Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

भिजलेल्या चण्यात प्रोटीन, फायबर, मिनरल, आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे बर्‍याच आजारांपासून तसेच निरोगी राहण्यास मदत मिळते. तसे, प्रत्येकास चणे खायला पाहिजे पण विशेषकरून पुरुषांनी नक्कीच याचे सेवन केले पाहिजे.

* खाण्याची योग्य पद्धत - मूठभर चणे घेऊन ते आधी स्वच्छ करून घ्यावे. रात्री त्याला भिजत ठेवावे. सकाळी ते चणे चावून चावून खावे. जर आवडत असल्यास चण्याचे पाणी देखील गाळून त्या पाण्याचे सेवन करू शकता.


* दररोज सकाळी भिजलेले चणे खाण्याचे फायदे :-

1. शक्ती आणि ऊर्जा - नियमित भिजलेले चणे खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.

2. कब्जा पासून बचाव - भरपूर फायबर असल्याने पोट स्वच्छ होतो आणि पचन चांगले होते.

3. स्पर्म संख्या वाढते - सकाळी 1 चमचे साखरेसह ते खाण्याने स्पर्म काउंट वाढतो.

4. फर्टिलिटी वाढते - दररोज सकाळी मूठभर भिजलेले चणे मधासोबत खाल्ल्याने फर्टिलिटी वाढते.

5. मूत्र समस्या - भिजलेले चणे गुळासोबत खाल्ल्याने वारंवार युरीन जाण्याची समस्या दूर होते. पाईल्सचा त्रास देखील कमी होण्यास मदत होतो.

6. निरोगी त्वचा राहते, वजन वाढण्यास मदत मिळेल, सर्दी खोकल्यापासून रक्षण होते, किडनीचा त्रास नाहीसा होतो तसेच हार्ट निरोगी राहत.


11. भिजलेले चणे खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते


12. रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळते.

घरच्या गरी तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही अगदी सोपे घरगुती उपाय करु शकता. पाहुया असेच काही सोपे घरगुती उपाय

1. थंड दूध (Cold Milk)

जर तुम्हाला अॅसिडीचा त्रास झाला असेल तर तुम्हाला दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हे दूध थंडगार पिण्यासाठी सांगितले जाते. जर तुम्हाला अॅसिडीचा भयंकर त्रास होत असेल अशावेळी तुम्ही जर थंडगार दूध प्यायलात तर अॅसिडीटीमुळे होणारी पोटातील जळजळ कमी होते. शिवाय तुमची अॅसिडीटी दाबून धरण्यासाठी तुम्हाला थंड दूध मदत करते. जर तुम्हाला अॅसिडीचा असा त्रास झाला तर तुम्ही लगेचच थंड दूधाचे प्राशन करा. पण थंड दूध पिताना बाजारात मिळणारे फ्लेवर्ड दूध टाळा. कारण त्यामुळे तुमची अॅसिडीटी कमी होणार नाही.

2. व्हॅनिला आईस्क्रिम (Vanilla Ice Cream)

आता अनेकांना दुधाचा नुसता वास जरी आला तरी ओकारी येते. अशांनी अॅसिडीटी झाल्यानंतर मस्त व्हॅनिला आईस्क्रिम खावे. त्यामुळे तुम्हाला चाळवलेला अॅसिडीचा त्रास कमी होईल. पोटात थंडावा निर्माण होईल आणि मग तुम्हाला बरं वाटेल. अॅसिडीटी झाल्यावर व्हॅनिला आईस्क्रिम खा असे सांगितले जाते. कारण बेसिक फ्लेवरच्या या आईस्क्रिममध्ये व्हॅनिलाचा ईसेन्स वगळता काहीच नसते त्यामुळे तुमच्या पोटातील पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते.

3. केळं (Banana )

जेवणानंतर अनेकदा केळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण केळ अन्नावर प्रक्रिया करायला मदत करते किंवा अन्न खाली ढकलायला मदत करते असे म्हटले तरी चालेल. अॅसिडीटीमध्ये तुमच्या पोटात अनेक गॅसेस तयार झालेले असतात. काहींना अॅसिडीटी झाली की, करपट ठेकर येऊ लागतात. अशावेळी जर तुम्ही एखादं केळं खाल्लं तरी तुम्हाला आराम पडू शकतो.

खरंतरं अॅसिडीटी झाल्यानंतर कोणताही आंबट पदार्थ खाऊ नका असे सांगितले जाते. याचे कारण असे की, त्याच्या आंबटपणामुळे तुम्हाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. पण आवळ्याच्या बाबतीत तसे होत नाही. तुम्हाला अॅसिडीटी झाल्यानंतर तुम्ही आवळा सुपारी किंवा आवळ्याची एखादी फोड जरी तोंडात ठेवली तरी तुम्हाला आराम मिळू शकतो. आवळ्याचा रस अॅसिडीटी कमी करतो.

4. आवळा (Amla)

खरंतरं अॅसिडीटी झाल्यानंतर कोणताही आंबट पदार्थ खाऊ नका असे सांगितले जाते. याचे कारण असे की, त्याच्या आंबटपणामुळे तुम्हाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. पण आवळ्याच्या बाबतीत तसे होत नाही. तुम्हाला अॅसिडीटी झाल्यानंतर तुम्ही आवळा सुपारी किंवा आवळ्याची एखादी फोड जरी तोंडात ठेवली तरी तुम्हाला आराम मिळू शकतो. आवळ्याचा रस अॅसिडीटी कमी करतो.

5. जिऱ्याचे पाणी (Cumin seed water)

तुम्ही घरी असताना तुम्हाला अॅसिडीचा त्रास झाला असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करुन पाहू शकता. पाणी गरम करुन त्यात साधारण एक चमचा जिरे घाला. जिऱ्याचा अर्क संपूर्णपणे पाण्यात उतरल्यानंतर ते पाणी थंड करुन त्या पाण्याचे सेवन करा. अॅसडीटीमुळे तुमच्या पोटात मुरडा आला असेल किंवा तुम्हाला गॅसेस झाल्यासारखे वाटत असतील तर तुम्ही जिऱ्याचे पाणी अगदी हमखास प्या. तुम्हाला लगेचच बरे वाटेल.

6. लवंग (Cloves)

लवंगाचे भरपूर फायदे आहेत. त्यातील एक फायदा तुम्हाला अॅसिडीटीसाठीही होऊ शकतो. तुम्हाला अॅसिडीचा त्रास होत आहे .असे जाणवायला लागले की, तुम्ही लगेचच दाताखाली एखादी लवंग ठेवा. लवंगाचा रस पोटात गेल्यानंतर तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास कमी होईल.

7. नारळाचे पाणी (Coconut Water)

नारळाचे पाणीही अॅसिडीटीसाठी चांगले आहे. दूधाप्रमाणेच ते तुम्हाला थंडावा देते. त्यामुळे तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही नारळाचे पाणी प्या. नॅचरल कुलर असल्यामुळे तुमच्या पोटातील आग शमवण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त असते. साधारण एका नारळाचे पाणी तुम्ही पूर्ण प्या. ते पिताना हळूहळू प्या. तुम्ही एकदम पाणी प्यायला जाल तर तुम्हाला उलटीसुद्धा होऊ शकते. (उलटी झाल्यास उत्तम कारण त्यामुळे तुमची अॅसिडीटी लगेचच बाहेर पडेल.आणि तुम्हाला बरं वाटेल)

8. आलं (Ginger)

आल्याचा एखादा तुकडा किंवा आल्याचे पाणी तुम्ही प्यायल्यात तर तुम्हाला बरे वाटेल.अॅसिडीटी नंतर तुमच्या घशाकडे तिखट असल्यासारखे वाटते किंवा ढेकर येतात. काहींना पोटात दुखायला लागते. काहींना डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी आल्याचा एक तुकडा काम करुन जातो. आल्याचा रस पोटात गेल्यानंतर तुम्हाला बरे वाटते जर गॅसेस पोटात घुटमळत असतील तर त्याचा मार्गही मोकळा होतो

9. कोकमचा रस (Kokum Juice)

काहींना अॅसिडीटी झाल्यानंतर सतत उलटी होत असल्याचे वाटते पण उलटी सहजासहजी होत नाही. अशावेळी तुमच्या घरी जर कोकमाचा आगळ असेल तर तुम्ही तो आंबट रस त्यात मीठ घालून तुम्ही तो अगदी घोट- दोन घोट रस प्यायलात तरी तुम्हाला लगेचच उल्टी होईल. ही उल्टी झाल्यानंतर तुम्हाला लगेचच बरे वाटेल. पण हा प्रयोग तुम्ही घरी असतानाच करा. कारण तुम्हाला उल्टी झाल्यानंतर थोडासा थकवा येईल पण लगेचच बरे वाटले.

10. बडिशेप (Fennel Seeds)
अनेकदा काही तेलकट किंवा तिखट खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होईल असे वाटू लागते. असे झाले आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला अॅसिडीटा त्रास हमखास होऊ शकतो. अशावेळी असे काही खाल्ल्यानंतर तुम्ही लगेचच बडिशेपेचे सेवन करा तुम्हाला बरे वाटेल.

रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला अनेकजण देतात. मात्र यामागचे नेमके कारण काय हे अनेकांना माहित नसते. मग जाणून घ्या भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे


भिजवलेले बदाम का खावेत ?

बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही एन्जाईम्समुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच त्यांना रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषणता मिळण्यास मदत होते.

भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे -:

1. गर्भाची योग्यरित्या वाढ होण्यास मदत होते

गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर स्त्रियांना सहज पचायला शक्य असतात.

2. भिजवलेले बदाम पचनशक्ती सुधारण्यास मदत करते

‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

3. रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. विशेषतः 30 -70वयोगटातील पुरूंषांमध्ये हा फरक प्रामुख्याने आढळून आला.

4. हृद्याचे कार्य सुधारते

जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुआर बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

5. शरीरातील ‘बॅड कोलेस्ट्रेरॉल’ वर नियंत्रण ठेवते

आजकाल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळीअवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढल्याने हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे. बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढते.

6. वजन घटवण्यास मदत होते

तुम्ही वजन घटवण्याच्या मिशनवर आहात ? मग नियमित भिजवलेले बदाम अवश्य खावेत. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी रिलेटेड मेटॅबोलिक डिसऑर्डर’ यांच्या अहवालानुसार बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते. जिम आणि डाएटशिवाय घटवा दिवसभरात 500 कॅलरीज !

एका अभ्यासानुसार घोरण्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होतो हे सिद्ध झालं आहे. याखेरीज घोरणाऱ्या व्यक्तीच्या एकूण दैनंदिन कामावर याचा खोलवर परिणाम होतो. श्वास कोंडल्याने दचकून जाग येते, मग पुन्हा झोपेसाठी वेळ जातो. काहीवेळा झोपेतून अचानक जाग आल्यावर डोकेदुखीचा त्रास होतो. पुन्हा झोपायचं म्हटलं तर त्यालाही वेळ जातो. मग पुन्हा तेच चक्र सुरु राहतं. याचा परिणाम म्हणजे झोप पूर्ण होत नाही आणि चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे अशी लक्षणं दिसू लागतात.

१. उताणे झोपू नका

श्वसनक्रिया सुरळीत राहावी यासाठी उताणे झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपा. उताणे झोपल्याने होतं काय, की जीभ मागच्या बाजूला सरकते आणि श्वसनाच्या मार्गात अडथळे येतात. उताणे झोपलेल्या माणसाच्या तोंडून जो विचित्र आवाज येत असतो तो हवेचा मार्ग रोखल्याने निर्माण होतो.

२. मद्यपान टाळा

एकंदरीत आरोग्यासाठी मद्यपान हे वाईटच पण घोरण्याच्या बाबतीत म्हणाल तर घोरणाऱ्या व्यक्तीने मद्यपान हे टाळलच पाहिजे. याचं कारण असं, की झोपण्याच्या ३ ते ४ तास आधी मद्यपान केल्यास घश्यातले स्नायू शिथिल पडतात, त्यामुळे न घोरणारी व्यक्तीही घोरू लागते.

३. पूर्ण झोप घ्या

घोरण्याच्या अनेक कारणांमध्ये अपुरी झोप हे एक कारण आहे. ७ ते ८ तासांची झोप ही आरोग्यासाठी फायदेशीर असते. पुरेशी झोप मिळत असेल तर घोरणे कमी होते. याखेरीज झोपेची वेळ ठरवा. भरपूर काम करून तुम्ही जर उशिरा झोपत असाल तर तुम्हाला गाढ झोप लागते. इतकी गाढ झोप ही घोरण्याला निमंत्रणच असते.

४. वजन कमी करा

स्लिम व्यक्तींनाही घोरण्याचा त्रास असतो, पण लठ्ठ व्यक्तींच्या बाबतीत हे प्रमाण जास्त आहे. गळ्याच्या भोवती जर मांस वाढलेलं असेल तर झोपेत घश्यावर दबाव निर्माण होतो. अशावेळी श्वास सुरळीत करण्यासाठी शरीराला जास्त प्रयत्न करावे लागतात. तर, वजन कमी करणे हा घोरण्यावरचा एक उत्तम उपाय असू शकतो.

५. नेजल स्ट्रीप किंवा नेजल डायलेटर वापरा

नेजल स्ट्रीप आणि नेजल डायलेटर हे दोन्ही श्वसनक्रिया सुरळीत करण्याचं काम करतात. घोरताना श्वास कोंडला जाऊ नये म्हणून हे दोन उपाय रामबाण ठरू शकतात.

६. पुरेसं पाणी प्या

दिवसभरात पुरेसं पाणी प्यायल्याने घोरणे कमी होते. हे कसे ? त्याचं काय आहे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने नाकाच्या आतील भाग आणि घशातल्या टाळूचा भाग चिकट होतो. हा चिकटपणा अर्थातच श्वसनक्रियेत अडथळा आणतो. परिणामी घोरणे सुरु होते भाऊ. म्हणूनच पुरेसं पाणी प्या. फक्त घोरणे नाही तर इतर अनेक आजार कमी होतील.

मासिक पाळी नियमित असणे आरोग्यासाठी योग्य असतं. अनेक स्त्रियांची पाळी येण्याची वेळ निश्चित नसते त्यामुळे अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. अनेकांना कधी कधी पाळी लवकर येते तर कधी उशिरा तर कधी-कधी दोन-तीन महिने उलटले तरी येतच नाही. पाळीवेळेवर येणे निरोगी असण्याचे लक्षणे असतात.

पाळीचे चक्र 21 किंवा 35 दिवसाचे असते. अश्यावर जर पाळी वेळेत यावी असं वाटत असेल तर येथ आम्ही काही उपाय सांगत आहोत.
1 आलं
आल्याचा चहा प्यायल्याने पाळी लवकर येते. पूर्वीच्या काळी बायका पाळी आणण्यासाठी आल्याचा वापर करत असे. हे उपयोगी असते.

2 हळद
दुधात हळद टाकून घेतल्यास पाळी लवकर येण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी आणि अजून ही पारंपरिक उपचार साठी हळदीचा वापर केला जातो. हळदी चे गुणधर्म औषधी असतात. हळद उष्ण प्रकृतीची असते.

3 ओवा आणि गूळ
ओवा आणि गुळाचे सेवन केल्याने मासिक पाळी लवकर येते. रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा आणि
गूळ टाका आणि ते पाणी सकाळी अनोश्यापोटी घ्या असे केल्याने पाळी लवकर येते.

4 कच्ची पपई
कच्ची पपई खाल्ल्याने किंवा कच्च्या पपईचा ज्यूस घेतल्याने मासिक पाळी नियमित आणि वेळेत येईल.
5 दूध- हळद
दुधात हळद टाकून काही आठवडे सेवन केल्याने देखील पाळी नियमित होते.

6 दालचिनी
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून काही आठवडे सेवन केल्याने पाळी नियमित होते.

7 बडीशेप
एक ग्लास पाण्यात दोन चमचे बडीशेप मिसळून रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून प्या. हे नियमित केल्यास समस्या नाहीशी होईल.

Dr. Sivasubramanian Pachamuthu
Dr. Sivasubramanian Pachamuthu
MD - Allopathy, Dermatologist, 6 yrs, Dharmapuri
Dr. Sujit Shinde
Dr. Sujit Shinde
BHMS, Family Physician Homeopath, 24 yrs, Pune
Dr. Kusum Garudkar
Dr. Kusum Garudkar
MS/MD - Ayurveda, Family Physician Ayurveda, 23 yrs, Pune
Dr. Darshankaur Chahal
Dr. Darshankaur Chahal
BAMS, Ayurveda Family Physician, 23 yrs, Pune
Dr. Rohan Shirole
Dr. Rohan Shirole
MS/MD - Ayurveda, Dermatologist Family Physician, 4 yrs, Pune
Hellodox
x