Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
हातावर मेंदी लावत असाल तर सावधान !
#स्किनकेअर

आपल्याकडे हातांना मेंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. लग्नात नवरीच्या हातावर मेंदी काढणे हा तर एक सोहळाच असतो. केस रंगवण्यासाठीही मेंदी लावली जाते. पण या मेंदीचेही दुष्परिणाम होतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

मेंदीने खरंच दुष्परिणाम होतात का ?

नवी दिल्ली येथील सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार, त्वचारोगतज्ज्ञ तसेच विभागप्रमुख डॉ. अनिल गंजू यांच्या मते, शुद्ध हिरव्या रंगाची मेंदी लावल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. संवेदनशील त्वचा असणाऱ्या काही लोकांचा याला अपवाद आहे. याउलट काळ्या किंवा तपकिरी रंगाची मेंदी लावणे हानीकारक आहे.

मेंदीचे दुष्परिणाम –

त्वचारोग –

मेंदी जरी नैसर्गिकरित्या मिळत असली तरी, काहीवेळा कमी कालावधीमध्ये अधिक गडद रंगण्यासाठी तिच्यात PPD (पॅरा-फेनिलीनडायअमाइन)मिसळतात. बऱ्याच जणांना हे माहीत नसते की, PPD त्वचेच्या संपर्कात आल्याने अॅलर्जी होऊ शकते. उदा.; खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे.

केसांना शुष्कता –

केसांना लावण्याची मेंदी तयार करताना त्यामध्ये अनेक घातक रासायनिक घटक मिसळल्यामुळे केस शुष्क होतात. तसेच डोक्याला खाज सुटते, कधीकधी पुरळही येऊ शकतात. (घरीच केस रंगवण्याचे ’6′ नैसर्गिक व सुरक्षित उपाय !)

डोळे लाल होतात –

मेंदीचा डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळे लाल होतात किंवा डोळ्यांतून पाणी येऊ लागते. अशा वेळी थंड पाण्याने डोळे धुवावेत व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लाल पेशी फुटणे –

ज्या मुलांना G6PD ची (6 ग्लुकोज फॉस्पेट डिहायड्रोजनेजची) कमतरता असेल त्यांच्या हातांना मेंदी लावू नये. नाहीतर त्यांच्या शरीरातील लाल पेशी फुटून शारिरीक समस्या निर्माण होतील. असे काही झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पोट बिघडणे –

कोणत्याही स्वरुपातील मेंदी पोटात जाणे मानवी आरोग्यासाठी घातक असते. चुकूनही थोडीफार मेंदी पोटात गेली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मेंदीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तज्ज्ञांचे सल्ले –

कधीही हातांना किंवा केसांना मेंदी लावण्याअगोदर पॅचटेस्ट करावी.
मेंदीमधील रासायनिक घटकांमुळे केस शुष्क न होण्यासाठी मेंदी लावण्याआधी केसांना तेल लावावे.
मेंदी लावल्यानंतर शांपू व कंडिशनरचा (शक्यतो आयुर्वेदिक) वापर करून केस स्वच्छ धुवावेत.
मेंदी लावल्यानंतर खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे अशी लक्षणे आढळल्यास लगेचच हात किंवा केस धुवून त्यावर Allegra किंवाAvil यांसारखे अॅलर्जी कमी करणारे औषध लावावे.
यांसारखी लक्षणे आढळल्यास घरीच कोणतेही तेल किंवा क्रिम न लावता त्वरित त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पुढच्या वेळी मेंदी लावताना या टिप्स लक्षात ठेवा आणि त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचा.

Dr. Sarita Bharambe
Dr. Sarita Bharambe
DHMS, Family Physician, 30 yrs, Pune
Dr. Sandeep Mengade
Dr. Sandeep Mengade
BAMS, Family Physician General Physician, 17 yrs, Pune
Dr. Abhijeet  Shinde
Dr. Abhijeet Shinde
DNB, Cardiologist Diabetologist, 13 yrs, Pune
Dr. Shyamsundar Jagtap
Dr. Shyamsundar Jagtap
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune