोठ्या प्रमाणात असतं, जाणून घेऊया आहारामध्ये पपईचा समावेश केल्याने होणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

वजन कमी होण्यासाठी

पपईमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे बऱ्याच वेळापर्यंत पोट भरल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे तुम्ही ओव्हर इटिंगपासून दूर राहता. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर पपई तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी

पपईमध्ये शक्तीशाली अ‍ॅन्टीऑक्सिडंट आढळून येतात. जसं कॅरोटिन्स, फ्लॅवोनॉएड्स, व्हिटॅमिन-सी इत्यादी. याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी शरीरातं अनेक आजारांपासून रक्षण होतं.

डोळ्यांसाठी उत्तम

पपईमध्ये व्हिटॅमिनी ए मुबलक प्रमाणात आढळून येतं. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी जिजेनेरेट होण्यापासून बचाव होतो. त्याचबरोबर मेक्यूलर डिजेनरेशन यांसारख्या डोळ्यांच्या समस्यांपासूनही सुटका होते.

हाडांच्या मजबूतीसाठी

हाडांचे आरोग्य स्वस्थ आणि मजबूत ठेवण्यासाठी दररोज पपईचे सेवन करा. पपईचं सेवन शरीरातील हाडांच्या मजबूतीसाठी मदत करतं. यामध्ये अ‍ॅन्टीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन-सी असल्यामुळे हे अर्थरायटिस यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी मदत होते.

पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी

पपईमध्ये डायजेस्टिव एंजाइम्ससारखं पपेन असतं, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर यामध्ये असलेलं फायबर शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं.

वाढतं वजन ही आजच्या लाइफस्टाइलमधील सर्वात जास्त भेडसावली जाणारी समस्या आहे. मग सुरू होतो वजन कमी करण्याचा संघर्ष. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. यात एक्सरसाइज आणि डाएट या दोन गोष्टी प्रामुख्याने केल्या जातात. खासकरून डाएट फार जास्त केलं जातं. अनेकजण वेगवेगळ्या भाज्या खाणं, वेगवेगळे पदार्थ खाणं बंद करतात. पण याचा प्रत्येकालाच फायदा होतो असे नाही.

घरात वांग्यांची भाजी झाली आहे म्हटल्यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांची भूक अचानक गायब होते. कुणी बाहेर जाऊन काही खाऊन येतं, तर कुणी वेगळं काही खातात. वांगी म्हटलं की, अनेकजण नाक मुरडतात. पण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर वांगी खाणं फायदेशीर ठरू शकतं. वांग्यांमध्ये वजन कमी करण्याचे किंवा नियंत्रणात ठेवण्याचे गुण असतात.

१०० ग्रॅम वांग्यांमध्ये २५ कॅलरी असतात. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत किंवा वांग्याचा कोणताही पदार्थ खाणं फायदेशीर ठरेल. बरं वांग्याने केवळ वजन कमी करण्यास फायदा मिळेल असे नाही, तर याचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत.

वजन कमी करा

१०० ग्रॅम वांग्यांमध्ये केवळ २५ कॅलरी असतात. तसेच वांग्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पोट भरलेलं राहतं आणि तुमचं मधेमधे काहीही खाणं बंद होऊ तुम्हाला वजन कमी करण्यास फायदा होऊ शकतो.

कोलेस्ट्रॉल कमी करा

वांग्यांमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचं प्रमाणही अधिक असतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचं शरीरातील प्रमाण वाढत नाही. जेव्हा तुम्ही वांगी खाता तेव्हा तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचाही धोका कमी राहतो.

अन्न चांगलं पचतं

वांग्यांमध्ये डायट्री फायबरचं प्रमाण अधिक आढळतं. त्यामुळे फायबर आतड्यांनी चिकटलेल्या वेगवेगळ्या वाईट गोष्टींना स्वच्छ करतं. याने अन्न चांगल्याप्रकारे पचन होण्यास फायदा होतो. पचन व्यवस्थित झालं तर पोटाची कोणतीही समस्या तुम्हाला होणार नाही.

हाडे होतात मजबूत

वांगी खाल्ल्याने तुमच्या हाडांसाठीही फायदेशीर असतात. कारण यात आयर्न आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आढळतं. त्यासोबतच वांग्यांमध्ये असलेलं फिनॉलिक अॅसिड हाडांची झीज कमी करून हाडे मजबूत करतं.

केळी एक असं फळ आहे जे खायला स्वादिष्ट तर लागतच सोबत आरोग्यासाठीही वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर ठरतं. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हे सिद्ध झालं आहे. केळी केवळ वजन वाढवण्यासाठीच नाही तर अनेक गोष्टीसाठी फायद्याची ठरतात. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, केळींचं नियमित सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेंशनच्या रुग्णांना फायदा होतो.

१.८० कोटी लोकांचा हृदयरोगाने मृत्यू

हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेंशन एक अशी स्थिती आहे ज्यात तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपप्रवाह वेगाने आणि प्रेशरने होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO नुसार, २०१६ मध्ये जगभरात जवळपास १७.९ मिलियन लोक म्हणजेच १ कोटी ८० लाख लोकांचा मृत्यू कार्डिओवस्कुलर आजारांनी झाला होता. ही आकडेवारी जगभरात झालेल्या एकूण मृत्यूंच्या ३१ टक्के इतकी आहे. यात ८५ टक्के मृत्यू हे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे झालेत. हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या आजारामागे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाइल आहे.

केळीचे हाय बीपी असल्यास फायदे

केळ्यांमध्ये फायबर आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे एक्सपर्ट हायपरटेंशन आणि हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना चांगल्या आरोग्यासाठी केळी खाण्याचा सल्ला देतात. त्यासोबतच केळीमध्ये सोडियम सुद्धा कमी प्रमाणात असतं. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना आहारातून सोडियमचा सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. केळीमध्ये असलेल्या पोटॅशिअम vasodilator चं काम करतो. याने सोडियमचा प्रभाव कमी केला जातो आणि यूरिनच्या माध्यमातून सोडियम शरीरातून बाहेर टाकलं जातं.

जास्ते केळी खाल्ल्याने साइड इफेक्ट

केळी हे फळं खाणं सर्वात सोपं आहे. वेगवेगळ्या प्रकारे केळी खाता येते. केळीचे अनेक आरोग्यदायी फायदे असेल तरी काही दुष्परिणामही आहेत. जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने नुकसान होतं. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केळी खाव्यात.

केळी खाण्याचे इतर फायदे

१) केळी खाल्याने हृदय रोग दूर राहतात - केळी हृदय रोगाने ग्रस्त लोकांसाठी फार फायदेशीर असतात. नियमीत रुपाने केळी खाल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो. या कारणाने केळी खाल्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी होते. तसेच यात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, ज्या कारणाने रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. दररोज दोन केळी खाणाऱ्यांना हृदय रोग आणि पचनक्रियेसंबंधी समस्या होत नाही.

२) केळी खाल्याने डोकं शांत राहतं - तणाव किंवा डिप्रेशन झालं असेल तर केळीचं सेवन करा. एका शोधातून हे समोर आलं आहे की, केळी खाल्याने तणाव आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते. कारण केळींमध्ये प्रोटीन आणि अनेक अॅंटीऑक्सिडेंट्स आढळतात जे डोकं शांत करतात.

३) ब्लड प्रेशर राहतं कंट्रोल - केळीचं सेवन नियमीतपणे केल्याने ब्लड प्रेशर सामान्य राहतं. यात पोटॅशिअम आढळतं जे ब्लड प्रेशरमुळे होणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका कमी करतात. तसेच याने हायपरटेंशनची समस्याही नियंत्रित राहते.

४) लहान मुलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी फायदेशीर - लहान मुलांच्या विकासाठी केळी फार फायदेशीर आहे. केळीमध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन आढळतात ज्यामुळे मुलांचा विकास चांगला होतो. त्यामुळे लहान मुलांना नियमीत केळी द्यायला हवीत. तसेच केळी वयोवृद्धांसाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी, बी ६ आणि फायबर आढळतात जे वाढत्या वयात गरजेचे असतात.

बटाट्याची भाजी आपल्यापैकी अनेकांची फेवरेट भाजी असावी. दैनंदिन आहारातील ही एक महत्त्वाची आणि अनेकांना आवडणारी भाजी आहे. बटाट्याची वेगवेगळ्या प्रकारे भाजी केली जाते. बटाट्याचे पराठेही चांगलेच ल्रोकप्रिय आहेत. पण कधी तुम्ही जांबळ्या रंगाच्या बटाट्याची भाजी खाल्ली का? नाही ना? होय..जांभळ्या रंगाचा बटाटा. या जांभळ्या रंगाच्या बटाट्याचे अनेक फायदे असतात. असं म्हणतात की, ज्या लोकांना तारुण्य टिकवून ठेवायचंय आणि सुंदर दिसायचंय त्यांनी या बटाट्याचं सेवन करावं. दिसायला हा बटाटा रताळ्यासारखा दिसतो, पण याची चव सामान्य बटाट्याची असते.

जांभळ्या रंगाचा बटाटा हा जंगली बटाटा आणि सामान्य बटाट्याच्या तत्वांना एकत्र करुन तयार करण्यात आला आहे. या बटाट्यावर अनेक शोधही करण्यात आले. चला जाणून घेऊ या बटाट्याचे फायदे.


सामान्य बटाट्याच्या तुलनेत या बटाट्यामध्ये अरारोटचं(एक तत्व) प्रमाण कमी असतं. त्यामुळेच याचा रंग जांभळा असतो. पण खाल्ल्यावर मात्र चव सामान्य बटाटच्या प्रमाणेच असते. जांभळ्या रंगाचा हा बटाटा जंगली बटाटा आणि सामान्य बटाट्यापासून तयार करण्यात आला आहे. शिजवल्यानंतरही या बटाट्याचा रंद चमकदार आणि जांभळाच राहतो.

कॅन्सरला ठेवतो दूर

तज्ज्ञांनुसार, जांभळ्या रंगाच्या बटाट्यासोबतच रंगीत झाडांमध्ये बायोगॅक्टिक तत्व असतात. जसे की, एंथोकायनिन आणि फिनोलिक अॅसिड जे कॅन्सरच्या उपचारासाठी फायदेशीर असतात. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, या तत्वांचं मोलेक्युलर स्तरावर काम करणे कॅन्सरला रोखण्यासाठीचं पहिलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

अॅंटी-एजिंग गुण

जांभळ्या रंगाच्या या बटाट्यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटचं प्रमाण भरपूर असतं. जे शरीरातील फ्री रॅडिकल्ससोबत लढून त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या दूर करतं. याने त्वचा आणखी तजेलदार आणि टवटवीत होते. त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या याने दूर होत असल्याने चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसून येत नाहीत.

कुठे आढळतो हा बटाटा?

जांभळ्या रंगाच्या या बटाट्यांची साल जवळपास काळ्या रंगाची असते. तर आतील भाग हा गर्ग निळा आणि जांभळा असतो. शिजवल्यावरही या बटाट्या जांभळा रंग कायम राहतो. हे बटाटे प्रामुख्याने फ्रान्समध्ये आढळतात. सामान्य बटाट्याच्या तुलनेत या बटाट्याची वाढ उशीरा होते.

कीवी हे फळ आजकाल बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहे. बटाट्याच्या आकाराचं आणि चिकूप्रमाणे दिसणारं फळ अगदी चविष्ट आहे. कीवीच्या बाहेरील आवरणावर बारीक बारीक केस असतात. यामुळे अनेकांच्या मनात त्याबाबत गैरसमज निर्माण होतात. कीवी हे फळ साल काढून किंवा सालासकटही खाल्लं जाऊ शकतं. कीवी फळाच्या सालीमध्येही अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामधील अ‍ॅसिड आरोग्याला फायदेशीर आहे. कीवीचं फळं सालीसकट खाल्ल्याने चव बिघडवू शकते मात्र आरोग्याला त्याचे अनेक फायदे आहेत.

कीवी फळाच्या सेवनाचे फायदे
कीवीच्या फळामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामधील अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील घातक बॅक्टेरियांचा नाश करतात.

कीवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्वचेची कांती सुधारते.


कीवी फळाच्या सेवनामुळे घातक कोलेस्ट्रेरॉल घटक कमी होण्यास मदत होते. नियमित 8-10 आठवडे कीवीचे सेवन केल्यास कोलेस्ट्रेरॉलमुळे होणारा त्रास कमी होतो.

रक्तदाबाचा त्रास नियंत्रणामध्ये ठेवण्यास कीवीचे फळ मदत करते. यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

कीवीमध्ये आयर्न घटक मुबलक असल्याने रक्ताची कमतरता, आयर्नचे प्रमाण सुधारण्यास मदत होते.

बिघडलेले पचनकार्य सुधारण्यास मदत होते. कीवीमधील एक्टिनिडिन एन्झाईम्स पचनसंस्थेला चालना देते.

Dr. Vijaykumar Raut
Dr. Vijaykumar Raut
BAMS, Family Physician Physician, 18 yrs, Pune
Dr. Komal Khandelwal
Dr. Komal Khandelwal
BAMS, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Joydeep Saha
Dr. Joydeep Saha
Specialist, Pain Management Specialist Physician, 10 yrs, Kolkata
Dr. Raveendran SR
Dr. Raveendran SR
MBBS, Chennai
Dr. Surekha Borade
Dr. Surekha Borade
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda General Physician, 16 yrs, Raigad
Hellodox
x