Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
निस्तेज त्वचेसाठी मिल्क पावडर प्रभावी उपाय
#स्किनकेअर#सौंदर्य हॅक्स#नैसर्गिक उपचार

आताच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर त्याचप्रमाणे चेहऱ्यावर होताना दिसत आहे. टॅनिंग, पिंपल्स, पिंगमेंटेशन, ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्यांनी त्रासले असाल तर एक फेसपॅक अत्यंत फायदेशीर ठरेल. बाजारात अनेक प्रकारचे फेसपॅक उपलब्ध आहेत. पण त्यात वापरलेल्या रसायनांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठी मिल्क पावडरने असे बनवा फेसपॅक्स…

मुलतानी माती चेहऱ्याच्या देखभालीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. विशेषतः तेलकट त्वचेसाठी ती अतिशय फायदेशीर ठरते. यासाठी मुलतानी माती आणि मिल्क पावडर समान प्रमाणात घ्या. त्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. गुलाबपाण्याचे काही थेंब घाला. त्यानंतर चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

निस्तेज त्वचेवर तजे आणण्यासाठी चमचाभर मिल्क पावडरमध्ये दोन चमचे लिंबाचा रस घाला. नंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा. सुकल्यावर पाण्याने स्वच्छ धुवा.

पिंपल्सने त्रासले असाल तर मिल्क पावडरमध्ये मध आणि गुलाबपाणी घाला. पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

केसर असल्यास मिल्क पावडरमध्ये मिसळा आणि पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ स्वच्छ पाण्यात धुवा.

Dr. Piyush  Jain
Dr. Piyush Jain
MS - Allopathy, Ophthalmologist Pediatric Ophthalmologist, 5 yrs, Pune
Dr. Renu Vatkar
Dr. Renu Vatkar
MDS, Pune
Dr. Amruta Gite
Dr. Amruta Gite
BDS, Dental Surgeon Dentist, Pune
Dr. Tejaswini Bidve
Dr. Tejaswini Bidve
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Vrushali Garde
Dr. Vrushali Garde
MBBS, Psychiatrist, 11 yrs, Pune