Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

बर्‍याच वेळा अस होत की जास्त केमिकल आणि शॅम्पूचा वापर केल्याने केसांचे बरेच आजार होण्याची शक्यता असते. जास्तकरून महिलांचे कोरडे केस, कोंडा आणि
केसांची ग्रोथ थांबल्या सारखे वाटते. महागडे केमिकल युक्‍त हेयर प्रॉडक्ट सोडून तुम्ही नॅचरल उपायांच्या मदतीने केसांच्या सर्व समस्येला दूर करू शकता. बटाटा एक अशी वस्तू आहे ज्याचे सेवन केल्याने तुम्ही केसांच्या सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता.

तुम्ही बटाट्यात मध, दही आणि लिंबाचा रस मिसळून तुमच्या केसांशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.

1. दाट आणि सॉफ्ट केसांसाठी

दोन ते तीन बटाटे घ्या, याला सोलून याचे पेस्ट तयार करा. यानंतर या पेस्टमध्ये अंड्याचा पिवळा भाग आणि मध मिसळा. त्यानंतर या पेस्टला केसांवर लावा. याला काही वेळ वाळू द्या. जेव्हा हा पॅक वाळून जाईल तेव्हा चांगल्या माइल्ड शँपूने केस धुऊन घ्या. दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने तुम्हाला केसांमध्ये फरक दिसू लागेल.

2. लांब केसांसाठी

दोन बटाटे घ्या आणि याचा रस काढा. यात दोन चमचे एलोवेरा जेल मिसळा. या मिश्रणाला केसांच्या मुळांना लावा. याला 30 ते 40 मिनिटापर्यंत केसांमध्ये राहू द्या. यानंतर पाण्याने केस धुऊन घ्या. लगेचच शँपू लावायची गरज नसते.

3. कोंडा असलेल्या केसांसाठी

एक किंवा दोन बटाटे घेऊन त्यांचा रस काढून घ्या. या रसात लिंबू आणि दही मिसळून त्या पेस्टला केसांना लावून थोड्यावेळेसाठी राहू द्या. नंतर एखाद्या चांगल्या शँपूने केस धुऊन घ्या.

कारल्याची भाजी खायची म्हटलं की अनेकांकडून नाके मुरडली जातात. अनेकांना ही भाजी अजिबातच नको असते. कारलं कडू असल्याने त्यांची भाजी खाण्यास अनेकांना रस नसतो. पण कारले खाण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळाले तर तुम्ही कारल्याच्या भाजीला कधीही नाही म्हणणार नाही. कारलं हे आपल्या शरीरातील रक्त साफ करतं. सोबतच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कारलं फायदेशीर असतं. तसेच दमा, पोटदुखी या आजारांवरही हा रामबाण उपाय आहे.

रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणं

कारल्याचा वापर एका नैसर्गिक स्टेरॉयडच्या रुपात केला जातो. कारण यात केरेटिन नावाचं रसायन अधिक प्रमाणात आढळतं. या सेवन केल्यास रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित राहते.

पोषक तत्वांचा भांडार कारलं

कारल्यामुळे शरीरातील शुगर लेव्हल जितकी नियंत्रित केली जाते, तितकं शरीराला पोषक तत्व मिळतात. त्यासोबतच कारल्यात तांब, व्हिटॅमिन बी, अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडसारखे तत्व असतात. यामुळे रक्त साफ स्वच्छ राहतं आणि किडनी सुद्धा निरोगी राहते.

कारलं खाण्याचे फायदे

- कफचा त्रास असलेल्यांना कारलं खाल्ल्ल्यांने आराम मिळतो.
- दमा असल्यास विना मसाल्याची भाजी खाल्ल्यास फायदा होतो.
- पोटात गॅसची समस्या किंवा अपचन झालं असेल तर कारल्याने आराम मिळतो.
- लखवा गेलेल्या रुग्णांनी कच्च कारलं खाल्ल्यास फायदा होतो.
- ओमोटींग, पोटात दुखणे यांसारखे त्रास होत असेल तर कारल्याच्या रसात पाणी आणि काळं मिठ घालून प्यायल्यास लगेच आराम मिळतो.
- काविळ झालेल्यांना आराम मिळण्यासाठीही कारलं फायदेशीर आहे. त्यासाठी रुग्णांनी कारल्याचा रस घ्यावा.
- कारल्यांच्या रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते.
- तोंडात फोडं आल्यास कारल्याचा रसाने गुरळा करा, याने आराम मिळेल.

मुंबई : जर तुम्हाला देखील मधुमेहाचा त्रास असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण आता कोणतेही औषध न खाता तुम्ही तुमच्या शरीरातील साखर कमी करू शकता. अगदी घर बसल्या हा उपया तुम्ही करू शकता. भेंडी खाऊन तुम्ही तुमच्या शरीरातील साखर कमी करू शकता. याचा कोणताही साइड इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार नाही.

बघूया कसं कराल मधुमेह कंट्रोल
कच्ची भेंडी खाल्यामुळे मधुमेह आटोक्यात येतो. यामध्ये असलेल्या फायबर डायबिटिक असलेल्या लोकांना साखर कमी करण्यास अतिशय मदत करते.

कच्ची भेंडी अशा प्रकारे शरीरात करते काम
दोन भेंडी घेऊन ते वरून आणि खालून दोन्ही बाजूने कापा. यामधून एक सफेद चिकट द्रव बाहेर पडेल तो तसाच राहू द्या. जेव्हा रात्री तुम्ही झोपायला जाल तेव्हा या कापलेल्या भेंडी तुम्ही ग्लासभर पाण्यात टाकून ठेवा. आणि हे ग्लास झाकून ठेवा.

सकाळी उठल्यावर ही कापलेली भेंडी काढून टाका आणि ते पाणी प्या. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील साखर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही हा असा प्रकार अनेक महिने करा. कच्चा भेंडीप्रमाणेच शिजवलेली भेंडी देखील अतिशय फायदेशीर आहे.

किडनी रोगापासून देखील होईल सुटका
टाइप 2 डायबिटीज झाल्यामुळे किडनीवर देखील त्याचा फरक पडतो. त्यावेळी जर तुम्ही भेंडी खाल्ली तर त्याचा नक्की फरक पडेल.

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास होतो. अशावेळेस मुबलक पाण्यासोबतच आहारात फळभाज्या, फळांचाही योग्य प्रमाणात वापर करणं गरजेचे आहे.
कलिंगड, टरबूज, ताडगोळा, शहाळ्याचं पाणी यासोबतच लिची खाणंही आरोग्यवर्धक आहे. लीची हे पाणीदार फळ आहे. सोबतच त्याला एक मंद सुगंध असल्याने उन्हाळ्यात लिची खाणं आरोग्यवर्धक आहे.

लिचीमध्ये आरोग्यदायी घटक -
लिची या फळामध्ये कार्बोहायड्रेट्स,व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. लिचीमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने तात्काळ एनर्जी मिळण्यास मदत होते. लिचीमुळे पोटात थंडावा निर्माण होतो.

तात्काळ मिळते उर्जा -
उन्हाळ्याच्या दिवसात थकवा येतो. अशावेळेस लिचीच्या सेवनामुळे त्यामधील नियासिन घटक शरीरातील हिमोग्लोबिन घटक निर्माण करण्यास मदत करतात. यामुळे शरीराला तात्काळ उर्जा मिळते.

कॅन्सरशी सामना -
लीचीमधील किमोप्रोटेक्टिव घटक ब्रेस्ट कॅन्सर सेल्स आणि ट्युमर यांची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. सोबतच लीची मधील फ्लेवोनॉईड्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक कॅन्सरचा बचाव करण्यास मदत करतात.

वजन घटवण्यास मदत
वजन घटवणार्‍यांसाठी लीची हे फळं फायदेशीर ठरतं. कपभर लीचीच्या अर्कामध्ये 125 कॅलरीज असतात. यामध्ये फॅट्स कमी असतात. फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असणारे पोटॅशियम घटक लिचीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. कपभर लीचीमध्ये 325 ग्राम पोटॅशियम घटक आढळतात. यामुळे दिवसभरातील 9% गरज पूर्ण होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक्षमता सुधारते
शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास लिची हे फळ मदत करते. कपभर लीचीमध्ये सुमारे 136 मिली ग्राम व्हिटॅमिन सी घटक आढळतात. नियमित लिचीच्या सेवनामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

सौंदर्य खुलवते
चेहर्‍यावर पिंपल्सचे डाग असतील त्वचा खुलवण्यासाठी लिची खाणं आरोग्यदायी ठरते. लिचीमध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे अ‍ॅन्टी एजिंगचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.

मुंबई : काही विशिष्ट वयापर्यंतच उंची वाढते. त्यामुळे साधारण वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलांच्या उंचीकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. या वयाच्या टप्प्यावर मुलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. यामुळे मुलांच्या शरीराच्या वाढीकडे नीट लक्ष देणं गरजेचे ठरते.

मुलांची उंची वाढण्यासाठी काय कराल ?
कॅल्शियम घटक
मुलांची उंची वाढवायची असेल तर त्यांच्या आहारत कॅल्शियम घटकांचा मुबलक प्रमाणात समावेश करणं आवश्यक आहे. कॅल्शियममुळे हाडांचा विकास होतो. याकरिता आहारात दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.

व्यायाम
व्यायाम आणि प्रामुख्याने योगाभ्यास केल्यानेही वजन आणि उंची दोन्ही वाढवणं शक्य आहे. लटकण्याचा व्यायाम करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. सोबतच भुजंगासन केल्यानेही उंची वाढण्यास मदत होते.

वाकून बसणं, चालणं टाळा
वाकून बसणं किंवा चालणंदेखील टाळा. यामुळे शरीराचा बांधा झुकलेला दिसतो. चालताना, बसल्यावर झुकून बसणं, चालणं टाळा. ताठ राहिल्यानं व्यक्तिमत्त्वही उठावदार दिसतं सोबतच शरीराची उंची उत्तम दिसते.

योग्य प्रमाणात खाणं
उंची वाढण्यासाठी शरीरात ग्रोथ हार्मोन्सची वाढ होणंही गरजेचे आहे. याकरिता नियमित आणि थोड्या थोड्या वेळानं खाणं गरजेचे आहे. दिवसातून किमान 5-6 वेळेस खाणं आवश्यक आहे.

अश्वगंधा
तुम्हांला उंची वाढवायची असेल तर आहारात अश्वगंधाचे सेवन करणं आवश्यक आहे. अश्वगंधामध्ये अनेक मिनरल्स घटक असतात, त्याच्या नियमित सेवनाने उंची वाढायला मदत होईल.

संतुलित आहार
नियमित संतुलित आहाराच्या सेवनामुळे उंची वाढण्यास मदत होते. त्यामुळे कितीही जंकफूड खाण्याचा मोह होत असला तरीही त्यावर आवर घाला आणि आहारात नियमित संतुलित जेवणाचा समावेश करा.

व्हिटॅमिन डी
उंची वाढवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे. कोवळ्या सूर्यप्रकाशातून शरीराला नैसर्गिक स्वरूपात व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो. सकाळ - संध्याकाळ किमान 20-30 मिनिटं कोवळ्या उन्हात फिरा.

आवळा
उंची वाढवण्यासाठी आवळ्याचं नियमित सेवन करणं आरोग्यदायी ठरते. आवळ्यातील व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराचा विकास होण्यास, उंची वाढण्यास मदत होते.

Dr. Manohar Wani
Dr. Manohar Wani
MBBS, General Physician, 44 yrs, Pune
Dr. Vijay Shirke
Dr. Vijay Shirke
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 17 yrs, Pune
Dr. Sucheta  Mokashi
Dr. Sucheta Mokashi
BDS, Dentist, 3 yrs, Pune
Dr. Anushree Bhonde
Dr. Anushree Bhonde
BPTh, Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Archana Bhilare
Dr. Archana Bhilare
BDS, Dentist Endodontist, 8 yrs, Pune
Hellodox
x