Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

हा ज्यूस म्हणजे बीटचा ज्यूस होय. बीट तुम्हाला माहितीच असेल, परंतु काहीजण हे आवडत नाही म्हणून खाण्याचे टाळतात. मात्र याचे अनेक फायदे आहेत. आरोग्यासाठी चांगले असणारे हे बीट आता मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाही मदत करत असल्याचे नुकत्याच झालेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

बीटचा ज्यूस पिण्याने मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत असून, वृद्धांचा मेंदू तरुणांप्रमाणे कार्यक्षम राहण्यास मदत होते.

अमेरिकेच्या वेक फॉरेस्ट विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले.

यामध्ये 55 किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या 22 पुरुष आणि महिलांचा समावेश करण्यात आला होता.

सहभागी झालेल्यांना आठवडयातून तीन वेळा असे सहा महिने बीटचा रस पिण्यास दिला. रस पिण्यापूर्वी त्यांना 50 मिनिटे चालण्यास सांगितले होते.


सहभागी झालेल्या निम्म्या लोकांना बीटमधून 560 मिली ग्रॅम नायट्रेट मिळाले, तर इतरांना बीटमधून अतिशय कमी प्रमाणात नायट्रेट उपलब्ध झाले.

ज्या वेळी तुम्ही व्यायाम करता, त्या वेळी तुमच्या मेंदूमधून सोमॅटोमोटर कॉर्टेक्‍स स्नायूतील माहिती प्रक्रिया सुरू करतो. व्यायाम करण्यामुळे सोमॅटोमोटर कॉर्टेस मजबूत होण्यास मदत होते.

व्यायाम करण्यामुळे आपल्या मेंदूतील ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होतो. त्या वेळी बीटचा रस घेतल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्‍सिजनचा पुरवठा होतो.

यामुळे सोमॅटोमोटर कॉर्टेस बळकट करण्यासाठी योग्य वातावरण मिळते. याचा थेट परिणाम मेंदूवर होत असून, तो अधिक कार्यक्षम होण्यासाठी मदत होत असल्याचे अभ्यासात दिसून आल्याचे संशोधकांनी सांगितले.

व्यायाम आणि बीट यामुळे मेंदूवर सकारात्मक परिणाम होत असून, त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होत असल्याचे या अभ्यासात दिसून आले.

सर्वात जास्त गर असलेले फळ म्हणजे फणस अशी फणसाची ओळख होऊ शकते. हे असं फळ किंवा अशी भाजी आहे ज्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आपल्यातील अनेकांना ज्ञात नाहीत. आज आपण या फळाचे काही गुणकारी गुणधर्म जाणून घेऊया.


फणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. व्हिटॅमिन ए, सी, थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह यांचा फणसात मोठय़ा प्रमाणात समावेश असतो.

पिकलेल्या फणसाचा पल्प करून तो पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास ताजेतवाने तर वाटतेच, पण हृदयाचे विकार जडलेल्या व्यक्तींना त्याचा फायदाही होतो.
फणसात मोठय़ा प्रमाणावर असणारे पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू शकतो.

भरपूर प्रमाणात लोह असल्याने अँनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचं ठरतं.

थायरॉईडचा त्रास असणार्याा लोकांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यात असलेले खनिज आणि तांबे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.

हाडांसाठी फणस खाणे खूप गुणकारी असते. या फळात असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडांसाठी गुणकारी असते.
फणसात असलेले व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका यामुळे कमी होऊ शकतो.

फणसात असणारे व्हिटॅमिन 'ए' डोळ्यांची शक्ती चांगली ठेवते. तसेच त्वचा उजळण्यासाठीसुद्धा तो फायदेशीर ठरते.

बोर सर्वांच्याच परिचयाचे असते. मात्र त्याचे झाड फारच कमी लोकांनी पाहिलेले असते. झुडुपवजा दिसणारे हे झाड काही ठिकाणी १० मीटरपर्यंत उंच वाढलेले दिसून येते. माळरानावर दिसणारे हे झाड पानगळीच्या वनात देखील दिसते. बोराचे शास्त्रीय नाव Ziziphus mauritiana / Ziziphus jujube असे आहे. बोराच्या झाडासारखे दिसणारे तोरण (वेल) हे आर्द्र पानगळीच्या निमसदाहरित झाडासारखेवनात दिसून येते.

जंगलात गेल्यावर बोर हे झाड ओळखायचे असेल तर त्याची वरुन हिरवी असलेली आणि खालच्या बाजूने पांढरट चंदेरी
रंगअसलेली पाने ही उपयुक्त खूण ठरु शकते. पानाला मुख्य तीन शिरा ठळकपणे दिसतात. पानाजवळ छोटे काटे असतात. क्वचित जोडीने येणारे काटे कधी कधी वळलेले असतात. त्यामुळे शेळ्यांना पाने खायला अडथळा येऊ शकतो.

पिवळसर पांढर्‍या बारक्या (२-४ सेंमी)फुलांमुळे पावसाळ्यात हे झाड काटेरी असूनदेखील अतिशय आकर्षक दिसते. बर्‍याचवेळा फूले फूलण्याचा काळ भौगोलिक परिस्थितीमुळेथोडा बदललेला दिसतो. बोराची फळे गोलसर असतात. पिकल्यावर ती पिवळ्या-गडद बदामी रंगाची दिसतात.

बोराच्या झाडावर छोट्या पिवळ्या, राखाडी चिमण्यांची घरटी दिसून येतात. पहीरीच्या काठावर असणार्‍या बोराच्या झाडावर १०-१५ च्यासंख्येने सुगरणीची घरटी आढळून येतात. झाडांच्या पानावर कॉमन पिरो, कॉमन सिल्व्हरलाईन फुलपाखराच्या अळ्या आढळून येतात.

पक्षी,
फुलपाखरांकरीता उपयुक्त असणार्‍या या झाडाच्या लाकडाचा उपयोग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची अवजारे बनविण्याकरीता केला जातो. जळाऊ लाकूड म्हणून तर सर्रास उपयोग केला जातो. आयुर्वेदात बोराचे मूळ, फळ, फुलं, औषधेबनविण्याकरीता वापरले जाते. फळे पौष्टिक असून त्यापासून चविष्ट लोणचे करता येते.

We all must have seen this fruit that looks identical to an orange. Yes, you guessed that right, it's kinnow! We have seen kinnows in juice shops, supermarkets and weekly fruit markets. Popularly known as Punjab's king of fruits, kinnows are a hybrid variety of two kinds of citrus cultivars - King (Citrus nobilis) and Willow Leaf (Citrus x deliciosa). According to nutritionists and health experts, adding kinnows to our daily diet can improve our health in many ways. So, let's have a look at some health benefits of including this orange lookalike in our daily meals:

1. Aids Digestion


One of the best qualities of kinnows is that it absorbs into stomach and helps in digestion without putting any pressure on the digestive tract. So, if you are someone with a weak stomach or have any indigestion issues, then you can skip drinking milk and consume kinnow juice in your breakfast. It is suggested to consume the fresh fruit twice a day for effective results.


2. Alleviates Acidity And Heartburn


If you are prone to suffering from acidity or heartburns, then kinnow is the fruit for you. Kinnows are rich in mineral salts; therefore, they are capable of alleviating acidity. It is believed that daily consumption of kinnow fruit is quite effective for those who are leading a sedentary lifestyle.

3. Rich in vitamin C And Minerals


Kinnows are extremely rich in vitamin C. Vitamin C acts as anti-aging agent. Eating kinnows or drinking kinnow juice regularly can help combat wrinkles due to ageing. Moreover, the minerals present in kinnows not only enhance our overall metabolism but also help us get a flawless and glowing skin.


4. Natural Body Energiser


Consuming kinnows regularly will energise our body. Power-packed with huge amounts of carbohydrates including glucose, fructose and sucrose, kinnows are known to be one of the best sources of energy. If you regularly workout or have a hectic work life, consume kinnow juice as your morning or post workout drink.


5. Balances Cholesterol Levels


According to health experts, kinnows are known to reduce the presence and effects of bad cholesterol and increase the amount of good cholesterol in our body. Meaning, consuming kinnows daily can reduce the chances of atherosclerosis, heart attack and stroke.

In comparison to other citrus fruits, kinnow contains more calcium, which means a regular consumption could make your bones stronger.


Fun fact: The peel of this fruit is used in various herbal cosmetic products and is an effective home remedy to treat those stubborn blackheads.

टोमॅटो चविष्ट असून पाचक असतात.
पोटाच्या आजारांवर याचा प्रयोग औषधी प्रमाणे केला जातो.

जीव घाबरणे, कळपट ढेकर येणे, तोंडातील छाले, हिरड्यांच्या दुखण्यात टोमॅटोचे सूप, आलं आणि काळे मीठ घालून सेवन केल्याने लगेचच फायदा होतो.

टोमॅटोच्या सूप मुळे शरीरात लवकरच स्फूर्ती येते. पोट हलकं राहतं.

हिवाळ्यात गरमा गरम सूप प्यायल्याने सर्दीत आराम मिळतो.

अपेंडिसाइटिस आणि शरीराची स्थूलतेत टोमॅटोचे सेवन फायदेशीर ठरते.

रक्तदाबात याचा प्रयोग नियमित केल्याने आराम मिळतो.

संधी वात आणि एक्जिमामध्ये याचे सेवन केल्याने आराम पडतो.

आजारानंतर आलेला थकवा दूर करण्यासाठी टोमॅटो सर्वात चांगला विकल्प आहे.

मधुमेहच्या रोगावर हा सर्वश्रेष्ठ पथ्य आहे.

Dr. Vivek Patil
Dr. Vivek Patil
MDS, Dentist Pediatric Dentist, 13 yrs, Pune
Dr. Pradnya Bafna
Dr. Pradnya Bafna
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Dr. Abhay Jamadagni
Dr. Abhay Jamadagni
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Aarti Vyas
Dr. Aarti Vyas
BAMS, Ayurveda Panchakarma, Pune
Dr. Bharat Oza
Dr. Bharat Oza
BAMS, General Surgeon Proctologist, 9 yrs, Pune
Hellodox
x