Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

बटाट्यानंतर भेंडी हीच एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना मनापासून आवडते. वजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी फायदेशीर ठरेल. पाहू किती गुणकारी आहे भेंडी:

* वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.

*मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

*भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे.

*भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्‍यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.

असे म्हणतात की केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. संशोधनातून हे समोर आले आहे की, दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी 90 मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी राहता.
केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे….
* केळी खाण्याने ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.

* महिलांसाठी केळी खाणे गरजेचे त्यामुळे हाडे मजबूत होतात.

* रिसर्चनुसार, केळी खाल्ल्याने डिप्रेशन दूर होते. केळ्यांमधील प्रोटीनमुळे केवळ मूड चांगला होतो.

* केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.

* केळ्यात आर्यन असते ज्यामुळे ऍनिमियाचा धोका टळतो.

* सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.

काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो.
गुणधर्म :
काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.
उपयोग :
काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.
फायदे :
काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेहीसांठी

देखील काकडी चांगली अंगातील आग कमी व्हावी, म्हणून काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये. प्रयोग दोन महिने करावा. त्याने शरीरावरील गळवे, पुळ्य कमी होतात.

केळीचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आपल्याला माहित आहेत. नाश्त्यामध्ये केळी खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. मात्र केळीची साल जी आपण फेकून देतो त्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्वचा उजळण्यासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर करु शकता.

* केळ्याची सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर रगडा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने

त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.

* केळ्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने डाग दूर होतात. तसेच त्वचेमध्ये चमक येते.

* केळ्याच्या सालीमधील पांढरे धागे काढून त्याल अॅलोव्हेरा जेल मिसळा. याने डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतील.

* केळ्याची साल चामखीळवर रगडल्याने ते दबून जातात.

लसणामुळे फक्त जेवणच चविष्ट होते असे नाही, लसणामध्ये असे बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. जाणून घेऊ की या छोट्या लसणामध्ये कोण कोणते गुण लपलेले आहेत.
एंटीबायोटिक - प्रथम लसणाला सोलून घ्या, लसणाच्या एका कुडीचे ३ ते ४ तुकडे करा. दोन्ही वेळेच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने लसणाचे दोन तुकडे तोंडात ठेऊन चगळा त्यानंतर पाणी प्या. > रोज लसणाचे सेवन केल्यास टीबी होत नाही. लसून हे किटाणुनाषक आहे, एंटीबायोटिक औषधांसाठी हा एक चांगला विकल्प आहे, लसणामुळे टीबीचे किटाणू नष्ट होतात.> डोके दुखीसाठी रामबाण उपाय - एका लसणाच्या ४ कुड्या तीस ग्राम मोहरीच्या तेलामध्ये टाका. तेल थोडे गरम करा आणि त्या तेलाने मालिश करा डोके दुखणे थांबेल.

दमा दूर करण्यासाठी उपयुक्त - दम्याच्या त्रासावर लसून हे एक उपयुक्त औषध आहे. ३० मिली दुधामध्ये लसणाच्या पाच कुड्या टाकून दुध गरम करा. रोज हे गरम दुध पिल्याने दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. अद्र्काच्या चहामध्ये थोडा लसण टाकल्याने दमा नियंत्रित राहतो.

Dr. Praisy David
Dr. Praisy David
BAMS, Pune
Dr. Anand  Kale
Dr. Anand Kale
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 2 yrs, Pune
Dr. Bhushan Khedkar
Dr. Bhushan Khedkar
Specialist, Dietitian dietetics, 8 yrs, Pune
Dr. Lalitkumar Thakare
Dr. Lalitkumar Thakare
BPTh, Homecare Physiotherapist Neuro Physiotherapist, 9 yrs, Pune
Dr. Manohar Wani
Dr. Manohar Wani
MBBS, General Physician, 44 yrs, Pune
Hellodox
x