Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
टिनिटस
#रोग तपशील#कानदुखी



कान वाजतोय

कोणीही काहीच बोलले नाही तरी कानात एखादा आवाज ऐकू येतो, असे आपल्याबाबत कधी झाले आहे का? कधी कानात शिट्टी वाजल्यासारखे वाटते का? असे होत असेल त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्यामुळे टिनिटस होऊ शकतो. टिनिटस ही खूप गंभीर समस्या नाही, असे लोकांना वाटते. कारण अशाप्रकारे आवाज ऐकायला आल्यास तो भ्रम असल्याचे ते मानतात. अनेकदा ही समस्या हानिकारक ठरू शकते. कारण त्यामुळे लक्ष भटकू शकते. बऱ्याच लोकांच्या कानात काही काही आवाज येत असतात. कानातील हे आवाज कशाही प्रकारचे असू शकतात. कधी नुसता ‘सूऽसूऽऽ’ असा आवाज येतो, तर कधी शिटी वाजविल्यासारखा. समुद्राचा आवाज येतो, तसाही आवाज आपल्या कानात येऊ शकतो. या त्रासाला इंग्रजीत ‘टिनिटस’ असे म्हणतात.

कानात येणारा आवाज दोन प्रकारचा असतो- सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह आवाज म्हणजे जो केवळ रुग्णाला ऐकू येतो. तर एखाद्या व्यक्तीच्या कानातील दुसऱ्या व्यक्तीलाही ऐकू येणारा आवाज म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. कान किंवा कानाच्या आजुबाजूच्या अवयवांमुळे किंवा चेता उद्दिपन आणि वहन (न्युरल एक्सायटेशन अॅण्ड कण्डक्शन) झाले की, कानात आवाज येतात. कानापासून मेंदूच्या भागात असे होऊ शकते. कानात आवाज येणे हे ‘सेंट्रल’ म्हणजे मेंदूशी संबंधित असू शकते किंवा ते ‘पेरिफेरल’ म्हणजे कानाशी संबंधित असू शकते.

कानात आवाज येण्याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे, धमनी-नीला (आर्टरी व्हेन) यांच्यात कानाच्या आजुबाजूला विकृती किंवा व्यंग निर्माण झाले तर किंवा मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीला अपवादात्मक शाखा फुटली तर. आपल्या कानाचे तिसरे हाड स्टेपिज हेही कानात आवाज येण्याचे एक कारण असू शकते. या स्टेपिजवर धमनी नसते, पण ती अपवादात्मक पद्धतीने आली तर किंवा रक्तवाहिनीला ट्युमर झाला तर कानात आवाज येतो. या सगळ्यांमुळे कानात येणारा आवाज हृदयाच्या स्पंदनांशी मेळ खाणारा असतो. कारण तो रक्तवाहिनीशी संबंधित असतो. मग कधी कधी सतत गुणगुणल्यासारखा किंवा गुंजारवासारखा आवाज येतो. हा झाला सब्जेक्टिव्ह प्रकार. दुसऱ्यांनाही ऐकू येणाऱ्या ऑब्जेक्टिव्ह प्रकारातील आवाजाचा संबंध युस्टेशियन ट्युबशी असतो. ही नलिका एक तर अपवादात्मक मोठी असते किंवा याला जोडलेले स्नायू सारखे आकुंचन पावतात. कधीकधी कानात आवाज येण्याबरोबरच श्रवणाचाही ऱ्हास होतो. हा श्रवणदोष नर्व्हशी संबंधित असतो किंवा मेंदूमधील कानाच्या भागाशी संबंधित असतो. सगळ्यात जास्त त्रास देणारा आवाज हा वयामुळे येणारा असतो.

टिनिटसची समस्या नेमकी काय आहे?
टिनिटसला सामान्य भाषेत कान वाजणे असे म्हणतात. अनेकदा टिनिटस झाल्यास कानात शिट्टी वाजल्यासारखे, फुंकर घातल्यासारखे आवाज येतात. काही व्यक्तींना दुसर्‍याचा आवाजही ऐकू येऊ शकतो. टिनिटस एक न्युरोलॉजिकल समस्या आहे. सर्वसाधारणपणे तणाव, अपुरी झोप, नैराश्य, सर्दी यामुळे ही समस्या निर्माण होते. त्याशिवाय मोबाईल कानाला लावून जास्त वेळ बोलणे किंवा हेडफोन वर खूप जास्त आवाजात गाणी ऐकण्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते.

कारणे कोणती?
कानात मळ : टिनिटन किंवा कान वाजणे या समस्येला कानातील मळ हे देखील एक कारण असू शकते. डॉक्टरकडे कान वाजताहेत, असे सांगितल्यास डॉक्टर प्रथम कानातील मळ किंवा मेण तपासतात.

औषधांचे कारण : काही औषधांचा परिणाम कानांवरही होतो. अ‍ॅस्प्रिन, काही प्रतिजैविके काही नैराश्यविरोधी औषधांचे अतिसेवन केल्यास टिटिनसची समस्या निर्माण होते. त्याशिवाय कर्करोगाच्या किमोथेरेपीमध्येही औषधांचा परिणाम आपल्या कानावर होतो.

दातांची समस्या : दातांच्या कोणत्याही समस्येमुळेही टिटिनस किंवा कानात आवाज येण्याचा त्रास होऊ शकतो. कान आणि डोके यांना जोडणार्‍या काही नसांचा संबंध जबड्याशी देखील असतो. दातांमध्ये वेदना किंवा विकार होत असल्यास कोणत्याही कारणाशिवाय आवाज ऐकायला येऊ शकतात.

डोक्याला झालेली इजा : अनेकदा डोक्याला झालेली इजा ही देखील टिनिटस ची समस्या होण्यास कारणीभूत असते. अपघात किंवा इतर कोणत्याही कारणावरून डोक्याला इजा झाल्यास कधी कधी कान वाजण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. आपल्या शरीरातील अवयवांचा संबंध मेंदूशी असतो. त्यामुळे कोणतीही जैवयांत्रिक समस्येमुळेही हा त्रास होतो.

आजारपणाची कारणे : काही

आजारांमुळेही टिनिटसची समस्या निर्माण होते. जसे मीनियर्स डिसीज, सर्दी, सायनस या सर्व आजारांमध्ये कान वाजण्याची समस्या होऊ शकते. मीनियर्स डिसिजमध्ये कानाच्या अंतर्गत भागात पातळ पदार्थ भरतो, त्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. त्याशिवाय उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांच्यामुळे कान वाजण्याचा त्रास होऊ शकतो.
उपाय कोणते?

टिटिनससाठी औषध प्रशासनाकडून प्रमाणित असे कोणतेही औषध नाही. त्यामुळे औषधे देऊन यावर उपचार शक्य होत नाहीत. टिनिटसवर उपचार कऱण्यासाठी त्याच्या कारणांचा शोध घ्यावा लागतो ज्याच्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. या आधारावर समस्येचे निवारण करता येते.

Dr. Richa Lal
Dr. Richa Lal
MBBS, Anesthesiologist, 8 yrs, Pune
Dr. Praisy David
Dr. Praisy David
BAMS, Pune
Dr. Anushree Bhonde
Dr. Anushree Bhonde
BPTh, Physiotherapist, 11 yrs, Pune
Dr. Pujitha Chowdary
Dr. Pujitha Chowdary
MD - Allopathy, General Medicine Physician Diabetologist, 6 yrs, Chennai
Dr. Pradnya Bafna
Dr. Pradnya Bafna
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune