Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
गुणकारी खरबूज
#निरोगी जिवन#फळे आणि भाज्या#स्किनकेअर

खरबूज खाण्यात जितका लज्जतदार लागते तितकाच तो सौंदर्याच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. खाण्यासोबतच तुम्ही खरबूज त्वचेवर लावल्यास तुम्हाला 'इस्टंट ग्लो' मिळेल. त्याचा फेसपॅक लावल्यानंतर तुम्ही काही मिनिटातच उजळल्याचा अनुभव घेऊ शकाल.


खरबूजाचा रस आणि दही

खरबुजात मोठ्या प्रमाणावर पाण्याची मात्रा असते. त्यामुळे त्याला कापल्यानंतर बऱ्यापैकी रस निघतो. त्यातून निघणारा रस एका वाटीत एकत्र करून घ्यावा. जितका रस निघेल तितक्याच मात्रेत त्यात दही मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणाचा लेप चेहरा आणि मानेवर चांगल्या पद्धतीने लावावा. सुमारे १५ मिनिटांपर्यंत हा लेप तसाच राहू द्यावा. त्यानंतर चेहरा धुवावा. हा लेप लावल्यामुळे तुमचा चेहरा उजळल्यासारखा वाटू लागतो. उन्हामुळे आलेले काळे डाग काही प्रमाणात कमी होतात. तुम्ही सातत्याने जलतरण करीत असाल, तर हा फेसपॅक तुम्ही हमखास वापरलाच पाहिजे. त्यामुळे त्वचेवरील काळे डाग, काळवटपणा कमी होईल. खरबुजाप्रमाणे त्याच्या बियादेखील उपयुक्त आहेत. बियांपासून तयार करण्यात आलेला फेसपॅक लावल्याने त्वचेची सखोल स्वच्छता होते. या मिश्रणात असलेल्या दह्यामुळे त्वचा मुलायम होते. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावर त्यामुळे तजेलादेखील येतो. दह्यातील अनेक पदार्थ त्वचेसाठी मॉइश्चरायजरप्रमाणे काम करतात.


मधासह खरबूज

मध हे त्वचेसाठी अमृततूल्य आहे. त्याने फायदे अनेक आहेत. त्यामुळे त्याला बहुगुणी म्हणून ओळखले जाते. खरबुजाच्या रसात मध कालवावे. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. १५ ते २० मिनिटानंतर चेहरा धुवावा. तीव्र उन्हामुळे तुमच्या चेहऱ्यावर जळल्यासारखे डाग पडले असतील, तर ते कालांतराने कमी होण्यासाठी हे फेसपॅक उपयुक्त आहे. घामामुळे येणारे मुरूम, पुटकुळ्या आणि तारूण्यपिटिकांवर हा फेसपॅक उत्तमप्रकारे काम करतो. धूळ-मातीमुळे अनेकदा चेहरा काळवंडतो. त्यामुळे त्वचेवरील सुक्ष्म छीद्र बंद होतात. ते उघडण्यासाठी या फेसपॅकमुळे मदत होते. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर जमा झालेली अस्वच्छता दूर होण्यास मदत होते.


असे होतील फायदे

- चेहरा थंड ठेवण्यास मदत होते.

- सनस्क्रीमसारखे काम करते.

- चेहऱ्यावरील काळे डाग दूर करते.

- त्वचेला आतपर्यंत स्वच्छ करते.

- त्वचा उजळण्यास मदत होते.


मधाचा उतारा

त्वचेवर मध वापरल्याने त्यावरील डाग दूर होतात. त्वचेतील मृतपेशीपासून मुक्तता मिळते. नव्या पेशी तयार होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 'सनबर्न'मुळे जे डाग पडतात, ते कमी होण्यासाठी मध सहाय्यक ठरते. वातावरणात असलेल्या हानीकारक किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदातरी चेहऱ्यावर मधाने मसाज करावा.


खरबूज अन् दूध

चेहऱ्यावरील काळसर डाग दूर करण्यासाठी हे मिश्रण फायदेशीर ठरते. या मिश्रणातील दूध हे चेहऱ्यासाठी डाग दूर करण्याचे सर्वोत्तम साधन ठरते. त्यासाठी खरबुजाच्या रसात थोडे दूध मिसळावे. त्यानंतर कापसाच्या सहाय्याने हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. किंचित मसाज करावा. त्यानंतर चेहरा धुवावा. तीव्र उन्हात फिरल्याने त्वचा लवकर काळी पडते. चेहऱ्यावर डाग पडतात. त्वचा भाजल्यासाखी होते. हे सर्व दूर करण्यासाठी खरबुजाचा रस आणि दुधाचे मिश्रण गुणकारी उपाय आहे.

--

खरबूज, काकडी

काकडीतील महत्त्वाचे घटक चेहरा थंड ठेवण्यासाठी मदत करतात. खरबूज आणि काकडीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील सर्व डाग नष्ट होतात. परंतु ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. हा पॅक वापरत राहिल्याने कालांतराने हे डाग नष्ट होतात. चेहऱ्याला नवीन तजेला देण्यासाठी आणि चेहरा उजळण्यासाठी हा पॅक लाभदायक आहे. उन्हातील तीव्र किरणांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासूनही हा पॅक त्वचेला वाचवितो.

Dr. Pruthviraj  Ugale
Dr. Pruthviraj Ugale
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diabetologist, 1 yrs, Pune
Dr. Vidya Deore
Dr. Vidya Deore
MS/MD - Ayurveda, Gynaecologist, 14 yrs, Pune
Dr. Pradnya Shirke
Dr. Pradnya Shirke
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Infertility Specialist, 17 yrs, Pune
Dr. Palavi Gholap
Dr. Palavi Gholap
BAMS, Ayurveda Family Physician, 9 yrs, Pune
Dr. Cliford John
Dr. Cliford John
BDS, Dental Surgeon Root canal Specialist, 6 yrs, Pune