Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
दाताचे संक्रमण
#रोग तपशील#दात आणि हिरड्यांची काळजी



दाताचे संक्रमण:

भारतीयांमध्ये एकूणच दातांच्या आरोग्याविषयी फारशी जागृती नाही. त्यामुळे दात किडणे, दुखणे, पडणे हे प्रकार नवीन नाही. त्यामुळे दंतवैद्याकडे लागणाऱ्या रांगांचे नवल वाटत नाही. मात्र दातांच्या या दुखण्यांसोबत आता शहरी भागात आणखी एका समस्येने डोके वर काढले आहे. खाण्याच्या पदार्थांमधील रसायनांमुळे दात झिजण्याचे व त्यामुळे त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र दात झिजण्यावर पूर्ण उपचार करण्याची प्रभावी पद्धती अजूनही भारतात फारशी उपलब्ध नाही. त्यामुळे दात झिजू नयेत, यासाठी काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहेत.

दात झिजणे म्हणजे नेमके काय?
विविध पदार्थांतील अॅसिडमुळे दातांचे संरक्षण करणारा इनॅमलचा थर निघून जातो. त्यामुळे दाताचा आतील संवेदनशील भाग उघडा पडतो.

काय परिणाम?
दातातील आतला भाग उघडा पडल्याने थंड, गरम पदार्थ खाल्ल्यावर दात ठणकतात. एवढेच नव्हे तर हवेशी संपर्क आल्यावरही दात शिवशिवतात.

झीज का होते?
लिंबू किंवा त्यासारख्या आंबट फळांचे ज्यूस, चायनीज फूड, शीतपेय, दारू तसेच तरणतलावात पोहोण्यामुळे दात झिजण्याचे प्रकार होतात. या पदार्थांमध्ये आम्लारी पदार्थ असतात. तरणतलावातील क्लोरिनमुळे दात झिजतात. विशेषत: ५.७ पेक्षा कमी पीएच असलेल्या पदार्थांमुळे दातावरील इनॅमलचे वातावरण झीजते. वाइनचा पीएच ३.८ पेक्षाही कमी असतो.

उपाय :
इलेक्ट्रोलिसिस पद्धतीने दातांवर फ्लुराइडचा थर लावण्याची पद्धत परदेशात विकसित झाली असली तरी ती महाग असल्याने भारतात अजूनही फारशा प्रमाणात उपलब्ध नाही. सध्या आपल्याकडे वापरात असलेल्या वैद्यकीय पद्धतीमध्ये मात्र काही प्रमाणात वेदना कमी होऊ शकतात. सध्या सेन्सिटीव्ह टूथसाठी वापरण्यायोग्य असलेल्या टूथपेस्टच्या जाहिराती दिसतात. फ्लोराइडचा अंश असलेल्या या टूथपेस्टमुळे आराम मिळू शकतो. मात्र या टूथपेस्ट वर्षानुवर्षे वापरणे फारसे योग्य ठरणार नाही.

प्रतिबंधात्मक उपाय:
कोल्ड्रिंक पिणे टाळावे. विशेषत: किशोरवयातील मुलांमध्ये हा प्रकार अधिक दिसत असल्याने लहान असतानाच खाण्याच्या योग्य सवयी लावाव्यात.
तलावात पोहोताना माउथ गार्ड लावावेत.

संत्री, लिंबू तसेच इतर अॅसिडीक प्रकारातील फळांचे रस मर्यादित प्रमाणात प्यावे.
चायनीज पदार्थ तसेच दारू विशेषत: वाइन टाळावी.

दातदुखी ही आबालवृद्धांमध्ये आढळाणारी अत्यंत त्रासदायक समस्या आहे. बर्‍याच जणांना दात किडल्यामुळे दातदुखीचा त्रास होतो. पण दात किडण्यासोबतच अन्य काही कारणांमुळेदेखील दातदुखीची समस्या उद्भवू शकते. मग जाणून घ्या दातदुखीची ही 10 कारणं….

दात कीडणे
दात कीडणे हे लक्षण जरी सामान्य असले तरीही दातदुखीचे एकमेव कारण नाही. दातांवर तयार होणार्‍या कॅव्हीटीज (छिद्र) यामुळे इनॅमलचे नुकसान होते व ते वेदनारहीत असते. मात्र ही छिद्र इनॅमलचा स्तर भेदून आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा दात संवेदनशील (सेंसिटिव्ह) बनायला सुरूवात होते. यामुळे वेदना तीव्र होतात तसेच दातांच्या आजुबाजूला संसर्ग झाल्याने पू तयार होण्याची शक्यता असते.

हिरड्यांचे आजार
हिरड्यांच्या आजारामध्ये त्या लाल होणे, त्यातून रक्तस्त्राव होणे अशी लक्षणं आपण सारेच जाणतो. मात्र हिरड्यांचे आजार गंभीर झाल्यास आरोग्यदायी दात सुद्धा दुखू शकतात. हिरड्यांजवळील संसर्गामुळे गालाजवळील भागाला, हाडांच्या टिशूला सूज येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

- तोंडावर पडणे किंवा जोरदार अपघात झाल्याने दात तुटण्याची किंवा फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. मात्र हे सहसा लक्षात येत नाही. फ्रॅक्चरची तीव्रता अधिक असल्यास म्हणजेच नर्व्हमध्ये फ्रॅक्चर झाल्यास वेदना अधिक प्रमाणात जाणवतात. तसेच अपघातामुळे दातांवर पडणार्‍या चिरेत प्लाग व बॅक्टेरिया वाढल्यानेदेखील दातदुखी वाढू शकते.

- काही वेळेस हिरड्यांचे विकार, कॅव्हीटीज अशा कोणत्याही आजारांव्यतिरिक्तही दातदुखीची समस्या उद्भवू शकते. प्रामुख्याने दातांच्या आतील भागात छुप्या स्वरुपाचे फ्रॅक्चर झाल्यास दातदुखी होऊ शकते. अशाप्रकारचे फ्रॅक्चर एक्सरे मध्ये देखील सहजपणे दिसून येत नाही. या समस्येला क्रॅक्ड टुथ सिंड्रोम असे म्हणतात. पदार्थ चावण्याच्या चुकीच्या पद्धती, रात्री झोपेत दात चावण्याची सवय, काही अपघात किंवा दातांमधील मोठ्या पोकळ्या यांमुळे ही समस्या उद्भवू शकते. कडक पदार्थ खाताना किंवा चावताना यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात.

- दात चावण्याची सवय असलेल्यांमध्ये दातदुखीची समस्या उद्भवू शकते. कारण दात चावताना तोंडातील टिशूवर अतिभार आल्याने दातांच्या दुखण्यासोबतच, जबड्यातील सांधे व स्नायूदेखील दुखतात.

- चुकीच्या पद्धतीने दात घासल्याने हिरड्या कमी होतात. यामुळे दातांजवळील सुरक्षाकवच कमी झाल्याने अति गरम व थंड पदार्थ खाल्ल्याने त्रास होण्याची शक्यता असते. अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाल्ल्याने देखील सेंसिटिव्हीटी वाढते व दात कमजोर होतात. (ब्रश करताना या ’7′ चुका टाळा)

- अक्कलदाढ येताना तीव्र वेदना होण्याची शक्यता असते. कारण ही दाढ काहीशा किंवा पूर्णपणे हिरड्यातून येते. मात्र पुरेशी जागा नसल्यास आजूबाजूच्या हिरड्यांसोबतच आजूबाजूच्या दातांवरही त्याचा परिणाम होतो. व भयंकर वेदना होऊ शकतात. मात्र अक्कलदाढ आल्यानंतर त्याची स्वच्छता बाळगणे अवघड असते. त्यामुळे संसर्ग होऊन तोंडात कीटाणू वाढण्याची शक्यता अधिक असते.

- वाकडे-तिकड्या रेषेत दात असणार्‍या व्यक्तींना दात चावण्यची सवय असेल तर प्रत्येक दातांवर पडणार्‍या वेगवेगळ्या भारामुळे नसांना त्रास होऊन दात दुखण्याची शक्यता असते.

- दातांना समान रेषेत आणण्यासाठी, दोन दातांमधील फ़ट कमी करण्यासाठी ब्रेसेस लावले जातात माते यामुळे बर्‍याचदा दातदुखी होते.
दातदुखी ही दातांच्या किंवा तोंडाच्या समस्येव्यतिरिक्तही अन्य काही करणांमुळेदेखील उद्भवू शकते.प्रामुख्याने सायनसच्या समस्येमध्ये नाकाजवळील हाडांचा भार दातांच्या मागच्या भागावर आल्याने दातदुखी होते. काही अपवादात्मक स्थितीमध्ये जबड्याचे दुखणे , दातदुखणे हे हृद्यविकाराचे लक्षण आहे.

Dr. Sabir Patel
Dr. Sabir Patel
MBBS, General Medicine Physician General Physician, 2 yrs, Bharuch
Dr. Rahul Pherwani
Dr. Rahul Pherwani
BHMS, 22 yrs, Pune
Dr. Vinay Sachdeva
Dr. Vinay Sachdeva
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 5 yrs, Pune
Dr. Chandrakumar Deshmukh
Dr. Chandrakumar Deshmukh
BAMS, Ayurveda Panchakarma, Pune
Dr. Kewal Deshpande
Dr. Kewal Deshpande
BHMS, 2 yrs, Pune