Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

सलाड, सॅन्डव्हिचमध्ये हमखास काकडीचा समावेश केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार काकडी नैसर्गिकरित्या शरीरात थंडावा निर्माण करायला मदत करते. काकडीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र काही लोकांना काहीही खाल्लं की त्यानंतर त्यावर थेट पाणी पिण्याची सवय असते. काकडीच्या सेवनावर पाणी पिण्याची सवय आरोग्याला त्रासदायक आहे.

काकडी सोलून खा किंवा थेट सालीसकट खा.. पण त्यावर लगेजच पाणी पिणं काही लोकांसाठी कसे त्रासदायक ठरते हे तुम्हांला ठाऊक आहे का?

काकडीमध्ये पोषकघटक
काकडीमध्ये सुमारे 95% पाण्याचा अंश असतो. सोबतच काकडीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅग्नीज घटक असतात.

काकडीवर लगेजच जेव्हा पाणी प्यायले जाते तेव्हा या पोषक घटकांचा शरीराला फायदा होत नाही. शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक शोषले न गेल्याने त्याचे सेवन निष्फळ ठरते.

नेमका कोणता त्रास होतो?
काकडीवर पाणी प्याययास पचनाशी निगडीत काही त्रास वाढतात. खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी शरीराला विशिष्ट पीएच लेव्हलची गरज असते. काकडीसोबत किंवा काकडीच्या सेवनानंतर लगेच पाणी प्यायल्यास पीएच लेव्हल कमी होते. खाल्लेलं पदार्थ पचवण्यासाठी आवश्यक अ‍ॅसिड नसल्याने पचनकार्य कमजोर होते. परिणामी पचनाशी निगडीत समस्या बळावतात.

डायरिया आणि लूज मोशनचा त्रास होत असल्यास काकडीच्या सेवनावर पाणी पिण्याची चूक करू नका. काकडीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, पचन सुधारण्यास मदत करते. मात्र काकडीवर पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठता आणि डायरियाचा त्रास वाढवतात.

कधी प्याल पाणी?
काकडी खाल्ल्यानंतर तुम्ही अर्धा तासानंतर पाणी पिऊ शकता.

वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर हेल्दी उपाय म्हणून फळांचा विचार केला जातो. ऋतूमानानुसार आहारात फळांचा समावेश करणं आवश्यक असल्याचे सांगितले जाते. मात्र चूकीच्या पद्धतीने फळांचा आहारात समावेश केल्यास त्यामुळे काही आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रामुख्याने वेट लॉसच्या मिशनवर असणार्‍यांसाठी फळांचा आहारात समावेश करणं त्यांचं वजन वाढण्याचं एक कारण असू शकतं.

कार्बोहायड्रेट्स आवश्यक मात्र ...
कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला उर्जा मिळते. मात्र वजन आटोक्यात ठेवताना कोणत्या फळाचा कसा समावेश करावा याकरिता पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार, कोणतेही फळ प्रमाणात खाल्ल्यास त्यचा आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही.

कोणती फळं खाल्ल्याने होऊ शकतो त्रास ?
केळं -
दूधासोबत केळं खाल्ल्याने वजन वाढतं. त्यामुळे वजन वाढवणार्‍यांसाठी हा उपाय अधिक फायदेशीर आहे. दूधातून प्रोटीन आणि केळ्यातून शुगरचा पुरवठा होतो. शरीरात कॅलरीचं प्रमाण वाढतं.


सुके जर्दाळू -
सुके जर्दाळू हे कॅन्डीप्रमाणे असतात. अनेकदा लोकं प्रवासादरम्यान सुके जर्दाळू चघळतात. चविष्ट जर्दाळूंमुळे अनेकजण त्यामधील फ्रुक्टोजचं प्रमाण लक्षात घेत नाहीत. यामुळे वजन वाढू शकते. लठ्ठपणा वाढण्यासाठी प्रमाणापेक्षा अधिक जर्दाळू खाणं त्रासदायक ठरू शकतं.

लठ्ठपणा कमी करताना 'या' चूकांंकडे दुर्लक्ष नको !
द्राक्ष
द्राक्ष चविष्ट असले आणि एकदा खाल्ले की खातच रहावे असे वाटत असले तरीही यामुळे लठ्ठपणाचा त्रास वाढतो. द्राक्षामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे वजन वाढू शकतं.

अननस
अननस आरोग्याला फायदेशीर आहे. त्यामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक अनेक आजारांचा सक्षमपणे सामना करण्यासाठी शरीराला मजबूत करण्यास मदत करतात. अननसाच्या अतिसेवनाने वजन वाढते. कॅलरीजचं प्रमाण अधिक असल्यने वजनही वाढते.

अ‍ॅव्हॅकॅडो
अ‍ॅव्हॅकॅडो हे परदेशी आणि आरोग्यदायी फळ आजकाल भारतामध्येही प्रसिद्ध आहे. त्याचा आहारात समावेश केल्याने वजन वाढण्यास मदत होते.

सुकामेवा
मनुका, बदाम असा सुकामेवा कॅलरीजयुक्त असतो. त्याच्या नियमित अतिसेवनामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

नारळ
नारळामध्ये प्रोटीन घटक मुबलक असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. शरीरात लठ्ठपणाची समस्या वाढते.

पिच -
नियमित पिच खाल्ल्याने वजन वाढते. यामध्ये प्रोटीन घटक मुबलक असल्याने वजन वाढते.

वांग सर्वांनाच आवडतं असं नाही. पण अशीही काही लोक आहेत त्यांना वांग फार आवडतं. वांग खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. वांग खाण्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहिती नसतील...

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी वांग खाणे अतिशय फायदेशीर ठरेल. वांग्यात खूप कमी कॅलरीज असतात. १०० ग्रॅम वांग्यातून तुम्हाला फक्त २५ कॅलरीज मिळतात. यात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. तसंच थोडसं वांग खाल्याने पोट भरतं आणि ओव्हर इटिंग टाळलं जातं.

हृदयाचे आरोग्य

वांग्यात भरपूर प्रमाणात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॉमिन बी ६ आणि फ्लेवोनॉइड्स असतात. त्यामुळे हृद्यविकारांचा धोका कमी होतो. याशिवाय यातील अॅंटीऑक्सीडेंट्स नसा स्वस्थ ठेवतात आणि हार्ट अॅटकपासून दूर ठेवतात.

हेल्दी लिव्हर

वांग्यातील फायबर्समुळे लिव्हर हेल्दी राहण्यास मदत होते. वांग्याच्या सेवनामुळे ब्लड कोलेस्ट्रॉलला पित्त बनवण्यासाठी लिव्हरला मदत होते.

ब्लड शुगर नियंत्रित राहण्यासाठी

मधुमेहींसाठी वांगाचे सेवन उपयुक्त ठरते. कारण यात कार्बोहायड्रेट कमी आणि फायबर्स अधिक असतात. फायबर्सचे अधिक प्रमाण ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

कॅन्सरपासून बचाव

वांग्यात फायबर्स आणि अॅंटीऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो. फायबर्समुळे पचनतंत्र सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स दूर होण्यास मदत होते. टॉक्सिन्समुळे कोलेन कॅन्सरचा धोका असतो. याशिवाय वांग्यातील अॅंटीऑक्सीडेंट्समुळे फ्रि रेडिकल डॅमेजशी लढण्यास पेशींना मदत होते.

गरोदरपणाच्या काळात आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. या काळात स्त्रियांना स्वतःच्या आरोग्यासोबतच गर्भाची काळजी घेणं गरजेचे असते. स्त्रियांच्या आहारावर गर्भाची वाढ आणि विकास अवलंबून असतो. म्हणूनच आहारात काही पदार्थांचा समावेश करणं हितकारी आहे.

गरोदरपणाच्या काळात डाळिंब खाणं आवश्यक आहे. डाळिंबामुळे गरोदर स्त्रियांच्या सोबतीने गर्भाच्या आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.

डाळिंबाचे फायदे -
गरोदरपणाच्या काळात स्त्रियांच्या शरीरात मुबलक प्रमाणात रक्त असणं आवश्यक आहे. डाळिंबामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. अ‍ॅनिमियाचा धोका कमी करण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.


गरोदरपणाच्या काळात अनेक पोटाचे विकर बळावण्याची शक्यता असते. यामध्ये अपचन, बद्धकोष्ठता, पोट बिघडणे, पचनसंस्थेचे त्रास बळावतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.

गर्भाच्या हाडांना मजबुती देण्यासाठी गरोदर स्त्रियांमध्ये डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरते. डाळिंबामुळे मांसपेशींनादेखील मजबुती मिळते.

गरोदरपणाच्या काळात रक्त कमी असल्यास प्रसुतीच्या वेळेस त्रास होऊ शकतो. डाळिंबामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. सोबतच नॉर्मल डिलेव्हरी होण्यासही मदत होते.

अनेकदा पाण्यासोबत औषध घेणे अनेकांना जमत नाही. म्हणून दूध किंवा फळांच्या रसासोबत औषध घेण्याची सवय असते. मात्र तुम्हांलाही फळांच्या रसासोबत औषध घेण्याची सवय असेल तर थोडं थांबा. कारण ही धोक्याची घंटा आहे. कोणत्याही फळाच्या रसासोबत औषध घेणं आरोग्याला धोकादायक आहे. काही वेळेस फळाच्या रसामुळे औषध घेतल्याने त्याचा परिणाम कमी होतो.

काय होतो परिणाम
फळांच्या रसासोबत औषध घेतल्याने अ‍ॅलर्जी होण्याचा धोका असतो. त्यामुळे द्राक्ष, संत्र आणि कधीकधी सफरचंदाच्या रसासोबत औषधं घेणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.

द्राक्षाच्या रसामुळे औषधांचा रक्तामध्ये मिसळणारा परिणाम कमी करण्यास मदत होते. यामुळे रक्तदाब कमी जास्त होणं, हृद्याची धडधड कमी, जास्त होणं असा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा रूग्णांना द्राक्षाच्या रसापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.


काय सांगते संशोधन ?
एका संशोधनामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, संत्र, सफरचंद, द्राक्ष यांचा रस कॅन्सर किंवा अ‍ॅन्टी बायोटिक्स घटकांचा औषधामधील परिणाम कमी करण्यास मदत करतात. द्राक्षाच्या रसासोबत औषध घेतल्यास त्याचा केवळ निम्मा परिणाम शरीरात दिसतो.

औषध हे नेहमी पाण्यासोबत घेणंच अधिक सुरक्षित आहे. ग्लासभर पाण्यासोबत औषधाची गोळी घेतल्यास ते शरीरात उत्तम प्रकारे मिसळले जाते. थंड गार पाण्याने औषध घेण्याची चूक करू नका.

Dr. Gauri Karve
Dr. Gauri Karve
MBBS, 6 yrs, Pune
Dr. Sandeep Darunde
Dr. Sandeep Darunde
BAMS, Optician Ophthalmologist, 3 yrs, Pune
Dr. Rekha Pohani
Dr. Rekha Pohani
Specialist, Dietitian dietetics, 13 yrs, Pune
Dr. Cliford John
Dr. Cliford John
BDS, Dental Surgeon Root canal Specialist, 6 yrs, Pune
Dr. Archana Bhilare
Dr. Archana Bhilare
BDS, Dentist Endodontist, 8 yrs, Pune
Hellodox
x