Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Diet and Nutrition :
Does the word Diet make you think of unpleasant weight-loss regimen? Forget it, Diet also refers to the food and drink a person consumes daily and the mental and physical circumstances connected to eating. Eating nutrition give you beautiful body not just outside but also inside.

पचनक्रियेशी निगडित तक्रारी या सध्या अतिशय सामान्य झाल्या आहेत. आपल्या जीवनशैलीमध्ये असणाऱ्या विविध गोष्टींचा परिणाम झाल्याने पचनक्रिया बिघडते. अपुरी झोप, खाण्याच्या वेळा, जंकफूडचा समावेश आणि इतर अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असतात. मग गॅसेस होणे, बद्धकोष्ठता किंवा अपचन अशा अनेक तक्रारी सातत्याने सुरु होतात. पण या पचनाशी निगडित तक्रारींवर वेळीच मात करायची असेल तर आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक असते. यामध्ये नियमितता ठेवल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. आता या गोष्टी नेमक्या कधी केलेल्या चांगल्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दिवसाची सुरुवात म्हणजेच सकाळ यासाठी उत्तम वेळ आहे.

पाणी प्या

सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यावे असे आपण अनेकदा ऐकतो. पण कधी मोबाईलच्या नादात नाहीतर ऑफीसला जाण्याच्या धावपळीत आपण ती गोष्ट विसरुन जातो. पण उठल्यावर पाणी पिणे हे तुमच्या पचनक्रियेसाठी उपयुक्त असते. त्यामुळे उठल्यावर किमान एक ग्लास पाणी प्यायलाच हवे. पोटाचे कार्य सुरळीत होण्याबरोबरच मेंदूचे काम चांगले होण्यासाठीही पाणी पिणे उपयुक्त ठरते. याच पाण्यात लिंबू पिळल्यास आणखी चांगले.

योगासने

योगासने हा भारतीय पारंपरिक व्यायाम समजला जातो. सकाळी झोपेतून उठल्यामुळे आपले शरीर काहीसे कठिण झालेले असते. त्यामुळे स्ट्रेचिंग केल्यास ते मोकळे होण्यास मदत होते. किमान १५ ते २० मिनिटे केलेला व्यायामही उपयुक्त ठरतो.

ध्यानधारणा

ध्यान हे मनाच्या शांतीसाठी अतिशय गरजेचे असते. त्यामुळे रिलॅक्स होण्यासाठी ध्यान करण्याची सवय अतिशय गरजेची आहे. त्यामुळे सकाळच्या वेळात तुम्ही किमान ५ ते १० मिनिटांसाठी ध्यान केले तर तुमचा दिवस चांगला जाण्यास मदत होऊ शकते.

पोटाला मसाज करा

झोपेतून उठल्यावर पोटाला हलका मसाज करणे पचनाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. हा मसाज उजव्या बाजूने डाव्या बाजूला करायला हवा. असे हळूवारपणे काही मिनिटे केल्यावर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

समतोल न्याहरी

न्याहरी ही दिवसभरातील पहिलेच खाणे असल्याने ती समतोल असायला हवी. हे खाणे पौष्टीक असायला हवे. चांगली न्याहरी घेतल्यास शरीराचे पोषण होण्यास मदत होते आणि शरीरातील उर्जा टिकून राहते. त्यामुळे न्याहरीत फायबरचे प्रमाण असेल असा प्रयत्न करा. न्याहरीत तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांची लापशी असल्यास उत्तम.

काही पदार्थ, फळं, भाज्या या दीर्घकाळ टिकाव्यात या करिता आपण त्या फ्रीजमध्ये साठवून ठेवतो.

काही पदार्थ, फळं, भाज्या या दीर्घकाळ टिकाव्यात या करिता आपण त्या फ्रीजमध्ये साठवून ठेवतो. फ्रीजमध्ये वस्तू ठेवल्याने ती अधिक दिवस टिकून राहते असे तुम्हांला वाटू शकते. मात्र तुमची ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. म्हणून या वस्तू फ्रीजमध्ये साठवण्याची चूक मूळीच करू नका.

कॉफी -
पावसाळ्याच्या दिवसात गरम कॉफी पिण्याचा आनंद काही औरच असतो. परंतू अधिक दिवस कॉफी टिकावी म्हणून ती फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. फ्रीजमध्ये कॉफी ठेवल्याने दुसर्‍या पदार्थांचा वास कॉफीला येतो आणि कॉफी खराब होऊ शकते.

मध -
मध फ्रीजमध्ये साठवू नका. मध सामान्य रूम टेम्परेचरमध्येचा उत्तम राहते. फ्रीजमध्ये मध ठेवल्यास त्याचे क्रिस्टल होऊ शकतात.

लोणचं -
बाजारात विकत मिळाणार्‍या विकतच्या लोणच्यामध्ये व्हिनेगरचा वापर केला जातो. व्हिनेगरयुक्त पदार्थ फ्रीजमध्ये साठवल्यास खराब होतात. त्यासोबत इतर पदार्थदेखील खराब होतात.

केळं -
केळं फ्रीजमध्ये साठवू नये. यामुळे ते काळं पडण्याची दाट शक्यता असते. यामधील ईथाईलीन घटक बाहेर पडतात. हा एक प्रकारचा गॅस असून त्यामुळे आजुबाजूची फळंदेखील खराब होऊ शकतात.

टोमॅटो -
फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवू नयेत. यामुळे ते खूप लवकर मऊ होतात. सोबतच त्याची चवदेखील उतरते. टोमॅटो अधिक काळ टिकवण्यासाठी खास टीप्स

बटाटा -
बटाट्यामध्ये स्टार्च शुगर असल्याने फ्रीजमध्ये ते अधिक दिवस ठेवल्याने चव खराब होण्याची शक्यता असते.

आंबट फळं -
संत्र,लिंबू, मोसंबी यासारखी आंबट फळं टाळा. फ्रीजमध्ये ही फळं खराब होतात, सुकतात

सांधेदुखी/अर्थरायटिस ही आजकालची सामान्स समस्या उतारवयात अनेकांना त्रासदायक ठरते.

मुंबई : सांधेदुखी/अर्थरायटिस ही आजकालची सामान्स समस्या उतारवयात अनेकांना त्रासदायक ठरते. पूर्वी उतारवयात जाणवणाऱ्या या समस्येने सध्या तरुणाईही त्रासली आहे. तुम्ही देखील या समस्येला सामोरे जात असाल तर आहारात या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

लसूण
दैनंदिन आहारात लसणाचा अवश्य समावेश करा. याच्या सेवनाने अर्थरायटिस रुग्णांना फायदा होतो. यात असलेल्या अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल, अॅंटी बायोटिक आणि अॅंटी इंफ्लेमेट्री गुणधर्मांमुळे सांधेदुखीवर आराम मिळण्यास मदत होते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात लसणाच्या २ हुन अधिक पाकळ्या खावू नका. कारण लसूणही गरम असतो.

ब्रोकोली
पोषकघटकांनी परिपूर्ण अशी ब्रोकोली सांधेदुखीवर अतिशय फायदेशीर ठरते. यात कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, आयर्न, व्हिटॉमिन ए-सी, क्रोमियम असते. त्यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते.

हळद
हळदीत करक्यूमिन नावाचे तत्त्व असते. त्यामुळे आजार पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. त्याचबरोबर सांधेदुखीवरही अत्यंत प्रभावी ठरते.

ओमेगा ३ अॅसिड
अर्थरायटिसपासून सुटका मिळवण्यासाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे सेवन करा. यासाठी आहारत मासे, फिश ऑईल याचा समावेश करा.

ही काळजी घ्या
फिरणे बंद करु नका.

नियमित व्यायाम करा.

फास्ट फूड आणि डबाबंद पदार्थांचे सेवन टाळा.

फॅट्सयुक्त पदार्थ खाणे टाळा.

ब-याचदा तुम्ही वजन कमी करण्याचा संकल्प करता मात्र हा संकल्प पुर्ण करणे तुम्हाला काही केल्या जमत नाही.जर तुम्हाला खरंच मनापासून तुमचे वजन कमी व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी Vegan डाएट नक्की ट्राय करा.Vegan फूड खाण्यास चविष्ट असतातच पण त्याचसोबत त्यामुळे तुमचे वजन देखील कमी होऊ शकते.या डाएटसह योग्य पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे तुमचे काही किलो वजन नक्कीच कमी होईल.न्यूट्रीशनिस्ट व PETA India च्या कॅम्पेन कॉर्डिनेटर यांच्याकडून जाणून घेऊयात Vegan फूड ची तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कशी मदत होऊ शकते.तसेच वाचा वजन कमी करायचं ? मग करा या योगसाधना

जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी Vegan Diet करणे का योग्य आहे.

वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात.

अनेक लोकांच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मांस,अंडी व दूग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो.अशा पदार्थांमध्ये Saturated fat,कॅलरीज व कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणावर असते.प्राण्यांच्या शरीरामध्ये कॅलरीज साठवण्याची व्यवस्था असते ज्यामुळे मांसाहारी पदार्थांच्या सेवनामुळे तुमचे वजन वाढू शकते.एकूण फॅटपैकी मांसामध्ये कमीतकमी २० ते ४० टक्के कॅलरीज असतात.तसेच फळे,भाज्या,शेंगभाज्या व कडधान्यांच्या तुलनेमध्ये लो-फॅट डेअरी प्रॉडक्ट्स मध्ये देखील फॅट व कोलेस्टेरॉल असते.

आरोग्य समस्या कमी होतात.

शाकाहारी(जे मांसाहार व दूग्धजन्य पदार्थांचे सेवन करीत नाहीत) लोकांपेक्षा मांसाहार करणा-या लोकांमध्ये लठ्ठपणा व लठ्ठपणातील विकार जसे की मधूमेह,उच्च रक्तदाब,स्ट्रोक,हार्ट अॅटक,काही प्रकारचे कॅन्सरचा धोका जास्त प्रमाणात असतो.काही Vegan आहार घेणा-या लोकांचे अतिवजन असू शकते पण संशोधनानूसार मांसाहार करणा-यापैक्षा हे लोक १८ टक्कांनी बारीक असतात.

vegan फूडमुळे मेटाबॉलिझम सुधारतो.

सर्वसाधारणपणे Vegan आहारामध्ये नैसर्गिकरित्या फॅट व कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रित राखणे सोपे जाते.वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर व कॉम्लेक्स कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे या आहाराच्या सेवनाने मोठ्या प्रमाणावर कॅलरीज बर्न होतात व मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.American Academy of Dietetics and Nutrition च्या अहवालानूसार Vegan आहार घेणा-या लोकांचे वजन तर कमी असतेच शिवाय अशा लोकांना कॅन्सर,मधूमेह,ह्रदयविकार व उच्च रक्तदाबाची समस्या देखील कमी होते.यासाठी जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी रोज आहारात फायबर्स किती प्रमाणात असावे ?

Vegan वेट लॉस डाएट प्लॅनसाठी प्रमुख मुद्दे-

न्यूट्रीशनिस्टच्या मते लो-फॅट वनस्पतीजन्य आहारामध्ये व्हिटॅमिन्स व मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असून त्यामध्ये cancer-fighting phytochemicals देखील असतात.यासाठी जाणून घ्या या पदार्थांना तुमच्या आहारात कसे समाविष्ट कराल.

1. चिकन ऐवजी mock meat,मीट बर्गर ऐवजी व्हेजी बर्गर व पनीर व अंड्याऐवजी टोफूचा आहारात समावेश करा.
2. तुमच्या आवडत्या भाज्यांमध्ये कमीतकमी क्रीम,लोणी व तूपाचा वापर करा.
3. नास्त्यासाठी अंडे न खाता ओट्स मध्ये बदाम व सोया दूध व ताजी फळे घालून खा.
4. डिनर तयार करण्यासाठी बीन्स व पालक घालून व्हेजीटेबल पास्ता अथवा चायनीज नूडल्स अथवा थाय व्हेजीटेबल करी बनवा.यासाठी वाचा पास्ताप्रेमींसाठी हेल्दी पास्ता बनवण्याच्या काही सोप्या पद्धती
तुमच्या आहारामध्ये फळे,भाज्या,तृणधान्ये,डाळी व सोयाबीनचा समावेश करा.या चविष्ट पदार्थांमुळे तुम्हाला शाकाहार करणे सोपे जाईल.

Vegan वेट लॉस डाएट प्लॅनचा नमुना-

SHARAN (Sanctuary for Health and Reconnection to Animals and Nature) and Vegan च्या संस्थापक डॉ.नंदीता शाह यांच्याकडून वजन कमी कऱण्यासाठी Vegan वेट लॉस डाएट प्लॅनचा नमुना जरुर जाणून घ्या.

चांगल्या परिणामांसाठी हे अवश्य लक्षात ठेवा.

तुमचा आहारातील सर्व गोष्टी वनस्पतीजन्य घटकांपासून तयार गेल्या आहेत याची खात्री करुन घ्या.
प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे बंद करा.
कांदा व लसूण शिवाय इतर सर्व भाज्या न सोलता खा.
शक्य असल्यास सेंदीय पदार्थांचा आहारात समावेश करा.तसेच वजन घटवताना अवेळी लागणार्‍या भूकेवर मात मिळवण्यासाठी खास डाएट टीप्स जरुर करा.

नारळाचा वापर भारतीय संस्कृतीमध्ये पूजेसाठी केला जातो. नारळाला श्रीफळाच्या नावानेही ओळखले जाते. वेगवेगळ्या पदार्थांची चव सुधारण्यासाठीही ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो. नारळामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.

ओलं खोबरं खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते, तसेच पोटही साफ होतं. उन्हाळ्यात खोबरं आवर्जून खायला हवं. यानेही तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. चला जाणून घेऊया ओलं खोबरं खाण्याचे फायदे...

1) स्मरणशक्ती वाढते

खोबरं खाल्लाने स्मरणशक्ती वाढते. यासाठी खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करुन रोज खावे. नारळात कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात मिळतात जे तुमचं आरोग्य चांगलं ठेवतं.

2) पोट राहतं साफ

जर तुमचं पोट खराब झालं असेल तर ओल्या खाबऱ्याचा एक मोठा तुकडा खाऊन झोपा. सकाळी तुमचं पोट साफ होणार. यात फायबर अधिक प्रमाणात असल्याने यामुळे पोट साफ होतं.

3) नाकातून रक्त येणे होते बंद

उन्हाळ्यात अनेकांना नाकातून रक्त येण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. यावर नारळ हा फारच चांगला उपाय आहे.

4) ओमोटींगपासून आराम

उन्हाळ्यात ओमोटींगची समस्या अनेकांना भेडसावते. वाढतं तापमान आणि घाम यामुळे असे होते. तुम्हाला जर ओमोटींग झाल्यासारखे वाटत असेल तर खोबऱ्याचा एक तुकडा खावा, याने तुम्हाला आराम मिळेल.

5) रोगप्रतिकारशक्ती वाढते

खोबऱ्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होतं. यात अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल आणि अॅंटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Dr. Rohit Patil
Dr. Rohit Patil
MDS, Dentist Implantologist, 5 yrs, Pune
Dr. Mahesh Zagade
Dr. Mahesh Zagade
BHMS, Homeopath General Physician, 3 yrs, Pune
Dr. Prasang Bharadwaj
Dr. Prasang Bharadwaj
MBBS, General Medicine Physician General Physician, 3 yrs, Mumbai
Dr. Yogesh Gholap
Dr. Yogesh Gholap
BAMS, Ayurveda General Physician, 12 yrs, Pune
Dr. Manisha Garud
Dr. Manisha Garud
BDS, Dental Surgeon Dentist, Pune
Hellodox
x