Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
World Breastfeeding Week : स्तनपान बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही ठरतं फायदेशीर
#बाळा ची काळजी

आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटल जातं की, बाळाला जन्म देताना आईचा पूर्नजन्म होतो. तसेच तिच्या शरीरातही अनेक बदल घडून येतात. बाळाला जन्म देणं ही निसर्गानं महिलांना दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे, असं समजलं जातं.

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीक (World Breastfeeding Week) म्हणून साजरा करण्यात येतो. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.आई झाल्यावर त्या महिलेच्या जबाबदाऱ्याही वाढतात. त्या बाळाला सांभाळणं न्हाऊ-माखू घालणं यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आईला कराव्या लागतात. पण यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला दूध पाजणं. हा अनुभव महिलेसाठी अत्यंत सुखद असतो, पण एखाद्या कोपऱ्यात किंवा बंद दाराआडच महिलेन बाळाला दूध पाजावं असं म्हटलं जातं. या सर्वांचा विरोध करून जर महिलेनं बाळाला सर्वांच्या डोळ्यादेखत, उघड्यावर दूध पाजलं तर ती महिला चर्चेचा विषय बनते. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. पण तुम्हाला माहीत आहे का? स्तनपान करणं हे बाळासोबतच आईसाठीही फायदेशीर असतं. जाणून घेऊया स्तनपान करण्याचे बाळ आणि आईला होणारे फायदे...

स्तनपान केल्याने बाळाला होणारे आरोग्यदायी फायदे :

- आईचं दूध बाळासाठी अमृतासमानच असतं. सहा महिने बाळाला इतर कशाचीही गरज नसते. जेवढं जास्त वेळ बाळाला आईचं दूध मिळतं तेवढाच वेगानं बाळाचा मानसिक आणि शारीरिक विकास होतो.

- संशोधनानुसार, बाळाच्या विकासासाठी आणि पोषणासाठी ज्या तत्वांची आवश्यकता असते. ती सर्व तत्व आईच्या दूधामध्ये सामावलेली असतात.

- आईच्या दूधामध्ये मुबलक प्रमाणात अ‍ॅन्टीबॉडिज असतात. त्यामुळे बाळाचा इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो.

- स्तनपान करण्याचे भावनात्मकही फायदे असतात, असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. कारण ज्यावेळी आई बाळाला दूध पाजते, त्यावेळी बाळ आईच्या सर्वात जवळ असतं. त्यामुळे ते भावनात्मक पद्धतीने एकमेकांशी जोडले गेलेले असतात.

स्तनपान केल्याने आईला होणारे आरोग्यदायी फायदे :

- स्तनपानामुळे आईला ब्रेस्ट कॅन्सर आणि अन्य अनेक आजार होण्याचा धोका कमी होतो.

- स्तनपान केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी दूर होतात. त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहते.

- स्तनपानामुळे शरीरातील ऑक्सीटोक्सिन हार्मोनचा स्त्राव वाढतो. त्यामुळे गरोदरपणानंतर गर्भाशय आणि शरीराला पुन्हा त्याच अवस्थेत आणण्यास मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

Dr. Himashree Wankhede
Dr. Himashree Wankhede
MBBS, Ophthalmologist Cataract surgeon, 5 yrs, Pune
Dr. Sonali Chavan
Dr. Sonali Chavan
BHMS, Homeopath, 10 yrs, Pune
Dr. Dr.Sandip Narkhede
Dr. Dr.Sandip Narkhede
MS/MD - Ayurveda, Infertility Specialist Lactation Consultant, 10 yrs, Pune
Dr. Nitin Desai
Dr. Nitin Desai
BAMS, Ayurveda Panchakarma, 22 yrs, Pune
Dr. Sarita Bharambe
Dr. Sarita Bharambe
DHMS, Family Physician, 30 yrs, Pune