Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

कर्करोगाचे रुग्ण आणि कोविड -19 बद्दल आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे आणि त्या पासून होणारे धोके कमी कसे करावे?

मायग्रेनची समस्या म्हणजे सतत डोकेदुखी होणं, जे मेंदूच्या अर्ध्या भागात होत आणि 1 दिवसापासून तर 3 दिवसांपर्यंत राहू शकतो. आपल्यालाही जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय वेदना कमी करण्यास मदत करतील.

1. द्राक्षाचा रस प्या - द्राक्षांमध्ये अनेक डायटरी फायबर, विटामिन ए, सी आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे मायग्रेनच्या वेदनेतून आराम देतात. मायग्रेनचा त्रास असल्यास याचा रस दिवसातून दोन वेळा घ्या.

2. आलं - आलं तणाव आणि शारीरिक वेदना दूर करण्यात मदत करता, याशिवाय ते मायग्रेनच्या त्रासात ही आराम देतात. आल्याच्या रसात लिंबाचा रस घालून किंवा आल्याचा रस रुग्णाला दिल्याने रुग्णाला आराम मिळतो.

3. दालचिनी - मायग्रेनने डोकेदुखी झाल्यावर दालचिनी पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि कपाळावर लावा. मग अर्धा तासाने गरम पाण्याने कपाळ धुवा, असे केल्याने नक्कीच त्रास कमी होण्यास मदत मिळेल.


4. प्रकाशाच जाणे टाळा - मायग्रेनचा त्रास असल्यास जास्त प्रकाशात जाणे टाळावे, यामुळे जास्त वेदना होतात म्हणून कमी प्रकाशात जा किंवा चष्मा घाला.

5. डोक्यावर मालीश करा - मायग्रेनच्या वेदनेतून सुटकारा मिळविण्यासाठी डोकेच्या त्वचेवर मालीश करणे आणि मान स्ट्रेच करणे हे प्रभावी उपाय आहे.

उन्हाळा सुरू झाला की आपल्या त्वचेची आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं उन्हाच्या उष्ण्तेमुळे आपल्या त्वचेला बरच नुकसान होण्याची शक्यता असते. साधारणतः उन्हाळयात प्रखर काटेदार उष्णता, फंगल इन्फेक्शन, शरीराची दुर्गंधी, सुर्याची प्रखर उष्णता, या समस्या उद्भवु शकतात, यातही ज्यांची त्वचा तैलीय आहे त्यांना जास्त समस्यांना सामोरं जावं लागतं कारण उष्णतेमुळे त्यांच्या त्वचेवरचे तेल संपुर्ण शरीरावर पसरू लागते. या समस्यांकरता खाली काही उपाय दिले आहेत जे अमलांत आणुन आपण ब-याच अंशी या समस्यांपासुन सुटका करून घेउ शकता.

उष्णतेपासुन त्वचेला वाचवण्याचे उपाय

उष्णतेपासुन स्वतःचे संरक्षण करण्याचा सगळयात महत्वाचा उपाय म्हणजे भरपुर प्रमाणात पाणी पिणे. कारण सुर्याची उष्णता आपल्या शरीरातील पाणी जास्त प्रमाणात शोषुन घेते म्हणुन उन्हाळयात पाणी, फळांचे ज्युस, नारळ पाणी, ताक, लिंबाचे सरबत, असे पेय प्यायला हवेत. मौसमी फळ जसे टरबुज, खरबुज, काकडी आपल्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. अॅसीडयुक्त पेयांपासुन दुर राहावे कारण हे आपल्या शरीराकरता हानीकारक तर असताततच शिवाय आपल्या त्वचेला सुध्दा याने हानी पोहोचते.

उन्हाळयात कमीत कमी 2 वेळा अंघोळ करून आपण उन्हापासुन आपले संरक्षण करू शकता.

शक्यतोवर 11 ते 3 या कालावधीत उन्हात बाहेर पडुच नये. पडावेच लागले तर छत्री, गाॅगल, स्कार्फ, याचा उपयोग करावा. प्रखर उन्हात बाहेर पडतांना सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नये. हे कधीही विसरता कामा नये की सुर्याची प्रखर किरणं थेट आपल्यावर पडल्यास अनेक शारीरीक समस्यांना आपल्याला तोंड दयावे लागू शकते.

कधीही आपण बाहेर असु तर सोबत नेहमी सनस्क्रिन लोशन ठेवावे. प्रखर उन्हात बाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास अगोदर सनस्क्रिन लोशनचा उपयोग करावा, नेहमी चांगल्या कंपनीच्या सनस्क्रिन लोशनचाच वापर करावा आणि वापरण्यापूर्वी त्याला लावण्याचे नियम वाचुनच उपयोगात आणावे.

उन्हाळयात शक्यतोवर गडद मेकअप टाळावा. नेहमी हलका आणि साधारण मेकअप करून बाहेर पडा, आणि जेव्हांही मेकअप चे सामान खरेदी कराल तर पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या मेकअप सामानांना प्राथमिकता दया, डोळयांचे संरक्षण करण्याकरता नेहमी वाॅटर प्रुफ आयलायनरचाच उपयोग करा आणि उन्हापासुन वाचण्याकरता आईल फ्रि अर्थात बिना तेलाच्या क्रिमचाच उपयोग करा.

उन्हापासुन वाचण्याकरता काही घरगुती उपाय:

मुल्तानी मातीत गुलाबजल मिसळुन आठवडयातुन किमान 3 ते 4 वेळा चेहे-याला लावावी.

पाणी जास्त असलेले फळ घेउन आपल्या घामोळयांना लावावे जास्त गरमी असल्यास आपण आठवडयातुन 4 ते 5 वेळा हा उपाय करू शकता.

तोंडात फोड होणे

कोबी ला पाण्यात उकळावे आणि दिवसातुन किमान 1 वेळा त्या पाण्याला प्यावे याने तोंडातील फोडांपासुन सुटका मिळेल. परंतु समस्या गंभीर असेल तर ताबडतोब दातांच्या डाॅक्टरला दाखवायला हवे.

फंगल इन्फेक्शन

उन्हाळयात आपल्या त्वचेची काळजी घेण्याकरता दिवसातुन किमान 2 वेळा अंघोळ करावी.

उन्हाळयात शक्यतोवर बुटाचा वापर टाळावा. अशी चप्पल किंवा सॅंडल वापरावी ज्यामुळे आपल्या पायांना हवा लागु शकेल.

उन्हाळयात काॅटनचे कपडे वापरावे. टाईट जिन्स् किंवा ब्लाउज वापरू नये.

फंगल इन्फेक्शन संबधीत गंभीर समस्यांकरता त्वचाविशेषज्ञाला भेटावे.

प्राकृतिक उपाय:

गुलाबजल मधे नैसर्गिक गुणधर्म असतात आणि गुलाब जल आपल्या त्वचेकरता लाभकारक देखील आहे. काॅटन कपडयाला गुलाबजलात बुडवुन त्वचेला लावा याने आपली त्वचा फ्रेश राहील.

काकडीचा रस आणि टरबुजाचा रस यांना समान प्रमाणात घेउन चेहे-याला लावा. लावण्यापूर्वी रसाला फ्रिजमध्ये ठेवा.

शक्यतोवर उन्हाळयाकरता समरपॅक घरीच बनवावा.

टरबुजाचे आणि खरबुजाचे छोटे छोटे तुकडे करून चेहे-याला लावावे 20 मिनीटांनंतर चेहरा धुवावा.

काकडीला कापुन दहयात मिसळुन चेह-याला लावल्यास चेहरा आणि आपल्या त्वचेला ताजेपणाचा अनुभव मिळतो.

बेसन आणि दहयाचे मिश्रण चेहे-याला लावावे. 20 मिनीटांपर्यंत ठेवुन थंड पाण्याने चेहरा धुवावा.

शक्यतोवर घरी बनवलेल्या वस्तुंचाच उपयोग चेहे-याकरता करावा.

आपल्या चेहे-याला सुर्याच्या थेट संपर्कात येण्यापासुन वाचवावे.

या सर्व उपायांनी आपण ब-याच प्रमाणात उन्हापासुन संरक्षण मिळवु शकता.

Dr. Pradip Pandhare
Dr. Pradip Pandhare
DNYS, 9 yrs, Pune
Dr. Ashish Babel
Dr. Ashish Babel
BHMS, Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Dhanraj Helambe
Dr. Dhanraj Helambe
BAMS, Ayurveda Family Physician, 20 yrs, Pune
Dr. Prashant Innarkar
Dr. Prashant Innarkar
BHMS, Medical Cosmetologist Trichologist, 8 yrs, Pune
Dr. Sheetal Shetty
Dr. Sheetal Shetty
BHMS, Homeopath Psychologist, 5 yrs, Pune
Hellodox
x