Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

ग्रीन टी हे एक नैसर्गिक फॅट बर्नर असून त्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. ग्रीन टी पिताना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.

आज आपण बराच काळापासून आपल्या डोक्यात घर करून बसलेल्या ग्रीन टीबद्दलच्या समज-गैरसमजांबाबत जाणून घेणार आहोत. त्यामागचं वास्तवही जाणणार आहोत.

ग्रीन टी हे आजकाल हेल्थ ड्रिंक म्हणून खूप प्रसिद्ध झालं आहे. अगदी जिम ट्रेनरपासून डाएटिशनपर्यंत आणि ऑफिसमधल्या सहकाऱ्यापासून शेजारच्या मैत्रिणीपर्यंत सगळे जण ग्रीन टी पिण्याचा सल्ला देत असतात. हा ग्रीन टी कसा घ्यावा, किती घ्यावा आणि कधी घ्यावा याबाबत मात्र प्रत्येकाच्या मनात बरेच प्रश्न असतात. कित्येकदा गैरसमजही असतात. ग्रीन टीचा उपयोग आणि तो घेण्याची योग्य पद्धत या विषयी...

आपल्याला सर्वांना माहीत आहे, की ग्रीन टी हे एक नैसर्गिक फॅट बर्नर असून त्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. ग्रीन टी पिताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

> दिवसाला साधारणपणे तीन ते चार कप ग्रीन टी घ्यावा म्हणजे त्याचे फायदे मिळू शकतात. जास्त प्रमाणात घेतल्यानं फायद्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते. उदा. पित्त वाढणं, मळमळ होणं, झोप न लागणं इत्यादी.

> बनवण्याची कृती - सर्वप्रथम पाणी उकळावं. गॅस बंद करून त्यात ग्रीन टी पावडर किंवा ग्रीन टी डीप सॅशे टाकून झाकण ठेवावं आणि दोन मिनिटं ते मुरू द्यावं. चवीला किंचित लिंबू, आलं नाहीतर पुदिना किंवा गवती चहा घातला तरी चालेल; परंतु साखर किंवा दूध मात्र अजिबात घालू नये.

> ग्रीन टीची चव थोडी वेगळी असल्यामुळे कित्येकांना आवडत नाही आणि खासकरून गरम ग्रीन टी पिणं त्यांना अवघड वाटू शकतं. ज्यांना गरम प्यायला आवडत नाही, त्यांनी गार करून प्यायला तरी चालेल.

> ज्यांना उग्र चव आवडत नाही, त्यांनी सुरुवातीला कमी प्रमाणात ग्रीन टी वापरावा किंवा एक लीटर पाण्यात एक कप ग्रीन टी घालून तो विरघळवून घ्यावा. हे पाणी बाटलीत भरून दिवसभर थोडेथोडं प्यावं.

> ग्रीन टी कधीही प्यायला तरी चालतो. पण संध्याकाळी उशिरा तो पिणं टाळावं. ग्रीन टीमुळे उत्साह वाढू शकतो; कारण ते मेंदूला उत्तेजन देणारे पेय आहे. रात्री प्यायल्यानं झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

> साधारणपणे दोन जेवणाच्यामध्ये ग्रीन टी घ्यावा. वजन कमी करण्यासाठी म्हणून घ्यायचा असेल, तर काही आहारतज्ज्ञ तो जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर घ्यायला सांगतात. यामुळे चरबीचं आणि काही पोषक घटकांचे शरीरात होणारं शोषण कमी होऊ शकतं.

बदलत्या हवामानामुळे व्हायरल इन्फेक्शन होणं ही बाब सामान्य आहे. परंतु हे इन्फेक्शन दररोजच्या जीवनात परिणाम करत असतं. याकडे दुर्लक्ष करणं नुकसानकारक ठरु शकतं. व्हायरल इन्फेक्शनमुळे घशात खवखव, सर्दी-खोकला, ताप येण्याची शक्यता असते. यावर लगेचच इलाज करणं आवश्यक आहे. आपल्या दररोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होण्यास मदत होऊ शकते.

मध आणि आलं -
आल्यामध्ये अॅन्टी-इंफ्लमेटरी गुण असतात. जे ताप आणि सर्दीपासून बचाव होण्यासाठी फायदेशीर ठरतात. सोबतच घशात होणारी खवखव, श्वास घेण्यास होणाऱ्या त्रासापासूनही बचाव होऊ शकतो. व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी हा उत्तम उपाय ठरु शकतो.

तुळस आणि काळी मिरी -
तुळस रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते. अस्थमा, आर्थराइटिसचा त्रास दूर करण्यासाठी मदत होते. सर्दी-खोकल्यावरही तुळस गुणकारी आहे. काळी मिरीमध्ये असणारे अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-बायोटिक गुण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

हळद -
एक ग्लास गरम पाण्यात चिमुटभर हळद मिसळून रोज सकाळी पिणं फायद्याचं ठरु शकतं. लिव्हरसाठी हे पाणी गुणकारी आहे. लिव्हरमधील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी याची मदत होते. हळदमध्ये अॅन्टी-व्हायरल आणि अॅन्टी-बॅक्टेरियल गुण असल्याने ते व्हायरल इन्फेक्शनवर लढण्यासाठी सक्षम बनवतात. व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी मदत करतात.

आवळा -
थंडीच्या दिवसांत आवळ्याचं सेवन फायदेशीर ठरतं. आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन असतं. आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासह पचनक्रियाही सुधारण्यास मदत करतं. व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठीही याचा फायदा होतो.

लसून -
आरोग्यासाठी लसून वरदान मानला जातो. लसूनमध्ये असणारे अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-फंगल गुण अनेक आजारांपासून सुरक्षा कवच प्रदान करतात. जे लोक दररोज लसनाचं सेवन करतात त्यांना व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो. रोज सकाळी २ पाकळ्या लसून खाणं फायदेशीर ठरु शकतं.

आजच्या बदलत्या जीवनशैलीच्या जगात मोबाईल काळाची गरज बनला आहे. त्याशिवाय दिवस प्रत्येकाला अर्धा वाटतो. लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल तासंतास वेळ व्यतीत करतात. विशेष म्हणजे मोबाईलला जोड असते ती म्हणजे हेडफोन्सची. बाजारात सध्या अनेक प्रकारचे हेडफोन्स उपलब्ध आहेत. आणि अशा हेडफोन्सची क्रेझ तरूणांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे. पण हे हेडफोन्स आपल्या आरोग्यास अत्यंत घातक असतात. त्यामुळे हेडफोन्सचा वापर फक्त कामापूरता करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात.

मोबाईलमध्‍येही आवाज वाढवताना एक नोटीफिकेशन येते की, यापेक्षा आवाज वाढवल्‍यास कानांचे नुकसान होऊ शकते. त्‍यामुळे या नोटीफिकेशनकडे दुर्लक्ष करु नका. त्‍यापेक्षा जास्‍त आवाज वाढवू नका. अन्‍यथा लवकरच तुमची ऐकण्‍याची क्षमता कमी होऊ शकते. ९० डेसिबलपेक्षा जास्‍त आवाज ऐकणे कानांसाठी हानिकारक असते.

त्याचप्रमाणे आपले हेडफोन्स कोणासोबतही शेअर करू नका त्यामुळे दुस-या व्‍यक्‍तीकडून होणा-या आजारांचे संक्रमण थांबवता येते. दुस-याचे हेडफोन घेण्‍याशिवाय कोणताच पर्याय उपलब्‍ध नसेल तर ते हेडफोन आधी नीट स्‍वच्‍छ करावे मगच कानात घालावे.

हेडफोनची सवय लागल्यमुळे ही सवय फार मोठया आजाराला सुद्धा आमंत्रण देवू शकते. काही जणांना हेडफोनचे व्‍यसनच लागते. हेडफोन लावले नाही तर त्‍यांचे डोके दुखायला लागते. सततच्‍या हेडफोनमुळे त्‍यांना लहानलहान आवाज ऐकू येणे बंद होते. त्यामुळे हेडफोनचा वापर फक्त कामासाठी करणे गरजेचे आहे.

मासे आवडणाऱ्या अनेक जणांना लोकांना मासे खाणे टाळणं शक्य होत नाही. माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे आरोग्यास फायदेशीर ठरणारे मासे पावसाळ्यात मात्र नुकसानकारक ठरतात. त्यामुळे पावसाळ्यात मासे खाणे टाळणे योग्य ठरेल. अन्यथा जीभेची चव आरोग्यास त्रासदायक होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात मासे न खाण्याचा सल्ला डॉक्टरदेखील देतात.

पावसाळ्यात मासे खाणं का टाळालं?

- हा काळ मासे आणि अन्य समुद्री जीवांसाठी प्रजननाचा काळ असतो. अंडी असलेले मासे खाल्याने पोटात इंफेक्शन आणि फूड पॉयजनिंग होण्याचा धोका वाढतो.

- पावसाळ्यात जल प्रदूषणाची संभावना वाढते. अशावेळी माशांवर घाण जमा होते. पाण्याने धुतल्यानंतरही तो थर निघून जात नाही. त्यामुळे मासे खाल्याने टायफाईड, कावीळ आणि डायरिया यांसारखे आजार होऊ शकतात.

- पावसाळ्यात मच्छीमारी बंद असते. त्यामुळे बाजारात ताजे मासे मिळणे कठीण होते. पॅक किंवा स्टोर केलेले मासे मिळतात. मासे अधिक काळ स्टोर केल्याने खराब होऊ शकतात. हे खाल्याने इंफेक्शनचा धोका वाढतो.

चहा-बिस्किट खाण्याची सवय अनेकांना असते. अनेकांना बिस्किटं खूप आवडतात. मात्र जास्त प्रमाणात बिस्किटं खाल्ल्यास शरीराचं नुकसान होऊ शकतं.

बिस्किटं तयार करण्यासाठी पाम तेलाचा वापर केला जातो. यामुळे हृदय विकार होण्याचा धोका असतो.

बहुतांश बिस्किटं मैद्यापासून तयार केली जातात. मैद्यामुळे आतड्यांवर विपरित परिणाम होतो.

बिस्किटातील मैद्यामुळे वजन वाढतं. यासोबतच रक्तातील साखरेचं प्रमाणदेखील वाढतं. मैद्याचा समावेश असलेली बिस्किटं जास्त प्रमाणात खाल्ल्यास अपचनाचाही त्रास होतो.

बिस्किटांमधील काही घटकांमुळे त्यांची चटक लागते. त्यामुळे व्यक्ती एका बिस्किटावर न थांबत नाही. त्यामुळे बिस्किटं खाण्याची सवय लागते.

साधारणपणे 25 ग्रॅम बिस्किटामध्ये 0.4 ग्रॅम मीठ असतं. जास्त बिस्किटं खाल्ल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

बिस्किटं अधिक काळ टिकावीत यासाठी प्रिझर्व्हेटिव्स वापरली जातात. ती रक्तासाठी हानीकारक असतात.

बिस्किटांमध्ये सोडियम बेन्झोएटचा वापर होतो. त्याचा डीएनएवर विपरित परिणाम होतो.

Dr. Vasudha Pande
Dr. Vasudha Pande
MBBS, Ophthalmologist, 16 yrs, Pune
Dr. Ganesh Pachkawade
Dr. Ganesh Pachkawade
MS/MD - Ayurveda, Cupping Therapist Dermatologist, 4 yrs, Pune
Dr. Bhagyashri Madake- Kuber
Dr. Bhagyashri Madake- Kuber
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. C  L Garg
Dr. C L Garg
MBBS, Family Physician General Medicine Physician, 46 yrs, Pune
Dr. Rashmi Mathur
Dr. Rashmi Mathur
BPTh, Physiotherapist Homecare Physiotherapist, 5 yrs, Pune
Hellodox
x