Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

१) जीवाणू आणि किटाणूंचा नाश करणारे अँटी बॅक्‍टीरियल आणि अँटी व्हायरल तत्त्व कांद्यामध्ये असतात... हे तत्त्व शरीरावर रगडल्याने जीवाणू आणि किटाणूचा नाश होतो आणि तुम्ही इन्फेक्शनच्या आजारांपासून दूर राहू शकता...

२) तुमच्या मनात आहेत तेच चेहर्‍यावर दिसते... तुम्ही नेहमी आनंदी राहणारे व्यक्ती असाल तर तुमचा चेहरा हसतमुख राहील आणि दिवसेंदिवस चेहर्‍यावरील उजळपणा वाढत राहील...

३) कॅल्शिअम शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती व शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असते... हे शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी, ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर या सर्वात असते...

४) तिळाच्या तेल्यात लसूण बारीक करुन ते गरम करून थंड झाल्यावर तेलाचे काही थेंब कानात टाकल्यास कान दुखणे थांबतो... हे जर तुम्ही नियमित केल्यास तुमची ऐकण्याची क्षमता वाढते...

५) नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा, खोकला, ताप आणि फुप्फुसाशी निगडित आजारा मध्ये फायदा होतो...

६) हळद हे सगळ्यात शक्तीशाली असे नैसर्गिक कॅन्सर विरोधक आहे...

७) रात्री जेवण कमी करावं आणि फळं खावीत... सोबतच योग्य वेळी जेवणाची सवय लावाल, तर लठ्ठपणा कमी करण्यात मदत होईल...

८) जेवणात अधिक खारट पणा ची सवय आपण स्वतःच निर्माण करीत असतो... अधिक प्रमाणात मीठ/सोडियम घेतल्यास हाडे ठिसूळ होत जातात... जास्त सोडियम कॅल्शियमची कमतरता निर्माण करते...

९) वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये... आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे... वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही...

१०) साखर ही वाईट नाही... उगाच साखरेच नाव वाईट आहे... साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते... त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापर करू शकतो...

११) प्रत्येकाने व्यायाम व योगासना चा प्रकाराचा
निवड करताना तो आपल्या देहयष्टीनुसार निवडावा...

१२) सर्वच सजीवांना प्रथिनांची गरज आहे... अर्थात ही गरज प्रत्येकाचे वय, शारिरीक स्थिती, कामाचे स्वरुप यावर अवलंबून आहे...

आता सणावाराच्या दिवसात नटण्या-सजण्याबरोबर मेंदीचा वापर आवर्जून करण्याकडे स्त्रियांचा कल असतो. सौंदर्यसाधनेमध्ये मेंदीचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. मेंदीच्या पानातील रंगद्रव्यामुळे तसेच फुलातून मिळणार्‍या सुगंधी द्रव्यांमुळे मेंदीला व्यापारी महत्त्वही आहे.

मेंदीमध्ये अनेक औषधी गुणतत्त्व आहेत. मेंदीच्या खोडाच्या सालीच्या अर्कामुळे त्वचारोग, पांढरे कोड आदी विकार दूर होतात.

मेंदीच्या सालीच्या काढय़ाने मुतखडा दूर करता येतो. मेंदीच्या पानांचा लेप गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे किंवा त्वचेचा दाह इत्यादींवर बाह्य उपचार म्हणून उपयुक्त ठरतो.

मेंदीच्या पानांमध्ये वांतिकारक आणि कफोत्सारक गुणधर्म आहे. घसादुखी असल्यास गुळण्या करताना पाण्यात मेंदीची पाने घातली जातात.

पायांची आग शमवण्यासाठी, शरीरातली अतिरिक्त ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी, डोकेदुखी थांबवण्यासाठी मेंदी डोक्याला किंवा पायाला लावतात.

मेंदीच्या पानांचा, सालींचा अर्क क्षयविकार दूर करण्यासाठी उपयोगात येतो. मेंदीच्या फुलातून टीरोझसारखे सुगंधी द्रव्य प्राप्त होते. यालाच हीना किंवा मेंदीतेल म्हणतात.

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला अधिक पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी तुम्ही सतत लिक्वीड घेत असता. मात्र या ऋतूत काही फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे ज्या शरीरासाठी लाभदायक असतात. या भाज्यांपैकी एक म्हणजे काकडी. उन्हाळ्यात काकडीचे सेवन शरीरासाठी चांगले मानले जाते. यात व्हिटामिन्सचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी फायदेशीर असते.

पाचनतंत्र सुधारते
काकडीमध्ये आढळणारे पाणी आणि फायबर शरीरातील पाचनक्रिया सुरळीत राखण्यास मदत करतात. जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर एक ग्लास काकडीचा रस प्यायल्याने आराम मिळतो.

डिहायड्रेशनपासून बचाव
काकडी ब्रेडमध्ये टाकून तुम्ही सँडविच म्हणूनही खाऊ शकता. अनेकांना फळ खाण्यापेक्षा फळाचा रस प्यायला आवडतो. तुम्हालाही फळ खाणे आवडत नसेल तर फळांचा रस काढून प्या. काकडीचा रसही तुम्ही पिऊ शकता. काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते ज्यामुळे डिहायड्रेशनपासून बचाव होतो.

कॅन्सरपासून होतो बचाव
काकडीत असणारे प्रोटीन शरीराला कॅन्सरशी लढण्याची शक्ती देतात. तसेच कॅन्सरपासून बचावही होतो. कॅन्सरच्या पेशी वाढण्यास रोखतात. त्यामुळे याला कॅन्सरविरोधी फळ म्हटले जाते. काकडीच्या सेवनाने कॅन्सरचा धोका कमी होतो.

मुख दुर्गंधी दूर होते
काकडी दातांनी तोडून थोडा वेळ तोंडात ठेवल्यास मुख दुर्गंधी दूर होते. काकडी चावून खाल्ल्याने तोंडातून येणारी दुर्गंधी दूर होते. दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरिया काकडी खाल्ल्याने नष्ट होतात.

चेहऱ्यावर तजेला येतो
काकडीचा वापर सुंदरता वाढवण्यासाठी केला जातो. जर उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल तर काकडीचा पॅक लावून दूर केला जाऊ शकतो. यामुळे त्वचा उजळ होते. काकडी त्वचेसाठी टोनिंगचे काम करते.

दररोज या वेळेस खा दोन काकड्या
दररोज कमीत कमी दोन काकड्या खाल्ल्या पाहिजेत. सकाळी भरपूर नाश्ता करा. दुपारच्या जेवणात शक्य असेल तर एक काकडी खा. जर हे शक्य नसेल तर रात्रीच्या जेवणात कमीत कमी दोन काकड्या खाल्ल्या पाहिजेत. यामुळे तुम्ही चपाती अधिक खाणार नाही. पाचनशक्ती वाढेल यासोबतच वेगाने वजन कमी होण्यास मदत होईल.

रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आणि सकाळी लवकर न उठणे आरोग्यास हानीकारक असून यामुळे आयुर्मान कमी होण्याचा धोका असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

या अभ्यासात पाच लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रात्री जागरण करणाऱ्यांचे आयुर्मान रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठणाऱ्यांच्या तुलनेत दहा टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले. हा अभ्यास जर्नल क्रोनोबायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ब्रिटनमधील सरे विद्यापीठाचे प्राध्यापक माल्कम वॉन शंटझ यांनी सांगितले. रात्री जागरण करणाऱ्यांच्या आरोग्यविषयक अडचणी समायोजित केल्यानंतरदेखील त्यांच्यामध्ये आयुर्मान दहा टक्क्यांनी कमी असल्याचा धोका आढळून आला.

रात्री जागरण करणाऱ्यांमध्ये मधुमेह, मज्जासंस्थेचा विकार, मानसिक विकारांचे प्रमाण जास्त आढळून आले. रात्री जागरण करणाऱ्या लोकांनी शक्य असल्यास त्यांची कामे लवकर करून घ्यावीत.

त्याचप्रमाणे त्यांचे जैविक घडय़ाळ दिवसाच्या वेळेप्रमाणे कसे चालेल याबाबत अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे, असे वॉन शंटझ यांनी सांगितले.


रात्री जागरण करणाऱ्या लोकांमधील जैविक घडय़ाळ त्यांच्या बाहय़ वातावरणाशी जुळत नसल्याचे अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापिका क्रिस्टन नुटसन यांनी सांगितले. आनुवंशिकता आणि ज्या वातावरणात आपण वाढतो या दोन्ही गोष्टी आपल्या झोपेच्या सवयींवर परिणाम पाडण्यास समान भूमिका बजावतात.

यावर उपाय म्हणून लोकांनी दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.

रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केल्याने मूत्रपिंडाच्या आजारापासून संरक्षण मिळू शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

विशेष करून तरुण वयापासूनच मीठ कमी सेवन करण्याची सवय ठेवली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. देशात मूत्रपिंड निकामी होणे हे मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण आहे. स्वयंपाकघराची सूत्रे महिलांकडे असतात तेव्हा त्यांनीच मिठाचा वापर कमी करण्याची आवश्यकता आहे.

२५ ते ३० वयोगटातील मूत्रपिंड रुग्णांची संख्या वाढत असून ती पाच-सहा वर्षांपूर्वी एवढी जास्त नव्हती, असा दावा मुंबईच्या सैफी रुग्णालयाचे मूत्रविकारतज्ज्ञ अरुण दोशी यांनी केला आहे. अतिरक्तदाब हा विकार मूत्रपिंड निकामी होण्यामुळे होऊ शकतो.

किंबहुना ते त्यामागे एक प्रमुख कारण आहे. मीठ आणि रक्तदाब यांचा थेट संबंध आहे. जास्त मीठसेवनाने रक्तदाब वाढतो. रक्तदाब कमी झाला तर अतिरक्तदाब आटोक्यात येऊ शकतो.

आपण आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. त्यात मीठ कमी असले पाहिजे, चीज बटर, साखर व मीठ हे प्रमुख घटक शरीरास घातक आहेत. त्यांचे सेवन कमी केले पाहिजे. उत्तर भारतातून तरुण मुले डायलिसिससाठी येतात, असे अपोलो रुग्णालयाचे डॉ. अमित लंगोटे यांनी सांगितले. लठ्ठपणा व मधुमेह यामुळे मूत्रपिंडाचे विकार होतात असे सांगून ते म्हणाले की, महिलांमध्ये मिठाचा कमी वापर करण्याबाबत जागृती केली पाहिजे. लोणची, पापड, चटणी व जादाचे नमकीन पदार्थ टाळले पाहिजेत.

सैफी रुग्णालयाचे हेमल शहा यांनी सांगितले की, कमी उष्मांक व कमी मीठ असलेला आहार आवश्यक आहे. फळे, भाज्या, कमी मेदाचे दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश आवश्यक आहे. कधीच जेवणात जास्तीचे मीठ वाढून घेऊ नका. सॅलडवर मीठ टाकून घेऊ नका.

आदिती शेलार यांनी सांगितले की, वेदनाशामक औषधे व इतर औषधे शक्यतो टाळली पाहिजेत त्यामुळे मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो.

Dr. Chandrakumar Deshmukh
Dr. Chandrakumar Deshmukh
BAMS, Ayurveda Panchakarma, Pune
Dr. Akash Grampurohit
Dr. Akash Grampurohit
MS - Allopathy, ENT Specialist, Dharwad
Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune
Dr. Abhijeet  Shinde
Dr. Abhijeet Shinde
DNB, Cardiologist Diabetologist, 13 yrs, Pune
Dr. Chhaya Helambe
Dr. Chhaya Helambe
BAMS, Ayurveda Family Physician, 20 yrs, Pune
Hellodox
x