Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

नारळाचा वापर भारतीय संस्कृतीमध्ये पूजेसाठी केला जातो. नारळाला श्रीफळाच्या नावानेही ओळखले जाते. वेगवेगळ्या पदार्थांची चव सुधारण्यासाठीही ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो. नारळामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.

ओलं खोबरं खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते, तसेच पोटही साफ होतं. उन्हाळ्यात खोबरं आवर्जून खायला हवं. यानेही तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. चला जाणून घेऊया ओलं खोबरं खाण्याचे फायदे...

1) स्मरणशक्ती वाढते

खोबरं खाल्लाने स्मरणशक्ती वाढते. यासाठी खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करुन रोज खावे. नारळात कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात मिळतात जे तुमचं आरोग्य चांगलं ठेवतं.

2) पोट राहतं साफ

जर तुमचं पोट खराब झालं असेल तर ओल्या खाबऱ्याचा एक मोठा तुकडा खाऊन झोपा. सकाळी तुमचं पोट साफ होणार. यात फायबर अधिक प्रमाणात असल्याने यामुळे पोट साफ होतं.

3) नाकातून रक्त येणे होते बंद

उन्हाळ्यात अनेकांना नाकातून रक्त येण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. यावर नारळ हा फारच चांगला उपाय आहे.

4) ओमोटींगपासून आराम

उन्हाळ्यात ओमोटींगची समस्या अनेकांना भेडसावते. वाढतं तापमान आणि घाम यामुळे असे होते. तुम्हाला जर ओमोटींग झाल्यासारखे वाटत असेल तर खोबऱ्याचा एक तुकडा खावा, याने तुम्हाला आराम मिळेल.

5) रोगप्रतिकारशक्ती वाढते

खोबऱ्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होतं. यात अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल आणि अॅंटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

ट्रेनमधून प्रवास करत होते. गर्दीची वेळ आणि गच्च भरलेली गाडी. एकमेकांना चिकटून सगळे प्रवासी उभे. माझ्या बाजूची मुलगी तेवढ्यातसुद्धा कानात हेडफोन्स लावून कोणाशीतरी तावातावाने भांडत होती. थोड्या वेळानंतर ती दुसऱ्या फोनवर बोलताना ढसाढसा रडली. तिच्याकडच्या मोठ्या बॅगसदृश पोतडीमधून बऱ्याचशा गोष्टी माझ्या शरीरात घुसू पाहात होत्या. मी तिला रागावून तिच्यावर खेकसणारच होते, इतक्यात तिच्या चेहऱ्यावरील काही गोष्टींनी माझं लक्ष वेधून घेतलं.

विशीच्या अलीकडे-पलीकडे वय. अंगकाठी जाडेपणाकडे असूनही अत्यंत टाईट कपडे. मला तिच्या हनुवटीवर दाढीसारखे खुंट दिसले. चेहऱ्यावर मेकअप लावून पिंपल्स झाकण्याचा प्रयत्न केला होता. एवढ्या मेकअपच्या थरातूनही डोळ्याखालची वर्तुळं लपत नव्हती. हेयरस्टाईलच्या मधूनमधून डोक्यावरची त्वचा डोकावत होती. मी टिपलेली ही निरीक्षणं तर PCOS च्या लक्षणांशी अगदी तंतोतंत जुळत होती. खरंच तिला PCOS म्हणजे Polycystic Ovarian Syndrome असेल का?

गेल्या काही वर्षात PCOS हे नाव सतत कुठे ना कुठे भेटतच आहे. यत्र, तत्र, सर्वत्र बोकाळलेलं हे नाव असलेलं हे प्रकरण आहे तरी काय?

अंडाशयात तयार झालेल्या फॉलिकल्समधून बीज बाहेर न पडता त्याच्या बाजूला आवरण तयार होतं. त्याची सिस्ट तयार होते. शरीरामध्ये पुरुषी (male)हार्मोन अँड्रोजेन जास्त प्रमाणात पाझरतं. अँड्रॉजेन्सचं इस्ट्रोजेन बनण्याची प्रक्रिया बंद होते. प्रोजेस्टेरॉनचं प्रमाणही कमी होतं. या सगळ्या हार्मोन्सच्या उलथापालथीमुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या अनियमितपणाबरोबरच नको त्या ठिकाणी लव येणे (चेहऱ्यावर केसांची लव), केस गळणे, केस पातळ होऊन टक्कल (male type baldness)या तक्रारी सुरू होतात. डोकेदुखी, थकवा, ओटीपोटात दुखत राहणं, मूड स्विंग्स, चिडचिड, नैराश्य अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.

शरीरातल्या वेगवेगळ्या क्रिया-प्रक्रिया चुकीच्या मार्गांनी जायला लागतात. या सगळ्यांच्या चेन रिअॅक्शनमुळे एका दुष्टचक्राला शरीर बळी पडतं आणि मग हे चालूच राहिलं तर वजन वाढणं, डायबेटिस होणं इथपर्यंत वाटचाल सुरू होते. या सगळ्या एकत्रित लक्षणांना PCOS म्हणतात.

काय आहे कारण?

या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे आपल्या धकाधकीच्या वेगवान आयुष्यातले ताण-तणाव आणि खाण्यापिण्याच्या सवयी यांच्याशी आपल्या शरीराला जुळवून घेणं खूप कठीण जातं आहे. आपल्या झोपेच्या चुकीच्या वेळापत्रकाचा शरिरातील अंतःस्त्रावी ग्रंथींच्या म्हणजेच आपल्या हार्मोन्सच्या लयीवर परिणाम होतो. हल्लीच्या मॉल संस्कृतीमधल्या आपल्या जेवणात अति प्रमाणात कर्बोदकांचा समावेश असतो. आपण त्याला सोशलायझिंग असं गोंडस नाव देतो. अति जास्त कर्बोदकं हाताळण्यासाठी खूप जास्त इन्सुलिन पाझरलं तरी ते चांगल्या पद्धतीने कार्य करू शकत नाही. यालाच insulin resistance म्हणतात. हीच खरी PCOS च्या निर्मितीची पहिली पायरी आहे. रक्तामध्ये खूप जास्त प्रमाणात इन्सुलिन असल्याने अंडाशयामधून बीज बाहेर पडत नाही आणि इस्ट्रोजेन बनण्यामध्ये अडथळे येतात. वजन वाढतं आणि त्याचेही दुष्परिणाम दिसतात.

यातली कुठलीही लक्षणं असतील तर स्री रोग तज्ज्ञ किंवा एन्डोक्रिनोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. सोनोग्राफी आणि रक्ताच्या चाचण्या करून त्याचे निदान होऊ शकेल.

यावरील उपचार पद्धतीमधे मुख्यत्त्वे शरीराची insulin sensitivity वाढवण्यावर भर दिलेला असतो. त्याच बरोबर जीवनशैलीमधील सकारात्मक बदल या आजाराशी दोन हात करण्याकरता सर्वोत्तम उपाय आहे.

कारल्याची भाजी खायची म्हटलं की अनेकांकडून नाके मुरडली जातात. अनेकांना ही भाजी अजिबातच नको असते. कारलं कडू असल्याने त्यांची भाजी खाण्यास अनेकांना रस नसतो. पण कारले खाण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळाले तर तुम्ही कारल्याच्या भाजीला कधीही नाही म्हणणार नाही. कारलं हे आपल्या शरीरातील रक्त साफ करतं. सोबतच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कारलं फायदेशीर असतं. तसेच दमा, पोटदुखी या आजारांवरही हा रामबाण उपाय आहे.

रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणं

कारल्याचा वापर एका नैसर्गिक स्टेरॉयडच्या रुपात केला जातो. कारण यात केरेटिन नावाचं रसायन अधिक प्रमाणात आढळतं. या सेवन केल्यास रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित राहते.

पोषक तत्वांचा भांडार कारलं

कारल्यामुळे शरीरातील शुगर लेव्हल जितकी नियंत्रित केली जाते, तितकं शरीराला पोषक तत्व मिळतात. त्यासोबतच कारल्यात तांब, व्हिटॅमिन बी, अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडसारखे तत्व असतात. यामुळे रक्त साफ स्वच्छ राहतं आणि किडनी सुद्धा निरोगी राहते.

कारलं खाण्याचे फायदे

- कफचा त्रास असलेल्यांना कारलं खाल्ल्ल्यांने आराम मिळतो.
- दमा असल्यास विना मसाल्याची भाजी खाल्ल्यास फायदा होतो.
- पोटात गॅसची समस्या किंवा अपचन झालं असेल तर कारल्याने आराम मिळतो.
- लखवा गेलेल्या रुग्णांनी कच्च कारलं खाल्ल्यास फायदा होतो.
- ओमोटींग, पोटात दुखणे यांसारखे त्रास होत असेल तर कारल्याच्या रसात पाणी आणि काळं मिठ घालून प्यायल्यास लगेच आराम मिळतो.
- काविळ झालेल्यांना आराम मिळण्यासाठीही कारलं फायदेशीर आहे. त्यासाठी रुग्णांनी कारल्याचा रस घ्यावा.
- कारल्यांच्या रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते.
- तोंडात फोडं आल्यास कारल्याचा रसाने गुरळा करा, याने आराम मिळेल.

मुंबई : जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप आणि धनाडाळ खाण्याची सवय असते. यामुळे पचन सुधारायला मदत होते सोबतच तोंडाला येणारी दुर्गंधीदेखील कमी होते. मात्र बडीशेप खाणं जितकं फायदेशीर आहे तितकेच बडीशेपाचे पाणीदेखील आरोग्याला फायदेशीर आहे. बडीशेप भिजत ठेवून त्याचं पाणी पिणं आरोग्याला फायदेशीर आहे. पहा बडीशेपाचं पाणी प्यायल्याने कोणकोणते फायदे होतात ? तुम्हाला माहीत आहे का जेवणानंतर पान, बडीशेप का खातात?

बडीशेपाचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे -
लठठपणा कमी होतो
आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठपणाची समस्या आढळते. त्यावर डाएट, जीम, योगाच्या मदतीचे बडीशेपाचं पाणी पिणेदेखील फायदेशीर ठरू शकते. नियमित सकाळी ग्लासभर बडीशेपाच्या पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने फायदा होतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

गरोदर स्त्रीयांना फायदेशीर
गरोदर स्त्रीयांसाठी बडीशेप फायदेशीर आहे. बडीशेप आणि खडीसाखरेचे मिश्रण नियमित सकाळ संध्याकाळ खाणं उपयुक्त ठरते. या मिश्रणामुळे गर्भाच्या शरीरात वाढणारे रक्तही शुद्ध राहते.

पचनाचा त्रास
बडीशेप पचन सुधारण्यास मदत करते. बडीशेपाचे पाणी प्यायल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता,पोटाचे, पचनाचे विकार दूर ठेवण्यास मदत होते.

मुंबई : केरळमध्ये सध्या 'निपाह' व्हायरसचं थैमान पसरले आहे. गेल्या आठ्वड्याभरात निपाह व्हायरसमुळे 13 रूग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र लॅबटेस्टमध्ये केरळमध्ये पसरत असलेल्या 'निपाह' व्हायरसचा प्रमुख स्त्रोत वटवाघूळ नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मग हा जीवघेणा व्हायरस नेमका आला कोठून याबाबतचं गूढ सध्या वाढलं आहे. 48 तासात जीवघेणा ठरतोय 'निपाह' व्हायरस

भारतात 17 वर्षांपूर्वीच आला 'निपाह'
'निपाह'चा वाढता धोका पाहता सध्या सरकारने याबाबत देशभरात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. 'निपाह' केरळमध्ये पहिल्यांंदा नव्हे तर 17 वर्षांपूर्वीच भारतामध्ये दाखल झाला आहे. मात्र केरळमध्ये अचानक या व्हायरसमुळे मृत्यूचं प्रमाणा वाढल्याने भीती निर्माण झाली आहे. लॅब टेस्टने मात्र केरळमधील साथीमागे वटवाघुळ नसल्याचं स्पष्ट केले आहे.

लॅबटेस्टचा खुलासा
केरळमधील कोझिकोडे भागात वेटरनेरी टीमने विहीरीत सापडलेल्या वटवाघुळांची तपासणी केली. मात्र ही वटवाघुळं फ्रुट बॅट या जातीची नाहीत असा खुलासा केला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC)ने वटवाघुळांचे सॅम्पल नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (पुणे) येथे पाठवली आहेत. विहिरीत मेलेली वटवाघुळं सापडल्याने पाण्यातून 'निपाह' व्हायरसचा संसर्ग झाल्याचे प्राथमिक अंदाज मांडण्यात आला होता. 'निपाह' व्हायरसची दहशत पसरवाणारी करोडो वटवाघुळं 'या' गावात एकत्र फळं खातात

आश्चर्यकारक खुलासा
निपाह व्हायरसमुळे अवघ्या 4 दिवसांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार मानवी शरीरात निपाह व्हायरस 11 वर्ष सुप्तावस्थेतही राहू शकतो. 2001 साली सिलीगुडी भागात या व्हायरसचा पहिला बळी गेला होता. त्यामुळे संक्रमित व्यक्तीमध्येच हा व्हायरस पुन्हा अ‍ॅक्टीव्ह झाल्याने आजार पसरल्याची माहिती देण्यात आली आहे. 'निपाह' बाबत आश्चर्यकारक खुलासा ! हा सगळ्यात घातक व्हायरस नव्हे

देशभरात अलर्ट
रिपोर्टच्या माहितीनुसार, सुरूवातीला प्रभावित झालेल्या भागांमध्येच पुन्हा 'निपाह' व्हायरस अ‍ॅक्टिव्ह झाला असावा. त्यानुसार दोन लोकांच्या संपर्कात येण्याने हा व्हायरस पसरत असावा. त्यामुळे गर्दीची ठिकाणं टाळा, मास्क, ग्लोव्ह्जचा वापर करा. तसेच 'निपाह' संबंधित लक्षण आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला आणि चाचण्या करण्यचा सल्ला देण्यात आला आहे. मग अशा स्थितीत Nipah Virus चा धोका ! सध्या केरळ ट्रीप करणं खरंच सुरक्षित आहे का? सोबतच जाणून घ्या ​निपाह व्हायरस पसरण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय...

Dr. Amit Murkute
Dr. Amit Murkute
MBBS, Dermatologist Hair Transplant Surgeon, 6 yrs, Pune
Dr. Rahul Sudhakar
Dr. Rahul Sudhakar
BDS, Dentist, 5 yrs, Pune
Dr. Suhas Sodal
Dr. Suhas Sodal
MBBS, Pediatrician, 8 yrs, Pune
Dr. Anup Gaikwad
Dr. Anup Gaikwad
BHMS, Family Physician Homeopath, 8 yrs, Pune
Dr. Vivek  Sahu
Dr. Vivek Sahu
MD - Homeopathy, 17 yrs, Pune
Hellodox
x