Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड्सपेक्षाही 'मेंस्ट्रुअल कप' ठरतो फायदेशीर!
#मासिक पाळीची स्वच्छता#मासिक पाळी

मेंस्ट्रुअल कप्सबाबत आजही आपल्या समाजामध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. आज आम्ही मेंस्ट्रुअल कप्सबाबतच्या काही गोष्टी सांगणार आहोत, कदाचित या गोष्टी जाणून घेऊन तुमच्या मनातील मेंस्ट्रुअल कप्सबाबतच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. अनेक महिलांच्या मनामध्ये मेंस्ट्रुअल कप आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो का? यांसारखे अनेक प्रश्न घर करून असतात. त्यामुळे सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पॉन्सप्रमाणे त्या मेंस्ट्रुअल कप संपूर्ण विश्वासाने वापरू शकत नाहीत. जाणून घेऊया मेंस्ट्रुअल कप्सबाबत काही गोष्टी, त्याचबरोबर याबाबत रिसर्चमधून काय समोर आलं आहे त्याबाबत...

रिसर्चमधून सिद्ध झाल्या आहेत या गोष्टी...

काही दिवसांपूर्वी 'द लांसेट पब्लिक हेल्थ'मध्ये मेंस्ट्रुअल कप्सबाबत एक व्यापक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता. यावेळी वेगवेगळे देश, शहरं आणि ग्रामीण भागांचा आढावा घेण्यात आला. यातून सिद्ध झाल्यानुसार, मेंस्ट्रुअल कप्स, सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पॉन्सच्या तुलनेमध्ये अधिक फायदेशीर ठरतात.

गरज आहे योग्य मार्गदर्शनाची

मेंस्ट्रुअल कप्सबाबत अनेक एक्सपर्ट्सचं मत आहे की, अनेक महिला हे कप वापरण्यास नकार देतात. यामगील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, त्याबाबत योग्य माहिती आणि मार्गदर्शन न मिळणं. मेंस्ट्रुअल कप्सचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा, याबाबत महिलांनी योग्य ट्रिक्स जाणून घेणं गरजेचं आहे.

वापरण्याची योग्य पद्धत

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मेंस्ट्रुअल कप वापर करताना सर्वात आधी हे वरच्या बाजूने थोडसं फोल्ड करणं आवश्यक असतं. ज्यामुळे हे व्हजायनामध्ये सहज इन्सर्ट करणं शक्य होतं. आतमध्ये गेल्यानंतर जर हे थोडसं फिरवलं तर ते व्यवस्थित फिट होतं आणि लिकेजचं कोणतंही टेन्शन राहत नाही. कारण मेंस्ट्रुअल कप आतमध्ये गेल्यानंतर व्हजायनाच्या आतील भागात व्यवस्थित बसतो.

अत्यंत आरामदायक आहे हा कप

मेंस्ट्रुअल कप एकदा इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही अगदी सहज योगाभ्यास आणि स्विमिंगसारख्या गोष्टीही करू शकता. कारण मासिक पाळीदरम्यान ज्या सॅनिटरी पॅड्सना महिला सुरक्षित मानतात. त्यांच्या आधार घेऊन स्विमिंग करणं अशक्य असतं.

हायजीन आणि मेंस्ट्रुअल कप

मेंस्ट्रुअल कप्स हायजीन आहेत की नाही, असा प्रश्न असेल तर, अजिबात टेन्शन घेऊ नका. एकदा इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही 4 ते 8 तासांपर्यंत अगदी टेन्शनफ्री राहू शकता. काही संशोधनांमधून असं सांगण्यात आलं आहे की, मेंस्ट्रुअल कप एकदा इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही 10 ते 12 तासांपर्यंत वापरू शकता. जेव्हा मासिक पाळी झाल्यानंतर हे कप्स व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही एका कंटेनरमध्ये ठेवू शकता. पण लक्षात ठेवा की, कंटेनर एअर टाइट नसावं.

मेंस्ट्रुअल कप्सची स्वच्छता

मेंस्ट्रुअल कपच्या स्वच्छेतबाबत अनेक एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, 4 ते 12 तासांमध्ये कप बाहेर काढणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्वात आधी हात साबणाने स्वच्छ धुणं गरजेचं असतं. त्यानंतर कप व्हजायनामधून बाहेर काढा आणि स्वच्छ करून घ्या. त्यानंतर पुन्हा इन्सर्ट करा.

...म्हणून ठरतो अधिक फायदेशीर

मेंस्ट्रुअल कप्स कसा फायदेशीर ठरतो, यावर अनेक संशोधनं करण्यात आलेली आहेत. एकिकडे हे सॅनिटरी पॅड्स आणि टॅमेपोन्सपासून महिलांना स्वातंत्र्य देतात. तसेच मेंस्ट्रुअल कप्समुळे पर्यावरणाची हानी होत नाही. कारण सॅनिटरी नॅपकिन्स एकदा वापरल्यानंतर आपण टाकून देतो. पण यांची विल्हेवाट लावणं फार कठिण असतं. याउलट मेंस्ट्रुअल कप्स अनेक वर्ष तुम्ही पुन्हा-पुन्हा वापरू शकता. केनियामधील ग्रामीण भागांमध्ये करण्यात आलेल्या पायलट स्टडिमध्ये असं समोर आलं आहे की, मेंस्ट्रुअल कप्सचा वापर करणाऱ्या तरूणींमध्ये सॅनिटरी पॅड्सचा वापर करणाऱ्या महिलांच्या तुलनेमध्ये इन्फेक्शनच्या समस्यांमध्ये अजिबातच वाढ झालेली नाही.

पाण्याचा कमी वापर

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मेंस्ट्रुअल कप्सबाबत करण्यात आलेल्या संशोधनांमधून असं सिद्ध झालं की, मेंस्ट्रुअल कप्सचा वापर करताना पाण्याचा वापर फार कमी होतो. म्हणजेच, ज्या भागांमध्ये पाण्याती कमतरता आहे. तिथे राहणाऱ्या महिलांमध्ये हे कप्स फायदेशीर ठरतात. कारण सॅनिटरी पॅड्सचा वापर करताना किंवा चेंज करताना व्हजायना पाण्याने स्वच्छ करावा लागतो. तसेच अनेकदा लिकेजमुळे कपडे स्वच्छ करावे लागतात. पण त्याऐवजी जर मेंस्ट्रुअल कप्सचा वापर केला तर या सर्व समस्यांपासून सुटका होते.

महाग असूनही सॅनिटरी पॅडपेक्षा स्वस्त

सॅनिटरी पॅड्सच्या तुलनेत मेंस्ट्रुअल कप फार महाग असतात. परंतु खरं तर हे स्वस्त पडतात. कारण मेंस्ट्रुअल कप म्हणजे, वन टाइम इन्वेस्टमेंट असते. कारण सॅनिटरी पॅड्स एकदा वापरल्यानंतर आपण टाकून देतो. पण तेच जर मेंस्ट्रुअल कप योग्य पद्धतीने वापरला तर तो पुडिल 10 वर्षांपर्यंत तुम्ही वापरू शकता. एवढ्या वर्षांमध्ये सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पॉन्ससाठी पैसे खर्च कराल त्याच्या तुलनेमध्ये मेंस्ट्रुअल कपची किंमत फक्त 5 टक्के असते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

Dr. Abhijit Sangule
Dr. Abhijit Sangule
BDS, Dentist, 8 yrs, Pune
Dr. Raveendran SR
Dr. Raveendran SR
MBBS, Chennai
Dr. Akash Grampurohit
Dr. Akash Grampurohit
MS - Allopathy, ENT Specialist, Dharwad
Dr. Vijay E Chaudhari
Dr. Vijay E Chaudhari
BHMS, Homeopath, 25 yrs, Pune
Dr. Shyamsundar Jagtap
Dr. Shyamsundar Jagtap
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune