Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

बटाटा हा विविध स्वरूपात आहारात समाविष्ट केला जातो. बटाट्याचा आहरातील समावेश चविष्ट असल्याने अनेकांना ती भाजी आवडते. मात्र बटाट्यावर ताव मारणं काहींच्या आरोग्यासाठी त्रासदायक आहे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर बटाटा आटोक्यात खाणं फार गरजेचे आहे.

गॅसचा त्रास -
अधिक प्रमाणात बटाट्याचा आहारात समावेश केल्याने पोटात गॅस होण्याचा त्रास उद्भवू शकतो. तुम्हांला पचनाचा त्रास असल्यास बटाट्याचा आहारातील समावेश नियंत्रणात ठेवा. अशावेळेस बटाटा कमी खावा.

रक्तातील साखर -
मधुमेहाच्या रूग्णांनीदेखील आहारात बटाट्याचा समावेश कमी करावा. रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी बताटा प्रमाणात खाणं गरजेचे आहे. बटाट्यामध्ये ग्लायस्मिक इंडेक्स अधिक असल्याने झटकन रक्तातील साखरेचे प्रमाणाही वाढते.


रक्तदाब -
रक्तदाबाच्या रूग्णांसाठीही अधिक प्रमाणात बटाटयाचं सेवन करणं त्रासदायक ठरू शकतं. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास बळावतो. रिसर्चनुसार, आठ्वड्यातून चार वेळेस किंवा त्याहून अधिक वेळेस बटाटा आहारात असल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका बळावतो.

वजन वाढणं -
बटाट्याचा योग्यरित्या आहारात समावेश केल्यास बटाटा तुम्हांला वजन घटवायलाही मदत करू शकते. मात्र डीप फ्राय, फ्रेंच फ्राईजच्या स्वरूपात बटाट्याचा आहारात समावेश करणं टाळा. फॅट्स वाढतील अशा स्वरूपात बटाटा खाऊ नका.

खजूर हा नैसर्गिकरित्या गोड असल्याने शरीराराला उर्जा देण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. खजूर तुम्ही अनेकदा सुकलेला किंवा काळा, चॉकलेटी स्वरूपात खाल्ला असेल. मात्र ताज्या स्वरूपातील खजूरदेखील आरोग्याला फायदेशीर आहे.

ताज्या खजूराचे आरोग्यदायी फायदे
ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. मग पहा अशा स्वरूपात खजूर खाल्ल्याने होणारे आरोग्यदायी फायदे.

फायबर घटक -
खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगचा त्रास कमी होण्यास मदत होते.


मिनरल्स -
ताज्या खजूरामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा नैसर्गिक स्वरूपात शरीराला पुरवठा करण्यास
खजूर फायदेशीर आहे.

व्हिटॅमिन्स -
ताज्या खजूरामध्ये व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी, केसांमधील शुष्कता कमी करण्यासाठी मदत होते.

कॅलरी -
तुम्ही कॅलरीचं गणित सांभाळून आहाराचं पथ्यपाणी सांभाळत असाल तर आहारात नक्कीच ताज्या खजुराचा समावेश करा. सुमारे 80 ग्रॅम ताज्या खजुरातून 142 कॅलरीज मिळतात. यामुळे भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

लो ग्लॅस्मिक इंडेक्स -
ताज्या खजुरामुळे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते. सोबतच मूड स्विंग्स कमी होतात.

प्रोटीन्स -
प्रोटीन्समुळे मसल्सला मजबुती मिळण्यास मदत होते.

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी भोजनाला महत्त्व देतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. रोजच्या आहारात बीटचा वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. बीटमध्ये अनेक आरोग्यदायी गुण आहेत.

बीटचे फायदे
1. रक्तदाब नियंत्रण : बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. गाजर आणि बीटचा 1-1 कप रस पिल्याने याचा मोठा फायदा होता. ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खायला द्या.

2. रक्ताची कमतरता : रोज सकाळी 1 कप बीटचा रस प्यायल्याने त्याचा खूप मोठा फायदा होता. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. रोज 30 ग्रॅम बीट खाल्याने याचा मोठा फायदा होतो. यामुळे लीवरची सूज देखील कमी होते.


3. कॅल्शिअमची स्रोत : बीट कॅल्शिअमची पूर्तता करतो. कॅल्शिअम शरिरासाठी महत्त्वाचं तत्व आहे. कॅल्शिअममुळे हाडे आणि दात मजबूत होतात. बीट शरिरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करतो. मुलांनी आणि युवकांनी बीट चाऊन खालं पाहिजे. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात.

4. कफचा त्रास : बीटमुळे कफ होण्याची समस्या दूर होते. बीट श्वसननलिका श्वच्छ ठेवते. बीटच्या रसमध्ये मध टाकून लावल्याने शरिरावर खाज येते त्या ठिकाणी लावल्याने ही समस्या दूर होते.

5 सांधे दुखी थांबते : बीटमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. बीटमध्ये सोडियम, पोटेशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयरन, विटामिन बी1, बी2 आणि सी मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये कॅलरीज खूप कमी असते.

6. गॅसची समस्या : दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधिस समस्या दूर होतात. बीट रोज खाल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

7. महिलांसाठी लाभदायक : बीटमध्ये फॉलिक अॅसिड असतं. जे गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असतं. बीटमुळे महिलांना ऊर्जा मिळते. मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्याने त्यापासून सूटका होते. रक्त वाढवण्यात बीट फायदेशीर ठरतं. बीटमुळे दूध वाढतं.

आरोग्यासाठी निसर्गात अनेक महत्त्वाच्या वस्तू आहेत जे आपलं शरीर आरोग्यदायी ठेवतात. अंजीर देखील असंच एक फळ आहे. अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. अंजीर हे थंड असले तरी ते पचण्यास थोडं जड आहे. सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते.

अंजीर खाण्याचे फायदे

1. पोट साफ करण्यासाठी अंजीरचा मोठा फायदा होतो. खावे. अंजीरमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे पोट साफ होतं.

2. अंजीरमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे आजारांपासून ऱक्षण होतं.


3. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर उत्तम आहे.

4. जागरण झाल्यास चहा किंवा इतर पदार्थ खाण्यापेक्षा अंजीरचं सेवन करावं.

5. अशक्तपणा जाणवत असेल तर अंजीर खावे.

वाढतं वय आणि त्यामुळे शरीरात होणारे बदल या साऱ्याच्या हल्लीच्या जीवनशैलीत बराच विचार केला जातो. मुख्य म्हणजे अनेकजण आपल्या वाढत्या वयाचा थेट परिणाम हा सौंदर्यावर, परिणामी त्वचेवर होणार, या चिंतेनेसुद्धा त्रस्त असतात. याच चिंता आणि या तणावापासून दूर राहण्यासाठी मग सुरुवात होते ती म्हणजे विविध उपाय शोधण्याची. महागडी औषधं या अनेकांचाच शेवटचा पर्याय असतोत. पण, तुम्हाला ठाऊक आहे का, रोजच्या वापरात असणारी फळंही त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी तितकीच फायद्याची असतात. चला तर, जाणून घेऊया ही फळं नेमकी आहेत तरी कोणती याविषयी...

सफरचंद-
सफरचंदामध्ये असणारा एन्झामाईन नावाचा घटक त्वचेचा तजेला कायम राखण्यास मदत करतं. त्वचेला एक वेगळी चमकही सफरचंदामुळेच मिळते. ‘अॅन अॅपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे’ असं नेहगमीच म्हटलं जातं. त्वचेच्या बाबतीतही असंच काहीसं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

पपई
त्वचा उजळण्यासाठी पपईचं सेवन करणं कधीही उत्तम. रोजच्या रत पपईचा समावेश केल्यास चेऱ्यावरील सुरकुत्या, डाग इत्यादीपासून तुमची सुटका होऊ शकते.


स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं. या घटकांमुळे त्वचेचं सौंदर्य कायम राहण्यास मदत होते. तसंच त्वचेतील कोलेजन वाढण्यासही स्ट्रॉबेरी उपयुक्त ठरतात.

किवी-
सहसा डेंग्यू या आजारावर उपाय म्हणून खाल्लं जाणारं किवी हे फळ आता अनेकांच्या आवडीचं झालं हे. डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळं म्हणजेच डार्क सर्कल, चेहऱ्यावरील सुरकुत्या यांचं प्रमाण कमी करण्यासाठी कीवीतील अँटीऑक्सिडंटस उपयुक्त ठरतात. या फळात असणारं ई आणि क ही जीवनसत्व वाढतं वय लपवण्यास उपयुक्त ठरतात.

कलिंगड-
शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी कलिंगडाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. मुख्य म्हणजे सौंदर्याची अर्धीअधिक मदार ही त्वचेवर असते आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी पाणीही तितकच गरजेचं असतं. परिणामी चिरतरुण सौंदर्यासाठी कलिंगड़ खाणं खूप फायद्याचं ठरतं.

Dr. Pawan Sarda
Dr. Pawan Sarda
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Abhay Singh
Dr. Abhay Singh
MBBS, Family Physician, 2 yrs, South Delhi
Dr. Zainab Shaikh
Dr. Zainab Shaikh
BAMS, Ayurveda, 2 yrs, Pune
Dr. Vinod Shingade
Dr. Vinod Shingade
BHMS, General Physician Homeopath, 10 yrs, Pune
Dr. Sachin Hundekari
Dr. Sachin Hundekari
MBBS, Cardiologist, 4 yrs, Pune
Hellodox
x