Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
टंग  अल्सर
#रोग तपशील#घोरते जीभ#सुजलेला जीभ



माऊथ अल्सर हा तोंडात विशिष्ट भागात होणारा, काहीसा त्रासदायक प्रकार! यामुळे बोलणे, खाणे हे सारेच कठीण होऊन बसते. काहींमध्ये हे अल्सर पोषणघटकांच्या कमतरतेमुळे उद्भवतात अशांना मल्टीव्हिटामिन्सच्या गोळ्या घेतल्याने आराम मिळण्यास मदत होते. मात्र माऊथ अल्सरच्या समस्येशी सामना करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायदेखील करू शकता.

वेदना कमी करण्यासाठी खास टीप्स -:
- माऊथ अल्सरमुळे जर खूपच वेदना होत असतील, तर बर्फाचा लहानसा गोळा घेऊन, त्याजागी फिरवा आणि थंड पाण्याने चूळ भरून टाका.
- लवंग चघळल्यानेदेखील वेदना कमी होण्यास मदत होते. लवंग चघळल्यानंतर त्याचा रस, अल्सर झालेल्या भागाकडे जाऊ द्या.
- अल्सर झालेल्या भागाला संसर्ग होऊ नये म्हणून मीठाच्या पाण्याने चूळ भरा.
यामुळे अल्सर लगेच कमी होणार नाही, परंतू वेदना कमी होण्यास मद्त होइल हे लक्षात ठेवा.

माउथ अल्सरवर परिणामकारक काही घरगुती उपाय –
1. मध :
आद्रता निर्माण करण्याचा नैसर्गिक गुणधर्म मधात असल्याने डीहायड्रेशनच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. मधामुळे व्रण जाण्यास मदत होते तसेच नव्या टिश्यूंची निर्मीती व वाढ होण्यास मदत होते. मधातील अ‍ॅन्टी-मायक्रोबियल घटकांमुळे माऊथ अल्सर लवकर बरे होण्यास मदत होते.
टीप -: कापसाच्या बोळ्यावर मध घेऊन तो व्रणावर ठेवा. किंवा मधात हळद घेऊन त्याची पेस्ट अल्सरवर लावल्याने त्यापासून मुक्ती मिळवण्यास मदत होते.

2. तुळस :
तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळसीच्या पानांमुळे ताण कमी करण्यास मदत होते.
टीप -: रोज 3-4 वेळेस काही तुळशीची पाने, पाण्यासोबत चघळा. यामुळे अल्सरपासून आराम मिळवण्यास मदत होते. तसेच त्याची पुनरावृत्ती कमी करण्यास प्रतिबंध करते.

3. नारळ :
सुके खोबरे, खोबर्‍याचे तेल तसेच नारळाचे पाणी हे तीनही घटक माऊथ अल्सरपासून आराम मिळवण्यास मदत करतात.
टीप –: शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत होते. खोबर्‍याच्या तेलाचे काही थेंब थेट अल्सरवर टाकल्यास तसेच काही खोबर्‍याचे तुकडे चाऊन खाल्ल्यास दाह व वेदना कमी होण्यास मदत होते व अल्सरपासून देखील आराम मिळतो.

4. खसखस :
खसखस शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतो. आयुर्वेदानुसार,शरीरातील अधिक प्रमाणतील उष्णता हे माऊथ अल्सरच्या निर्मीतीचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे खसखस यापासून आराम मिळवण्यास फारच उपयुक्त आहे.
टीप -: खसखसीच्या बिया ठेचुन त्यात साखर टाकून खा. यामुळे अल्सरपासून आराम मिळवण्यासाठी मदत होईल

5. ज्येष्ठमध :
ज्येष्ठमधातील औषधी गुणधर्मामुळे अल्सरमुळे होणारी दाहकता कमी होण्यास मदत होते. ज्येष्ठमधाच्या काड्या किंवा पावडरच्या स्वरुपात ज्येष्ठमध उपलब्ध असते.
टीप -: ज्येष्ठमधाची काडी पातरीवर उगाळून त्याची पेस्ट अल्सरवर लावा. जर तुमच्याकडे ज्येष्ठमधाची पावडर असेल तर ती मधात एकत्र करून लावा. तसेच तुम्ही ज्येष्ठमधाची पावडर, हळद गरम दुधात टाकून ते दिवसातून तीनदा घ्या.

माऊथ अल्सरबाबत घ्या विशेष दक्षता –
माऊथ अल्सर हा सामान्यतः आठवड्याभराच्या काळात बरा होतो. काही घरगुती उपचारांच्या सोबतीने लवकर आराम मिळण्याचीही शक्यता असते. मात्र तोंडात अल्सर आहे पण वेदनादायक नाही म्हणून त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या,कारण वेदनारहित माऊथ अल्सर हे तोंडाच्या कर्करोगाचे एक लक्षण आहे.

Dr. Ashish Bandewar
Dr. Ashish Bandewar
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 1 yrs, Pune
Dr. Sachin Patil
Dr. Sachin Patil
BHMS, Family Physician Homeopath, 11 yrs, Pune
Dr. Dr Anirudha Vaidya
Dr. Dr Anirudha Vaidya
MPTh, Neuro Physiotherapist Obesity Specialist, 7 yrs, Pune
Dr. Sonawane Shivani
Dr. Sonawane Shivani
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 3 yrs, Pune
Dr. Kamlesh Manikhedkar
Dr. Kamlesh Manikhedkar
BDS, Dental Surgeon, 9 yrs, Pune