Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

जिम जाणाऱ्या लोकांना नेहमीच प्रश्न पडतो की, जिमला जाण्याआधी काही खावं किंवा खाऊ नये? सगळ्यांनाच शरीराला पोषण आणि वर्कआउट करण्यासाठी ऊर्जा मिळावी असं वाटत असतं. पण अनेकदा चुकून अशा काही गोष्टी खाल्ल्या जातात की, त्याचा आपण आजारी पडू शकतो किंवा शरीरावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता असते. अनेकांना हे माहीत असतं की, जिमला जाण्याआधी काय खावं, पण अनेकांना हे माहीत नसतं की, जिमला जाण्याआधी काय खाऊ नये. तर आज आम्ही तुम्हाला जिमला जाण्याआधी काय खाऊ नये हे सांगणार आहोत.

दूध आणि दुधापासून तयार पदार्थ

वर्कआउट करण्याआधी दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ जसे की, दही आणि लस्सी इत्यादींपासून दूर रहावे. दूध हे कॅल्शिअमचं मोठं स्त्रोत आहे. पण दुधात लॅक्टोजही असतं. त्यामुळे वर्कआउटआधी दुधाचं सेवन केल्याने आतड्यांना नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळे दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ वर्कआउट करण्यापूर्वी सेवन करू नये.

तळलेले-भाजलेले पदार्थ

जिममध्ये जाण्याआधी तळलेले किंवा भाजलेले कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. कारण त्यांमध्ये अतिरिक्त फॅट असतात जे आतड्यांवर दबाव टाकतात. याने तुम्हाला डायरिया, पचनाची समस्या आणि आतड्यांसंबंधी समस्या होण्याचा धोका असतो. त्यामुळे वर्कआउटआधी तळलेले-भाजलेले पदार्थ खाऊ नयेत.

फ्लॉवर

फ्लॉवर किंवा ब्रोकलीसारख्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, पण यात सल्फरही असतं. ज्यामुळे काही लोकांना गॅसची समस्या होत असते. त्यामुळे वर्कआउटआधी फ्लॉवर किंवा ब्रोकलीचं सेवन करू नका.

सोडा

जिममध्ये जाण्याआधी सोडा किंवा त्यापासून तयार पदार्थांचं सेवन करणे टाळावे. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. सोड्यामुळे गॅसची समस्या होते. याने तुम्हाला वर्कआउट करताना अडचण येऊ शकते.

गोड पदार्थ टाळा

जिमला जाण्याआधी गोड पदार्थ खाणेही टाळावे. कारण यात असलेल्या एक्स्ट्रा शुगर, फॅट आणि बटरमुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला वर्कआउट करताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे वर्कआउटआधी कधीही गोड पदार्थ खाऊ नये.

मेंदू आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अंगांपैकी एक आहे. याला जराही इजा किंवा जखम झाली तर शरीराचे इतर अंग प्रभावित होतात. सोबतच जीव सुद्धा जाऊ शकतो. दरवर्षी भारतात लाखों लोक डोक्याला गंभीर जखम म्हणजे ट्रॉमेटिक ब्रेन इंजरीचे शिकार होता आणि अनेकांचा यात जीवही जातो. त्यामुळे डोक्याला किंवा मेंदूला झालेल्या छोट्या इजेकडे दुर्लक्ष करू नका. आज आम्ही तुम्हाला ट्रॉमेटिक ब्रेन इंजरी आणि त्याच्या बचावाबाबत सांगणार आहोत.

mayoclinic.org ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रॉमेटिक ब्रेन इंजरी गाडी चालवताना अॅक्सिडेंट दरम्यान किंवा एखाद्या हिंसक घटनेदरम्यान होऊ शकते. त्यासोबतच मेंदूला खोलवर आघात झाल्यानेही ही स्थिती निर्माण होऊ शकते. यात मेंदूच्या आतील नसा फाटतात आणि ब्लीडिंग होऊ लागते. अनेकदा स्कलमध्ये फ्रॅक्चर होतो आणि ते मेंदूच्या पेशींमध्ये घुसतं. या स्थितीला ट्रॉमेटिक ब्रेन इंजरी असं म्हणतात.

ट्रॉमेटिक ब्रेन इंजरीची लक्षणे

१) यात काही सेकंद किंवा मिनिटांसाठी व्यक्ती बेशुद्ध होतो.

२) डोकदुखी आणि उलट्या होऊ लागतात.

३) बोलण्यात अडचण येऊ लागते आणि चक्कर येऊ लागतात. शरीरावरील कंट्रोल सुटतो आणि बॅलन्स करण्यात समस्या होते.

४) डोळ्यांसमोर धुसर दिसू लागतं आणि कानांमध्ये नेहमी आवाज येऊ लागतात.

५) तोंडाची चव बदलते आणि लाइट लावल्यावर किंवा मोठ्या आवाजाने त्रास होऊ लागतो.

अशात जोरात झटका लागला असेल किंवा छोटी इजाही झाली असेल तर डॉक्टरांना लगेच संपर्क करा. असही होऊ शकतं की, बाहेर जास्त जखम दिसत नसेल पण आत जखम मोठी असेल. याकडे दुर्लक्ष केल्याने डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते आणि व्यक्ती कोमामध्येही जाऊ शकते.

एका रिसर्चनुसार, मेंदूमध्ये पुन्हा पुन्हा जखम झाल्यास किंवा ट्रॉमेटिक ब्रेन इंजरीने डिजनरेटिव्ह ब्रेन डिजीज होऊ शकतो. ज्यामुळे व्यक्ती अल्झायमर, पार्किन्स डिजीज आणि डिमेंशियाने ग्रस्त होऊ शकतो.

ट्रॉमेटिक ब्रेन इंजरीपासून बचाव

- याप्रकारच्या इंजरीपासून बचाव करण्यासाठी ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट लावा. गाडीत एअरबॅग असाव्यात, जेणेकरून अपघात झाल्यास जखमी होऊ नये. जर सोबत लहान मुलं असतील तर त्यांना नेहमी मागच्या सीटवर बसवा.

- गाडी चालवताना मद्यसेवन किंवा ड्रग्सचं सेवन करू नका आणि मद्येसवन केल्यावरही गाडी चालवू नका.

- टू-व्हिलर चालवताना हेल्मेट वापरा. घरातही कुठे घसरून पडू नका. त्यासाठी आवश्यक काळजी घ्या.

- बाथरूम आणि त्याच्या आजूबाजूला मॅट ठेवा, जेणेकरुन तुम्ही घसरणार नाहीत.

आपल्यापैकी अनेकांना पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशातच चारचौघांत शरमेने मान खाली घालवायला भाग पाडणारे हे पांढरे केस काळे करण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या हेअर डाय प्रोडक्ट्सचा आधार घेतो. अनेकदा तर आपल्या सिम्पल केसांना नवीन लूक देण्यासाठी नवीन कलर करण्याचा प्लॅन करण्यात येतो. तुम्हीही असाच केसांना कलर करण्याचा प्लॅन करत असाल तर, मासिक पाळी येण्याआधी केसांना डाय किंवा कलर करू नका. असं आम्ही नाही तर हेअर कलर एक्सपर्ट्स सांगत आहेत की, मासिक पाळी येण्याआधी केसांना ब्लीच करणं टाळावं. कारण असं केल्याने तुमच्या स्काल्पला म्हणजेच, डोक्याच्या त्वचेला वेदना किंवा इजा होण्याचा धोका असतो.

मासिक पाळीआधी स्काल्प सेन्सिटिव्ह होतात

तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळी येण्याआधी स्काल्प इतर दिवसांच्या तुलनेमध्ये अधिक सेन्सिटिव्ह होतात. अशातच जर या दिवसांमध्ये केसांना कलर केला गेला तर, स्काल्पना वेदना होतात. याबाबत जर तुम्ही कोणत्याही हेअर एक्सपर्टसोबत बोलाल तेव्हा ते तुम्हाला हेच सांगतील की, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये केसांना कलर किंवा डाय करण्यासोबतच कोणत्याही ब्युटी ट्रिटमेंट करणं टाळावं.

स्काल्पना वेदना आणि इरिटेशन होऊ लागतं

मासिक पाळीआधी किंवा मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही तुमचे केस डाय करत असाल, तेव्हा तुम्हाला स्काल्पमध्ये इरिटेशन जाणवू लागेल. यूनिवर्सिटी ऑफ मिशिगनमधील एका टिमने 2003मध्ये एक संशोधन केलं होतं, ज्यामध्ये असं आढळून आलं की, महिलांमध्ये एस्ट्रोजेन लेव्हल बदलते. तेव्हा त्यांना मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान वेदना आणि सेन्सिटिव्हीटी जाणवते.

ब्रेन नॅचरल पेनकिलर इन्डॉर्फिन रिलीज नाही करत...

संशोधनानुसार, शरीरामध्ये एस्ट्रोजनची उच्च पातळी मेंदूला संकेत देते की, नॅचरल पेनकिलर सिस्टममार्फत इन्डॉर्फिनला रिलीज करा जे वेदना कमी करण्यासाठी मदत करतं. दरम्यान, एस्ट्रोजनच्या लो लेवलमुळे मेंदूची नॅचरल पेनकिलर सिस्टम काम करत नाही आणि वेदनांप्रति सेन्सिटिव्ह होतात.

त्यामुळे सावधनता बाळगणं फायदेशीर

दरम्यान, सर्व महिलांना मासिक पाळी दरम्यान सारखाच अनुभव येत नाही. या विषयावर आणखी खोलवर रिसर्च करण्याची गरज आहे. परंतु एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, जर आपण सावधगिरी बाळगली तर आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.

चपात्या तयार करण्यासाठी दररोज पीठ मळण्यात येतं. अनेकदा उरलेलं पीठ आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या पिठाच्या चपात्या तयार करतो. अनेकदा जॉब करणाऱ्या महिला वेळेचं मॅनेजमेंट करण्यासाठी पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवून देतात. जशी गरज असेल तसं फ्रिजमधील पिठाचा वापर करतात. यामुळे नक्कीच वेळ वाचतो. परंतु तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहीत नसेल की, अनेक असे पदार्थ असतात. ज्यांचं फ्रिजमध्ये ठेवून सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. जर तुम्हीही दररोज पीठ फ्रिजमध्ये ठेवत असाल तर असं करणं तत्काळ थांबवा.

फ्रिजमध्ये पीठ मळून ठेवण्याची तुमची ही सवय तुम्हाला कदाचित महागात पडू शकते. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. परंतु हेचं खरं आहे. फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पिठ मळल्यानंतर लगेचच त्याचा वापर केला पहिजे. जेव्हा तुम्ही पीठ मळल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवता, त्यावेळ त्यामध्ये रासायनिक बदल होतात. हे बदल आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजमधील हानिकारक किरणं त्यावर परिणाम करतात. त्यामुळे पिठामध्ये काही रासायनिक क्रिया घडून येतात. जेव्हा तुम्ही अशा पिठापासून चपाती तयार करून खाता. त्यावेळी तुमचं आजारी पडणं स्वाभाविक आहे.

पीठ फ्रिजमध्ये ठेवावं की नाही?

आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, फ्रिजमध्ये पीठ मळून ठेवू नये. शिळ्या पिठाच्या चपात्यांची चव ताज्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या चपात्यांपेक्षा वेगळी असते.

फर्मेंटेशनची प्रक्रिया

ओल्या पिठामध्ये फर्मेंटेशनची क्रिया लवकर सुरू होते. त्यामुळे या पिठामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि हानिकारक केमिकल्स तयार होतात. हे सर्व बॅक्टेरिया आरोग्याला नुकसान पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरतात. यापासून तयार केलेल्या चपात्या खाल्यामुळे पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

पोटदुखी

शिळ्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या चपात्या, पुऱ्या किंवा पराठे शिळे असतात. यामुळे त्या सर्व समस्यांना सामोरं जावं लागतं ज्या शिळ्या चपात्या खाल्याने होतात. खासकरून पोटदुखीचा त्रास होणं एक सामान्य समस्या आहे.

बद्धकोष्ट

गव्हाचं पीठ पचण्यासाठी जड असतं. ज्या व्यक्तींना बद्धकोष्टाचा सामना करावा लागतो त्यांना चपात्या न खाण्याचा सल्ला देण्यात येतो. शिळ्या चपात्या खाल्यानेसामान्य लोकांनाही बद्धकोष्टाची समस्या होऊ शकतात.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

उन्हाळ्यामध्ये जेव्हा पारा 40च्या आसपास पोहोचतो. त्यावेळी अंगाची अगदी लाहीलाही होते. अशातच पंखा किंवा कूलरही काही करू शकत नाही. अशातच एयर कंडिशनर म्हणजेच एसी हा एकमेव उपाय असतो. आपण दिवसभर सेंट्रलाइज्ड एसी ऑफिसमध्ये असतो आणि रात्रीसुद्धा एसीमध्येच झोपतो. हैराण करणाऱ्या उकाड्यापासून शांतता देणारा एसी हवाहवासा वाटला तरिही हा आरोग्याला अत्यंत नुकसान पोहोचवतो. जाणून घेऊया सतत एसीमधये राहिल्याने आरोग्यासोबतच सौंदर्याच्या होणाऱ्या समस्यांबाबत...

ताज्या हवेपासून दूर रहावं लागतं

एसी सुरू करताना आपल्याला दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे एसीची हवा बाहरे न जाता त्या खोलीतच राहते आणि तेथील वातावरण थंड राहते. अशातच आपल्यापर्यंत ताजी हवा पोहोचत नाही, जी आरोग्याला नुकसान पोहोचवणारी असते. त्यामुळे सतत थकवा जाणवतो. एसीचा डक्ट स्वच्छ नसेल तर तुम्हाला श्वासाशी निगडीत समस्या आणि लंग इन्फेकशन होऊ शकतं.

अत्यंत थंड वातावरण

अनेकदा आपण झोपलेले असतो, तेव्हा तापमान फार थंड होतं. पण जेव्हा आपण जागे असतो तेव्हातरी आपण ते मन्टेन करू शकतो. परंतु झोपलेलं असताना अनेकदा हे आपल्या आरोग्याच्या सहन करणाऱ्या क्षमतेपेक्षा कमी होते. थंडाव्यामुळे डोकेदुखी आणि पाठदुखी यांसारख्या समस्या होऊ शकतात. गरजेपेक्षा जास्त थंडाव्यामुळे सांधेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो.

कोरडपणा

एयर कंडिशनर हवेमधील ओलावा शोषून घेतो. एवढचं नाही तर हे आपली त्वचा आणि केसांचा ओलावा शोषून घेतात. ज्यामुळे स्किन आणि केस ड्राय होतात. एवढचं नाही कमी वायातच वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात. तसेच यामुळे त्वचेशी निगडीत समस्या होऊ शकतात.

करा हे उपाय

तुम्ही ऑफिसचा एसी बंद करू शकत नाही. परंतु स्वतःला एसीची सवय लावून घेऊ नका. घरीदेखील कमीत कमी एसी लावा आणि तापमान नॉर्मल ठेवा. एसीमध्ये बसल्यानंतर त्वचेवर सतत मॉयश्चरायझर लावा.

जास्त पाणी प्या

एसीमध्ये बसल्यानंतर सतत पाणी पित रहा. ऑफिसमध्ये असाल तर मध्येमध्ये उठून अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला फ्रेश वातावरणात राहता येईल. ऑफिसनंतर संध्याकाळी किंवा सकाळी पार्कमध्ये फिरण्यासाठी जा.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.

Dr. Mayur Narayankar
Dr. Mayur Narayankar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Vidya Deore
Dr. Vidya Deore
MS/MD - Ayurveda, Gynaecologist, 14 yrs, Pune
Dr. Pallavi Joshi
Dr. Pallavi Joshi
BHMS, Family Physician Homeopath, 1 yrs, Pune
Dr. Mahesh Zagade
Dr. Mahesh Zagade
BHMS, Homeopath General Physician, 3 yrs, Pune
Dr.  Kishor Selukar
Dr. Kishor Selukar
BDS, Dentist, 9 yrs, Pune
Hellodox
x